अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना 2025: महाराष्ट्रातील तरुणांना स्वयंरोजगार कर्जाद्वारे ५० लाखापर्यंत अर्थसहाय्याद्वारे सक्षम करणे.
१. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास योजना काय आहे ?
Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal yojna-अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना 2025 राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने चालू केलेला हा उपक्रम आहे. जो बेरोजगारांना सक्षम बनवतो तसेच त्यांना स्वयं रोजगार उपलब्ध करून देतो . या योजनेचा लाभ घेण्याकरिता आत्ताच अर्ज करा आणि तुमच्या उद्योजकीय प्रवासाच्या दिशेने पहिले पाऊल टाका!
Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal yojna-अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना 2025 या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास बेरोजगार तरुणांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ,गट कर्ज व्याज योजना तसेच गट प्रकल्प कर्ज योजना इत्यादीच्या मार्फत योजनेद्वारे लाभ दिला जातो .कर्जाची रक्कम ३ लाखाप्सून ते ५० लाख रुपये आहे आणि त्याचा परतफेडीचा कालावधी हा ५ वर्ष ते ७ वर्ष पर्यंत आहे .सदर योजना सविस्तर विश्लेषण खालील मुद्याच्या आधारे पाहूया.
२. योजनेची प्रमुख उद्दिष्टे :-
- महाराष्ट्राच्या शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना सक्षम बनवणे .
- आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी विशेषत मराठा समुदायातील तरुणांनमध्ये स्वयं रोजगार उपलब्ध करुन देणे .
३. लाभार्थीची पात्रता :
Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal yojna-अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना 2025 या योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदारांनी खालील अटी पूर्ण केल्या पाहिजेत:
- महाराष्ट्र राज्याचे राहिवासी असावे .
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते कमाल ६० वर्ष असणे गरजेचे आहे .
- या अंतर्गत लाभार्थी ने इतर कोणत्याही उमेदवाराचा लाभ घेतलेला नसावा .
- अपंग व दिव्यांग व्यक्तीसाठी यामध्ये प्राधान्य दिले जाईल .
- एका व्यक्तीला एकदाच लाभ दिला जाईल .
४. योजनें अंतर्गत मिळणारे कर्ज :-
Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal yojna- 2025योजनेंअंतर्गत व्यवसाय करण्याकरिता व्यवसाय यादी अन्नासाहेव पाटील कर्ज योजनेमध्ये पुढील चार प्रकारे व्यासायासाठी कर्ज दिले जाते .ते कर्ज पूर्वी ५ वर्षाकरता आणि आत्ता ते ५ ते७ वर्षाकरिता देण्यात येत आहे .व्यवसायाची यादी –
- शेती व शेतीशी निगडीत व्यवसाय .(Agriculture and Alligned Businesses)
- मॅन्युफॅक्चरिंग संबधित व्यवसाय (Manufacturing Businesses )
- सेवा उद्योग (Service Industry )
- सर्व व्यावसायिक वाहने (All Commercial Vehicle )
इतर उद्योगांची यादी योजनेच्या website वरती जाऊन पहा .
Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal yojna-अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना 2025 ही योजना अर्ज परतावा स्वरुपात परतफेडीसह अनुदानित कर्जाच्या स्वरूपात आर्थिक मदत प्रदान करते.
- या योजनेंअंतर्गत महामंडल लाभार्थीस पहिला हप्ता (मुदल + व्याज)अनुदान स्वरुपात देते .
- तसेच त्याव्यतिरिक्त जास्तीत जास्त ३ लाख पर्यंत(१२% च्या मर्यादेत) कर्ज व्याज परतावा करेल .
- Credit Guarantee Fund Trust fot Micro and Small Enterprises रक्कम : प्रकारानुसार ₹५० लाखांपर्यंत
- व्याज अनुदान : अर्जदाराच्या श्रेणी आणि व्यवसाय योजनेनुसार व्याज अंशतः किंवा पूर्णपणे अनुदानित केले जाते.
- परतफेडीचा कालावधी : सामान्यतः दरम्यान असतो ५ ते ७ वर्षे असणार .
५. अर्ज कसा करावा
✅ ऑनलाइन अर्ज
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: udyog.aswayam.gov.in


वरील फोटो मध्ये दाखव्लेप्र्माने online form ची प्रक्रिया पूर्ण करा .
