अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई यादी ,अनुदान किती आणि निकष काय .
अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई जीआर आला शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार.अतिवृष्टी नुकसान भरपाई काय आहे या संपूर्ण माहितीचा आढावा घेवूया .
महाराष्ट्र शासनातर्फे अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी मित्रांसाठी अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई मिळणार याबाबत दिनांक ६ ऑगस्ट २०२५ रोजी शासनाचा जीआर आला आहे .त्या जीआर निर्णयामध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ आणि जून २०२५ या कालावधीत अतिवृष्टी मुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याना आर्थिक मदत दिली जाणार आहे .त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि किती रक्कम मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण पुढीलप्रकारे पाहूया .
E-Peek Pahni:ई -पीक पाहणी पिक विमा मिळवण्यासाठी लवकर करा नोंदणी.
सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी मुळे आणि पुरामुळे नुकसान झालेले जिल्हे :-

छत्रपती संभाजीनगर – सप्टेंबर २०२४ते ऑक्टोबर २०२४ या कालवधीत शेतातील शेतीपिकाच्या झालेल्या नुक्सानिकारिता वितरीत करावयाचा अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई निधीचा तपशील .
अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई मिळणारे अनुदान :-
विभाग | जिल्हा | कालावधी | बाधित शेतकरी संख्या | बाधित शेतीचे क्षेत्र हेक्टर | मंजूर निधी |
छत्रपती संभाजीनगर | धाराशिव | ऑक्टोबर २०२४ | ७९८८० | ६३५७६.०० | ८६४६.३४ |
ऑक्टोबर २०२४ | २४८०५९ | १२६०३४.७० | १७४९७.०४ | ||
छत्रपती संभाजीनगर | सप्टेंबर २०२४ | ७५८४ | ४८९१.०५ | ६६५.४१ | |
एकूण विभागीय आयुक्त,छत्रपती संभाजीनगर | ३३५५२३ | १९४५०१.७५ | २६८०८.७९ | ||
नाशिक | धुळे | सप्टेंबर २०२४ | १ | ०.३ | ०.०४ |
एकूण विभागीय आयुक्त, नाशिक | १ | ०.३ | ०.०४ | ||
एकूण राज्य अतिवृष्टी | ३३५५२४ | १९४५०२.०५ | २६८०८ .८३ |
जुन २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेले जिल्हे .
अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई जील्यांची यादी :-
१. अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई हि महाराष्ट्रातील विदर्भातील अमरावती विभागासाठी ८६.२३ कोटी रु चा निधी जाहीर केला आहे आणि तो मिळणार आहे. त्यामध्ये असणारे जिल्हे.
- अमरावती
- यवतमाळ
- अकोला
- वाशीम
- बुलढाणा या जिल्याकरिता हा निधी आलेला आहे .
२. अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई छत्रपती संभाजीनगर या विभागाकरिता हि १४.५४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि तो मिळणार आहे .त्यामध्ये समाविष्ट असनारे जिल्हे
- छत्रपती संभाजीनगर
- बीड
- नांदेड
- हिंगोली या चार जिल्याकरिता निधी मंजूर झाला आहे आणि तो वितरीत देखील होणार .
अतिवृष्टीचे निकष काय आहेत ?
- अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई करिता २४ तासांत १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस असणे म्हणजे अति मुसळधार पाऊस होय त्यालाच अतिवृष्टी असे म्हणतात उदा –पूर येणे यात शेतीच्या पिकांचे नुकसान ,मानवी जीनला धोका जसे घर वाहून जाणे ,जनावरे वाहून जाणे किंवा नुकसान होणे होय .
- इतर उपजीविकेची साधने किंवा पायाभूत सुविधांचे नुकसान आणि पिके आणि उत्पादनाचे नुकसान होय .
अनुदान कशा स्वरुपात मिळणार :-
- अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई हि मिळण्याकरिता शेतकरी यांना ३ हेक्टर जमिनीची मर्यादा आहे .त्यानुसार नुकसान भरपाई मिळणार आहे.
- मिळणारी नुकसान भरपाई हि संबधित लाभार्थी शेतकरी यांच्या थेट बँक खात्यात DBT द्वारे मिळणार आहे .
- त्यासाठी काही कागदपत्रांची जमवा जमव करावि लागणार आहे ती कागपत्रे कोणती आहेत ते पाहूया .
- शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- जमिनीचा ७/१२ आणि ८अ चा उतारा .
- हि कागदपत्रे तहसील कार्यालयात किंवा online पोर्टल वरती जमा करावी लागतील .
निष्कर्ष :-
अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई देण्याचे आदेश २०२५ याबाबत महाराष्ट्र शासनाचा जीआर ६ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर झाला आहे ,संबधित जीआर नुसार वरील प्रमाणे दिलेल्या विभागातील जिल्यानुसार सदर निधी मिळणार आहे .तसेच तो किती मिळणार याबाबतही सविस्तर माहिती दिली आहे ती वाचा .आणि याबाबत हि माहिती सर्व शेतकरी बांधवान पर्यंत पोहचावण्याकरिता प्रयत्न करा .
धन्यवाद !