बांधकाम कामगार योजना नोंदणी व नुतनीकरण आत्ता यापुढे निशुल्क केले जाणार याबाबत महाराष्ट्र शासनाचा १३ ऑगस्ट २०२५ चा जीआर
बांधकाम कामगार योजना करिता महाराष्ट्र शासन उद्योग,ऊर्जा,कामगार व खनिकर्म विभाग मार्फत इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधाकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी/नुतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी/ नुतनीकरण फी हि २०२० रोजी रु.२५ इतकी होती त्यानंतर ती रु.१ इतकी करण्यात आली त्यानंतर सध्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण शुल्क माफ करणेबाबत मंडळाने ठराव पास केला आहे .त्यांनुसार नोंदणी/नुतनीकरण शुल्क फी निशुक्ल करण्यात आली आहे .त्याबाबत महाराष्ट्र शासनाने १३ ऑगस्ट २०२५ रोजी शासन निर्णय काढून मंजुरी दिली आहे .
चला तर मग मित्रानो बांधकाम कामगार योजना करिता कामगार नोंदणी कशी करायची ,कुठे करायची त,योजनेचा फॉर्म ,योजनेचे फायदे ,त्याकरिता website कोणती आहे त्याची लिंक काय इत्यादीबाबत सविस्तर माहिती आजच्या या पोस्ट मध्ये देण्यात येणार आहे .
बांधकाम कामगार योजना नोंदणी ऑनलाइन फॉर्म :-
इमारत व इतर बाधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ लागू करण्यात आला .त्यानुसरून या अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बाधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम २००७ तयार करण्यात आला या नियमाच्या कलम १८ अन्वये महाराष्ट्र इमारत व इतर बाधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापन करण्यात आली .
बांधकाम कामगार योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यातील इमारत व इतर बाधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगाराची मंडळामार्फत नोंदणी व नुतनीकरण करण्यात येते .सन २०२० पासून बांधकाम कामगाराची नोंदणी / नुतनीकरण व लाभ वाटप हे ऑनलाइन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत website वरती केली जात आहे.संबधित अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी मंडळाकडे नोंदणी करण्याकरिता रु.२५/- इतके शुल्क घेतले जात होते .त्यानंतर परत यात काही बदल करण्यात आले आणि त्यानुसार पुन्हा हे नोदणी शुल्क रु.१/- करण्यात आले .
त्यानंतर परत एकदा त्यावरती मंडळळा च्या बैठकीत चर्चा करून हे नोंदणी व नुतनीकरण निशुल्क करण्याबाबत ठरवण्यात आले त्यानुसार माहाराष्ट्र शासन माफर्त देखील यास १३ ऑगस्ट २०२५ च्या जीआर नुसार मंजुरी मिळाली आहे .
आत्ता यापुढे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी व नुतनीकरण शुल्क माफ केला जाणार आहे. नोंदणी हि २ प्रकारे करता येते ऑनलाइन ऑफलाईन .ऑनलाइन नोंदणी हि सबंधित website वरती जाऊन करावी लागते .
तर ऑफलाईन हि जवळच्या कामगार कार्यालयात जाऊन करावी लागते .
Bandhkam Kamgar Yojana Online Registretion: बांधकाम कामगार नोंदणी/नुतनीकरण प्रक्रिया :-
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या आदेशानुसार बांधकाम कामगार योजनाअंतर्गत बांधकाम कामगार आपले नोंदणी व नुतनीकरण व लाभाचे अर्ज online पध्दतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील .online अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल .तरीख निवडण्याची सुविधा दिली आहे ,परंतु निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल .
जर संबंधित कामगार हा ठरलेल्या तारखेस व त्या ठिकाणी हजर नाही राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येईल .बांधकाम कामगारांना लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणी साठी जागा व तारीख निवडण्याबाबत सूचना :
ज्या कामगारांनी IWBMS प्रणालीद्वारे कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात .
Bandhakam Kamgar Laptop Yojana -2025बांधकाम कामगार लॅपटॉप योजनाकरिता मिळवा रुपये ४००००/-पर्यंत अर्थसहाय्य .
बांधकाम कामगार योजना कामगार नोदणीची पात्रता निकष :-
- १८ ते ६० वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार.
- मागील बारा महिन्यामध्ये ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार महणून काम केलेले कामगार .
बांधकाम कामगार योजना यादी:-
बांधकाम कामगार योजना या योजनेंअंतर्गत बांधकाम कामगारांसाठी २९ विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात .त्या योजनाचे वर्गीकरण केले आहे ते पाहूया .
- शैक्षणिक सहाय्य योजना .
- आरोग्य विषयक योजना
- सामाजिक सुरक्षा योजना .
