Ration Card Yojana-रेशन कार्ड योजनामध्ये अंत्योदय रेशन कार्ड विषयी माहिती .
Ration Card Yojana मध्ये रेशन कार्ड नियमात नवीन बदल काय हे जाऊन घ्या.
Ration Card Yojana-राशन कार्ड बाबत केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या स्तरावर वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्यांची नावे वेगवेगळी आहेत परंतु पूर्वीच्या नियमानुसार प्रत्येक गरजू व्यक्तीला राशन मिळत नव्हते .म्हणून राजस्थान राज्यातील काही नियमातील बदलामुळे अत्यंत गरजू आणि पात्र कुटुंबालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे .
चला तर मग मित्रांनो सदर योजनेच्या नियमात काय बदल केले आहेत याची माहिती घेवूया .
नियमातील बदल :-
मोफत सरकारी Ration Card Yojana योजनेचा लाभ घेत असणारे लाभार्थी ज्यांची आर्थिक परिस्थती चांगली असूनहि आणि त्यांच्याकडे कुलर ,फ्रीज ,एअर कंडीशनर किंवा चारचाकी वाहने आहेत .अशा कुटुंबाना कडक इशारा देण्यात आला आहे .
Ration Card Yojanaमधील नवीन नियमानुसार राशन कोणाला मिळणार :-
Ration Card Yojana सदर योजनेतील नवीन नियमानुसार मोफत रेशन मिळेल फक्त आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबाना आणि ज्यांना २ वेळेचे जेवण मिळत नाही अशा कुटुंबाना या योजनेमध्ये अन्न धान्य शी निगडीत वस्तू दिल्या जाणार आहेत .
अन्नधान्य मध्ये : गहू ,तांदूळ , डाळ इत्यादी
इतर साहित्य : खाद्यतेल ,मीठ ,मिरची ,हळद ,धने इत्यादी .
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ – २.० कनेक्शनसाठी Prdhanmantri Ujjavla Yojana आत्ताच अर्ज करा
रेशन कार्डचे विविध प्रकार आहेत त्यापैकी अंत्योदय योजना प्रकाराची आपण माहिती घेऊया .
१. अंत्योदय अन्न योजना (ए.ए.वाय.)
अंत्योदय अन्न योजना (ए.ए.वाय.)सदर योजनेत ३ वेळा बदल करण्यातआला तो बदल पुढीलप्रमाणे का सांगतो ते पाहूया .
१. बदल कमांक- १
- दिनांक : 01/05/2001 -शासनाचा gr नुसार सर्वात गरीब कुटुंबांना या योजनेंतर्गत दि. १/५/२००१ पासून अन्नधान्य (गहू रु. 2/- प्रति किलो दराने आणि तांदूळ रु. 3/- प्रति किलो) पुरवले जाते.
- त्यावेळी भारत सरकारने राज्याला५.०११ लाख लाभार्थ्यांचे लक्ष्य घेऊन अंत्योदय योजनेचा विस्तार केला आहे.
सदर योजनेच्या लाभार्थीची त्यावेळीची पात्रता :-
- या योजनेंतर्गत, विधवा किंवा अशक्त आजारी व्यक्ती,
- किंवा अपंग व्यक्ती किंवा 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती
- किंवा एकल महिला किंवा कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसलेले अविवाहित पुरुष.
- सर्व आदिम आदिवासी कुटुंबांना प्राधान्य दिले गेले.इत्यादी लाभार्थीला प्राधान्य देण्यात आले आहे .
२. बदल क्रमांक -२
सदर योजनेत दुसऱ्या वेळी भारत सरकारने राज्याला 4.81 लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देऊन अंत्योदय योजनेचा आणखी विस्तार केला आहे, या योजनेंतर्गत, खालील श्रेणीतील कुटुंबे पात्र ठरवून त्यांना अन्नधान्य दिले जाते.
