संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 लगेच अर्ज करा

संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया पध्दत ,पात्रता ,अटी व शर्ती ,फायदे इत्यादी बाबत सविस्तर माहिती मिळवा .

संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 सदर योजनेची सविस्तर माहिती आज घेणार आहोत. चला तर मग आज आपण या लेखाद्वारे योजनेचे लाभार्थी कोण ,फायदे ,आवश्यक कागदपत्रे कोणती ,अर्ज कसा भरायचा ,योजनेसाठी पात्र कोण असेल, अटी व शर्ती  काय असतील , लाभाचे स्वरूप कशा प्रकारे दिले जाते इत्यादी सखोल माहिती या लेखाद्वारे पुढीलप्रमाणे पाहू .

Table of Contents

१. संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 योजनेची माहिती –

संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 सदर योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र शासनामार्फत केली जाते . वय मर्यादा ६५ वर्षाच्या आतील महिला पुरुष ज्यांचे कुटुंबाचे उत्पन्न – प्रतिवर्षी रु २१,०००/- पर्यंत आहे असे जे की निराधार ,अपंग प्रवर्गातील,आजारी ,अनाथ बालके ,घटस्फोटीत महिला ,अत्याचारित ,तृतीय पंथीय ,देवदासी ,इतर महिला पुरुष यांना सदर योजनेचा लाभ या योजनेखाली पात्र होणाऱ्या कुटुंबात एक लाभार्थी असल्यास रुपये ६००/- प्रतिमहा तर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास रुपये ९००/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते .

संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024
संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024

२. संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 योजनेचे  लाभार्थी – 

  1. या योजनेंतर्गत ६५ वर्षाखालील निराधार महिला व पुरुष ,
  2. अनाथ मुले ,
  3. सर्व अपंग प्रवर्गातील : कर्णबधीर ,मतीमंद ,मुकबधीर.
  4. कर्करोग ,क्षयरोग ,कुष्ठरोग  अशा आजारी व्यक्ती ज्या स्वतचा आणि कुटुंबाचा पालन पोषण करू न शकणारे महिला व पुरुष ,
  5. निराधार महिला ,
  6. निराधार विधवा यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या विधवासह ,
  7. घटस्फोटीत झालेल्या आणि प्रक्रियेत असणाऱ्या परंतु त्याना पोटगी न मिळालेल्या महिला ,
  8. अत्याचारीत व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला.
  9.  तृतीय पंथीय ,देवदासी ,
  10. ३५ वर्षावरील अविवाहित स्त्री ,
  11. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी या सर्वांना लाभ मीळतो.
  12. या योजनेद्वारे दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,०००/- पर्यंत कौटुंबीक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे .

अटल पेन्शन योजना २०२३ -आर्थिक भविष्य सुरक्षित करा व भविष्यातील स्थिरतेस सक्षम करा

३. संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 फायदे – 

या योजनेखाली पात्र होणाऱ्या कुटुंबात एक लाभार्थी असल्यास रुपये ६००/- प्रतिमहा तर एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास रुपये ९००/- प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते .

४. संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 पात्रता – 

  • अपंग प्रवर्गातील स्त्री पुरुष – अस्तीव्यंग,अंध ,मुकबधीर , कर्णबधीर , मतीमंद इत्यादी होय .
  • आजारी किंवा आजाराने ग्रस्त असणारे स्त्री पुरुष – कर्करोग ,पक्षघात, एड्स बाधित ,कुष्ठरोग  ई होय  .
  • निराधार महिला ,निराधार विधवा घटस्फोट झालेल्या महिला अथवा घटस्फोट प्रक्रियेत असणाऱ्या महिला परंतु पोटगी न मिळणाऱ्या महिला .
  • तसेच या योजनेखाली विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला .
  • अत्याचारित महिला व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला .
  • शेतमजूर महिला
  • आत्महत्याग्रस शेतकरी कुटुंबातील व्यक्ती परंतु योजनेंतर्गत असणारी उत्पन्नाची अहर्ता यामध्ये  असतील तर ते कुटुंब
  • अनाथ मुले (१८ वर्षाखालील)
  • इत्यादी वरील सर्व घटक या योजनेसाठी पात्र असतील .

५. संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 आवश्यक असणारी कागदपत्रे –

  1. वयाचा दाखला
  2. उत्पन्नाचा दाखला
  3. रहिवाशी प्रमाणपत्र
  4. अपंगाचे प्रमाणपत्र
  5. आजारी असल्यास रोगाचा दाखला वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला .
  6. कोणत्याही सरकारी किंवा निमसरकारी किंवा निवास गृहात आंतर निवासी नसल्याबाबतचा दाखला .
  7. अनाथ असल्याचे प्रमाणपत्र .
  8. आधार कार्ड.
  9. पास पोर्ट फोटो इत्यादी .

