महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ फक्त २ वर्ष कालावधी गुंतवणुकीच्या ठेवीवर ७.५% व्याजदराने,व्याजासह रक्कम मिळवा.

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ Mahila Smman Bachat Patra Yojana लाभ घेण्यासाठी ठेव किती,त्यावरती व्याजदर किती ,खाते कुठे काढावे ,कालावधी किती असेल इत्यादी विषयी संपूर्ण माहिती मिळवा .

नमस्कार मित्रांनो ,

Table of Contents

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ योजना देशातील महिला व मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी अल्पबचत योजना म्हणून जाहीर केली आहे .तसेच सदर योजनेच्या माध्यमातून पैसे गुंतवणूक करून बचत करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी  २०२३ रोजी अर्थसंकल्प सादर करताना त्यामध्ये विशेष महिला व मुलींसाठी महिला सम्मान बचत पत्र योजनेची घोषणा केली.

सदर योजनेचा कालावधी मार्च २०२५ पर्यंत असेल .सदर योजनेचा लाभ कसा मिळवायचा खाते कुठे आणि कसे काढायचे ,ठेव किती जमा करावी ,त्यावरती व्याज दर किती असेल,कागदपत्रे काय लागतील, .त्यासर्व प्रक्रियेची सविस्तर माहिती आजच्या या लेखात पाहणार आहोत .सदर योजना काम कशी करते याविषयी जाणून घ्यायचे आहे का ? तर चला मग सदर योजनेची सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया .

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४
महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ योजना काय आहे ?

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ सदर योजनेची घोषणा केंद्र शासनामार्फत  १ फेब्रुवारी २०२३ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना केली. सरकारने विशेषत देशातील महिला व मुलींसाठी हि योजना आहे . अल्प कालावधीत बचतीचा अधिक लाभ मिळवून देणारी योजना आहे .

सदर योजने अंतर्गत तुम्ही महिला सन्मान बचत पत्र योजेनेमध्ये किमान १०००/-रु ते कमाल  रु २ लाख रुपयापर्यंत रक्कम जमा करू शकता. किंवा गुंतवणूक करू शकता . त्यानंतर तुम्हाला तुमच्या ठेवीवर सरकारकडून ७.५% दराने व्याज मिळेल .या योजनेत गुंतवलेले पैसे २ वर्षासाठी जमा केले जातील. आणि त्यानंतर तुमची सर्व रक्कम व्याजासह परत केली जाईल.यामध्ये अंशत:पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध असेल .भारत सरकारची हि योजना मार्च २०२५ पर्यंत लागू असेल .

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ योजनेचे उद्देश –

  • महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ सदर योजनेचा उद्देश देशातील महिला व मुलींचे आर्थिक सक्षमीकरण करण्यास प्रोत्साहन देणे .
  • नविन बचत पद्धतीचा अवलंब करून आर्थिक बचतीवर निश्चित व्याज मिळवणे .
  • बचतीला प्रोत्साहन देणे ,व अधिक व्याज मिळवून देणे .
  • सर्व सामान्य कुटुंबातील महिलांना परवडणारी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देऊन अधिक व्याज  मिळवून देणे .

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ योजनेचे फायदे –

  • महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ सदर योजना महिला व मुलींसाठी  खूप महत्वपूर्ण आहे ज्याद्वारे महिला आपले पैसे गुंतवून त्यावरती निश्चित व्याज मिळवू शकतात .
  • गुंतवणुकीची रक्कम किमान १००० रु ते कमाल २ लाख रु आहे व २ वर्ष असा कमी कालावधी आहे .
  • गुंतवणुकीवर ७.५ % असे आकर्षक व्याज दर आहे .
  • योजनेंतर्गत मुदतपूर्व अंशिक पैसे काढता येतील .
महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४
महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ योजनेची मुख्य वैशिष्ट्ये – 

  • महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ सदर योजना महिला व मुलीसाठी लागू करण्यात आली आहे .
  • १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत कोणतीही महिला व मुलगी आपले खाते पोस्टात अथवा बँकेत कढून या योजनेंतर्गत रु २ लाख रक्कमेची गुंतवणूक हि २ वर्ष कालावधीसाठी करू शकतात .
  • सदर योजनेचा निश्चित केलेला मुदतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकूण जमा केलेली गुंतवणुकीची रक्कम +त्यावरील व्याजासह सदर महिला लाभार्थी अथवा मुलीला परत मिळेल .
  • सदर योजनेंतर्गत कर सूट आहे .
  • गुंतवणुकीवर दिले जाणारे व्याजदर वार्षिक ७.५ % आहे. तसेच ठरलेल्या व्याज दरात बदल होणार नाही तो दर निश्चित आहे .
  • मुदती पूर्व अंशिक पैसे काढता येतील .
  • कोणत्याही वयोगटातील महिला व मुली खाते उघडून गुंतवणूक करू शकतात .म्हंजे वयाची आट नाही .

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते उघडणे ,गुंतवणूक मर्यादा ,नियम ,व्याजदर ,कालावधी इत्यादी बाबत तपशिल

अ.क्रखाते कुठे उघडावेखाते कोण उघडू शकतेयोजनेतील गुंतवणुकीचा कालावधीगुंतवणुकीची  कमाल व किमान रक्कमदिले जाणारे व्याज दर
१) पोस्ट ऑफिस

२) बँक (राष्ट्रीय कृत )

१)     स्वतः स्त्री,मुलगी

२)     अल्पवयीन मुलीच्या बाबतीत पालक उघडू शकतात

योजनेतील गुंतवणुकीचा कालावधी २ वर्ष असेलगुंतवणुकीची किमान मर्यादा एक हजार रु किंवा शंभर रुपयाच्या पटीतआणि  कमाल मर्यादा रु २ लाख असेल .प्रती वर्ष ७.५% व्याज दर आहे .

