रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेंतर्गत आत्ताच अर्ज करा आणि घर बांधकामासाठी १,३२,०००/-रु ते २.५० लाख रु पर्यंत अनुदान मिळवा .

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी योजना काय आहे? अटी व शर्ती ,लाभाचे स्वरूप ,नियम ,निवड प्रक्रिया इत्यादी बाबत सविस्तर माहिती मिळवा.

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेंतर्गत आत्ताच अर्ज करा आणि घर बांधकामासाठी १,३२,०००/-रु ते २.५० लाख रु पर्यंत अनुदान मिळवन्यासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संवर्गातील घटकांसाठी ज्यांना राहण्यासाठी घर नाही किंवा ज्यांना राहण्यासाठी कच्या स्वरूपाचे घर आहे .ज्यांची परिस्थिती बिकट आहे .अशा लोकांना राहण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी शासनाने रमाई घरकुल योजना सुरु केली आहे .

Table of Contents

सदर योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाने १५ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयानुसार केली आहे .त्यानुसार ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या निवाऱ्याचा  प्रश्न सुटावा त्यांचे  राहणीमान उंचावले जावे अशा हेतूने सदर योजनेची सुरुवात केली आहे.

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ सदर  योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी योजना काय आहे ? अटी व शर्ती ,लाभाचे स्वरूप ,नियम ,निवड प्रक्रिया कशी केली जाते . इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण आज या लेखाद्वारे पाहणार आहोत .चला तर मग सदर योजनेची सविस्तर माहिती खालिलप्रकारे पाहूया .

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजना काय आहे ?

  • रमाई आवास घरकुल योजना-२०२४ सदर योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध संवर्गातील कुटुंबाचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा आणि त्यांचे राहणीमान उंचावले जावे या उद्देशाच्या परिपूर्तीसाठी योजनेची सुरुवात सन २००९-१० पासून सुरु केली आहे .
  • ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर किंवा कच्या घराच्या जागेवर २६९ चौरस फुटाचे पक्के घर बांधून देणे .सदर योजनेची अमलबजावणी हि संबधित यंत्रणाच्या माध्यमातून केली जाते .ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा  आणि शहरी विभागासाठी नगरपरिषद /नगरपालिका /महानगरपालिका या स्थानिक यंत्रणा मार्फत करण्यात येते .
  • सदर योजनेसाठी लाभार्थीची निवड हि सामाजिक आर्थिक ,जात सर्वेक्षण २०११ नुसार घराच्या गरजेनुसार निवड हि ग्रामसभेद्वारे केली जाते .ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीस या योजनेचा लाभ मिळेल. आणि शहरी भागातील दारिद्र्य रेषेवरील लाभार्थीस देखील लाभ दिला जातो .
  • पात्र लाभार्थीस ग्रामीण क्षेत्रातील घराच्या बांधकामासाठी क्षेत्रानुसार १,३२,०००/- रु अर्थ सहाय्य दिले जाते.डोंगराळ व नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी १,४२,०००/- रु ,आणि नगरपरिषद / नगर पालिका/महानगरपालिका व मुंबई विकास प्राधिकरण क्षेत्र यांच्यासाठी रु.२.५० लाख रुपये अर्थ सहाय्य दिले जाते .
  • भागानुसार लाभार्थी हिस्सा घेतला जातो. परन्तु ग्रामीण भागासाठी घेतला जात नाही.
  • 40% अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीस देखील या योजनेंतर्गत लाभ दिला जातो .

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin)2023 : पायाभूत सुविधांचा विकास व गृहनिर्माण सक्षमीकरण व महाराष्ट्रातील योजनेची list. 

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेचा उद्देश – 

  • रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लोकांचा निवाऱ्याचा प्रश्न सोडवणे  .
  • राहण्यासाठी पक्के व सुरक्षित घरे बांधून देणे .
  • सदर योजनेंतर्गत लोकांचे राहणीमान उंचावणे .
  • त्यांच्या स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अर्थ सहाय्य देणे. किंवा कच्या घराच्या जागी पक्के पक्के घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य प्रदान करणे .
  • इत्यादी उद्धेश पूर्तीसाठी योजना राबवली जाते .

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेचे लाभार्थी कोण –

  • रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील व्यक्ती सदर योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र ठरतील.
  • सर्व साधारण क्षेत्रमध्ये दारिद्य्र रेषेखालील लाभार्थी असने गरजेचे असेल .
  • शहरी भागात दारिद्रय रेषेवरील असला तरी त्यास योजनेचा लाभ मिळेल .
  • ४०% अपंगत्व असणरी व्यक्ती सदर योजनेचा लाभार्थी असेल .

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेसाठी लागणारी कागदपत्रे – 

रमाई आवास घरकुल योजना-२०२४
रमाई आवास घरकुल योजना-२०२४
  • जातीचे प्रमाणपत्र,
  • उत्पनाचा दाखला,
  • बँकेचा तपशिल,
  • मतदान ओळखपत्र,
  • आधार कार्ड,
  • पॅनकार्ड,
  • ८ अ चा उतारा,
  • लाईट बिल किंवा घर पट्टी, इत्यादी कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे राहील .

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेच्या अटी व शर्ती –

  • रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा .
  • किमान १५ वर्ष महाराष्ट्रात रहिवाशी असावा .
  • कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा हि १ लाख रु च्या आत असणे गरजेचे असेल .
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल .
  • लाभार्थ्याने इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा .
  • अनुसूचित जातीमधील जे अपंग लाभार्थी दारिद्रय रेषेखाली नाहीत ,परंतु ज्यांचे अपंगत्व ४०% पेक्षा जास्त आहे. आणि वर्षिक उत्पन्न १ लाख रु पर्यंत आहे .अशा अपंग लाभार्थ्यांना ते सदर योजनेच्याअटी व शर्ती ची पूर्तता करत असल्यास त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे .
  • सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील सर्व अटी व शर्ती ची पूर्तता करणे गरजेचे राहील .