(अ) स्वमालकीची जमीन नसलेले शेतमजूर,
ब) अल्पभूधारक शेतकरी,
क) ग्रामीण कारागीर/कारागीर जसे की कुंभार, चर्मकार, विणकर, लोहार, सुतार,
ड) झोपडपट्टीतील रहिवासी आणि
इ) पोर्टर्स, कुली, रिक्षाचालक यांसारख्या अनौपचारिक क्षेत्रात दररोज आपली उपजीविका करणाऱ्या व्यक्ती. गाड्या ओढणारे, फळे आणि फुलांचे विक्रेते, सर्पमित्र, चिंध्या वेचणारे, मोची, निराधार आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील सबंधित श्रेणी इत्यादीचा योजनेत सहभाग वाढविला त्यांना सदर योजनेत लाभ दिला गेला .
३. बदल कमांक -३
भारत सरकारच्या Ration Card Yojana मधील अंत्योदय अन्न योजनेच्या तिसऱ्या बदलात राज्याला ५२१५०० लाभार्थ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले.
सरकारने ११/९/२००९ रोजी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन परिपत्रक जारी करायला लावले आणि त्यात खालील लाभार्थीची पात्रता यादीत नव्याने जोडणी केली .
१. एचआयव्ही/एड्स व्यक्ती ,
२. कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींना प्राधान्याने निवड करण्याबाबत बदल करण्यात आला .
वरील नव्याने जोडण्यात आलेल्या लाभार्थी करिता अंत्योदय रेशनकार्ड देण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे, ज्यांची नावे बीपीएल यादीत आहेत त्यांना देखील समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या.
सदर योजनेत वरीलप्रमाणे वेळोवेळी gr काढून आणि सूचना निर्गमित करून खूप मोठ्या प्रमाणात बदल केले गेले असंख्य लाभार्थी देखील जोडले गेले .
रेशन कार्ड योजना लाभार्थी कोण आहेत :
अंत्योदय योजनेचे खालील सर्व पात्र लाभार्थी जे शिधापत्रिकाधारक आहेत .
- या योजनेंतर्गत, विधवा किंवा अशक्त आजारी व्यक्ती,
- किंवा अपंग व्यक्ती किंवा 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती
- किंवा एकल महिला किंवा कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नसलेले अविवाहित पुरुष.
- सर्व आदिम आदिवासी कुटुंबांना प्राधान्य दिले गेले.इत्यादी लाभार्थीला प्राधान्य देण्यात आले आहे .
- स्वमालकीची जमीन नसलेले शेतमजूर,
- अल्पभूधारक शेतकरी,
- ग्रामीण कारागीर/कारागीर जसे की कुंभार, चर्मकार, विणकर, लोहार, सुतार,
- झोपडपट्टीतील रहिवासी आणि
- पोर्टर्स, कुली, रिक्षाचालक यांसारख्या अनौपचारिक क्षेत्रात दररोज आपली उपजीविका करणाऱ्या व्यक्ती.
- गाड्या ओढणारे, फळे आणि फुलांचे विक्रेते, सर्पमित्र, चिंध्या वेचणारे, मोची, निराधार आणि ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील सबंधित श्रेणी इत्यादीचा योजनेत सहभाग वाढविला त्यांना सदर योजनेत लाभ दिला गेला .
- एचआयव्ही/एड्स व्यक्ती ,
- कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींना प्राधान्याने निवड करण्याबाबत बदल करण्यात आला.
रेशन कार्ड योजनाचे फायदे:
- Ration Card Yojana सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थीला दरमहा ३५ किलो अन्नधान्य (सध्या मोफत) मिळते .
अर्ज कसा करावा :-
- Ration Card Yojana सदर योजनेच्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत website वरती जाऊन तुम्ही अर्ज करण्याकरिता आणि योजनेबाबत माहिती घेण्याकरिता भेट द्या .
- रेशन कार्ड योजनाचा लाभ घेण्याकरिता जवळपासच्या रेशनिंग कार्यालयाला भेट द्या
- किंवा सेवा टॅबमध्ये उपलब्ध ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीद्वारे अर्ज करा.
