Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजनाअंतर्गत १ लाख ते १,२५०००/- पर्यंत सबसिडी मिळवा .

Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजनाऑनलाईन अर्ज प्रक्रिया,पात्रता ,मिळणारे अनुदान इत्यादी बाबत सविस्तर माहिती .

महाराष्ट्र शासनामार्फत शेतकरी वर्गासाठी कृषी यांत्रिकीकरण योजनेंअंतर्गत Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजनामहाराष्ट्रासाठी राबवण्यात येणारी योजना आहे .राज्य सरकार मार्फत कृषिविषयक अवजारे आणि यंत्रे शेतकऱ्याना उपलब्ध करून देण्याकरिता अर्थसहाय्य अनुदानाच्या माध्यमातून देत आहे. मिळणारे अनुदान हे अनुसूचित जाती आणि जमाती करिता ५०% आहे. तर इतर शेतकरी यांच्याकरिता ४० % अनुदान दिले जाणार आहे. त्यापैकी एक म्हणजे शेती अवजारे पैकी ट्रॅक्टरअनुदान योजना होय .त्याकरिता सदर शेतकरी यानी mahabdt च्या पोर्टल वरती जाऊन शेतकरी यानी नोंदणी क्र्रायची आहे .जो शेतकरी आपला फार्मर id काढून सदर योजनेकरिता आपली त्याला प्रथम नोंदणी करेल त्यालाच प्राधान्य दिले जाणार आहे .तेव्हा लवकरात लवकर नोंदणी करा .

चला तर मग मित्रांनो महाडीबीटी पोर्टल मार्फत शेतकरी यांच्याकरिता मिळणारे ट्रॅक्टर अनुदान किती असेल ,त्याकरिता अर्ज कसा आणि कुठे करायचा ,त्याची पात्रता काय आहे इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण खालील मुद्यांच्या आधारे पाहुया.

Sour Chalit Favarni Pump Yojana-सौर चलित फवारणी पंप योजना २०२५

Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजना योजना काय आहे?

Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजना सदर योजना राज्य शासनामार्फत कृषी विभागांतर्गत आणि कृषी घटकासाठी राबवली जाते .हि योजना कृषी यांत्रिकीकरनास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलो हेक्टर पर्यंत वाढविणे . लोकसंख्या वाढीमुळे अन्न धाण्याची सततची वाढती मागणी आहे .यामुळे शेती क्षेत्राचा विकास करून उत्पादनात वाढ करणे हे उद्देश समोर ठेऊन योजनेची आखणी केली आहे . परंतु देशातील शेती क्षेत्राचा विचार करता हे प्रदेशानुसार अनुदान असेल तसेच राज्यशासन हिस्सा असेल .

सदर योजनेचा लाभ अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती /अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी /महिला शेतकरी यांना ५०% सबसिडी दिली जाते. रुपये मध्ये पहिले तर १ लाख ते १२५०००/- इतकी सबसिडी मिळू शकते .आणि इतर लाभाथ्री साठी ४०% सबसिडी दिली जाते, या प्रमाणे पहिले तर रुपये मध्ये ५० हजार ते १ लाख रुपया पर्यंत सबसिडी मिळू शकते .याकरिता शेतकरी mahadbt पोर्टल वरती जाऊन आपली नोंदणी करू शकतात आणि या योजनेकरिता अर्ज करून योजनेचा लाभ मिळवू शकतात .

Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजना अंतर्गत मिळणारे अनुदान :-

कृषी यांत्रिकीकरण या योजनेतून सदर घटकासाठी अनुदान दिले जाते त्याचबरोबर Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजनाया योजनेतून खालील दिलेल्या कृषी यंत्र /अवजारे यांच्या खरेदीकरिता सुद्धा अर्थसहाय्य देण्यात येते .

१) ट्रॅक्टर

Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजनेंतर्गत या घटकासाठी सदर योजनेचा लाभ अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती /अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी /महिला शेतकरी यांना ५०% सबसिडी दिली जाते. रुपये मध्ये पहिले तर १ लाख ते १२५०००/- इतकी सबसिडी मिळू शकते .

आणि इतर लाभार्थी साठी ४०% सबसिडी दिली जाते, या प्रमाणे पहिले तर रुपये मध्ये ५० हजार ते १ लाख रुपया पर्यंत सबसिडी मिळू शकते .

२) कृषी यांत्रिकीकरण मार्फत इतर कोणकोणत्या घटकासाठी अनुदान दिले जाते.

१. ट्रॅक्टर .

२. पावर टिलर.

३. ट्रॅक्टर/ पावर टिलर चलित अवजारे

४. बैल चलित यंत्र /अवजारे .

