Post office- पोस्ट ऑफिस मधील खाते उघडण्यापासून ते ई-बँकिंग किंवा मोबईल बँकिंग कशी करायची इत्यादी बाबत माहिती .
Post office- पोस्ट ऑफिस भारत टपाल विभाग अंतर्गत लहान बचत योजना राबविल्या जातात .या योजनामध्ये आकर्षक व्याजदर आणि करलाभ दिले जातात यामुळे पोस्टाच्या काही योजना लोकप्रिय आहेत. परंतु सर्वसाधारण व्यक्तीला या योजनाचे किंवा ठेवीचे व्याजदर माहिती नसतात त्याचा परिपक्वता कालावधी आणि त्याचे व्याजदर माहित नसतात. त्यामुळे व्यक्ती गुंतवणुकीपासून दूर राहतो .तेंव्हा प्रतेक व्यक्तीला या व्याजदराची माहिती देण्याकरिता आजच्या या पोस्टच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे .
चला तर मग मित्रानो Post office- पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत चालणाऱ्या सर्व ठेवींची आणि योजनाची माहिती त्याबरोबर .खाते उघडण्याची प्रक्रिया .लागणारी कागदपत्रे कोणती .ई बँकिंग सुविधाची माहिती ,नामांकन बदलणे ,खाते हस्तांतरण करायचे अशा विविध मुद्यानुसार याबाबत सविस्तर माहिती खालील मुद्यांच्या आधारे देण्यात आली आहे .चला तर मग संबधित माहिती पाहूया .
Post Office PPF Scheme:2025 पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना नवीन व्याजदर, परिपक्वता कालावधी ,त्यावरती मिळणारे कर्ज .
Post office –पोस्ट ऑफिस अंतर्गत मिळणारा व्याजदर :-
Post office- पोस्ट ऑफिसच्या लहान बचत योजना करिता डब्ल्यू .एफ .०१.०४.२०२५ ते ३०.०६.२०२५ ) पर्यंत मिळणारा व्याजदर आहे त्याबाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे .
अ.क्र | योजना | व्याजदर डब्ल्यू .एफ | मिळणारा व्याजदर |
१ | बचत खाते | ४.० | वर्षिक |
२ | १ वर्षाची मुदत ठेव | ६.९% (वार्षिक व्याजदर र.१०,०००/- साठी रु.७०८ ) | तिमाही |
३ | २ वर्षाची मुदत ठेव | ७.०% (वार्षिक व्याजदर र.१०,०००/- साठी रु.७१९ ) | तिमाही |
४ | ३ वर्षाची मुदत ठेव | ७.१(वार्षिक व्याजदर र.१०,०००/- साठी रु.७२९ ) | तिमाही |
५ | ५ वर्षाची मुदत ठेव | ७.५ % (वार्षिक व्याजदर र.१०,०००/- साठी रु.७७१) | तिमाही |
६ | ५ वर्षाची आवर्ती ठेव योजना | ६.७ % | तिमाही |
७ | ज्येष्ठ नागरिक बचत योजना | ८.२% (रु.१०,०००/-साठी तिमाही व्याजदर रु.२०५ ) | तिमाहीआणि स्शुल्क |
8 | मासिक उत्पन्न खाते | ७.४ %(मासिक व्याजदर रु.१०,०००/- साठी रु.६२) | मासिक आणि सशुल्क |
९ | राष्ट्रीय बचत प्र,प्रमाणपत्र (आठवा अंक ) | ७.७ (परिपक्वता मूल्य रु.१०,०००/- साठी रु.१४४९०) | दरवर्षी |
10 | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना | ७.१ | दरवर्षी |
११ | किसान विकास पत्र | ७.५ (परिपक्वता ११५ महिने ) | दरवर्षी |
१२ | महिला सन्मान बचत प्रमाणपत्र | ७.५ (परिपक्वता मूल्य रु.१०,०००/-साठी रु.११,६०२ ) | तिमाही |
१३ | सुकन्या समृद्धी खाते योजना | ८.२ | वार्षिक दर |
Post office- पोस्ट ऑफिसमध्ये खाते कसे उघडावे ?
- खाते उघडण्यासाठी Post office- पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडण्याचा फॉर्म घ्या .
-FORM भरा आणि स्वाक्षरी करा .
Post office- पोस्ट ऑफिस फॉर्म सोबत जोडायची कागदपत्रे ?
- Post office- पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडण्याचा फॉर्म,
- आधार कार्ड,
- pan card ,
- अड्रेसप्रूप साठी लाईट बिल ,मतदान ओळखपत्र ,लायसन.
- जन्मतारीख किंवा जन्म प्रमाणपत्र पुरावा सुकन्या समृद्धी खात्यासाठी अनिवार्य असेल .