महाराष्ट्रातील विधवा महिलांसाठी विधवा पेंशन योजना Maharashtra Vidhwa Pension Yojana -२०२४ अंतर्गत मासिक ६००/- रु च्या आर्थिक मदतीसाठी आत्ताच अर्ज करा

६. संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 अटी व शर्ती –

१ . किमान १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे गरजेचे आहे .

२.अ -लाभार्थीची मुले २१ वयाची होईपर्यंत किंवा त्यांना नोकरी मिळेपर्यंत (मग ती नोकरी शासकीय असो अथवा निमशासकीय असो ) यामध्ये जे अगोदर घडेल तोपर्यंत लाभार्थी इ मुलांना लाभ देण्यात येतो .

2.ब – मुलीचा विवाह झाला तर तिच्या पालक कुटुंबाला अनुदान पुढे चालू ठेवण्यात येते .

३ लाभार्थीच्या उत्पन्नासह कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न रु २१,०००/- पर्यंत असल्यास लाभार्थी योजनेस पात्र असेल .

४ या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट असणार नाही .

५ अस्थिव्यंग ,अंध ,मुकबधीर , कर्णबधीर ,मतीमंद या प्रवर्गातील अपंगाना यांचे अपंग प्रमाणपत्र ४०% अपंगत्व असलेले जिल्हा शल्य चिकित्सक (सिव्हील सर्जन )यांचे प्रमाणपत्र असणे बंधनकारक असेल .

६ बलात्कार अथवा शारीरिक छळवणूक  झालेल्या अत्याचारित स्त्रीच्या बाबतीत सिव्हील सर्जन व महिला बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आणि बलात्कार संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलिस ठाण्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल .

७ घटस्फोटीत महिलेबाबत जर तिचा घटस्फोट झालेला आहे पण पोटगी मिळत नाही अशा किंवा सदर योजेतील उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला या योजनेस पात्र असतील परंतु घटस्फोटाची न्यायालयाची प्रत व पोटगीची रक्कम याबाबत पुरावा सादर करणे आवश्यक राहील .

८ जर सबंधित महिलेचा घटस्फोट प्रक्रियेत असेल अथवा अंतिम कार्यवाही झालेली नसेल. तर अशा कालावधीत पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या स्त्रियांनी घटस्फोटासाठी रीतसर केलेल्या अर्जाची सत्यप्रत व पतीपासून वेगळी राहत असल्याबाबत सबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवक यांनी दिलेले व तहशिलदारांनी सक्षांकित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील .

९ वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत ,महिला व बाल विकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या इतर योजनेतून नियमित मासिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील .

१० अनाथ मुले ,मुली त्यांचे आई वडीलांचा मृत्यू झाला आहे .आणि ते कुठल्याही अनाथ आश्रमात राहत नाहीत अशानाच  लाभ मिळेल .

परंतु यासाठी अनाथ असल्याबाबत तलाठी व ग्रामसेवक यांचे व सबंधित बाल विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील .

११ विधवा स्त्रिया या योजनेस पात्र असतील .परंतु पतीचे निधन झाल्याबाबत सबंधित ग्रामपंचायत / नगरपरिषद /नगरपालिका यांच्याकडील मृत्यू नोंदीचा उतारा सादर करणे आवश्यक राहिल .

७. संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 अर्ज करण्याची पद्धत –

१ सदर योजनेसाठी अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज करावा .तो पूर्ण भरून त्याच्या दोन प्रती ठेवाव्यात .आणि सदर अर्ज हा सबंधित तलाठी यांच्याकडे  त्यास लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज दोन प्रतीत घ्यावा .आणि एक प्रत सादर करावी .

अर्ज करण्यासाठी अर्ज व इतर form ची pdf साठी  संजय गांधी निराधार अनुदान योजना २०२४इथे किल्क करा

2  तलाठी यांच्याकडे अर्ज सादर केल्यानंतर त्याची  पोचपावती घ्यावी .

३ त्यानंतर तलाठी हे अर्जाची पडताळणी व छाननी करून अर्ज सबंधित तह्शीलदार /नायब तह्शीलदार यांचेकडे पुढील प्रक्रियेसाठी पाठवतील

4 सादर केलेल्या अर्जाची प्रत्यक्ष छाननी व पडताळणी तह्शीलदार आणि नायब तहशिलदार हे करतील आणि ती यादी सबंधित अनुदान योजना समितीसमोर निवड प्रक्रियेसाठी सादर करतील .

5 निवड प्रक्रियेतून पात्र ठरलेले लाभार्थीची यादी सूचना फलकावर लावली जाते .आणि ज्यांची निवड झाली नाही त्यांना देखील अपात्रतेचे करण काय हे कळवले जाते .

६ गाव पातळीवर अथवा शहर पातळीवर मंजूर यादीचे वाचन ग्रामसभेत केले जाते. त्यानंतर यादी सूचना फलकावर लावल्या जातात .

