Pradhanmantree Awas yojna -प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत सुधारणा १४ ऑगस्ट २०२५ चा GR आला .

Pradhanmantree Awas yojna -प्रधानमंत्री आवास योजनाकरिता पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत सुधारणा करण्यात आली.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण /शहरी :-

भारत सरकारची केंद्र पुरस्कृत योजना पूर्वीची इंदिरा आवास योजनेच्या नावात बदल करून १४ ऑक्टोबर २०१६ रोजी Pradhanmantree Awas yojna -प्रधानमंत्री आवास योजना असे करण्यात आले .या योजनेंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थीला घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थीला पंडित दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी रु.५०,०००/- अर्थसहाय्य २०१७ रोजी देण्यात येत होते .

Table of Contents

त्यांनतर परत पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत यात बदल करून ६ फेब्रुवारी २०२४ चा शासन निर्णयाद्वारे या अनुदानात वाढ करून ती ५०० चौरस फुट जागेसाठी रु,१,००,०००/- पर्यंत रक्कम वाढवण्यात आली .परंतु त्यासोबत काही निकषात देखील बदल करण्यात आले .त्याचप्रमाणे पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत या सदर योजनेमध्ये १४ ऑगस्ट २०२५ रोजी नवीन शासननिर्णयाद्वारे बदल करण्यात आला आहे.

Pradhanmantree Awas yojna -प्रधानमंत्री आवास योजनाकरिता पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत सुधारणा १४ ऑगस्ट २०२५ चा GR आला त्यामध्ये काय नवीन बदल केलेत ते आपण खालीलप्रमाणे पाहूया .

पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत पूर्वी वेळोवेळी केलेले बदल आणि तरतुदी:-

  • Pradhanmantree Awas yojna -प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत ज्या लाभार्थीची निवड करण्यात आलेली आहे परंतु त्यांना जागा नाही अशा लाभार्थीसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत ज्या लाभार्थीची निवड झाली आहे.अशा लाभार्थीला जागा खरेदी करण्याकरिता रु.५०,०००/- अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी १४ जुलै २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली .
  • दिनांक २ ऑगस्ट २०१८ रोजी पुन्हा यामध्ये नवीन तरतुदी करण्यात आल्या संबधित लाभार्थीस शासकीय जमिनी मूल्य विरहीत उपलब्ध करून देणे. तसेच जर लाभार्थीने शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्यास संबधित जागा विनामुल्य नियमानुसार करणे अशा प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या .
  • पुन्हा दिनांक १६ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुन्हा या उपक्रमात नाविन्यपूर्ण असा बदल केला गेला आणि ज्यामध्ये बहुमजली गृह संकुले (हाऊसिंग अपार्टमेंट)उभारणे बाबत समावेश करण्यात आला.
  • परत एकदा २२ ऑगस्ट २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व ग्रामीण गृह निर्माण योजनांमध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी करताना मुदांक शुल्क रु.१,०००/- आकारणे ,मोजणी शुल्कामध्ये ५०%सवलत लागू करण्यात आली .तीन मजली आणि चार मजली इमारत बांधकामास मान्यता देण्यात आली.
  • दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार घरकुल जागा खरेदी करण्याच्या अनुदानात ५०० चौरस फुटा रुपये १,००,०००/-रुपयापर्यंत वाढ करण्यात आली .परंतु यामध्ये प्रत्यक्ष जागेची किमत किंवा रुपये १,००,०००/- या पैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देण्याचे निश्चित करण्यात आले .

पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत सुधारणा १४ ऑगस्ट २०२५ चा GR आला .सदर योजनेत नवीन करण्यात आलेले बदल :-

अ) पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेया योजने अंतर्गत भूमिहीन लाभार्थींना ५००चौरस फुट जागा खरेदीसाठी रु.१,००,०००/- चा मर्यादेत अर्थसहाय्य मिळणार

  • लाभार्थीने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किमत त्याची शहानिशा तालुका समिती करणार .

ब)पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना योजनेअंतर्गत जागा खरेदी प्रक्रीये अंतर्गत लाभार्थ्याने जागा मालकाबरोबर केलेल्या विक्री करारानंतर देय अर्थसहाय्य रक्कम लाभार्थ्यास अदा करण्यात येईल .सदर जागेची प्रत्यक्ष खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे तालुकास्तरीय समिती सुनिश्चित करेल .

क) जागेची कमी आणि किमत जास्त याचा विचार करून या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थीस एकत्र येऊन एक ते चार मजली पर्यंत G+1,G+2,G+3,G+4 अशी बहुमजली इमारतीसाठी एकूण लाभार्थीच्या एकत्रित अर्थसहाय्यतून जागा खरेदी करू शकतात .परंतु प्रती लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किमत किंवा रुपये १,००,०००/- या पैकी जे कमी असेल ते अर्थसहाय्य देण्यात येईल .

ड) जागा कमी आणि जास्त किमत याचा विचार करून या योजने अंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र येऊन गृहसंकुले किंवा बहुमजली गृह संकुले साठी एकूण लाभार्थीच्या एकत्रित अर्थसहाय्यतून जागा खरेदी करू शकतात .परंतु प्रती लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किमत किंवा रुपये १,००,०००/- या पैकी जे कमी असेल ते अर्थसहाय्य देण्यात येईल .

इ) Pradhanmantree Awas yojna -प्रधानमंत्री आवास योजनाया योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना ५०० चौ .फुट जागा खरेदीसाठी रुपये १,००,०००/- च्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येईल

– तसेच २० पेक्षा जास्त लाभार्थींनी एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग सोसायटी करिता मुलभूत नागरी सुविधा जसे-जोड रस्ता,अंतर्गत रस्ता,ड्रेनेज व्यवस्था ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,विद्युत व्यवस्था इ .साठी जागा खरेदी करण्याकरिता अतिरीक्त २०% जागेसाठी अर्थसहाय्य मिळणार .

– हा खर्च सदर योजनेसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून करण्यात येणार आहे .

तसेच २०% अर्थसहाय्य यातून खरेदी केलेले क्षेत्र हे सामुहिक राहिल.हे क्षेत्र लाभार्थी किंवा ग्रामपंचायत मार्फत खरेदी करता येईल आणि त्याची मालकी अंतिम ग्रामपंचायतकडे राहील .

निष्कर्ष :-

Pradhanmantree Awas yojna -प्रधानमंत्री आवास योजनाअंतर्गत निवडलेल्या लाभार्थीला पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेसदर योजनेअंतर्गत जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते ते कशासाठी दिले जाते त्यात कोकोन्त्या गोष्टीची तरतूद आहे तो खर्च कसा करायचा.सामुहिक किंवा वयैक्तिक त्याबत सविस्तर मर्गदर्शन केले आहे .तसेच सदर योजनेच्या तरतुदी मध्ये वेळोवेळी बदल देखील केले आहेत त्याबाबत सविस्तर माहिती वरील मुद्यांच्या आधारे देण्यात आली आहे तरी सर्व माहिती वाचा आणि इतरांनी त्याची माहिती द्या .

धन्यवाद !

Pradhanmantree Awas yojna -प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत निवडलेल्या लाभार्थीला पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेत सुधारणा १४ ऑगस्ट २०२५ चा GR आला .तो पाहण्याकरिता शासन gr पहा .

ladki Bahin Yojna -लाडकी बहिण योजना:Ladki Bahin Yojana eKYC Online –लाडकी बहिण योजना ई-केवायसीऑनलाइन .

Leave a comment