दुधाळ गाय म्हैस अनुदान योजनाअंतर्गत ७५% अनुदान घ्या आणि गाय म्हैस खरेदीसाठी १,३४,४४३/- रुपये मिळवा .
गाय म्हैस अनुदान योजना: महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र राज्यातील शेतकरी वर्गासाठी अत्यंत आनंदाची बातमीगाय म्हैस अनुदान योजना 2025 अंतर्गत ५०% ते ७५% अनुदान घेऊन गाय म्हैस मोफत मिळवा.महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राज्य सरकार शेतकरी वर्गासाठी विविध योजना राबवत आहे त्यामध्ये हि योजना शेतकरी कुटुंबासाठी आर्थिक सहाय्य देऊन रोजगाराचा साधन उभे करत आहे.
गाय म्हैस अनुदान योजना सदर योजनेकरिता अनुदान किती आणि कसे मिळणार तर त्याकरिता तुम्हाला तालुका स्तरावरील पशुसंवर्धन खात्याकडे ऑफलाईन अर्ज करावा लागेल किंवा online अर्ज करावा लागेल .मिळणारे अनुदान हे जातीच्या प्रवर्गानुसार दिले जाते .सर्वसाधारण घटकासाठी ५०% अनुदान असेल तर SC ,ST साठी ७५% अनुदान मिळेल . दोन गाई साठी – १,१७,६३८/- रुपये (अनुदान ७५%)दोन म्हशीसाठी – १,३४,४४३/- रुपये मिळतील . त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ,अर्ज कुठे करावा लागेल इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहूया .
गाय म्हैस अनुदान योजनाचे स्वरूप काय ?
- गाय म्हैस अनुदान योजना सदर योजना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकरी वर्गासाठी राबवली जात आहे. ज्यामध्ये संबधित अर्जदारास दोन गायी किंवा दोन म्हसी घेण्यासाठी जनावर खरेदी करताना रकमेच्या ७५ % आणि दिली जाणार आहे.दिली जाणारी रक्कम हि दोन गाई साठी – १,१७,६३८/- रुपये (अनुदान ७५%)दोन म्हशीसाठी – १,३४,४४३/- रुपये जातीच्या प्रवर्गानुसार असेल.
- गाय म्हैस अनुदान योजना सदर योजनेंतर्गत मिळणारी जनावरे हि फक्त पशुसंवर्धन विभागाने अधिकृत केलेल्या केंद्रामधूनच खरेदी करणे बंधनकारक असेल .या योजनेचा लाभ मिलाल्यापासून किमान पुढील ३ वर्ष चालू दुग्ध व्यवसाय चालू ठेवावे लागणार आहे ,
गाय गोठा अनुदान योजना 2025:गायी/ म्हशी गोठयासाठी २,३१,५६४रु.अनुदान दिले जाणार आहे .
दुधाळ गाय म्हैस अनुदान योजनाचा उद्देश :-
१. दुधाळ गाय म्हैस अनुदान योजना सदर योजनेच्या माध्यमातून अर्जदार शेतकरी वर्गास आर्थिक सहाय्य प्रधान करणे .
२. शेतकरीयास रोजगाराचे साधन निर्माण करून देणे .
गाय म्हैस अनुदान योजना अनुदान किती आहे ?
- या योजनेंअंतर्गत राज्यातील शेतकरी यांच्या प्रवर्गानुसार मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम हि वेगवेगळी दिली जाते .त्यामध्ये
१. सर्वसाधारण प्रवर्गासाठी (General)-
- दोन गाई साठी – ७८,४२५/- रुपये (अनुदान ५०%)
- दोन म्हशीसाठी – ८९,६२९/- रुपये (अनुदान ५०%) अशा प्रकारे अनुदान मिळेल .
२. अनुसूचित जाती/जमाती (ST/SC) :-
- दोन गाई साठी – १,१७,६३८/- रुपये (अनुदान ७५%)
- दोन म्हशीसाठी – १,३४,४४३/- रुपये (अनुदान ७५%) अशा प्रकारे अनुदान मिळेल.
योजनेचा लाभ घेण्याकरिता लागणारी कागदपत्रे :-
- तुम्हाला अर्ज करण्याकरिता ऑफलाईन असो किंवा online असो त्याकरिता खलील कागदपत्राची पूर्तता करावी लागणार आहे .
- अर्जदाराचे आधार कार्ड .
- ७/१२ आणि ८-अ चा उतारा .
- रेशन कार्ड .
- रहिवाशी ,
- बँक पासबुकची झेरॉक्स ,
- कौटुंबिक सहमती पत्रक ,
- जातीचा दाखला .
अर्ज कसा करावा ?
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही दोन प्रकारे अर्ज करू शकतात .त्या पद्धती कोणत्या त्या खालील प्रकारे पाहूया .
- ऑनलाईन पध्दतीने :- राज्य शासनाच्या पशुसंवर्धन खात्याच्या MAHABMS या website वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात .तसेच google store वरून (AH MAHA BMS ) या ऑपद्वारे अर्ज करता येऊ शकतो .
- ऑफलाईन पध्दतीने : स्थानिक तालुका पशुसंवर्धन विभाग कार्यालयात जाऊन तुम्ही तेथील अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अर्ज करू शकतात .