- जर संयुक्त खात्यासाठी ,सर्व संयुक्त धारक केवायसी दस्तऐवज
- किरकोळ खाते ,केवायसी खाते .
C) संयुक्त खात्याचे एकाच खाते किंवा त्याउलट रुपांतर करण्यास परवानगी नाही .
d) प्रोढ झाल्यानतर ,अल्पवयीन व्यक्तीने नवीन खाते फार्म + केवायसी सादर करणे आवश्यक आहे .
e) रु.१० लाखापेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी निधीच्या स्त्रोताचा पुरावा आवश्यक आहे (Pmla२००२ नुसार).
f) वरिष्ठ नागरिकांसाठी व्हीआरएस निवृत्ती लाभाचा पुरावा अवश्यक आहे .
g) NRI ,Trust ,Farm,sastha इत्यादी राष्ट्रीय (लघु)बचत योजना खात्यासाठी पात्र नाहीत .
h) सध्या ,शाखा Post office- पोस्ट ऑफिसमध्ये फक्त चेकद्वारे खाती उघडता येतात .
Post office- पोस्ट ऑफिस ई-बँकिंग /मोबाईल बँकिंग .
– जवळच्या Post office- पोस्ट ऑफिसमध्ये स्वाक्षरी करून विहित नमुन्यात फॉर्म सादर करावा पिओ बचत खात्यावर ई-बँकिंग /मोबाईल बँकिंग सुविधा मिळू शकते .
– संबधित Post office- पोस्ट ऑफिसने या सुविधा सक्षम केल्यानंतर ,खातेधारकाला खाते उघडल्यानंतर ४८ तासांच्या आत सक्रीयकरण कोड मिळेल .आणि https://ebanking.indiapost.gov.in वर नवीन वापरकर्ता सक्रीयकरण पर्यायात पुढे जाण्यासाठी ते सक्रीयकरण कोड प्राप्त करतील .
ई –बँकिंगमध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत .
- आवर्ती ठेव/वेळ ठेव खाते उघडणे .
- CBS पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या RD/PPF/SSA/SB खात्यामध्ये ठेव.
- RD कर्ज घेणे/ PPF काढणे .
- सर्व लघु बचत योजनांशी जोडलेल्या खात्यांचे व्यवहार तपसील पाहता येतात .प्रिंट करता येईल .
- मिनी स्टेटमेंट सुविधा आहे .
Post office- पोस्ट ऑफिस नामांकन :-
१. खाते उघडताना नामांकन अनिवार्य आहे.आणि ते जास्तीत जास्त ४ व्यक्तीसाठी करता येते .
२. नामांकनात बदल करू शकतात त्याकरिता तुमच्या जवळचे पोस्ट ऑफिस मध्ये विहित नमुन्यात अर्ज सादर करावा त्याकरिता रु.५० शुल्क आकारले जाईल .
Post office- पोस्ट ऑफिसखाते हस्तांतरित करता येते :-
- तुमचे खाते कोणत्याही CBS पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते .
- PPF/SSA/SCSS खाते बँकेतून पोस्ट ऑफिस मध्ये हस्तांतरित करता येते .
- खाते हस्तांतरणासाठी संबधित पोस्ट ऑफिस मध्ये पासबुक आणि विहित शुल्क सह विहित अर्ज सादर करा .
Post Office मधील खाते संबधित बदल करताना शुल्क आकाराची माहिती :-
- जर आपले पासबुक हरवले तर डुप्लिकेट पासबुक काढण्याकरिता रु.५० आकारले जातील .
- खात्याचे विवरण किंवा ठेवनेची पावती चालू करण्याकरिता रु.प्रती प्रकरण २० रुपये आकारले जातील .
- हरवलेल्या किंवा फाटलेल्या प्रमाणपत्राच्या बदल्यात पासबुक सुरु करणे त्याकरिता रु.१० प्रत्येकी नोंदणीकरिता घेतले जातील .
निष्कर्ष :-
अशा प्रकारे Post office- पोस्ट ऑफिसमधील सर्व ठेवी किंवा योजना बाबत मासिक .तिमाही .किंवा वार्षिक व्याजदर हे आजच्या पोस्टच्या आधारे माहिती दिली आहे .त्यानुसार सर्व अभ्यासून ठेवी ठेवा आणि योजनांचा लाभ घ्या .तसेच खाते उघडणे ,खाते हस्तांतरित करणे असेल तसेच आपल्या व्यवहाराबाबत काही दंड /शुल्क भरणे असेल इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली आहे ती शेवटपर्यंत नक्की वाचा आणि त्याचा फायदा घ्या .
धन्यवाद !