- आर्थिक सहाय्य योजना .अशा प्रकारात वर्गीकरण करून योजना कामगारांकरिता राबवल्या जातात.
बांधकाम कामगार योजना फायदे :-
बांधकाम कामगार योजना अंतर्गत मिळणारे फायदे ये या योजनेंअंतर्गत मिळतात त्याचे विश्लेषण खालीलप्रमाणे केले आहे .
१. सामाजिक सुरक्षा योजना-यामध्ये कोणकोणत्या योजना येतात ते पहा .
- पहिल्या लग्नाच्या खर्चासाठी रु.३०,०००/- चे अर्थसहाय्य दिले जाते.
- मध्यान्ह भोजन योजना .
- प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना .
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना .
- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना .
- पूर्व शिक्षण प्रशिक्षणाची मान्यता योजना .
- नोदानिकृत कामगारांच्या एका मुलीच्या लग्नासाठी रु,५१,०००/- चे आर्थिक मदत योजना .
२. आरोग्य विषयक योजना-
- बांधकाम कामगार नॉरमल डिलिव्हरी रु,१५,०००/- आणि
- सिझेरियन डिलिव्हरी रु २०,०००/- रक्कम देऊन अर्थसहाय्य दिले जाते .
- गंभीर आजाराच्या उपचारासाठी रु,१,००,०००/- (नोंदणीकृत बांधकाम कामगार ,त्याच्या /तिच्या कुटुंबातील सदस्याकरिता )
- मुलगी १५ वर्षाची होईपर्यंत रु.१,००,०००/- ची मुदत ठेव .(पहिल्या मुलीच्या जन्मानंतर गर्भनिरोधक शस्त्रक्रिया करावी लागते )
- जर कामगारास कायमचे किंवा ७५% अपंगत्व आल्यास रु.२,००,०००/- चे आर्थिक सहाय्य केले जाते .
- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना .
- कामगारासाठी आरोग्य तपासणी .
३. शैक्षणिक सहाय्य योजना.-
या घटकात सर्व फायदे नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत .
- १ लि ते ७ वि पर्यंतच्या विध्यार्ठीसाठी –रु-२५००/- वर्ष दिले जातात .
- ८ वि १० वि पर्यंतच्या विध्यार्थीसाठी –रु.५०००/- वर्ष दिले जातात .परंतु विध्यार्थी उपस्थिती ७५% किंवा त्याहून अधिक असणे गरजेचे आहे .
- १०वि ते १२वीच्या विध्यार्थी साठी रु.१०,०००/- वर्ष दिले जातात .यात हि विध्यर्थी उपस्थिती ५०% किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक असेल .
- ११ वि ते १२ वीच्या विध्यार्थी साठी रु.१०,०००/- वर्ष
- पदवी अभ्यासक्रमासाठी –रु.२०,०००/- वर्ष (नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पत्नीसाठी देखील लागू )
- वैद्यकीय पदवी –रु.१,००,०००/-अभियांत्रिकी पदवी –रु.६०,०००/- (पत्नीसाठी देखील लागू )
- डिप्लोमा कोर्स –रु.२०,०००/-पदव्युत्तर पदविका अभ्याक्रम –रु.२५,०००/- वर्ष (फक्त सरकारने मान्यता दिलेल्या )
- एम एस सी आयटी अभ्यासक्रमाची परतफेड .
४. आर्थिक सहाय्य योजना-
१ बांधकामाच्या ठिकाणी काम करताना अपघाती मृत्यू –रु.५,००,०००/- (कायदेशीर वारसाला ).
२ नैसर्गिक मृत्यू साठी आर्थिक मदत –रु.२,००,०००/-
३ घरकुल साठी सहाय्य अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी
४ घरकुल साठी सहाय्य अटल बाधकाम कामगार आवास योजना ग्रामीण
५ अंत्यसंस्कार मदत –रु.१०,०००/-
६ नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या विधवा किंवा विधुरासाठी (५ वर्षासाठी ) रु.२४,०००/- वर्ष मदत.
७ नोंदणीकृत कामगाराचा मृतदेह त्याचा गावी किंवा राहत्या ठीकामी शववाहिकेद्वारे पाठवण्याकरिता आर्थिक मदत .
८ घर खरेदीसाठी बँककेकडून गृह कर्जासाठी रु.६,००,०००/- किंवा रु.२,००,०००/- अनुदान .
बांधकाम कामगार योजना लिंक आणि website –
बांधकाम कामगार योजना या सदर योजनेबाबत सविस्तर माहिती मिळवायची असेल तर शासनाच्या संबधित website वरती जाऊन तुम्ही माहिती मिळवू शकतात .