Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाअंतर्गत शासनाचे १००% अनुदान मिळवा .

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाचे पात्रता ,मिळणारे अनुदान ,अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबत सविस्तर माहिती .

राज्य शासन आणि कृषी विभागामार्फत Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025 योजनांतर्गत शेतकरी यांच्याकरिता फळबाग लागवडी करिता सन २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून राज्यात राबविण्यात येत आहे . या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंअंतर्गत जॉबकार्ड असणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी यांना २ हेक्टर क्षेत्र मर्यादेत फळबाग लागवडी करिता अनुदानास पात्र आहेत.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सदर योजनांतर्गत लागवडीचे क्षेत्र किती ,पात्रतेचे निकष काय असतील ,अनुदान किती मिळेल ,लाभार्थीची जबाबदारी काय असावी ,आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या पोस्ट मध्ये घेणार आहोत .

चला तर मग मित्रानो आपण पुढील मुद्यांच्या आधारे सदर योजनेची सविस्तर माहिती घेवूया .

Bhausaheb Fundkar Falbag yojana 2025 : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना काय आहे ?

महाराष्ट्र शासनातर्फे कृषी विभागामार्फत Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025 सदर योजना सर २०१८-१९ पासून राज्यात सुरु करण्यात आलेली आहे . या योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंअंतर्गत जॉबकार्ड असणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी यांना २ हेक्टर क्षेत्र मर्यादेत फळबाग लागवडी करिता अनुदानास पात्र आहेत . जे लाभार्थी फळबाग लागवड या बाबीचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांना यामध्ये लाभ देण्यात येणार आहे .

Mahadbt Tractor Yojna-2025 महाडीबीटी ट्रॅक्टर योजनाअंतर्गत १ लाख ते १,२५०००/- पर्यंत सबसिडी मिळवा .

लागवडीचे क्षेत्र मर्यादा :-

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025 या योजनेत भाग घेण्याऱ्या शेतकरी यांनी खालीलप्रमाणे क्षेत्र मर्यादा पाहून अर्ज करावा

  • कोकण विभागात कमीत कमी १० गुंठे तर जास्तीत जास्त १० हेक्टर आणि
  • इतर विभागात कमीत कमी २० गुंठे आणि जास्तीत जास्त ६ हेक्टर या क्षेत्र मर्यादेत लाभ घेऊ शकतो .
  • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंअंतर्गत पात्र लाभार्थी यांना त्या योजनेप्रमाणे लाभ घेणे आवश्यक आहे .
  • अल्प व अत्यल्प भूधारक , महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य आहे.
  • भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गतसहभागी होणाऱ्या शेतकर्यांना मंजूर अनुदान हे पुढील तीन टप्यात दिले जाणार आहे

१. पहिल्या वर्षी ५०%

२. दुसऱ्या वर्षी ३०%

३. तिसऱ्या वर्षी २०% अशा प्रकारे ३ वर्षात अनुदान हे दिले जाणार आहे .

  • लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्याकरिता लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी ९०% ते कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे .
  • जर झाडांचे प्रमाण कमी झाले तर शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण जे विहित केले होते त्याप्रमाणे राखणे आवश्यक आहे .

फळबाग लागवडीसाठी मुदत :-

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सदर योजनेंअंतर्गत फळबाग लागवडीचा कालावधी प्रतिवर्षी १ मे ते ३० नोव्हेंबर पर्यंत राहील .योजनेत सहभाग घेण्यासाठी अर्ज सादर करणे बंधनकारक राहील .

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाअंतर्गत मिळणारे अनुदान :-

  1. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना ठिबक सिंचन संच्याकरिता १००%अनुदान मिळेल .
  2. सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यास एकूण ३ वर्षाच्या कालावधीत ५०:३०:२० या प्रमाणे अनुदान दिले जाते .उदा : आंबा कलमांची लागवड केल्यास १०x १० मीटर अंतरावर केल्यास खलील तक्त्यात दिल्या प्रमणे अनुदान देण्यात येईल .
.क्र.बाबवर्ष पहिलेवर्ष दुसरेवर्ष तिसरेएकूण
खड्डे खोदने ९९४७ ९९४७
कलमे लागवड करणे १००६० १००६०
नांग्या भरणे २०१२ २०१२
ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे २३०४७ २३०४७
पिक संरक्षण २१५५ ३१७० ३१७० ८४९५
एकूण अनुदान ४५२०९ ५१८२ ३१७० ५३५६१
देय अनुदान २६७८१ १६०६८ १०७१२ ५३५६१

४. ७/१२ वरती फळबाग लागवडीची नोंद करून घेण्याची जबाबदारी कार्यक्रमाअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थीची राहील .

५. लाभार्थीने लावलेली झाडे पहिल्या वर्षी किमान ८०% व दुसऱ्या वर्षी ९०% जगविणे आवश्यक राहील .

६. लाभार्थ्यास प्रतिवर्षी देय असलेले अनुदान त्याच्या आधारसंलग्न खात्यात वर्ग केले जाईल .