ऑनलाइन रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम ‘ERCMS’ काय आहे ?
– Ration Card Yojana तर सदर योजनेतील लाभार्थीला नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करता येतो , तसेच नवीन रेशन कार्डची ऑनलाइन स्थिती ट्रॅक करणे आणि चालू रेशन कार्डमध्ये बदल करणे देखील करता येतील त्याकरिता हि सिस्टम काम करते .ते कसे काम करते हे खलील मुद्याच्या आधारे पाहुया .
ERCMS प्रक्रिया:- ERCMS द्वारे, तुम्ही तुमच्या रेशन कार्डमधील दुरुस्त्या करण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
– या सुविधेसाठी खाली दिलेल्या स्टेपचा वापर करा .
१. दिलेल्या ड्रॉपडाऊन बॉक्समधून ERCMS बदलावयाचा प्रकार निवडा:-
( खाली दिलेल्या बदल प्रकारापैकी तुम्ही एका वेळी फक्त एकच प्रकार निवडू शकतात )
अ) डीलर बदलायचा असेल.
ब) कुटुंबातील सदस्य जोडणे असेल.
क) कुटुंबातील सदस्याला काढून टाकने असेल.
ड) नावात दुरुस्ती करणे.
ई) रेशन कार्ड प्रकार बदलणे.
फ) मोबाईल नंबर दुरुस्त करणे किंवा बदलणे.
ग) बँक खाते क्रमांकात सुधारणा किंवा बदल करणे.
ह) UID मध्ये सुधारणा किंवा बदल करणे.
टीप :- Ration Card Yojana नावातील दुरुस्तीसाठी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
२. पुढील पानावर, तुम्हाला तुमचा रेशन कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे माहिती मिळू शकेल.
३. तुमच्या निवडलेल्या अर्जाप्रमाणे तुम्हाला एक फॉर्म मिळेल. तो पूर्णपणे भरा आणि Send Request बटणावर क्लिक करा.
४. क्लिक केल्यानंतर, कन्फर्मेशन पेज – ओके / कॅन्सल दिसेल.
जर तुम्ही ओके बटणावर क्लिक केले तर तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल आणि तुमचा अर्ज बीएसओ (ब्लॉक सप्लाय ऑफिसर) कडे जाईल.
जर तुम्ही कॅन्सल बटणावर क्लिक केले तर तुमचा अर्ज नाकारला जाईल.
५. भविष्यातील संदर्भासाठी पावती क्रमांक नोंदवा.
६. भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या.
७. फॉर्मसोबत रेशन कार्डची प्रिंट आउट आणि संबंधित कागदपत्रे जोडा आणि ती संबंधित बीएसओ कार्यालयात जमा करा आणि कार्यालयातून पावती घ्या.
८. अर्जाच्या आवश्यकतेनुसार सोबत जोडव्याची कागदपत्रे :-
॰१. जर तुम्हाला डीलर बदलायचा असेल तर त्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे:
रहिवासी प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र किंवा वीज बिल किंवा टेलिफोन बिल यापैकी कोणतेही एक जोडू शकतात .
२. जर तुम्हाला कुटुंबातला एखादा सदस्य काढून टाकायचा असेल त्यासाठी,
– अर्जदाराकडे स्वतःचा मोबाईल असावा लागेल .आणि तसे सांगावे लागेल
॰३. जर नावात दुरुस्ती करयाची असेल तर त्यासाठी, -जे नाव टाकायचे त्या बँक पासबुकची झेरॉक्सप्रत अर्जदाराने जोडणे गरजेचे असेल .
४. रेशन कार्ड प्रकार बदलासाठी ,अर्जदाराने आधार कार्डची झेरॉक्स प्रत जोडावी
९. अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी: चेक स्टेटस वर क्लिक करा.
१०. उघडणाऱ्या पुढील पानावर तुम्ही तुमचा रेशन कार्ड क्रमांक