E-Peek Pahni:ई -पीक पाहणी पिक विमा मिळवण्यासाठी लवकर करा नोंदणी.

ई -पीक पाहणी म्हणजे काय ,ती कशी करावी ,फायदे ,अंतिम तारीख इत्यादी बाबत माहिती मिळवा .

ई -पीक पाहणी लवकर करा अंतिम तारीख सप्टेंबर २०२५ .

ई -पीक पाहणी : महाराष्ट्र शासनातर्फे ई -पीक पाहणी शेती क्षेत्रासाठी राबवला जाणारा हा एक उपक्रम आहे ज्याच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या पिकांची नोदणी डिजिटल स्वरुपात करू शकतात .यालाच तर ई -पीक पाहणी असे म्हणतात .यामुळे काय होईल तर कृषी विभागापर्यंत आपल्या पिकाबाबत अचूक आणि पूर्ण माहिती जाणार आणि त्यामुळे सरकारी योजना मिळवण्याकरीता सोयीस्कर होणारआहे .सदर कार्यक्रमांतर्गत नोंदणी करण्याकरिता १ ऑगस्ट २०२५ पासून सुरुवात झाली आहे ती सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे तरी सर्व शेतकरी यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी .

चला तर मग मित्रानो आज आपण ई -पीक पाहणी म्हणजे काय, ती कशी करायची ,त्याचे फायदे काय होतील ,त्याला कोणती कागदपत्रे लागतील इत्यादी बाबत सविस्तर माहिती खालील मुद्याच्या आधारे पाहूया .

Namo Shetkri Sanman Nidhi Yojana 6 Installment :नमो शेतकरी सन्मान निधी योजना ६वा हप्ता.
ई -पीक पाहणी
ई -पीक पाहणी

ई -पीक पाहणी म्हणजे काय ?

ई – पीक पाहणी म्हणजे शेतकरी त्याच्या शेतीमधील पिकांची माहितीई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे डिजिटल स्वरुपात नोंदवण्याकरिता हि सुविधा आहे. यामुळे पिकांची माहिती शासनाकडे जाते आणि त्याचा उपयोग शेतीविषयक योजनासाठी होतो जसे –पिक विमा अनुदान होय .हि प्रक्रिया पारदर्शक आणि सोपी होण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा यात वापर केला आहे .

ई -पीक पाहणी कशी करावी /ई-पीक पाहणी मोबाईल ॲप ?

  • ई -पीक पाहणी त्याकरिता लागणार आहे तुम्हाला स्मार्ट फोन आणि इंटरनेट कनेक्शन. त्यानंतर लागणार आहे नोंदणी करिता आवश्यक कागदपत्रे .
  • आणि पिकांचे फोटो .
  • ई -पीक पाहणी
    ई -पीक पाहणी

    ई -पीक पाहणी
    ई -पीक पाहणी

चला मग ई -पीक पाहणी कशी करायची हे पाहुया .

१. ई -पीक पाहणी ॲप डाउनलोड करा

  • Google Play Store वरती जाऊन ई -पीक पाहणी ॲप डाउनलोड करा . आणि mobile वरती install करून घ्या .

२. ई -पीक पाहणी नोंदणी करा .

  • ई -पीक पाहणी ॲप उघडून नोंदणी पर्याय वरती किल्क करा .
  • तुमचा आधार क्रमांक टाकून येणाऱ्या OTP द्वारे पडताळणी करा .
  • आपली वैयक्तिक माहिती भरा.(शेतकरी नाव ,पत्ता,संपर्क क्रमांक )

३. शेताचा तपशील द्या .

  • survey Number टाका .(त्याकरिता ७/१२ च्या उताऱ्यावरून शेत जमिनीचा गट नंबर टाका आणि)
  • गावाचे नाव टाका .
  • ॲप अपोआप जमिनीची माहिती शोधेल .
  • जर ई -पीक पाहणी ॲपद्वारे माहिती दिसत नसेल तर आपण स्वत भरावी .

