LIC ची Bima Sakhi Yojana- 2025 विमा सखी योजना काय आहे ? एलआयसी च्या प्रधानमंत्री विमा सखी योजनेंतर्गत महिलांसाठी ७०००/. रु महिना व कमिशन मिळवा .
प्रस्तावना –
LIC ची Bima Sakhi Yojana- 2025 विमा सखी योजना केंद्रशासनाणे महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी राबवण्यात येत आहे . LIC ची विमा सखी योजना फक्त महिलांसाठी राबवण्यात येणार असून त्यामार्फत महिलांना स्टायपेंड दिला जाणार असून तीन वर्ष कालावधी करिता हि योजना आहे . सदर योजनेमार्फत दरमहा देय हा ७००० रु मिळेल. त्याचबरोबर कमिशन देखील दिले जाणार आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला online पद्धतीने अर्ज करू शकतात .पात्र महिलांना ट्रेनिंग दिले जाणार असून या अंतर्गत दरमहा देय वेतन किती दिले जाईल ,योजनेतील अटी काय असतील ,कागदपत्रे काय लागतील इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण खालिलप्रकारे पाहूया .
LIC ची Bima Sakhi Yojana- 2025 विमा सखी योजना कालावधी –
LIC ची Bima Sakhi Yojana- 2025 विमा सखी योजना स्टायपेंड देणारी योजना हि ३ वर्ष कालावधी साठी राबवली जाणार आहे .
LIC ची Bima Sakhi Yojana- 2025 विमा सखी योजना अंतर्गत महिलांना किती पैसे मिळणार ? दरमहा देय वेतन कसे आणि किती दिले जाईल ?
नियुक्त झालेल्या महिलांना देय स्टायपेंड स्वरूप पुढीलप्रकारे दिले जाणार आहे –
अ.क्र | वेतन कालावधी | दरमहा दिले जाणारे वेतन |
१ | वर्ष पहिले | रु.७०००/- तसेच कामानुसार कमिशन मिळेल. |
२ | वर्ष दुसरे | रु. ६०००/- तसेच कामानुसार कमिशन मिळेल. |
३ | वर्ष तिसरे | रु. ५०००/- तसेच कामानुसार कमिशन मिळेल. |
देय स्टायपेंड बाबत महत्वाची सूचना किंवा अट –
- दुसरे वर्ष रु ६०००/- हि देय रक्कम पहिल्या स्टायपेंडरी वर्षात पूर्ण झालेल्या पौलीसी च्या किमान ६५% च्या अधीन राहून दुसऱ्या स्टायपेंड री वर्षाच्या संबधित महिन्याच्या शेवटी लागू आहेत.
- तिसरे वर्ष रु. ५०००/- हि देय रक्कम दुसऱ्या स्टायपेंडरी वर्षात पूर्ण झालेल्या पौलीसी च्या किमान ६५% च्या अधीन राहून तिसऱ्या स्टायपेंड री वर्षाच्या संबधित महिन्याच्या शेवटी लागू आहेत.
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे –
- पासपोर्ट फोटो.
- ओळखपत्र पुरावा आधार कार्ड , पुन कार्ड.
- पत्याचा पुरावा – वीज बिल किंवा रेशनकार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी जे असेल ते देऊ शकतात .
- शैक्षणिक अहर्ता साठी १०/१२ चा मार्कमेमो .
( टीप – वरील सर्व कागदपत्रे हि स्वयं-साक्षांकित करावीत .)
LIC ची Bima Sakhi Yojana- 2025 विमा सखी योजनासाठी असणाऱ्या अटी व पात्रता –
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने पुढील अटीची पूर्तता करणे गरजेचे आहे .त्या अटी खालिलप्रकारे पाहूया .
- अर्ज दाराचे वय किमान १८ वर्ष ते ७० वर्ष वयाच्या महिला अर्ज करू शकतात .
- शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे असेल .
- Mahila Career Agents (MCA)योजनेंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती हि महामंडळाच्या कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही .
- एमसीएने प्रत्येक स्टायपेंडरी वर्षात कामगिरीचे निकष पूर्ण केले पाहिजेत .
- विध्यामान एजंट किंवा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक MCAs म्हणून भारती होण्यास पात्र नसतील .(नातेवाईक कोण तर कुटुंबातील सदस्य जसे कि जोडीदार ,स्वताचे किंवा सावत्र किंवा दत्तक मुले ,आई –वडील , भाऊ ,बहिण किंवा सासरे त्यादि )
- कार्पोरेशनचा सेवानिवृत्त कर्मचारी किंवा पुननिर्युक्तीची मागणी करणारा माजी एजंट यास पात्र नसेल .
LIC ची Bima Sakhi Yojana- 2025 विमा सखी योजनासाठी अर्ज प्रक्रिया.
- संबधित जवळील LIC कार्यालयात जावून माहिती घ्या .
- online पद्धतीने अर्ज करावा लागेलत्यासाठी LIC सदर website वरती जाऊन अर्ज करा .
- अर्ज सविस्तर वाचून पूर्ण भरा .
- अर्जासाठी येथे किल्क करा व अर्ज हा बघा .
- लागणारी सर्व संबधित कागदपत्रे अर्जाबरोबर अपलोड करा .
निष्कर्ष –
LIC ची Bima Sakhi Yojana- 2025 विमा सखी योजना केंद्रशासनाची एलआयसी च्या प्रधानमंत्री विमा सखी योजनेंतर्गत महिलांसाठी ७०००/. रु महिना आणि कामानुसार कमिशन देखील मिळणार आहे .आजच्या या लेखात दिलेली सर्व माहिती सर्व वाचकांसाठी खूप महत्वपूर्ण असेल तरी हि माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचवावी आणि सदर योजनेचा लाभ मिळवून द्यावा .तसेच सदर योजनेबाबत काही प्रश्न असतील तर आमच्याशी संपर्क करून विचारू शकता .तसेच योजनेबाबत आणखी माहिती हवी असेल तर आपल्या हक्काच्या या yojanagrnews24.com संकेतस्थळावरती येऊन माहिती घेऊ शकतात .
धन्यवाद !
FAQ –
२. LIC ची Bima Sakhi Yojana- 2025 विमा सखी योजना काय आहे ?
उत्तर – हि केवळ महिलांसाठी असलेली स्टायपेंड री योजना आहे ,याचा कालावधी हा ३ वर्षाचा असून त्यामध्ये १८ ते ७० वर्षाच्या आतील महिला लाभ घेऊ शकतात .
२. LIC ची Bima Sakhi Yojana- 2025 विमा सखी योजना मार्फत नेमके पैसे किती मिळणार आहेत ?
उत्तर – प्रधानमंत्री विमा सखी योजनेंतर्गत महिलांसाठी ७०००/. रु महिना आणि कामानुसार कमिशन देखील मिळणार आहे.
आणखीन माहिती वाचा
१. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana