गाय गोठा अनुदान योजना 2025:गायी/ म्हशी गोठयासाठी २,३१,५६४रु.अनुदान दिले जाणार आहे .

गाय गोठा अनुदान योजना 2025 Online Apply करा आणि १००% अनुदान मिळवा .

गाय गोठा अनुदान योजना 2025 सदर योजना महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील शेतकरी वर्गासाठी राबवली जात आहे .या योजनेच्या माध्यमातून जनावरांसाठी निवारा करण्याकरिता शेतकरी यांना सदर घटकासाठी आर्थिक सहाय्य केले जात आहे .

पावसाळ्यात गायी म्हशींचे दुहेरी उत्पादनाचे साधन आहे . तसेच त्यांच्यापासून शेतकरी वर्गाला वेळोवेळी आर्थिक सहाय्य होते पण पैशांच्या अडचणीमुळे गायी म्हशी यांना निवाऱ्याची सुविधा करता येत नाही हा विचार करून शासनातर्फे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिने संरक्षण करण्या करिता या घटकास अनुदान मिळत आहे .

चला तर मग मित्रानो गाय गोठा अनुदान योजना 2025 या योजनेत अनुदान किती मिळणार ,यासाठी कागदपत्रे काय लागतील,अर्ज कसा आणि कुठे करायचा इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण खालीलमुद्यांच्या आधारे घेवूया .

गाय गोठा अनुदान योजना 2025 योजना काय आहे ?

महाराष्ट्र शासनातर्फे गाय गोठा अनुदान योजना 2025 हि शेतकरी वर्गासाठी ५ एकरच्या आतील अल्प भूधारक शेतकरी यांना पशुपालन च्या बाबतीत त्यांच्या सरक्षणासाठी दिलासा मिळणार आहे .कारण गायी आणि म्हशी साठी निवाऱ्याची सुविधा करण्याकरिता शासनातर्फे आर्थिक सहाय्य केले जात आहे .

गाय गोठा अनुदान योजना 2025 या योजनेंतर्गत गाय व म्हशी करिता गोठा बांधला जावा .त्यांचे पाऊस पाणी ,वादळ ,उन इत्यादीपासून संरक्षण व्हावे तसेच त्यांची काळजी घेतली जावी याकरिता किमान २ आणि कमाल ६ गायी/म्हशी साठी ७७,१८८ रु. अनुदान मिळेल आणि १८ पेक्षा जास्त गायी/ म्हशी साठी २,३१,५६४रु.अनुदान दिले जाणार आहे .१००% अनुदान दिले जात आहे .त्याकरिता लगेच अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या .

सदर योजना महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी शेतकरी यांच्याकरिता राबवली जाणार आहे. तसेच जे अल्पभूधारक शेतकरी यांच्याकडील असणाऱ्या गायी म्हशीच्या संख्येनुसार लाभ दिला जाणार आहे .गाय गोठा बांधण्याचे काम मनरेगा रोजगार हमी योजना मार्फत करून दिले जाणार आहे .सदर योजनेचा लाभ सदर शेतकरी यांच्या खात्यात तीन टप्प्यात वर्ग केला जाणार आहे .

Manrega Yojana Maharashtra- मनरेगा योजना महाराष्ट्र २०२५ सद्याचा रोजगार किती मिळतो जाणून घ्या .

गाय गोठा अनुदान योजना अनुदान किती आहे ?

  • गाय गोठा अनुदान योजना 2025 सदर योजना महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी शेतकरी यांच्याकरिता राबवली जाणार आहे तसेच जे अल्पभूधारक शेतकरी यांच्याकडील असणाऱ्या गायी म्हशीच्या संख्येनुसार लाभ दिला जाणार आहे .
  • गाय गोठा बांधण्याचे काम मनरेगा रोजगार हमी योजना मार्फत करून दिले जाणार आहे .
  • सदर योजनेचा लाभ सदर शेतकरी यांच्या खात्यात तीन टप्प्यात वर्ग केला जाणार आहे .
  • मिळणारे अनुदान
अ.क्रगायी /म्हशी ची संख्यामिळणारे अनुदान
किमान २ आणि कमाल ६ गायी/म्हशी साठी७७,१८८ रु. अनुदान मिळेल
किमान ६ किंवा कमाल १८ पर्यंत गायी/म्हशी साठी१,५४,३७३ रु.अनुदान दिले जाणार आहे .
१८ पेक्षा जास्त गायी/ म्हशी साठी२,३१,५६४रु.अनुदान दिले जाणार आहे .

पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील नागरिकांनकरिता सन २०२५-२०२६ राज्यस्तरीय ७५%अनुदान योजना – दोन दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे.

गाय गोठा अनुदान योजना अर्ज कसा करावा ?

  • गाय गोठा अनुदान योजना 2025 या योजनेसाठी अर्ज हा online आणि offline अशा दोन्ही पद्धतीने करता येतो .
  • offline – सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज करण्यासाठी तुम्ही ज्या गावामध्ये राहतात त्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन अर्ज करायचा आहे .ग्रामपंचायतमध्ये विहित नमुन्यात अर्ज मिळेल तो अर्ज घेऊन तो पूर्ण भरायचा आणि त्याबरोबर आवश्यक कागदपत्रे जोडावीत आणि ग्रामसेवकाकडे अर्ज दाखल करावा .
  • online :- शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही online अर्ज करू शकतात .
  • तसेच कागदपत्रे अपलोड करावीत .

गाय गोठा अनुदान योजना 2025 Online Apply :-

गाय गोठा अनुदान योजना 2025 या योजनेचा लाभ मिळवण्याकरीता शासनाच्या अधिकृत website वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात .तसेच mobile app द्वारे देखील तुम्ही form भरू शकतात .

पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन

सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता वेळेत form भरा आणि आणि संबधित अधिकारी यांच्याशी संपर्क करुन योजनेचा पाठपुरावा करत राहा .

गाय गोठा अनुदान योजना कागदपत्रे ?
  • आधार कार्ड .
  • रहिवाशी दाखला .
  • जातीचे प्रमाणपत्र .
  • कुटुंबाचे जॉब कार्ड .
  • ७/१२ चा उतारा .
  • ८-अ नमुना .
  • बँक पासबुक
  • ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र .
  • जनावरांचे टॅनिंग प्रमाणपत्र .
  • गोठ्यासाठी निवडलेल्या जागेचा आराखडा आणि फोटो .
  • मनरेगा तांत्रिक सहाय्यक ,पशुधन विभाग पर्यवेक्षकआणि संबधित लाभार्थी सहीचा ठिकाण पाहणी अहवाल .
  • पासपोर्ट फोटो .
  • मोबाईल नंबर .
  • स्वयंघोषणापत्र .
योजनेचा लाभ मिळवण्याकरीता लाभार्थी पात्रता काय आहे ?
  • अर्जदार हा अनुसूचित जाती व जमातीचा असावा .
  • महिला कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब सदर योजनेस पात्र असेल .
  • शारीरिकदृष्ट्या अपंग असणारे कुटुंब यास देखील प्रधान्य दिले जाईल .
  • अल्पभूधारक ते ५ एकरच्या आत जमीन असणारे शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील .
  • भटक्या विमुक्त जमातीतील शेतकरी देखील पात्र असतील .
  • असे शेतकरी ज्यांनी भूसुधार योजनेचा लाभ घेतला आहे तो देखील या योजनेस पात्र असेल .

निष्कर्ष :-

महाराष्ट्र शासनाने गाय गोठा अनुदान योजना 2025 या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास साधला जावा तसेच त्यांना आर्थिक सहाय्य मिळावे आणि पशुधन जोपासले जावे. याकरिता सदर योजना राबवली जात आहे .तसेच शेतकरी यांच्या पशुधनाचे संरक्षण केले जात आहे .शेतकरी यांचा पशुधनासाठी कायमस्वरूपी किंवा दीर्घकाळ टिकणारे छत मिळणार आहे.तेव्हा या योजनेचा लाभ घेण्याकरिता तत्काळ अर्ज करा .

धन्यवाद !

Leave a comment