७ ज्या लाभार्थीस मंजुरी मिळाली असेल तास निधीचे वितरण केले जाते. व लाभार्थ्याच्या बँक खात्यात प्रतिमाह रु ६०० /- ते रु ९०० /- यापैकी जे लाभार्थीस मंजूर असेल ती रक्कम बँकखात्यात जमा केली जाते .

सदर योजनेची online माहिती साठी शासनाच्या अधिकृत website ला भेट द्या .

८ . संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra -2024 देण्यात येणारा लाभ कशा स्वरुपात दिला जातो .

संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024
संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024
  • लाभार्थ्यांना योजनेंतर्गत मंजूर झालेली अनुदान बँक खाते / पोस्ट खाते यामार्फत वितरीत करण्यात येते .
  • लाभार्थीचे जवळच्या बँकेत बचत खाते काढावे लागते.
  • एखादा लाभार्थी अपंग व चालण्या फिरण्यास असमर्थ असल्यास अशा लाभार्थ्याची पाहणी करून त्याला वर नमूद केल्याप्रमाणे तालुका कोषागारातून धनादेशाद्वारे पैसे काढून सदरचे पैसे सबंधित पोस्ट मास्तर कडे जमा करून मनी ऑर्डरद्वारे पाठवावेत ३१ मार्च २००९ पर्यंत होते . परंतु ३१ मार्च,२००९ नंतर मनी ऑडर पाठविता येणार नाही . त्यासाठी अपंग लाभार्थ्याना सुद्धा बँक किंवा पोस्टात बचत खाते उघडणे आवश्यक राहील .
  • जर लाभार्थींनी सलग ३ महिने अनुदान उचलले नाही तर सबंधित बँकनी /पोस्टाच्या मास्तरांनी याबाबतची माहिती तहसील दाराकडे कळवावे असे पैसे तत्काळ पुन्हा कोषागारात जमा करण्यात येतील .
  • त्याचप्रमाणे मनी ऑडर द्वारे पाठविलेले पैसे सतत तीन महिने प्रत आल्यास लाभार्थ्याची ह्यातीची पडताळणी करूनच पुढील लाभ देण्यात येईल .

९. संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 लाभार्थीची ह्यात असल्याची तपासणी कशा स्वरुपात केली जाते ?

  • लाभार्थी ह्यात असल्याबाबतची तपासणी वर्षातून एकदा केली जाते .
  • दरवर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत एकदा सबंधित लाभार्थ्यांनी त्याचे जेथे खाते आहे .अशा बँक मॅनेजर किंवा पोस्ट मास्तरकडे स्वत;हजर राहावे व ते ह्यात असल्याची नोंद बँक मॅनेजर यांनी घ्यावी .
  • कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकला नाही .तर त्या लाभार्थी ने  नायब तह्शीलदार /तह्शीलदार /उप विभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी )यांचे समोर राहून ह्यातीबाबातचे प्रमाणपत्र सबंधित तह्शीलदार यांचे कडे सादर करावे .
  • ह्यात प्रमाणपत्र सादर केले नाही तर निवृत्ती वेतन देण्यात येणार नाही .
  • याबाबतचे कारण सबंधित लाभार्थीस कळवून लाभ त्वरित बंद केला जातो.
  • लाभार्थी मरण पावल्याची सूचना द्यावी लागते .
  • जर एखादा लाभार्थी मरण पावल्यास ,ग्रामपंचायत क्षेत्रात –ग्रामसेवकाने ,नगपालिका क्षेत्राच्या बाबतीत नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी , महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रभाग अधिकारी यांनी ती गोष्ट सबंधित नायब तह्शीलदार /तहशिलदार यांना तातडीने कळवावे .
  • लाभार्थी मृत्यू पावलेल्या दिनांकास आर्थिक सहाय्याची काही थकबाकी निघत असल्यास मृत्यू च्या दिनांकापर्यंत चा हिशोब करून ती योग्य प्रमाणात लाभार्थी च्या उतरजीवि व्यक्तीला म्हणजे त्याची पत्नी /तिचे पती किंवा कायदेशीर वारसास द्यावी .
  • त्यानंतर आर्थिक सह्याच्या नोदी सहित  मृत्यूच्या घटनेची नोंद करावी व परिणामी त्यानंतर आर्थिक सहाय्य देण्याचे बंद करण्यात येईल .
१०. निष्कर्ष –

संजय गांधी निराधार अनुदान योजना Sanjay Gandhi Niradhar Yojana Maharashtra 2024 सदर योजनेबद्दल आपण आज या लेखाद्वारे माहिती दिली आहे. ज्यात योजना काय आहे ,लाभार्थी कोण ,फायदे ,अति व शर्ती ,अर्ज प्रक्रिया ,लागणारी कागदपत्रे ,पात्रता ,आपणास हि माहिती आवडली असेल तर तुम्ही हि माहिती इतरांबरोबर शेअर करा आणि या माहितीच्या आधारे सदर योजनेचा लाभ पात्र लाभार्थीला मिळवून द्या .

धन्यवाद !

 

Leave a comment