Bima sakhi yojana2025-LIC विमा सखी योजना काय आहे ?
(LIC) भारतीय आयुर्विमा महामंडळ अंतर्गत महिलांसाठी Bima sakhi yojana विमा सखी योजना-2025 सुरु करण्यात आली आहे .सदर योजनेंतर्गत महिलांना एल आय सी एजंट म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे त्याकरिता त्यांना प्रशिक्षण दिले जाते.
Bima sakhi yojana विमा सखी योजना-2025 योजनेबाबत सविस्तर माहिती घ्या ज्यामध्ये योजनेची पात्रता ,लागणारी कागदपत्रे,ऑनलाइन अर्ज प्रक्रिया , योजनेचे फायदे काय अशा बऱ्याच मुद्यावर आपण खालीलप्रमाणे माहिती देणार आहोत.चला तर मग मित्रानो आपण पुढीलप्रमाणे माहिती घेऊ .
सौर कृषी पंप योजना २०२५ -Sour Krushi Pamp Yojanaमागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शासनाचे ९०% अनुदान मिळवा.

LIC विमा सखी योजना काय आहे ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजी विमा सखी योजनेची घोषणा केली जी LIC द्वारे राबवली जात आहे ज्यामध्ये केवळ महिलांसाठी संधी असून एक स्टायपेंड योजना आहे .संपूर्ण भारतातील ग्रामीण महिलांना स्वयं रोजगार आणि उपजीविकेची संधी निर्माण करून देणारी योजना आहे.ज्याद्वारे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणारी योजना आहे .
सदर योजनेंतर्गत पात्र महिलांना ३ वर्षाकरिता प्रशिक्षण आणि प्रशिक्षण कालावधीत या ३ वर्षाचा स्टायपेंड मिळणार असून त्यानंतर त्यांना LIC विमा एजेंट म्हणून काम करू शकतात .तसेच ज्याकाही विमा पोलिसी विकल्या जातील त्यावरती आकर्षक कमिशन सुद्धा दिले जाणार आहे .
विमा सखी योजनेचे उद्देश –
- LIC च्या विमा सखी योजनेचे मुख्य उद्दिष्ट १ लाख महिलांची एका वर्षात नोंदणी करून त्यांना विमा एजंट बनवणे .
- महिलांना स्वयं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे .
- महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे .
- महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे .
Bima sakhi yojana विमा सखी योजना-2025 योजनेचे फायदे –
सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेस जो स्टायपेंड मिळणार तो किती हे पाहूया .
योजनेंतर्गत मिळणारा स्टायपेंड –
- LIC एजंट म्हणून महिलांना काम करण्याची संधी मिळत आहे .
- महिलांना प्रती महिना तीन वर्षाकरिता वेगवेगळा ठरवण्यात आला आहे .
- पहिल्या वर्षी ७,०००/- रुपये प्रती महिना दिला जाईल .
- त्यानंतर दुसऱ्या वर्षी ६,०००/- रुपये प्रती महिना दिला जाणार आहे.
- तिसऱ्या वर्षी ५,०००/- रुपये प्रती महिना दिला जाणार आहे .
- या कामाकरिता महिलांना प्रशिक्षण आणि त्याबरोबर स्टायपेंड देखील मिळणार आहे .
- तसेच एका वर्षात २४ पोलीसी विकल्यास त्यावरती अतिरिक्त ४८ हजार रुपये कमिशन सुद्धा मिळणार आहे .
विमा सखी योजनेसाठी कोण पात्र आहे –
- अर्जदार महिला किमान १० वि पास असणे गरजेचे राहील .
- सदर योजनेकरिता वय १८ ते ७० वर्षाच्या आतील महिला अर्ज करू शकतात .
- विशेषत ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाईल .
- सदर योजनेतील LIC चे विद्यमान एजंट किंवा कर्मचारी किंवा त्यांचे नातेवाईक अर्ज करण्यास पात्र नसतील .
Bima sakhi yojana विमा सखी योजना-2025 अर्ज कसा करावा –
सदर योजनेकरिता licindia.in या website वरती online अर्ज करू शकतात .अर्ज कसा करायचा त्या step पुढीलप्रकारे पाहूया.
- Step 1 – LIC च्या licindia.in अधिकृत website ला भेट द्या.
- Step 2 – सदर योजनेचे मुखपृष्ठ खाली स्क्रोल करा आणि विमा सखी साठी येथे किल्क करा .
Bima sakhi yojana विमा सखी योजना-2025 - Step 3 – open झालेल्या page वरती विधारलेली सर्व माहिती पूर्ण भरा ,जसे –नाव,जन्मतारीख ,mobile No ,ईमेल आयडी ,तुमचा पत्ता आणि तुम्ही कोणत्या LIC एजंट किंवा कर्मचारी यांच्याशी संबधित आहात का इत्यादी बाबत माहिती भरावी लागेल .
- त्यानंतर कॅपच्या कोड लिहा आणि form सबमिट करा .
- Step 4 – अर्जदाराने स्वतचे राज्य निवडावे तसेच तुम्हाला ज्या शहरात काम करायचे आहे ते शहर निवडा .
- Step 5– LIC कार्यालय निवडा ,शाखा निवडून सबमिट लीड form वर किल्क करा .
Bima sakhi yojana विमा सखी योजना-2025 form भरण्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे ?
- पासपोर्ट फोटो.
- जन्मतारखेचा दाखला .
- शाळेचा मार्कलिस्ट .
- आधार कार्ड .
- रहिवाशी दाखला . इत्यादी कागदपत्राची पूर्तता करून form भरावा .
निष्कर्ष :-
Bima sakhi yojana विमा सखी योजना-2025 अंतर्गत सदर योजना महिलांसाठी स्वयं रोजगाराची संधी निर्माण करून डेट आहे तसेच महिलांना आर्थिक स्वावलंबी होण्यास सहकार्य केले जात आहे .महिला ३ वर्षाकरिता नेमणूक करून त्यांना प्रशिक्षण व स्टायपेंड दिला जाणार आहे .मिळणारी लाभाची रक्कम हि प्रतिमाह ७,०००/- रुपये याप्रमाणे पहिल्या वर्षाकरिता आणि दुसऱ्या वर्षाकरिता ६,०००/- प्रतीमाह मिळेल. तिसऱ्या वर्षाकरिता ५,०००/- रुपये प्रती महिना दिला जाणार असून त्यानंतर सदर महिलेस विमा एजंट म्हणून काम करण्याची संधी देखील दिली जाईल .
सदर योजनेबाबत अर्ज कसा भरावा त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ,पात्रता काय आहे ,लाभाचे स्वरूप काय इत्यादी बाबत सविस्तर माहिती आजच्या या लेखात दिली आहे तरी या माहितीच्या आधारे सदर योजनेचा लाभ मिळवावा आणि इतरानाही मिळण्य करिता मदत करावी .
धन्यवाद !