Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजनाअंतर्गत दरवर्षाला रु.६,०००/-ते रु १२०००/-पेंशन मिळवा.
प्रस्तावना –
महाराष्ट्र शासनाची बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना वयाची ६० वर्ष पूर्ण करणाऱ्या कामगाराला २८/०३/२०२५ च्या शासन निर्ण्यान्व्ये लागू करण्यात आली आहे. कारण कि वयाची ६० वर्ष पूर्ण झाली कि शारीरिक कष्ट होत नाहीत मग त्याच्या वृद्धपणात आर्थिक अडचणीला हातभार लागतो.याकरिता सरकारने केलेली उपाययोजना आहे.
महाराष्ट्र इमारतव इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत नोंदीत कामगार असावेत.नोंदणीच्या कालावधीनुसार त्यांना पेंशन रक्कम हि रु.६०००/-पासून ते रु.१२,०००/- पर्यंत मिळेल .त्याकरिता योजनेची पात्रतानिकष , निवृत्ती वेतन अर्जाबरोबर जोडवयाची कागदपत्रे, निवृत्ती वेतनाचे निकष आणि दर किती दिला जातो, अर्ज कसा आणि कुठे करायचा, अटी व शर्तीकोणत्या इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण खालिल मुद्याच्या आधारे पाहूया .

Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजना पात्रता निकष-
- बांधकाम कामगार याने मंडळाकडे किमान १० वर्ष पासून नोंदणी केलेली असणे गरजेचे असावे.
- बांधकामगार याने वयाची ६० वर्ष पूर्ण केलेली असावीत.
- बांधकामगार याच्या कुटुंबातील पती/पत्नी दोघे हि बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र असतील .
- पती/पत्नी च्या मृत्यू नंतर संबधित बांधकाम कामगाराचे पती/पत्नी निवृत्ती वेतन करिता पात्र असतील.
- जर पती किंवा पत्नीला योजनेंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर सबधीतास डबल निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही.
- केंद्र शासनाच्या आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार, कर्मचारी राज्य विमा कायदा,१९४८ (Employees State Insurance Act,1948) व कर्मचार्यांचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा,१९५२ (The Employees provident fund and Miscellaneous Provision Act,1952)अंतर्गत लाभ प्राप्त करणारे कामगार निवृत्तीवेतनास पात्र राहणार नाहीत.
बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ कामगारासाठीच्या सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक व आरोग्यविषयक कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती .
Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजना करिता निवृत्तीवेतन अर्जाबरोबर जोडवयाची कागदपत्रे .

- आधार कार्ड .
- जन्म तारखेचा पुरावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला.
- बँक खाते पासबुक झेरॉक्स.
- नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी.
Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजना निवृत्ती वेतनाचे निकष आणि दर किती दिला जातो .
- मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना त्याच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन देण्यात येईल.
- मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतनाचे दर खालीलप्रमाणे पाहू.
अ.क्र | मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष | दरवर्षी मिळणारे निवृत्तीवेतन |
१. | १० वर्ष | ५०% (रु ,६,०००/-) |
२. | १५ वर्ष | ७५% (रु.९,०००/-) |
३. | २० वर्ष | १००%(रु.१२,०००/-) |
वरीलपैकी आपण केलेल्या नोंदणीच्या आधारे दरानुसार निवृत्तीवेतन मिळेल.
Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजना अर्ज कसा आणि कुठे करायचा.
- सदर योजनेंतर्गत पात्र असणारे मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगाराणे mahabocw.in मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुन्यात अर्ज download करून घेणे .
- Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजना अर्जाचा नमुना प्रपत्र- अ विनामुल्य प्राप्त करून घ्यावा.
अर्जाचा नमुना प्रपत्र- अ

- अर्जाचा नमुना प्रपत्र- अ पूर्णपणे भरून पात्र नोंदीत बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्यातील असेल त्या जिल्हा बांधकाम सुविधा केंद्राचे(WFC) प्रभारी कामगार उपयुक्त/सहायक कामगार आयुक्त/सरकारी कामगार अधिकारी) यांच्याकडे जमा करावा.
अर्जाचा नमुना प्रपत्र- ब - अर्ज जमा करताना त्याबरोबर लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे वरील दिल्या प्रमाणे जोडावीत.
- त्यानंतर अर्ज छाननी साठी जाईल .
Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजना - त्यानंतर अर्ज मान्य झाल्यास संबधित बांधकाम कामगारास “निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र”मिळेल .
- निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबधित बाधकाम कामगाराचा निवृत्तीवेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्ष गणले जाईल.त्यानुसार निवृत्ती वेतन मिळेल.
- दरमहा संबधित निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगाराचा खात्यावर निवृत्ती वेतन जमा होईल .
पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना २०२४-PM Vishwakarma Kausalya Sanman Yojana Maharashtra योजनेंतर्गत सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योगाकरिता १ ते २ लाख रु पर्यंत कर्ज मिळवा अर्ज करा.
Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजना अटी व शर्ती –
- अर्ज मंजूर झाल्यास संबधित बांधकाम कामगाराने दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात त्याच्या हयातीचा दाखला (प्रपत्र-इ )पुरावा स्वरुपात सादर करावा लागेल .
(प्रपत्र-इ )

- याकरिता आधार कार्ड /मंडळाचे नोंदणी कार्ड व निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्रासह संबधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये स्वत हजर राहून जिल्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून हयातीचा दाखला घ्यावा.
- मंडळाच्या निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगारास त्याचे बँक खाते बदलावयाचे असेल तर तसा अर्ज त्यास प्रभारी ,जिल्हा बांधकामसुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल.
- मंडळाचा निवृत्ती वेतन धारक बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचा किंवा तिचा वारसदार पती/पत्नीने वारस नोंदीचा अर्ज प्रभारी,जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल.
FAQ-
१. निवृत्तीवेतन करिता बांधकामगार कामगाराने कोणत्या मंडळाकडे नोंद करावी?
– महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत नोंद करावी .
२. Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजना वयाची अट काय आहे ?
– नोंदणीकृत बांधकामगार यांनी वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर सदर योजना लागू होते.
३.बांधकामगार पेंशन योजनेची मंडळाकडे नोंदणी करून १७ वर्ष पूर्ण झाली असतील तर लाभ किती मिळेल?
– मंडळाकडील नोंदणीला एकूण १५ वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे ७५%प्रमाणे दरवर्षी रु.९,०००/- याप्रमाणे रक्कम मिळेल.
निष्कर्ष :-
Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजना सदर योजनेंतर्गत बांधकाम कामगाराला वयाची ६० वर्ष पूर्ण झाल्यानंतर शारीरिक कष्टाची काम होत नाही अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते या परिस्थितीवर मात करण्यासाठी सदर योजना खूप फायद्याची होईल.बांधकामगार पेंशन योजनाअंतर्गत दरवर्षाला रु.६०००/-ते रु १२०००/-पेंशन मिळवा.पेंशन योजनाकरिता अर्ज कसा आणि कुठे करायचा ,लाभाचे स्वरूप किती मिळेल इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिली आहे. सदर माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवार बरोबर शेअर करा कारण कि प्रत्येक कामगाराला सदर योजनेचा लाभ घेता येईल .
तसेच योजनेबाबत काही प्रश्न किंवा अडचणी येत असतील तर आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात .
धन्यवाद !