सौर चलित फवारणी पंपाचे फायदे व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया .
महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागातर्फे mahadbt पोर्टल वरती शेतकरी यांनी Sour Chalit Favarni Pump Yojana-सौर चलित फवारणी पंप योजना २०२५करिता अर्ज करून शेती क्षेत्राच्या विकासाकरिता तसेच शेतातील खर्च कमी करण्याकरिता या योजनेंतर्गत लाभ मिळवता येत आहे.त्याकरिता शेतकरी यांना Mahadbt पोर्टल वरती online नोंदणी करणे गरजेचे आहे तसेच शेतकरी यांच्याकडे Farmer id असणे देखील गरजेचे आहे.
चला तर मग मित्रांनो योजना आहे तरी काय याकरिता अनुदान किती मिळते,सौर चलित पंपाचे फायदे काय,online अर्ज कसा करयचा कागदपत्रे कोणती लागतील याबाबत सविस्तर माहिती आपण पुढील मुद्यांच्या आधारे पाहूया .
सौर चलित फवारणी पंप योजना काय आहे ?
- Sour Chalit Favarni Pump Yojana-सौर चलित फवारणी पंप योजना २०२५ सदर योजनेंतर्गत शेतकरी यांना शेतातील पिक फवारणीकरिता जे फवारणी पंप लागतात ते खूप खर्चिक बाब आहे जसे डिझेल ,पेट्रोल वर चालणारे पंप आर्थिक खर्चाची बाब आहे आणि काही वेळा ती न परवडणारी गोष्ट आहे .त्याकरिता शासनामार्फत आधुनिक पंप जे की सौर उर्जेवर चालतात त्याकरित अनुदान दिले जात आहे .
- कृषी विभागामार्फत सौर चलित नॅपसॅक फवारणी पंप ४० ते ५०% अनुदानावर वाटप केली जाणार आहेत.याकरिता जो प्रथम अर्ज करील त्याला प्रथम प्राधान्य देवून वाटप होणार आहे .तेंव्हा शेतकरी यानी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि योजनेस पात्र व्हावे .
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojanaमागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शासनाचे ९०% अनुदान मिळवा.
Sour Chalit Favarni Pump Yojana-सौर चलित फवारणी पंप योजना २०२५योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
- online अर्ज करण्यासाठी कागदपत्रे अपलोड करावी लागतात ती कोणती ते पाहूया .
- शेतकरी फार्मर आयडी
- आधार कार्ड
- सातबारा उतारा
- ८ अ उतारा
- बँक पासबुक प्रत .
- मोबाईल नंबर.

सौर चलित फवारणी पंपाचे फायदे व योजनेचे फायदे –
- पेट्रोल आणि डिझेल चा लागणारा खर्च वाचेल .
- online अर्ज करून शेतकरी यांचा वेळ वाचतो.
- पहिल्यांदा अर्ज करील त्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे .
- तसेच offline अर्ज प्रक्रिया मध्ये भरावयाचे शुल्क वाढीव घेऊ शकतात .
- तसेच mobile App वरून सुद्धा तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो .
सौर चलित फवारणी पंप लाभार्थी पात्रता –
- Sour Chalit Favarni Pump Yojana-सौर चलित फवारणी पंप योजना करिता अर्जदार शेतकरी याने Mahadbt या पोर्टल वरती नोंदणी असणे गरजेचे आहे.
- तसेच अर्ज करणारा शेतकरी याच्या नावे शेती असावी .
- अर्जदार शेतकरी याने यापूर्वी Mahadbt पोर्टल वरती फवारणी पंप योजनेसाठी लाभ घेतलेला नसावा.
Sour Chalit Favarni Pump Yojana-सौर चलित फवारणी पंप योजना २०२५ योजनेचा तपशील :-
योजनेचे नाव | Sour Chalit Favarni Pump Yojana-सौर चलित फवारणी पंप योजना २०२५ |
शासन | महाराष्ट्र शासन |
विभाग | कृषी विभाग |
लाभार्थी | शेतकरी वर्ग |
लाभाचे स्वरूप | फवारणी पंपाकरिता ४० ते ५०% अनुदान |
अर्जाचे स्वरूप | online अर्ज |
अधिकृत website | Mahadbt पोर्टल |
हेल्पलाईन नंबर | ०२२ ६१३१ ६४२९ |
सौर चलित फवारणी पंपाचे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया . :-
– Mahadbt farmer पोर्टल वरती जाऊन login करा.

- त्यानंतर अर्ज करा या बटनावर क्लिक करा .
- त्यानंतर खालील बाबी निवडा त्यामध्ये मुख्य घटक यावरती किल्क करा .
- त्यामध्ये कृषी यंत्र औजारांच्या खरेदीसाठी अर्थ सहाय्य या घटकावरती किल्क करा .
- त्यापैकी सौर चलित नॅपसॅक फवारणी पंप हे निवडा .
- त्यानंतर जतन करा या बटनावर किल्क करा .
- त्यानंतर मेन्यूवर जा या बटनावर किल्क करा .
- त्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर किल्क करा .
- त्यानंतरMake Payment या बटनावरती किल्क करा .
- त्यानंतर अर्ज फी म्हणून २३ रुपये ६० रुपये एवढे शुल्क भरा .
- शुक्ल भरल्यानंतर अर्जाची प्रत घ्या .
- अशा प्रकारे संपूर्ण अर्ज प्रक्रिया पद्धतीचा वापर करावा आणि form भरावा .
सौर चलित फवारणी पंपाचे फायदे व ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अनुदान किती मिळेल ?
- लहान सीमान्त शेतकरी/महिला/SC /ST शेतकरी यांना जास्तीत जास्त १८००/-रु पर्यंत अनुदान दिल्या जाईल .
- इतर शेतकऱ्याना ४०% किंवा जास्तीत जास्त १५००/- रुपये पर्यंत अनुदान मिळेल .
नेहमी विचारले जाणारे प्रश्न (FAQ):-
१. Sour Chalit Favarni Pump Yojana-सौर चलित फवारणी पंप योजना २०२५ सदर योजनेचा लाभ मिळण्याकरिता पैसे किती भरावे लागतील ?
– फक्त २३.६० पैसे भरून योजनेचा लाभ मिळतो .
२. Sour Chalit Favarni Pump Yojana-सौर चलित फवारणी पंप योजना २०२५अर्जदाराची निवड कशी केली जाते ?
– तुम्ही पात्रतेच्या अटी पूर्ण केल्यानंतर सर्वात अगोदर अर्ज भरला त्यास प्रथम प्राधान्य देऊन त्याची निवड केली जाणार आहे .
३.सौर ऊर्जा फवारणी पंप करिता जर माझ्याकडे फार्मर आयडी नसेल तर लाभ कसा घेता येईल ?
– सदर अर्जदारास फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे त्याशिवाय login करता येणार नाही आणि योजनेचा लाभ हि मिळणार नाही.