इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना Indira Gandhi National old age pension scheme 2024 योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया,लाभाचे स्वरूप,अटी व शर्ती संपूर्ण माहिती घ्या व लगेच अर्ज करा.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना Indira Gandhi National old age pension scheme 2024 सदर योजना केंद्र पुरस्कृत असून ती महाराष्ट्र शासनाकडून जेष्ठ नागरिक ,वयोवृद्ध व्यक्ती, अपंग व्यक्ती,निराधार ,विधवा ,अशा सर्व घटकासाठी योजना राबवली जात आहे. योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे सदर योजनेची संपूर्ण माहिती आजच्या या लेखात पाहणार आहोत .
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आणि इतरांना मिळवून देण्यासाठी आज आपण या लेखातून योजनेचे लाभार्थी कोण, फायदे ,उद्देश ,लागणारी कागदपत्रे ,अटी व शर्ती , पात्रता निकष इत्यादी आवश्यक ती सर्व माहिती पुढील प्रमाणे पाहूया .
१) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना काय आहे ?
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना सदर योजना हि केंद्र पुरस्कृत योजना असून या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्याला रु २००/- प्रतिमाह प्रती लाभार्थी निवृतीवेतन दिले जाते .याच लाभार्थ्यांना राज्य शानामार्फत श्रावणबाळ सेवा योजनेतून गट अ रु ४००/- प्रतीमहा निवृतीवेतन दिले जाते .यामुळे लाभार्थ्यांना राज्य सरकारकडून रु ४००/- आणि केंद्र सरकारकडून रु २००/- अशी एकूण रक्कम ६००/- रु प्रतिमहा प्रती लाभार्थी दिले जातात. एकंदर सदर योजनेंतर्गत ६५ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि दारिद्रय रेषेखालील भारतीय नागरिकांना प्रती महिना प्रत्येक लाभार्थ्यांना निवृतीवेतन रु ६००/- अदा केले जाते .
सदर योजनेंस वृद्ध पेंशन योजना महाराष्ट्र ,इंदिरा गांधी निराधार योजना ,तसेच ६० वर्षावरील पेंशन योजना असे देखील म्हणले जाते .या योजनेतून लाभार्थीची आर्थिक गरज भागावी ,दैनंदिन जीवन चांगले जगता यावे यासाठी हि योजना कार्य करते .
संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 लगेच अर्ज करा
२) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजनचा उद्देश –
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजनाचे उद्दिष्टे आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना पेंशनद्वारे आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे .राज्यातील निराधार व्यक्तीला दरमहा निवृतीवेतन देणे होय .
सदर योजनेंतर्गत ६५ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या आणि दारिद्रय रेषेखालील भारतीय नागरिकांना प्रती महिना प्रत्येक लाभार्थ्यांना निवृतीवेतन देणे .
३) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना पात्रता निकष –
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेंतर्गत काही पात्रता आणि निकष ठरवलेले असुन त्या निकषाची पूर्तता करणे गरजेचे आहे ते पात्रता आणि निकष पुढीलप्रमाणे पाहू .
- ६५ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती पात्र असतील .
- दारिद्रय रेषेखालील ६५ व ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील.
- राज्यातील निराधार व्यक्तीला दरमहा निवृतीवेतन देण्यात येईल .
४) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना अटी व शर्ती–
- दारिद्रय रेषेखालील ६५ व ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील .
- सदर योजना सर्व प्रवर्गासाठी लागू आहे .
- कुटुंबाची उत्पन्न मर्यादा विचारात घेतली जाणार त्या त्या घाटकानुसार उत्पन्न मर्यादा आहे परंतु दारिद्रय रेषेखालील कुटुंबासाठी मात्र उत्पन्न मर्यादा नाही .
- BPL कुटुंबातील ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व सदस्यासाठी पेन्शन योजना असून ती एका व्यक्ती पुरती मर्यादित नाही .
अटल पेन्शन योजना २०२३ -आर्थिक भविष्य सुरक्षित करा व भविष्यातील स्थिरतेस सक्षम करा
५) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना लाभार्थी –
- दारिद्रय रेषेखालील ६५ ते ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील .
६) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजनेचे फायदे –
- प्रतिमहा प्रती लाभार्थी निवृत्ती वेतन रु ६००/- देण्यात येते .
- सदर पात्र लाभार्थ्यास केंद्र शासनाकडून रु २०० /- प्रतिमहा प्रती लाभार्थी निवृत्ती वेतन देण्यात येते .
- तसेच सदर लाभार्थी यांना राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजने मधून गट अ अंतर्गत रु – ४००/- प्रतिमहा निवृत्ती वेतन मिळते . यामुळे या लाभार्थ्यास राज्य शासनाकडून रुपये ४००/- प्रतिमहा व केंद्र शासनाकडून रुपये २००/- प्रतिमहा असे एकूण रुपये ६००/- प्रतिमहा प्रती लाभार्थी निवृत्ती वेतन मिळते .
- ६०-७९ वयोगटातील व्यक्तींना दरमहा रु २००/- रक्कम दिली जाते .
- ८० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तीला दरमहा पेन्शन रु ५००/- रककम दिली जाते .
७) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना अर्ज कसा करावा –
- इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना सदर योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल तर अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय ,तहसीलदार संजय गांधी योजना किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन अर्ज करू शकतात .
- संपर्क कार्यालयाचे नाव –जिल्हाधिकारी कार्यालय /तहसिलदार संजय गांधी योजना / तलाठी कार्यालय या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडून माहिती घेऊ शकतात.
- आणि अर्ज विहित नमुन्यात पूर्ण भरावा .
- आणि त्याबरोबर लागणारी सर्व कागदपत्रे जोडावीत .
- आणि विहित नमुन्यातील अर्ज आणि सोबत सर्व लागणारी कागदपत्रे जोडून form submit करावा .
- त्याबरोबर तिथे form दिल्यावर पोहच पावती घ्यावी .
- तसेच पुढील प्रक्रियेसाठी पाठपुरावा देखील करू शकतात.
- किंवा शासनाच्या अधिकृत website या भेट
८) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना साठी लागणारी कागदपत्रे-
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्राची पूर्तता करावी लागते .
- अर्जाची प्रत ,
- वयाचा दाखला ,
- आधार कार्ड,
- रेशन कार्ड ,
- रहिवाशी प्रमाणपत्र ,
- उत्पन्न प्रमाणपत्र ,
- मोबाईल क्रमांक ,
- बँक पासबुक झेरॉक्स ,
- पासपोर्ट फोटो इत्यादी .
९) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना निष्कर्ष –
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना या सदर योजने बाबत आजच्या या लेखात वरीलप्रमाणे सविस्तर माहिती दिली आहे . वरील माहिती मध्ये अर्ज कसा करायचा,योजनेचे फायदे काय आहेत ,अति व शर्ती काय आहेत ,लाभार्थी कोण ,त्याची पात्रता काय ,लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोणती लागतात इत्यादी सर्व माहिती सविस्तर दिली
१०) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजना FAQ –
१) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करावा ?
—- तलाठी ,किंवा तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज दाखल करावा .
२) इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृतीवेतन योजनेंतर्गत लाभार्थी कोण आहेत ?
—- दारिद्रय रेषेखालील ६५ व ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती पात्र होतील .
३) वृद्धापकाळ निवृतीवेतन योजनेत रक्कम किती आहे ?
—- प्रतिमहा प्रती लाभार्थी निवृत्ती वेतन रु ६००/- देण्यात येते.