लाडकी बहिण योजना जुलैचा १३ हप्ता रुपये १५००साठी अपात्र माहिला २६.३४ लाख,अपात्रतेची कारणे काय .
Ladki Bahin Yojna Jully 13 Installment:
महाराष्ट्र शासनाची विशेष महिलांसाठी राबवण्यात येत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना हि जून २०२४ पासून सुरु झाली झाली आहे .सदर योजनेस पूर्ण १ वर्ष झाले असून आजपर्यंत पात्र लाभार्थी महिलांना एकूण १२ हप्ते प्रत्येकी रुपये १५०० याप्रमाणे एकूण १८०००/- रुपये आजतागायत मिलेलाले आहेत .
आत्ता जुलै महिन्याचा १३ वा हप्ता रुपये १५०० पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याची याची उत्सुकता आणि प्रतीक्षा खूप मोठी लागून राहिली आहे . तर त्याच संदर्भात असलेली हि खूप मोठी अपडेट आहे कि ३० जुलै २०२५ चा शासनाचा जाहीर झालेला जीआर होय .
त्याचप्रमाणे जुलै चा १३ वा हप्ता देखील जाहीर केले आहे. शासनाच्या gr नुसार ८ ते १० दिवसात पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यात रुपये १५०० जमा होणार आहते त्यानुसार ८ ऑगस्ट २०२५ या तारखेच्या दरम्यान म्हणजे २ ते ३ दिवसात खात्यात पैसे जमा होतील .
PM Kisan Yojana-पी एम किसान योजना 2025 ची नवीन यादी: नाव, स्थिती आणि पेमेंट अपडेट तपासा
३० जुलै २०२५ चा शासनाचा जाहीर जी आर :-
Ladki Bahin Yojna Jully 13 Installment योजनेकरिता महाराष्ट्र शासनाच्या ३० जुलै २०२५ चा शासनाचा जाहीर जीआर मधील निर्णयानुसार येत्या १ ते ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत जुलै चा १३ वा हप्ता जमा होणार असून त्याकरिता शासनाने रुपये २९८४ कोटीचा निधी सदर योजनेच्या खात्यात मंजूर करून वर्ग देखील केला आहे .
लाडकी बहिण योजना जुलैचा १३ हप्ता रुपये १५०० अपात्र महिलांना लाभ न मिळण्याची कारणे :-
महाराष्ट्र शासनाची माझी लाडकी बहिण योजना Ladki Bahin Yojna Jully 13 Installment गेल्या १ वर्षापासून चालू आहे . सदर योजनेचे आजपर्यंत एकूण १२ हप्ते मिळालेले आहते.आणि आत्ता ज्याची प्रतीक्षा लागली आहे तो जुलै चा १३ वा हप्ता होय महिला व बालविकास विभागाच्या माननीय मंत्री आदिती तटकरे यांनी अशी माहिती दिली आहे कि ,ज्या पात्र महिलांना जून महिन्याचा १२ वा हप्ता जमा झाला आहे आणि ज्या महिलानी KYC केली आहे अशाच महिलांना जुलै महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे .
इतर अपात्र ठरलेल्या महिलांना का वगळण्यात आले आहे .याची करणे आपण खालील मुद्न्यांच्या आधारे पाहूया .
लाडकी बहिण योजना जुलैचा १३ हप्ता रुपये १५०० न मिळणाऱ्या अपात्र माहिला २६.३४ लाख,अपात्रतेची कारणे :-
- इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिला : आजपर्यंत Ladki Bahin Yojna Jully 13 Installment सदर योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थी महिला यांची पडताळणी केली त्या दरम्यान आढळून आलेल्या महिला ज्या इतर सरकारी योजनेचा सुद्धा लाभ घेत आहेत अशा महिलांना वगळण्यात आलेले आहे उदा : विधवा पेन्शन योजना असेल किंवा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या महिला असतील .
- महिलांच्या नावाने पुरूषांची खाती असणारे वगळण्यात आलेले आहेत .
- ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न रुपये २.५० लाखा चा पुढे आहे अशा महिलांना देखील वगळण्यात आलेले आहे .
- ज्या महिलांच्या पतीच्या नावे ४ चाकी वाहन असेल त्या देखील महिलांना वगळण्यात आलेले आहे .
वरील निकषांमध्ये ना बसणाऱ्या महिलांना सदर योजनेतून वगळण्यात येत आहे किंवा अपात्र ठरवण्यात येत आहे .
- pm किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त ५०० रुपये दिले जातील .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी कशी पाहावी :-
Ladki Bahin Yojna Jully 13 Installment सदर योजनेतील महिलांना लाभार्थी यादीत आहात कि नाही हे पाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक mobile app सुरु केला आहे त्यात तुम्ही तुमचा रजिस्टर mobile क्रमंक टाकून आपले नाव यादीत आहे कि नाही हे तपासू शकतात.किवा
- सदर योजनेच्या अधिकृत website वरती जा.
- तुम्हाला अर्जदार लॉगीन या पर्यायावर किल्क करायचे आहे.त्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्टर mobile no टाकून आणि त्यावरती येणारा OTP टाकून लॉगीन करायचे आहे .
- त्यानंतर एक पॉपप open होईल त्यामध्ये Beneficiary list या पर्याय वरती किल्क करून पात्र लाभार्थी यादी पाहू शकतात .
धन्यवाद !