Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना २६/१२/२०२४ चा GR ची सविस्तर माहिती घ्या .

Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ६००००/-रु ते ३८०००/-रु पर्यंत अर्थसहाय्य मिळवण्याकरीता सविस्तर माहिती मिळवा .

Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५
स्वाधार योजना

१. Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५  योजनेचे स्वरूप –

Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालणारी फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य करते .

Table of Contents

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील मागासवर्गीय  शासकीय वसतीगृहात रीतसर अर्ज करूनही प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील इयत्ता ११ वी ,१२ वी तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून निवास , भोजन ,शैक्षणिक साहित्य व इतर अवश्यक सोयी सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक ती लागणारी रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात (DBT) जमा करण्याकरिता शासनाने ६ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे .

चला तर मग मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेची पात्रता काय आहे , आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात ,शैक्षणिक निकष कोणते ,रक्कम किती व कशी दिली जाते ,अर्ज प्रक्रिया कशी व कधी असते.तसेच  योजनेवर सनियंत्रण  कोणाचे असते इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखात घेणार  आहोत तरी हि पोस्ट शेवटपर्यंत वाचावी   .

२.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाची पात्रता काय आहे? 

Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाची मुलभूत पात्रता खालीलप्रमाणे पाहूया .

  1. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असने बंधनकारक असेल .
  2. अर्जदार  विद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा .
  3. अर्जदार  विद्यार्थी याने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल .
  4. विद्यार्थी च्या पालकाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे .
  5. सदर योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज केलेला परंतु वसतिगृह प्रवेश क्षमतेचा अभावी प्रवेश न मिळालेलेच विद्यार्थी या योजनेस पात्र असतील .
  6. सदर योजनेद्वारे शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करताना अर्जदार विद्यार्थी याने स्वाधार योजनेचा पर्याय नमूद करणे बंधनकारक राहील .
  7. अर्जदार विद्यार्थी हा प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या महानगरपालिकेच्या , शहराच्या /तालुक्याच्या ठिकाणी आहे ,अशा शहरातील तसेच तालुक्यातील अर्जदार विद्यार्थी हा रहिवाशी नसावा .
  8. अर्जदार विद्यार्थीचे बँक खाते राष्ट्रीय कृत बँकेत असणे आणि ते आधार लिंक असणे बंधनकारक असेल .
  9. अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील तृतीयपंथी (Transgender)पात्र असेल .
  10. वसतीगृह प्रवेशासाठी अर्जदार विद्यार्थीची गुणवत्तेनुसार प्रथमतः निवड करण्यात येईल व त्यानंतर गुणानुक्रमे स्वाधार योजनेचा लाभ लागू होईल .

३. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाचे  शैक्षणिक निकष –

  1. अर्जदार विद्यार्थी इयत्ता ११ वी ,१२ वी ,आणि त्यानंतरचे उच्च शिक्षण घेत असावा .
  2. शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेशास पात्र असलेला विद्यार्थी  स्वाधार योजनेस पात्र असेल .
  3. अर्जदार विद्यार्थी याने ज्या शिक्षण संस्थेत किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे ती ज्या महानगरपालिका /नगरपालिका/शहर/तालुका यातील रहिवाशी नसावा .
  4. परंतु महानगरपालिकेच्या हद्दीपासून ०५ कि.मी. परिसरातील  महाविद्यालय किंवा शिक्षण संस्थेत शिकत असलेले विद्यार्थीसुद्धा या योजनेच्या लाभास पात्र असतील .
  5. स्वाधार योजनेसाठी अर्ज करताना विद्यार्थी ज्या इयत्तेत शिक्षण घेत आहे त्याच्या मागच्या वर्षात त्यास किमान ५०% गुण असणे बंधनकारक असेल .
  6. जर विद्यार्थी याने एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सदर योजनेचा लाभ घेतला तर पुन्हा इतर शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर  शिक्षणासाठी प्रवेश घेतला तर त्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही .
  7. बिगर व्यावसायिक पदवीनंतर व्यावसायिक पदव्युत्तर ला लाभ मिळेल .उदा.बी.ए.नंतर एल.एल.बी.,किंवा बी.एड ,किंवा एम.बी.ए.
  8. दिव्यांग  विद्यार्थीना सदर योजनेत ३% आरक्षण आहे .परंतु त्यास जिल्हा शल्य चिकित्सक याचे ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असल्यचे प्रमाणपत्र बंधनकारक असेल.आणि दिव्यांग विद्यार्थीसाठी गुणवत्तेची टक्केवारी ४०% इतकी असेल त्यांच्यासाठी त्यांची स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल .
  9. सदर योजनेंतर्गत ३०% महिलांसाठी समांतर आरक्षण असेल .
  10. स्वाधार योजनेंतर्गत निवड झालेले विद्यार्थी यांनी ज्या संबधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत अभ्यासक्रमाच्या परीक्षेत पास होणे बंधनकारक असेल .
  11. सदर योजनेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थीना पदवी/पदव्युत्तर पदवी पूर्ण करताना ATKT मिळाली तर फक्त एकदाच अटीतून सूट मिळेल परंतु जर सदर विद्यार्थीस दुसऱ्यावेळी ATKT मिळाली तर तो योजनेसाठी पुढील लाभास अपात्र असेल .
  12. महाविध्यालयातील उपस्थीती किमान ७५% असणे गरजेचे आहे .

४.Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ योजनेसाठी अर्जदारास खालील महत्वपूर्ण निकषाची पूर्तता करणे अनिवार्य आहे .

  1. स्वाधार योजनेचा लाभ १० वि नंतर चे उच्चशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीयास लागू असेल .
  2. एका विद्यार्थीस जास्तीत जास्त ७ वर्ष सदर योजनेचा लाभ घेता येईल .
  3. तर व्यावसायिक अभ्यासक्रम साठी एका विद्यार्थीस जास्तीत जास्त ८ वर्ष या योजनेचा लाभ घेता येईल .परंतु लाभ घेताना विद्यार्थी वयोमर्यादा कमाल ३० वर्ष इतकी आहे .
  4. जर काही विद्यार्थी यांचा शिक्षणात खंड असेल आणि त्यानंतर तो शिक्षण घेण्यासाठी योजनेचा लाभ घेत असेल तर तो या योजनेस पात्र असेल .परंतु तो खंड २ वर्षा पेक्षा जास्त नसावा आणि त्याबरोबर निश्चित केलेल्या वयोमर्यादा पेक्षा जास्त नसावा .
  5. विद्यार्थी हा कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करणारा नसावा .
  6. विद्यार्थी याने प्रत्येक सत्र परीक्षेचा निकाल १५ दिवसांच्या आत संबधित गृह्पालाला सादर करणे बंधनकारक आहे .
  7. विद्यार्थी याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना,किंवा विध्यावेतन योजना या योजनांपैकी एकाच योजनेचा लाभ घेता येईल .
  8. जर एकच विध्यार्थी हा एकाच कालावधीत एक पेक्षा अधिक योजनेचा लाभ घेत असेल तर संबधित विध्यार्थी फौजदारी गुण्यास  पात्र राहील.आणि त्याने जो आर्थिक लाभ घेतलेला असेल ती रक्कम १२% व्याजासह वसूल केली जाईल .

५.Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५  योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  1. स्थानिक रहिवाशी नसून तो भाड्याने राहत असलेबाबत प्रतिज्ञापत्र तेही नोटरी करून व भाडेकरार नामा .
  2. स्वयं घोषणापत्र .
  3. कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश नसला बाबतचे प्रमाणपत्र .
  4.  महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा .
  5. ओळखपत्र पुरावा .
  6. बँक खाते तपशिल .

६.Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ अनुदान रक्कम किती आणि कशा स्वरुपात दिली जाते .

Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ सदर योजनेतील पात्र लाभार्थी विध्यार्थी यांना भोजन,निवास,शैक्षणिक साहित्य ,निर्वाह भत्ता .व इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्यसाठी या योजनेच्या माध्यमातून खालीलप्रमाणे रक्कम संबधित विद्यार्थी च्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते .

अ.क्र.खर्चाची बाबमुंबई शहर ,मुंबई उपनगर ,नवी मुंबई ,ठाणे ,पुणे पिंपरी चिंचवड ,नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विध्यार्ठीसाठी मिळणारी रक्कमइतर महसूल विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या

विध्यार्ठीसाठी मिळणारी रक्कम

इतर जील्याच्या ठिकाणी तसेच महानगर पालिकेच्या हद्दीपासून ५ कि.मी परिसरात असलेली महाविद्यालये /शैक्षणिक संस्था या ठिकाणी मिळणारी रक्कमतालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या

विध्यार्ठीसाठी मिळणारी रक्कम

1.भोजन भत्तारु,३२,०००/-रु २८,०००/-रु.२५,०००/-रु,.२३,०००/-

 

२.निवास भत्तारु,२०,०००/-रु,१५,०००/-रु,१२,०००/-रु,१०,०००/-
३.निर्वाह भत्तारु,८,०००/-रु,८,०००/-रु,६,०००/-रु,५,०००/-
प्रती विध्यार्थी एकूण देय रक्कम १० महिन्याकरितारु,६०,०००/-रु,५१,०००/-रु,४३,०००/-रु,३८,०००/-

सूचना – वरील रक्कमे व्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी प्रतिवर्ष रु,५,०००/- अ अन्य शाखेतील विध्यार्थ्यांना प्रतिवर्ष रु, २,०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी रोख स्वरुपात देण्यात येते .

