Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजना

Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत बांधकाम कामगारांना घर बांधणीसाठी ६ लाख रुपयाचे कर्जआणि त्यावरती २ लाखाचे अनुदान मिळवा.

महाराष्ट्र शासनाने Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 योजनेंतर्गत बांधकाम कामगारांसाठी घर कर्ज आणि त्यावरती अनुदान देण्याची योजना सुरु केली आहे.पण हि योजना कोणासाठी तर मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कामगार असतील आणि त्यांना घर बांधायचे असेल किंवा ज्यांना पक्के घर नाही अशांसाठी सदर योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे .

Table of Contents

सदर योजेतील मंडळाने घालून दिलेले निकष व पात्रता पूर्ण केल्यानंतर संबधित बांधकाम कामगार यास पक्के घर बांधण्यासाठी सरकारतर्फे २ लाख रुपयाचे अनुदान मिळणार असून त्याकरिता संबधित कामगाराने राष्ट्रीय कृत बँक मध्ये घर कर्जासाठी अप्लाय करून घर कर्ज मंजूर करून घ्यावे.बँकेचे मंजुरीचे प्रमाणपत्र आणि लागणारे इतर कागदपत्रे जोडून मंडळाच्या website वरती घर कर्जासाठी अप्लाय करायचा आणि मग त्यानंतर योजनेसाठी जेकाही निकष पात्रता ,अटी शर्ती पूर्ण करेल अशाच कामगारास लाभ मिळेल .

चला तर मग मित्रानो आज आपण पुढीलमुद्द्याच्या आधारे योजनेचे स्वरूप,लाभाचे स्वरूप,अर्थसहाय्य तसेच बांधकामासाठी दिलीजाणारी रक्कमेचे ४ टप्पे ,सदर योजनेचा उद्देश ,लाभार्थीची पात्रता ,योजनेचे फायदे ,लागणारी कागदपत्रे ,अर्ज कसा भरायचा इत्यादी बाबत सविस्तर माहिती घेवू .

Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजना

१. Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजना स्वरूप –

महाराष्ट्र शासन तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या समन्वयाने सदर योजनेंअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगाराला रु ६ लाखापर्यंत चे कर्ज घर बांधणीसाठी दिले जाणार आहे.आणि त्याबरोबर त्यावरती रु २ लाखाचे अनुदान सुद्धा मिळणार.

नोंदणीकृत बांधकाम कामगार घरबांधणी असो किंवा घर खरेदीकरिता बँकेकडून घेतलेल्या ६ लाख रुपये च्या कर्जावरील व्याजाची रक्कम मंडळामार्फत दिली जाईल .आणि ती रक्कम कामगाराच्या बँकेच्या कर्ज खात्यात जमा केली जाणार आहे.सदर योजनेसाठी लाभार्थीची जागा असणे गरजेचे आहे .किंवा अगोदरचे कच्चे घर असेल तरीही चालेल कारण याच करिता होम लोन मिळत आहे .परंतु लाभार्थीच्या नावे पूर्वीचे पक्के घर नसावे .मिळणाऱ्या ६ लाख रु कर्जाची परतफेड २ लाख रु अनुदान वगळून फक्त ४ लाख रु परतफेड करायची आहे .मg आहे ना फायद्याची योजना .चला तर मग लाभाचे स्वरूप व अर्थसहाय्य किती मिळते हे पुढीलप्रकारे पाहूया .

बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ कामगारासाठीच्या सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक व आरोग्यविषयक कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती .

२. बांधकाम कामगार घरकुल योजनेतील लाभाचे स्वरूप –आर्थिक सहकार्य:-

Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजनाअंतर्गत लाभार्थीस अर्थसहाय्य हे पुढीलप्रकारे दिले जाते .