- तुमचा मोबाईल नंबर आणि आधार वापरून नोंदणी करा .
- अर्जदाराने आधार लिंक करावा आणि रजिस्टर मोबईल नंबर वरती ओतप येतील तो टाकल्याशिवाय नोंदणी प्रक्रिया पूर्ण होणार नाही .
- अर्ज फॉर्ममध्ये तुमचे वैयक्तिक, व्यवसाय आणि उत्पन्नाचे तपशील भरा .
- त्यांतर अर्ज submit करा .
- अर्ज सबमिट केल्यानंतर सात दिवसांच्या आत कर्ज घेण्यास पात्र आहे कि नाही हे महामंद्लाद्वारे उमेदवारास कळवले जाते .
- त्यानंतर सदर उमेदवारास पात्र असल्यास पात्रता प्रमाणपत्र(LOI) online प्राप्त होईल .
- मंजूर झालेले शासनाचे कर्ज हमी सबधीचे पत्र देखील online प्राप्त होईल .
- त्यानंतर अर्जदाराने अति व शर्ती मंजूर असल्याबाबतचे शपथपत्र online format मध्ये भरायचे आहे .
- खालील सर्व ऑनलाईन प्रक्रिया करताना लागणारी कागदपत्रे सर्व अपलोड करा :-
तुमचा अर्ज पूर्ण झाला आहे याची खात्री करण्यासाठी, खालील कागदपत्रे तयार ठेवा:
६. Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal yojna-अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना 2025 आर्ज करण्याकरिता लागणारी आवश्यक कागदपत्रे .
- आधार कार्ड
- रहिवाशी दाखला (त्याकरिता लाईट बिल ,रेशन कार्ड गुस कनेक्शन)
- उत्पन्नाचा दाखला
- जात प्रमाणपत्र(लागू असल्यास)
- शैक्षणिक पात्रता
- प्रस्ताव
- बँक पासबुकची प्रत
- पासपोर्ट आकार फोटो
- पॅन कार्ड
- स्वयंरोजगाराच्या उद्देशाचे प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्र
८. योजनेचे फायदे:-
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना २०२५ अनेक सामाजिक-आर्थिक फायदे देते.
- तरुणांना त्यांच्या उद्योजकीय कल्पनेला निधी देऊन सक्षम बनवते.
- मागास आणि वंचित घटकांसाठी आर्थिक समावेश सक्षम करते
- स्थानिक रोजगार तयार करण्यास मदत करते .
- खात्री करण्यासाठी कमी जोखीम, कमी व्याजदराचे कर्ज देते
- तळागाळातील उद्योगांना पाठिंबा देऊन ग्रामीण आणि निम-शहरी अर्थव्यवस्था मजबूत करते .
१०. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)
प्रश्न १. Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal yojna-अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना 2025 काय आहे ?
व्यवसाय योजनेनुसार ₹५० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते .
प्रश्न २. मला तारण देण्याची आवश्यकता आहे का?
बऱ्याच प्रकरणांमध्ये, नाही. तथापि, बँकांना मोठ्या कर्जांसाठी तारणाची आवश्यकता असू शकते.
प्रश्न ३. काही अनुदान उपलब्ध आहे का?
हो, पात्रतेनुसार ३ प्रकारचे व्याज अनुदान दिले जाते.
प्रश्न ४. या योजनेंतर्गत कर्ज परतफेडीचा किती वेळ आहे?
परतफेडीचा कालावधी ५ ते ७ वर्षांचा असतो .
प्रश्न ५. महिला उद्योजक अर्ज करू शकतात का?
होय महिला आणि अल्पसंख्याक उद्योजक अर्ज करू शकतात .
११. निष्कर्ष
Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal yojna-अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ योजना 2025 ही एक सुव्यवस्थित योजना आहे जी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला आर्थिक सहाय्य प्रदान करते . महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगारीतून बाहेर पडून स्वावलंबी होण्याची ही एक शक्तिशाली संधी आहे.राज्य शासनामार्फत मराठा समाजातील तरुणांना मिळालेली संधी आहे .या योजनेचा लाभ घ्या आणि इतरानाही मिळवून द्या .
धन्यवाद !