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेंतर्गत मिळणारे लाभाचे स्वरूप-

  • रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेंतर्गत क्षेत्रानुसार घर बांधकामासाठी खर्चाची मर्यादा कमाल १,३२,०००/- रु आहे .
  • तर डोंगराळ क्षेत्र व नक्षलग्रस्त क्षेत्रातील  घर बांधकामासाठी कमाल खर्च मर्यादा १,४२,०००/- रु आहे .
  • तसेच नगर परिषद /नगर पालिका व महानगर पालिका व मुंबई विकास प्राधिकरण क्षेत्र यांच्यासाठी रु २,५०,०००/- रु इतकी घर बांधकामासाठी कमाल खर्च मर्यादा आहे .
  • रमाई आवास घरकुल योजना-२०२४ सदर योजनेत लाभार्थी हिस्सा बंधनकारक असून भागानुसार तो घेतला जातो.
  1. ग्रामीण भागासाठी लाभार्थी हिस्सा घेतला जात नाही तो निरंक आहे
  2. लाभार्थी हिस्सा नगरपालिका/ महानगरपालिका  क्षेत्रासाठी ७.५% घेतला जातो .
  3. लाभार्थी हिस्सा महानगरपालिका  प्राधिकरण क्षेत्रासाठी १०% आकारला जातो .

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेंतर्गत लाभार्थीस दिले जाणारे अर्थसहाय्य ,उत्पन्न मर्यादा व लाभार्थी हिस्सा याबाबतचा सविस्तर तपशील .

अ.क्रक्षेत्रउत्पन्न मर्यादामिळणारे अनुदानलाभार्थी हिस्सा
 ग्रामीण भागासाठीरु .१.२० लाख१,३२,०००/-रुनिरंक
नगरपालिका क्षेत्रासाठीरु .३.०० लाख२.५ लाख रु७.५ % घेतला जातो
महानगरपालिका क्षेत्रासाठीरु .३.०० लाख२.५ लाख रु७.५ % घेतला जातो
 ४महानगरपालिका प्राधिकरण क्षेत्रासाठीरु. २.०० लाख

 

२.५ लाख रु

 

शहरी भागात दारिद्रय रेषेवरील लाभार्थीला देखील रमाई आवास घरकुल योजना-२०२४ सदर घरकुल योजनेचा लाभ दिला जातो .

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजने व्यतिरिक्त इतर योजनेचे अर्थसहाय्य मिळते ?

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ग्राम विकास  विभाग शासन निर्णय दिनांक ३०.१२.२०१५ अन्वये या सदर योजनेतून रमाई आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील दारिद्रय रेषेखालील घरकुलासाठी पात्र असणाऱ्या परंतु जागा उपलब्ध नसणाऱ्या लाभार्थ्यासाठी जागा खरेदी करिता रु.५०,०००/- पर्यत अर्थसहाय्य देण्यात येते .
  • रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेकरिता महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत लाभार्थ्यास ९० दिवसाचा रोजगार दिला जातो .
  • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय  उभारणीसाठी १२,०००/- रुपयांची अर्थसहाय्य दिले जाते .

अशा प्रकारे सदर योजेतील लाभार्थींना या योजने व्यतिरिक्त वरील इतर योजनेतून देखील अर्थसहाय्य दिले जाते .

रमाई आवास घरकुल योजना-२०२४
रमाई आवास घरकुल योजना-२०२४

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेसाठी online नोंदणी प्रक्रिया –

  • रमाई आवास घरकुल योजना-२०२४ शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात .
  • `तुमच्या समोर होम पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्ही तुमची नगर परिषद ,नगर पंचायत, निवडा .
  • त्यानंतर रमाई घरकुल योजनेवर किल्क करा .
  • त्यानंतर समोर एक form ओपन होईल त्या त्यामध्ये तुम्हला तुमची वैयक्तिक सर्व सविस्तर माहिती भरायची आहे .
  • त्यानंतर form submit करा .
  • त्यानंतर सोबत जोडायची सर्व कागदपत्रे अपलोड करा.आणि सर्व पुन्हा सबमिट करा .
  • अशाप्रकारे सदर योजनेचा अर्ज online पद्धतीने पूर्ण भरावा .

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेसाठी Offline अर्ज प्रक्रिया –

  • रमाई आवास घरकुल योजना-२०२४ योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय , नगरपालिका ,महानगरपालिका इत्यादी कार्यालयात जाऊन सदर योजनेचा विहित नमुन्यात अर्ज भरून सोबत सर्व कागदपत्रे जोडावी .
  • अर्ज सादर करावा .
रमाई आवास घरकुल योजना-२०२४ निष्कर्ष

रमाई आवास घरकुल योजना-२०२४ सदर योजनेची माहिती  योजना काय आहे ? लाभार्थी कोण ,लाभाचे स्वरूप, उद्देश,अटी व शर्ती , online offline अर्ज प्रक्रिया ,सदर योजने सोबत इतर योजनेचा लाभ कसा घेता येईल इत्यादी बाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे .

तरी सबंधित माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुम्ही हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे इतर लोकांनाही सदर योजनेच्या लाभ घेता येईल .आणि हो जर योजनेबाबत अथवा माहिती बाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकतात .

धन्यवाद !

 

Leave a comment