Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना फायदे,ऑनलाईन लॉगीन पहा .

Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना सविस्तर माहिती मिळवा .

Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना हि भारत सरकार मार्फत राबवली जाणारी योजना आहे . हि निवृत्ती वेतन योजना असुन शासन अनुदानित आहे सदर योजना २०१७ मध्ये सुरु करण्यात आली ती ३१ मार्च २०२३ पर्यंत राबविण्यात आली आहे.

सदर योजनेतून निश्चित पेन्शन दिले जात असून त्याची वारंवारिता मासिक ,त्रैमासिक ,सहामाही किंवा वार्षिक अशा प्रकारे आहे .वय ६० वर्षा पुढील जेष्ठ नागरीकान करिता असून ती १० वर्षा करिता आहे . त्याला योग्य परतावा देखील दिला जातो .

चला तर मग मित्रानो सदर योजनेचे फायदे .त्याकरिता लागणारी पात्रता ,कागदपत्रे काय लागतील ,अर्ज प्रक्रिया काय आहे कर पात्रतेची तरतूद काय इत्यादी बाबत सविस्तर माहिती खालील मुद्यांच्या आधारे आपण पाहणार आहोत .

Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना काय आहे ?

भारत सरकार आणि LIC जीवन विमा महामंडळ यांच्यामार्फत देशातील जेष्ठ नागरिकांकरिता Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना हि एक पॉलिसी पेन्शन योजना महणून राबवली जात आहे.

PMVVY योजनेंतर्गत ६० वर्षाच्या पुढील व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात. जे कि सेवा निवृत्ती नंतर आर्थिक नियोजनासाठी खूप महत्वपूर्ण योजना आहे .ज्याद्वारे वयोवृद्ध व्यक्तीला १० वर्ष कालावधीकरिता पेन्शन मिळवता येते .

PMVVY हि एक निवृत्ती आणि पेन्शन योजना असून त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठी जीवन विमा असेलेल्या LIC मार्फत चालवली जाते .सदर योजना ३१ मार्च २०२३ पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होती .या तारखेपर्यंत खरेदी केलेल्या सर्व पॉलिसी साठी १० वर्षाच्या संपूर्ण पॉलिसी मुदतीसाठी पेन्शन चा निश्चित दर हा ८.२०% इतका २०२३-२४ या वर्षाकरिता करण्यात आला आहे .

वरिष्ठ नागरिक तीर्थ यात्रा योजना २०२५-सरकारची नवीन योजना: वयोवृद्धांसाठी तीर्थ यात्रा २०२५ मध्ये कशी मिळवावी?

Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना लाभार्थी पात्रता :-

  • संबधित अर्जदार हा ज्येष्ठ नागरिक असावा.
  • त्याने वयाची ६० वर्ष पूर्ण केलेली असावीत .
  • तसेच तो भारतीय नागरिक असावा .
  • १० वर्ष मुदतीनुसार लाभ घेणारा असणे गरजेचे राहील .
  • सदर योजनेंतर्गत एकूण खरेदी किमत १५ लाख रु पेक्षा जास्त नसावा .

प्रधानमंत्री वय वंदना योजना अर्जासोबत लागणारी कागदपत्रे :-

Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना सदर योजनेंतर्गत लाभ घेण्याकरिता पुढील कागदपत्रांची पूर्तता करणे जरुरी राहील .

  • आधार कार्ड
  • वयाचा दाखला
  • पुन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • पत्याचा पुरावा
  • पासपोर्ट फोटो
  • बँक खाते झेरॉक्स
  • अर्जदार नोकरीतून निवृत्त झालेले पुरावे

Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजनाचे फायदे :

  • सदर योजनेद्वारे सबंधित लाभार्थीस १० वर्षाकरिता योग्य व्याजदराने खात्रीशीर परतावा दिला जातो .तो व्याजदर ७% ते तसेच प्रत्येक वर्षी वेगळा व्याजदर दिला जातो .
  • सदर योजनेची १० वर्षाची मुदत संपल्यानंतर संपूर्ण रक्कम हि पेन्शन आणि खरेदी किमत समाविष्ट करून दिली जाईल .
  • १० वर्षाच्या पॉलिसीच्या दरम्यान निवडलेल्या कालावधी नुसार मासिक,त्रैमासिक ,सहामाही ,किंवा वार्षिक प्रत्येक कालावधीच्या शेवटी पेन्शन दिली जाईल.
  • जर लाभार्थी चालू मुदतीदरम्यान मृत झाला तर त्यास जी पॉलिसीची मूळ रक्कम आहे ती त्याच्या वारसास दिली जाईल .
  • पॉलिसी सुरु केल्यापासुन तीन वर्षा नंतर त्यावरती मूळ पॉलिसी किमतीच्या ७५% रक्कम पर्यंत कर्ज दिले जाते. परंतु सरकारकडून ठराविक कालावधीने निश्चित केल्यानुसार कर्जाच्या रकमेवर व्याजदर आकारला जाणार आणि कर्जाचे व्याज हे पॉलिसी अंतर्गत देय असलेल्या पेन्शन रकमेतून वसूल केले जाईल .
  • सदर योजनेतून मुदती अगोदर बाहेर देखील पडता येते .उदा- जर पेन्शन धारकाला किंवा त्याच्या जोडीदाराला एखाद्या गंभीर आजाराच्या उपचाराकरिता पैशांची आवश्यकता असेल अशा वेळी पॉलिसी च्या खरेदी किमतीच्या ९८% surrender value अर्जदारास देय राहील .
  • सदर योजनेतून तुम्हाला वापसी करायची असेल तर पॉलिसी विकत घेतल्यापासून १५ दिवसांच्या आत आणि जर पॉलिसीऑनलाईन खरेदी केली असेल तर ३० दिवसांच्या आत वापस पॉलिसी करू शकतो.परंतु stamp duty खर्च पेन्शनसाठी भरलेले शुल्क वजा करून घेतले जाईल .

Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना अर्ज करण्याची पद्धत :-

ऑनलाईन प्रक्रिया :-

  • LIC च्या अधिकृत website जाऊन login करा .
  • Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना
    Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना

  • ऑनलाईन पॉलिसी खरेदी करा या वरती किल्क करा
  • येथे किल्क करा या बटनावर किल्क करा .
  • त्यांनतर प्रधानमंत्री वय वंदना योजना यावरती किल्क करा .
  • एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये click to Buy Online यावरती किल्क करा .
  • संपर्क तपशील प्रविष्ट करा
  • त्यानंतर पुढे जा या बटनावरती किल्क करा .
  • त्यानंतर अर्ज भरा .
  • online अर्ज सबमिट करा आणि कागदपत्रे अपलोड करा .
  • त्यानंतर सबमिट या बटनावर किल्क करा .

ऑफलाईन प्रक्रिया :-

  • LIC ऑफिस च्या कोणत्याही शाखेतून अर्ज पूर्ण भरा .
  • Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना

    IMG 20250730 174631

  • Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजनाIMG 20250730 174648 1Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजनाIMG 20250730 174706 1

    IMG 20250730 174714

  • भरलेल्या अर्जाची प्रत आणि सोबत सर्व कागदपत्रे जोडा .
  • अर्ज व कागदपत्रे सबमिट करा .
पॉलिसी पेन्शन पेमेंटची पद्धत :-
  • पेन्शन भरण्याची देयकाचे मासिक .त्रैमासिक आणि सहामाही किंवा वर्षिक यापैकी एक पद्धत निवडा .
  • एकदा निवडलेली पद्धत पुन्हा पॉलिसी च्या कालावधीत बदलता येणार नाही .
  • पॉलिसी खरेदी करिता आधार क्रमांक प्रमाणीकरण असणे आवश्यक आहे
  • पेन्शन पेमेंट NEFT किंवा आधार सक्षम पेमेंट सिस्टम द्वारे केले जाईल .
  • पेन्सन धारकाला पेन्शन पेमेंट घेण्यासाठी बँकेत किंवा LIC एजंटला भेट देण्याची गरज नाही .
कमाल किंवा किमान खरेदी आणि पेन्शनची किमत :-
  • Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजनामध्ये किमान खरेदी किमत रुपये १,६२,१६२ आहे त्यासाठी पॉलिसी धारकाला मासिक पेन्शन पेमेंटसाठी ज्या व्याजदराने रु.१,०००/- रुपये पेन्शन मिळते .
  • ग्राहकाला मिळणारी पेन्शन ची रक्कम त्यांच्या खरेदी किमतीवर अवलंबून असते .
  • त्याचा तक्ता पुढीलप्रकारे पाहूया .
पेन्शन पेमेंट ची पद्धतखरेदी किंमत ची किमान रक्कमखरेदी किमतीच्या तुलनेत किमान पेन्शन रक्कमकमाल खरेदी किंमतखरेदी किमतीच्या तुलनेत कमाल पेन्शन रक्कम
मासिकरु.१,६२,१६२रु.१,०००१५,००,०००रुपये९,२५० रुपये
त्रैमासिकरु १,६१,०७४,३,०००रुपये१४,८९,९३३रुपये२७,७५० रुपये
सहामाहीरु,१,५९,५७४६,००० रुपये१४,७६,०६४ रुपये५५,५०० रुपये
वार्षिकरु. १,५६,६५८१२,००० रुपये१४,५९,०८६ रुपये१,११,००० रुपये

कर तरतूद :-

Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना सदर योजना करबचत योजना नसून ती एक गुंतवणूक योजना आहे .यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांनी केलेल्या गुंतवनुकीवर दरमहा ,तिमाही,सहामाही किंवा वार्षिक पेन्शन मिळते.

  • योजनेद्वारे मिळणारे परतावे लागू असलेल्या कर दराने कर आकारले जातात .
  • यात कोणताही आयकर सूट नाही .
  • पॉलिसी धारक या योजनांतर्गत आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वजावटीचा दावा करू शकत नाहीत
  • परंतु योजनेतून जीएसटी सूट आहे .

निष्कर्ष :-

Prdhanmantri vaya vandana yojana (PMVVY)-2025 प्रधानमंत्री वय वंदना योजना हि जेष्ठ नागरिकांसाठी योजना हि एक गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे तसेच पेन्शन मिळू शकते .थोडक्यात काय तर वयस्कर व्यक्तीच्या म्हातारपणी आर्थिक आधार उभा राहतो .त्याकरिता सदर योजना खूप महत्वपूर्ण ठरली आहे .

Leave a comment