* व्याज त्रैमासिक रित्या चक्रवाढ केले जाईल.

*आणि  खात्यात जमा केले जाईल. आणि जेन्व्हा खाते बंद होईल तेन्ह्वा दिले जाईल

अ) ठेव / गुंतवणूक – 

१.  किमान एक हजार रु किंवा शंभर रुपयाच्या पटीत जे योग्य असेल ती रक्कम तुम्ही निश्चित करू शकतात .

२ एका खात्यात जास्तीत जास्त दोन लाख रुपयाची गुंतवणुकीची मर्यादा आहे परंतु खातेधारकाने दुसरे खाते उघडून या योजनेंतर्गत गुंतवणूक केली तर  खातेधारकाचे सर्व खात्यामधील मिळून गुंतवणूक कमाल २ लाख असेल .

३ सध्याचे चालू खाते आहे आणि तुम्हाला  दुसरे खाते उघडायचे असेल तर यामध्ये कमीत कमी ३ महिन्याचे अंतर राखले जाईल .

ब) व्याज –

  • ठेव वार्षिक ७.५% व्याजदरासाठी पात्र असेल .
  • व्याज त्रैमासिक रित्या चक्रवाढ केले जाईल.
  • आणि  खात्यात जमा केले जाईल. आणि जेन्व्हा खाते बंद होईल तेन्ह्वा दिले जाईल .
  • नियमांचे उल्लंघन करून उघडलेले खाते किंवा जमा केलेले खाते @ PO बचत खाते व्याजासाठी पात्र असेल .

क) पैसे काढणे –

खाते उघडण्याच्या तारखेपासून एक वर्षानंतर पात्र शिल्लक रकमेचे ४०% पैसे काढले जाऊ शकतात .

ड) खाते मुदतीपूर्वी बंद  –

  1. खातेदाराच्या मृत्यूचे कारण .
  2. अत्यंत अनुकंपा कारणावर .
  • खातेदाराचा जीवघेणा मृत्यू  झाला तर  .
  • संबधित कागदपत्रे सादर केल्यावर पालकाचा मृत्यू  झाला तर .
  • कोणतेही कारण न सांगता खाते उघडल्या नंतर सहा महिन्यानंतर मृत्यू झाला .

टीप –   योजनेचे व्याज मूळ रक्कमेवर दिले जाईल .

–   योजनेवर २ टक्क्यांनी कमी व्याज दिले जाईल .

 इ) खाते परिपक्वता-

  • खाते उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षांनी पात्र शिल्लक रक्कम ठेवीदाराला दिली जाईल .
  • सदर योजनेचा निश्चित केलेला मुदतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एकूण जमा केलेली गुंतवणुकीची रक्कम +त्यावरील व्याजासह सदर महिला लाभार्थी अथवा मुलीला परत मिळेल.

ई) खाते कसे उघडायचे –

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ आवश्यक कागदपत्रे –

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४
महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४
  • लाभार्थीचे आधारकार्ड,
  • पॅनकार्ड,
  • शिधापत्रिका,
  • पत्याचा पुरावासाठी ( लाईट बिल अथवा रेशनीग कार्ड )
  • मोबाईल क्रमांक,
  • पासपोर्ट फोटो ,
  • इत्यादी वरील सर्व कागदपत्रे लागतील .
महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ निष्कर्ष –

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ केंद्र शासनामार्फत महिला व मुली साठी राबवण्यात येणारी आर्थिक बचत योजना  असून  तुमच्या गुंतवणुकीवर अथवा ठेवीवर आकर्षक  निश्चित व्याजदर देण्यात येणार आहे.तो व्याज दर ७.५ % असेल. आणि ठेव कमीत कमी १००० रु ते जास्तीत जास्त २ लाख रु ठेव म्हणून ठेवू शकतात .ते फक्त २ वर्ष कालावधीसाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर तुम्हाला तुमची ठेव + व्याजदर असे एकूण परतावा मिळणार आहे .

सदर योजनेची सविस्तर माहिती आजच्या या लेखात दिली आहे तरी आम्ही आशा करतो कि हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल .या माहितीचा उपयोग करण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्कीच वाचा .आणि जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा.आणि काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट करून विचारू शकतात .

धन्यवाद !

महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ FAQ –

१. महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ सदर योजनेत किती गुंतवणूक करू शकतात ?

– किमान १००० रु ते कमाल रु २ लाख ठेव ठेवून गुंतवणूक करू शकतात .

२. महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ योजनेचा परिपक्वता कालावधी किती आहे ?

– सदर योजनेत खाते काढण्यासाठी तुम्हला १ फेबुरवारी २०२३ ते ३१ मार्च २०२५ हा कालावधी आहे परंतु ठेव गुंतवण्याचा कालावधी हा गुंतवणूक केलेल्या तारखेपासून २ वर्ष यासाठी असेल .

३. महिला सम्मान बचत पत्र योजना- २०२४ ठेवीवर व्याज किती मिळेल ?

– सदर योजनेवर प्रती वर्ष ७.५/ दराने व्याज दिले जाईल .व्याज त्रैमासिक रित्या चक्रवाढ केले जाईल.अन खात्यात जमा केले जाईल.

 

Leave a comment