लाभार्थीची पात्रता : –

  1. Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यास फळबाग लागवडी करिता ठिबक सिंचन संच बसविणे अनिवार्य आहे .
  2. सर्व प्रवर्गअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे अश्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल .
  3. आणि त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल.( कुटुंबाची व्याख्या – कुटुंब म्हणजे पती ,पत्नी व त्यांची अज्ञात मुले )
  4. योजने अंतर्गत लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येईल . गट व संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार नाही .
  5. शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक असेल . जर सयुक्त मालकी असल्यास इतर खाते दारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वताच्या हिस्याच्या मर्यादे लाभ घेता येईल .
  6. जर ७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची सहमती घेणे आवश्यक आहे .
  7. परंपरा गत वननिवासी ( वन अधिकार मान्यता ) अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र असतील .
  8. इतर शासकीय योजेनेतून फळ बाग लागवड केली असल्यास तेक्षेत्र वगळून वरील विभागानुसार क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल .

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाकरिता लाभार्थीच्या जबाबदऱ्या :-

  1. Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या शेतकरी यानी जाहिरात प्रशिद्ध झाल्यापासून किमान २१ दिवसात अर्ज सादर करावा .
  2. लाभार्थी निवडीसाठी असणाऱ्या सोडतीचे ठिकाण ,दिनांक आणि वेळ पाहून उपस्थित राहावे .पूर्व संमती मिळाल्यापासून ७५ दिवसात सर्व बाबीसह फळबाग लागवड करावी .
  3. तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत अदा केलेल्या परवान्यावर कलमा /रोपांची उचल केल्यानंतर लागवड करणे आवश्यक आहे अन्यथा सदर कलम /रोपांची किमत शासनास परत करण्याची जबाबदारी राहील .अन्यथा सबंधित लाभार्थ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल .
  4. शासनाने निश्चित केलेली फळपिके ,प्रजाती व लागवडीचे अंतर याचे निकष पाळणे बंधनकारक राहील आणि सदर बाबीचा भंग केल्यास संबधित शेतकरी अनुदानास अपात्र राहील व त्यानी परवान्यावर घेत्ल्लेल्या कलम किंवा रोपांची रक्कम शासनास परत करण्याची जबाबदारी राहील अन्यथा कादेशीर करवाई करण्यात येईल .
  5. ठिबक सिंचन संच ७ वर्षापर्यंत त्याच शेतात कायम ठेवणे अनिवार्य राहील .
  6. कागदी लिबू ,संत्रा व मोसंबी या लिबूवर्गीय फळपिकांच्या लागवडी करिता माती परीक्षण करणे अनिवार्य असेल अनिमती परीक्षण शेतकऱ्याने स्वखर्चाने करावे .
  7. लाभार्थ्याने फळबाग लागवडीकरिता जमीन तयार करणे ,माती व शेणखत/ सेंद्रिय खात मिश्र नाणे खड्डे भरणे तसेच रासायनिक खात वापरून खड्डे भरणे ,अंतर मशागत करणे आणि काटेरी झाडांचे कुंपण करणे इत्यादी कामे पूर्ण करण्याची जबाबदारी राहील .
  8. लाभार्थीने लावलेली झाडे पहिल्या वर्षी किमान ८०% व दुसऱ्या वर्षी ९०% जगविणे आवश्यक राहील.

अर्ज करण्याची प्रक्रिया :-

  1. राज्य / जिल्हा स्तरावरून वर्तमान पत्रामध्ये दरवर्षी एप्रिल मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येतात .
  2. अर्जाचा नमुना
  3. .IMG 20250803 162834
  4. IMG 20250803 162815

IMG 20250803 162802

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025
Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025

  1. इच्छुक शेतकऱ्यांनी जाहिरात दिल्यापासून किमान २१ दिवसात अर्ज सादर करावा .
  2. तालुका निहाय सोदर कडून प्राधान्यक्रम यादी करून लाभार्थी निवड करण्यात येईल .
  3. लाभार्थी निवडीसाठी असणाऱ्या सोडतीचे ठिकाण ,दिनांक आणि वेळ पाहून उपस्थित राहावे .
  4. पूर्व संमती मिळाल्यापासून ७५ दिवसात सर्व बाबीसह फळबाग लागवड करावी लागेल .
आवश्यक कागदपत्रे :-
  1. ७/१२ चा उतारा
  2. ८व चा खाखला
  3. हमीपत्र
  4. संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे सहमती पत्र
  5. जातीचे प्रमापत्र (अनुसूचित जाती /अनुसूचित जमातीतील शेतकरी यांच्यासाठी )
योजनेचा संपर्क तपशील :-

Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025 सदर योजनेत काही अडचणी येत असतील तर तुम्ही अधिकृत website च्या हेल्पलाईन नंबर -०२२-६१३१६४२९ या वरती call करू शकतात आणि तुमच्या प्रश्नाचे निवारण करू शकतात .

तुम्हाला call करण्याकरिता कार्यालयीन कामकाजाची वेळ पाहून call करायचा आहे जेणे करून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळवता येईल .ती कार्यालयीन वेळसकाळी ९.४५ ते सायंकाळी ६:१५ वाजेपर्यंत असेल .

Leave a comment