७.Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ अर्ज प्रक्रिया –

  • दरवर्षी जून महिन्यात वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरु होते .तेंव्हाच विध्यार्थी यांनी वसतिगृह व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करावा ,
  • अर्ज online आणि ofline या दोन्ही पद्धतीने करता येतो .
  • online अर्ज करताना पोर्टल वरून अर्ज करावा .
  • online पोर्टल कार्यान्वीत नसेल तर गृहपाल /जिल्याचे सहाय्यक आयुक्त ,समाजकल्याण यांच्याकडे यांना offline अर्ज करावा .
  • अर्ज भरण्याची मुदत हि दरवर्षी जास्तीत जास्त ३० नोव्हेंबर पर्यंत असते .मात्र ज्या विध्यार्थी चा निकाल उशिरा लागल्याने महाविद्यालयातील प्रवेश उशिरा झाल्यास अशा विध्यार्थ्यांना प्रवेशानंतर एका महिन्याच्या आत स्वाधार योजनेसाठी अर्ज करता येईल .
  • अर्जदाराने सादर केलेली कागदपत्रे व माहिती यांची आवश्यकतेनुसार पडताळणी करण्याचे अधिकार गृहपाल जिल्याचे सहाय्यक आयुक्त ,समाजकल्याण यांच्याकडे असतील .
  • महाराष्ट्र शासनाच्या website वरती जाऊन माहिती घेऊ शकतात .
८. योजनेवर नियंत्रण कोणाचे असेल ? 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेवर सनियंत्रण हे जिल्याचे सहाय्यक आयुक्त ,समाजकल्याण तसेच गृहपाल यांचे असेल .

९. निष्कर्ष –

Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ सदर योजनेतील पात्र लाभार्थी विध्यार्थी यांना भोजन,निवास,शैक्षणिक साहित्य ,निर्वाह भत्ता .व इतर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्यसाठी या योजनेच्या माध्यमातून  रक्कम हि स्तरानुसार ६०,०००/-,५१,०००/-,४३,०००/-,किंवा ३८,०००/-  रुपये यापैकी जो विध्यार्थी तालुका ,जिल्हा , महानगरपालिकेच्या का नगर पालिकेच्या  नेमका कोणत्या स्तरावर शिकत आहे त्यानुसार संबधित विद्यार्थी च्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली जाते .

आजच्या या लेखात आपण योजनेचे स्वरूप,पात्रता काय लागते , शैक्षणिक निकष काय आहेत ,रक्कम किती अदा केली जाते तसेच त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात ,अर्ज कुटे आणि कसा करावा इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण वरीलप्रमाणे पहिली आहे .संबधित माहिती सर्व वाचकांनी आपल्या मित्र परिवाराबरोबर शेअर करावी आणि सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा .

धन्यवाद !

१० . FAQ – 
१. Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५  योजनेचा लाभ घेण्याकरिता वयोमर्यादा किती आहे ?

उत्तर – अर्जदार लाभार्थी हा वयवर्ष १० वी नंतर जास्तीत जास्त ३० वर्षापर्यंत सदर योजनेचा लाभ घेवू शकतो .

२. Swadhar Yojana स्वाधार योजना २०२४-२०२५ अर्ज करण्यासाठी विध्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न किती असावे ?

उत्तर – विध्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त नसावे .

३. अर्ज करण्यासाठी विध्यार्थ्यास काही टक्केवारीची अट  आहे का ?

उत्तर -होय अर्ज करतानाच्या मागील वर्षातील किमान ५०% गुण असणे गरजेचे आहे ?

हे देखील वाचा .


१. पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना –२०२४ Pandit Dindyal Upadyay Swayam Yojana

२.Mukhyamntri Ladka Bahu Yojana Maharashtra लाडका भाऊ योजना -२०२४ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत युवकांना कसे आणि किती पैसे मिळणार .

 

 

Leave a comment