  • ग्रामीण भागासाठी घर बांधणी करिता रुपये २ लाख असेल.
  • शहरी भागासाठी घर बांधणी करिता रुपये ३ लाख रु असेल .
  • कच्चे घर पक्के करण्याकरिता १ लाख रु असेल .
  1. बांधकाम कामगार मंडळा अंतर्गत नोंदणीकृत असतील यांना ग्रामीण व शहरी भागात स्वत: च्या जागेवर नवीन घरबांधणी करिता किंवा कच्चे घर असेल तर पक्के घर करण्याकरिता २ लाख रु अर्थ सहाय्य .
  2. घराचे क्षेत्रफळ :-घर बांधकामासाठी चटई क्षेत्र किमान २६९चौ फुट व जास्तीत जास्त ३००चौ फुट असावे.
  3. तसेच जागेच्या उपलब्धतेनुसार घर बांधकाम करणेस परवानगी असेल.मात्र बांधकाम क्षेत्र हे ३० मी पेक्षा जास्त असता कामा नये.

३. Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजना बांधकामाची रक्कम हि ४ टप्यात मिळेल ते टप्पे पुढीलप्रमाणे पाहूया .

  1. जागा उपलब्ध तेचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तसेच बंध्कामासाठी पाया खोदल्यानंतर आणि लागणारे बांधकाम साहित्यची जुळवाजुळव केल्यानंतर पहिला हप्ता रुपये ३०,०००/- मिळतो .
  2. बांधकाम सुरु करून लेनटल लेव्हल पर्यनताचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता ६०,०००/- रुपये मिळतो.
  3. छतापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्यानतर तिसरा हफ्ता ६०,०००/-रुपये दिला जातो.
  4. घर पूर्णझालेला पूर्णत्वाचा दाखला सादर केल्यानंतर चौथा हफ्ता ५०,०००/- रुपये दिला जातो.

४. Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजनातील महत्वपूर्ण घटक –

योजनेचे नावबांधकाम कामगार घर कर्ज योजना २०२५ .
शासनमहाराष्ट्र शासन
विभागउद्योग, ऊजा, कामगार व खनीकर्म विभाग
लाभार्थीमंडळाकडे नोंदणीकृत असणारे बांधकाम कामगार .
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत websitemahabocw.in

. Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजनाचा उद्धेश –

बांधकाम कामगार हे कामानुसार संबधित कामाच्या ठिकाणी वास्तव्यास असतात परंतु घर मात्र पक्के व सुरक्षित नसते कच्या घरात किंवा झोपडीत,पत्रेच्या शेड मध्ये अशा प्रकारच्या घरात राहतात.त्यांचे व त्याच्या कुटुंबाचे घर उभारणीचे स्वप्न अपुरे राहते मात्र हेच स्वप्न आता सरकार सत्यात उतरवण्यासाठी संबधित कामगारांसाठी सदर योजनेची सुरुवात करत आहे.

  • “ बांधकाम कामगार यांना मजबूत व सुरक्षित घर प्रदान करून त्यांची राहणीमान उंचावणे हा मुख्य उद्देश ठेवून सरकार सदर योजना राबवत आहे.
  • बांधकाम कामगारांना आर्थसहाय्य करणे .
  • घेतले ल्या घर कर्जावरील व्याज आणि मुद्दल कमी करण्यासाठी अनुदान देऊन सहकार्य करणे.

Bandhkamgar Pension Yojana 2025-बांधकामगार पेंशन योजना.

६. Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजनासाठी लाभार्थीची पात्रता काय –

सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदाराने खाली दिल्याप्रमाणे पात्रता निकष पूर्ण करणे गरजेचे राहील .लाभार्थी पात्रता काय हे आपण पुढीलप्रमाणे पाहू .

  • संबधित लाभार्थी हा नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा.
  • वय किमान १८ ते कमाल ६० वर्ष वयाच्या आतील असावा .
  • महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असने अनिवार्य असेल
  • ९० दिवस बांधकाम कामगार किंवा मजूर म्हणून काम केलेले असावे.
  • सदर योजनेकरिता राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मंजूर असावे.

७. बांधकाम कामगार घरकुल योजनासाठी लागणारी कागदपत्रे –

  • बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र,
  • ९० दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र,
  • कामगार ओळखपत्र,
  • आधार कार्ड,
  • पॅन कार्ड,
  • रहिवाशी प्रमाणपत्र,
  • पासपोर्ट फोटो,
  • बँक खाते झेरॉक्स,
  • राष्ट्रीयकृत बँक केकडून कर्ज मंजूर प्रस्ताव,
  • स्वयं घोषणा पत्र.

८ . Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजनाचे फायदे –

  • घर बांधणीसाठी एक रकमी रक्कम मिळते.
  • मिळणाऱ्या कर्जावर २ लाख अनुदान मिळत आहे .
  • स्वप्न साकार होत आहे .
  • संबधित कामगारास हक्काचे घर मिळत आहे .
  • त्याबरोबर सामाजिक प्रतिष्ठा उंचावत आहे .

९ . Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजना अर्ज करण्याची प्रक्रिया –

  • कोणत्याही राष्ट्रीय कृत बँकेत कर्ज मंजुरीसाठी अर्ज करा आणि कर्ज मंजूरी मिळवा .
  • mahabocw.in या वेबसाईट वर जाऊन कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र आणि लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा .
  • ऑनलाइन फॉम भरून अर्ज सबमिट करा.
  • online form ⇒
    बांधकाम कामगार घर कर्ज योजना online form
    बांधकाम कामगार घर कर्ज योजना online form

    बांधकाम कामगार घर कर्ज योजना online form
    बांधकाम कामगार घर कर्ज योजना online form

  • अर्ज प्रक्रियेनंतर अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाईल.

१० . निष्कर्ष –

Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजना सदर योजनेद्वारे कामगारांना स्वतचे पक्के आणि हक्काचे घर मिळेल आणि सुरक्षितता मिळेल.त्याचबरोबर प्रतिष्ठा देखील उंचावेल.योजनेंतर्गत नोंदीत कामगाराला घरकर्जासाठी रुपये ६ लाख पर्यंत राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज उपलब्ध करावे लागेल.कर्ज मंजूर झाल्यानंतर मंडळातर्फे २ लाख रु अनुदान दिले जाईल .

सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता आजच आणि आत्ताच अर्ज करा आणि आपले व आपल्या कुटुंबाचे घर उभारणीचे स्वप्न पूर्ण करा. योजनेबाबत काही प्रश्न असतीलतर तुम्ही आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात.

धन्यवाद!

११ . FAQ :-
१. Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजनासाठी कोण पात्र आहे ?

मंडळाचा नोंदीत बांधकाम कामगार ज्याने पूर्वी ९० दिवस काम केलेले असणे गरजेचे तसेच वय किमान १८ ते कमाल ६० वर्ष वयाच्या आतील असावा .महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असने अनिवार्य असेल असा कामगार पात्र राहिल .

२.Bandhkam Kamgar Home Loan Yojana-2025 बांधकाम कामगार घरकुल योजना अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ?
mahabocw.in या वेबसाईट वर जाऊन कर्ज मंजुरीचे प्रमाणपत्र आणि लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा .
३. बांधकाम कामगार योजनेंतर्गत घर कर्ज योजेनेचे लाभाचे स्वरूप /आर्थिक सहकार्य ?

ग्रामीण भागासाठी घर बांधणी करिता रुपये २ लाख असेल. शहरी भागासाठी घर बांधणी करिता रुपये ३ लाख रु असेल .कच्चे घर पक्के करण्याकरिता १ लाख रु असेल .

४. बांधकामासाठी मिळणाऱ्या रक्कमेचे ४ टप्पे कोणते ?
 १. जागा उपलब्ध तेचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तसेच बंध्कामासाठी पाया खोदल्यानंतर आणि लागणारे बांधकाम साहित्यची जुळवाजुळव केल्यानंतर पहिला हप्ता रुपये ३०,०००/- मिळतो .
२. बांधकाम सुरु करून लेनटल लेव्हल पर्यनताचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता ६०,०००/- रुपये मिळतो.
३. छतापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाल्यानतर तिसरा हफ्ता ६०,०००/-रुपये दिला जातो.
४. घर पूर्णझालेला पूर्णत्वाचा दाखला सादर केल्यानंतर चौथा हफ्ता ५०,०००/- रुपये दिला जातो.

Leave a comment