५. मनुष्य चलित अवजारे / यंत्र

६. प्रक्रिया संच

७. काढणी तंत्रज्ञान

८. फलोत्पादन यंत्र /अवजारे

९. स्वयचलित यंत्र अवजारे.

१०. वैशिष्ट्येपूर्ण यंत्र अवजारे

योजनेच्या लाभार्थीची पात्रता :-

Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजना सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरीता शेतकरी यांच्याकडे खालील पात्रतेचे निकष पूर्ण करणे आवश्यक असणार आहे .·

  1. शेतकरी यांच्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे .
  2.  शेतकरी यांच्याकडे ७/१२ चा उतारा अन ८ अ असावे .
  3.  सदर योजनेचे अनुदान मिळवण्याकरीता शेतकरी हा ज्या प्रवर्गाचा असेल ते जात प्रमाणपत्र असावे .
  4. सदर योजनेमार्फत एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजे ट्रॅक्टर किंवा यंत्र किंवा अवजारे .
  5.  जर पूर्वीचे कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्यास तसा पुरावा सोबत जोडणे आवश्यक असेल .
  6.  जर एखाद्या घटकासाठी /औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक / औजारासाठी पुढील १० वर्ष अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल .

योजनेतील लाभार्थी अपात्रता : –

१.Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजना अंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ या सालामध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्ष ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास तो शेतकरी पात्र ठरणार नाही.

२) परंतु इतर औजारासाठी त्याच वर्षी तो पात्र ठरणार नाही पात्र तो पुढच्या वर्षी अर्ज करून लाभ घेण्यास पात्र होऊ शकतो .

online form भरताना अर्जात काय काय नोद्वायचे आणि अर्ज कसा भरायचा :-

Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजनाअंतर्गत अर्ज करताना प्रथम जो अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे .आणि त्याची निवड केली जाणार आहे .

१. महाडीबीटी चा पोर्टल वरती जा .

IMG 20250719 174744

Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजना
Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजना

२. वैयेक्तिक शेतकरी हा प्रकार निवडा .

– वैयेक्तिक शेतकरी सदर योजनेकरिता अर्ज करू शकतो .

३. योजनेत प्रमुख घटक निवडा _ कृषी यांत औजरांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा घटक निवडा

४. त्यांनंतर बाब निवडा – ट्रॅक्टर

५. त्यानंतर व्हील ड्राईव्ह प्रकार निवडा – त्यामध्ये १. २ डब्लू डी आणि २. ४ डब्लू डी यापैकी कोणतेही एक निवडा

६. त्यानंतर एच.पी. निवडा –

· २ डब्लू डी करिता

१. ८ ते २० पिटीओ एचपी .

२. २० पेक्षा जास्त ४० पिटीओ एचपी.

३. ४० पेक्षा जास्त ७० पिटीओ एचपी.

· ४ डब्लू डी करिता –

१ ८ ते २० पिटीओ एचपी .

२ २० पेक्षा जास्त ४० पिटीओ एचपी.

३ ४० पेक्षा जास्त ७० पिटीओ एचपी.

७. त्यानंतर जातीचा प्रवर्ग निवडा

८. कारण मिळणारी सबसिडी रुपये आणि टक्केवारीत किती मिळेल याचा तपशील हा प्रवर्गानुसारच आहे .

– तसेच सदर अनुदान हे आपल्या प्रवर्गानुसार आपण निवडणाऱ्या बाबीवर आणि मशिनरी प्रकारावर खालिलप्रकारे असणार आहे .

– सदर योजनेचा लाभ अनुसूचित जाती /अनुसूचित जमाती /अल्पभूधारक आणि बहुभूधारक शेतकरी /महिला शेतकरी यांना ५०% सबसिडी दिली जाते. रुपये मध्ये पहिले तर १ लाख ते १२५०००/- इतकी सबसिडी मिळू शकते .

– आणि इतर लाभार्थीसाठी ४०% सबसिडी दिली जाते, या प्रमाणे पाहिले तर रुपयेमध्ये ५० हजार ते १ लाख रुपयापर्यंत सबसिडी मिळू शकते .

– अर्ज भरताना स्टेप बाय स्टेप अर्ज हा सविस्तर भरा आणि अर्ज save करा. .

Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजनासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-
  1. आधार कार्ड
  2.  ७/१२ चा उतारा.
  3.  ८अ दाखला .
  4.  खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन
  5.  केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल .
  6.  जातीचा दाखला .
  7.  स्वयं घोषणापत्र .
  8.  पूर्वसंमती पत्र .

त्यादी कागदपत्रे सोबत अपलोड करणे अनिवार्य असेल .

सदर योजनेच्या अर्ज करण्याकरिता काही अडचणी आल्यास Mahadbt portal वरती जा .