४. पिकांची माहिती नोंदवा –

  • तुमच्या शेतातील पिक निवडा .
  • निवडलेल्या पिकाचे क्षेत्रफळ किती हे टाका .(हेक्टर आणि एकरमध्ये )
  • पिक लागवडीची तारीख आणि पिकाची सद्यस्थिती नोंदवा .(पिकाची वाढ किंवा कापणीची तयारी हे टाका )

५. फोटो अपलोड करा .

  • शेतातील पिकांचे फोटो काढून ई -पिक पाहणी ॲपवर अपलोड करणे आवश्यक आणि अनिवार्य आहे .

६. सोबत जोडावयाची कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • बँक खाते तपशील

७. सबमिट करा आणि पावती मिळवा –

  • सर्व माहिती सविस्तर भरा आणि सबमिट बटनावर किल्क करा .
  • तुमचा नोंदणी सबमिट झाल्यावर तुम्हाला डिजिटल पावती मिळेल ती सांभाळून ठेवा .

८. पडताळणी प्रक्रिया :-

  • तलाठी किंवा कृषी अधिकारी तुमच्या नोंदणीची पडताळणी करतील .
  • त्यानंतर तुमची ई -पीक पाहणी प्रक्रिया पूर्ण होईल .आणि याबाबतची माहिती अधिकृतपणे नोंदवली जाईल .

ई -पीक पाहणी फायदे –

  • डिजिटल नोंदणीमुळे पारदर्शकता वाढेल आणि गैरप्रकार बंद होतील .
  • शासनाला खरी आणि अद्यावत माहिती मिळेल .
  • घरी बसुन शेतकरी स्वत पाहणी करून ई-पीक पाहणीची ॲपद्वारे नोंद करतील .
  • तलाठी यांच्याकडे जाण्याचा वेळ वाचेल .
  • शासनाच्या इतरही विविध कृषी योजनेचा आणि अनुदान मिळवण्यास उपयोग होईल .

ई -पीक पाहणी कार्यक्रमाच्या अटी –

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी या कर्यक्रमात सहभागी होऊ शकतात .
  • ॲप च्या सहाय्यानेच नोंदणी करावी लागेल .
  • प्रकल्प अंमलबजावणीचा कालावधी :
  • प्रत्येक हंगामातील सुरुवातीचे २ महिने शेतकरी आपल्या शेतातील ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे अपलोड करतील .
  • व त्यानंतरचा १ महिना तलाठी आणि कृषी सहाय्यक हे नमुना पडताळणी करतील .
  • आणि त्यानंतर तलाठी ई-पीक पाहणीला अंतिम मान्यता देतील.

ई -पीक पाहणी नोंदणी २०२५ Last Date-

  • ई -पीक पाहणीचा कालावधी -१ ऑगस्ट पासून पुढील ४५ दिवसात नोंदणी पूर्ण करावी लागेल .
पिकांच्या समाविष्ट अवस्था –
  • पिक पेरणी नंतर दोन आठवड्यात वाढलेले पीक .
  • पिकांची पूर्ण वाढलेली अवस्था .
  • कापणी हंगाम पूर्वीची अवस्था .
ई -पीक पाहणी प्रकल्पाला शेतकऱ्याडून आजपर्यंत मिळालेला प्रतिसाद .

-ई -पीक पाहणी गेल्या वर्षी खरीप हंगामात ३८० पिकांची तर रब्बी हंगामात २६३ पिकांची आणि उन्हाळी हंगामात १८३ पिकांची एकूण ८२६ पिकांची नोंद केली गेली आहे .

– आजवर ९० लाखाहून अधिक शेतकऱ्याणी ई-पीक नोंदणी केली असून ७० लाखाहून अधिक शेतकऱ्यांची सातबारा वरील ई -पिक पाहणी नोंदणी पूर्ण केली आहे .

Leave a comment