मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळेसाठी रु ७५,०००/ रक्कमेचे अनुदान वितरीत झाले असून आत्ताच अर्ज करा आणि लाभ घेण्यासाठी पात्रता निकष , लाभाचे स्वरूप ,अटी व शर्ती ,अर्ज प्रक्रिया जाणून घ्या.
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबविण्यास दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून .सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यांमध्ये देखील राबविण्याचा निर्णय शासनाने दि.१८ नोव्हेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेतला आहे .
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबर ,वैयक्तिक शेततळे ,शेततळेयाचे अस्तरीकरण .हरित गृह उभारणे व शेडनेट हाऊस उभारणे या घटकांकरिता अनुदान वितरीत करण्यात येते.
सन २०२३-२०२४ या वर्षासाठी वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता रु ४०.०० कोटी निधी शासनाकडून वितीत करण्यात आला आहे. चला तर मग सदर योजनेचा लाभ घ्यायचा आहे का ? चला तर मग आपण योजनेची पात्रता निकष , लागणारी कागदपत्रे , अर्ज कसा करायचा ,अटी व शर्ती काय,लाभ किती मिळणार याबाबत सविस्तर माहिती या लेखात खालिलप्रकारे पाहूया .
योजनेची सविस्तर माहितीसाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना पाहण्यासाठी येथे पहा .CMSKSY_FARM_POND_GUIDLINES (1)
१. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ योजनेंतर्गत लाभार्थी पात्रता व निकष –
१ अर्जदार शेतकऱ्याच्या नावे किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असावे .कमाल कितीही असले तरीही चालेल याला मर्यादा नाही .
२ अर्जदार शेतकऱ्याची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी .
३ पावसाच्या पाणी नैसर्गिक प्रवाहाद्वारे शेततळ्यात साठवून त्याचे पुनर्भरण करता येईल असे जमिनीचे क्षेत्र असावे .
४ अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळेसाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा .
(योजनेचा तपशील – मागेल त्याला शेततळे ,सामुहिक शेततळे , किंवा भट खाचरातील बोडी अथवा या घटकाकरिता कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा .)
प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना (कुसूम) २०२३ – Pradhanmantri Sour Krushi Pamp Yojana (KUSUM)
२. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ योजनेंतर्गत लाभार्थी निवड प्रक्रिया –
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ साठी संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडतीनुसार योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळेसाठी लाभार्थी निवडी बाबत निर्णय घेतला जातो .
शासन परिपत्रक क्रमांक ०९१९/प्र.क्र. २२१/१४-अ ,दिनांक ०४/११/२०२० नुसार महा-डीबीटी पोर्टलवर कृषी विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचा फक्त शेतीशी निगडीत सर्व बाबीसाठी अर्ज घेण्यात येतो .त्या बाबीकरिता कोणत्या योजनेतून सबंधित शेतकऱ्यास लाभ देता येईल. याबाबत संगणकीय प्रणाली एकत्रित सोडतीमध्ये निर्णय घेईल .त्यानुसार निवड ठरेल .
३. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना -२०२४ अंतर्गत शेततळ्यासाठी जागा निवडीचे तांत्रिक निकष –
- शेततळे योग्य जमीन ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असावी .
- काळी जमीन ज्यात चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे .
- जल परिपूर्ण झालेल्या पाणलोट क्षेत्रात शेततळे प्राधान्याने घेण्यात यावीत .
- टंचाई ग्रस्त गावातील लाभ क्षेत्रात शेततळी घेण्यात यावीत .
४. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ साठी जलसंपदा विभागानुसार शेततळी घेण्यासाठी अटी व शर्ती-
- मुरमाड ,वालुकामय,स्चीद्र खडक अशी जमीन असलेली जागा शेततळयास निवडू नये .
- ज्या ठिकाणी जमिनिचीचा उतार सर्वसाधारण ३% च्या आत असावे त्या ठिकाणी शेततळी घेण्यात यावीत .
- नाल्यात / ओहोळ च्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नयेत .
- इनलेट /आऊटलेटसह शेततळ्यासाठी पाणलोट क्षेत्रातून येणारे पाणी हे शेततळयाच्या पाणीसाठा क्षमतेपेक्षा जास्त असणे बंधनकारक राहील .
- इनलेट /आऊटलेट विरहीत शेततळ्यासाठी पुनर्भरणाकरिता अतिरिक्त अपधाव उपलब्ध असल्याची खातरजमा करण्यात यावी .
- शेततळ्याच्या भोवताली जमिनीत दलदल व चिखल होईल तसेच शेततळयातून पाणी पाझरून लगतच्या शेतकऱ्याच्या मालमत्तेचे नुकसान होईल अशा जमिनी शेततळ्यासाठी निवडल्या जाऊ नये .
- शेततळयासाठीची जागा हि शेतकऱ्याने स्वखुशीने व विनामुल्य द्यावयाची आहे .
५. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ अंतर्गत शेततळयासाठी आकारमाननुसार अनुदानाचे स्वरूप/ लाभाचे स्वरूप –
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ योजनेंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयासाठी कमाल रक्कम रु ७५०००/- अक्षरी पंचाहत्तर हजार रु फक्त रक्कमेच्या मर्यादेत अनुदान देय राहील. त्यानुसार खालील तक्त्यामध्ये त्याची सविस्तर माहिती दिली आहे .
तक्ता अ-
यंत्राद्वारे इनलेट /आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅपसह शेततळे
अ.क्र | आकारमान (मीटरमध्ये) | बाजू उतार (1:1) | बाजू उतार (१ : १ : ५ ) ( काळ्या मातीमध्ये ) | ||
सर्व साधारण क्षेत्र | अदिवाशी उपाय योजना व डोंगराळ क्षेत्र | सर्व साधारण क्षेत्र | अदिवाशी उपाय योजना व डोंगराळ क्षेत्र | ||
१ | १५x१५x३ | २३,८८१ | २६,०१० | १९,६९३ | २१,४९२ |
२ | २०x१५x३ | ३२,०३४ | ३४,८८१ | २६,७९९ | २९,१७४ |
३ | २०x२०x३ | ४३,६७८ | ४७,३९८ | ३७,३९५ | ४०,६२१ |
४ | २५x२०x३ | ५५,३२१ | ५९,९७४ | ४७, ९९१ | ५२,०६८ |
५ | २५x२५x३ | ७०,४५५ | ७५,००० | ६२,०६८ | ६७,२८० |
६ | ३०x२५x३ | ७५,००० | ७५,००० | ७५,००० | ७५,००० |
७ | ३०x३०x३ | ७५,००० | ७५,००० | ७५,००० | ७५,००० |
8 | ३४x३४x३ | ७५,००० | ७५,००० | ७५,००० | ७५,००० |
तक्ता “ ब ”
यंत्र द्वारे इनलेट / आऊ लेट खोदाई व सिल्ट ट्रॅपसह विरहित शेततळे
अ.क्र | आकारमान (मीटरमध्ये) | बाजू उतार (1:1) | बाजू उतार (१ : १ : ५ ) ( काळ्या मातीमध्ये ) | ||
सर्व साधारण क्षेत्र | अदिवाशी उपाय योजना व डोंगराळ क्षेत्र | सर्व साधारण क्षेत्र | अदिवाशी उपाय योजना व डोंगराळ क्षेत्र | ||
१ | १५x१५x३ | १८,६२१ | २०,२३५ | १४,४३३ | १५,७१७ |
२ | २०x१५x३ | २६, ७७४ | २९,०४६ | २१,५३९ | २३, ३९९ |
३ | २०x२०x३ | ३८,४१७ | ४१,६२३ | ३२,१३५ | ३४,८४६ |
४ | २५x२०x३ | ५०,०६१ | ५४,१९९ | ४२,७३१ | ४६,२९३ |
५ | २५x२५x३ | ६५,१९३ | ७०,५४० | ५६,८१८ | ६१,५०५ |
६ | ३०x२५x३ | ७५,००० | ७५,००० | ७०,९०४ | ७५,००० |
७ | ३०x३०x३ | ७५,००० | ७५,००० | ७५,००० | ७५,००० |
8 | ३४x३४x३ | ७५,००० | ७५,००० | ७५,००० | ७५,००० |
६. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ अंतर्गत वैयक्तिक शेततळे आकारमान व खोदकामाचे परिमाण :
- आकारमान निहाय शेततळ्याचे अपेक्षित खोदकामाचा तपशील खालीलप्रमाणे
तक्ता अ.
यंत्राव्दारे इनलेट /आऊटलेट खोदाई व सिल्ट ट्रॅपसह शेततळे
अ.क्र | शेततळ्याचे आकारमान (मीटर मध्ये ) | खोदकामाचे परिमाण घन.मी.
| ||
बाजू उतार (१.१) | बाजू उतार (१:१.५) | |||
१ | १५x१५x३ | ४४१ | ३५१ | |
२ | २०x१५x३ | ६२१ | ५०८.५० | |
३ | २०x२०x३ | ८७६ | ७४१ | |
४ | २५x२०x३ | ११३१ | ९७३ .५० | |
५ | २५x२५x३ | १४६१ | १२८१ | |
६ | ३०x२५x३ | १७९१ | १५८८.५० | |
७ | ३०x३०x३ | २१९६ | १९७१ | |
८ | ३४x३४x३ | २८९२ | २६३१ | |
तक्ता “ ब ”
यंत्र द्वारे इनलेट / आऊलेट खोदाई व सिल्ट ट्रॅपसह विरहित शेततळे
अ.क्र | शेततळ्याचे आकारमान (मीटर मध्ये ) | खोदकामाचे परिमाण घन.मी.
| ||
बाजू उतार (१.१) | बाजू उतार (१:१.५) | |||
१ | १५x१५x३ | ४४१ | ३५१ | |
२ | २०x१५x३ | ६२१ | ५०८.५० | |
३ | २०x२०x३ | ८७६ | ७४१ | |
४ | २५x२०x३ | ११३१ | ९७३ .५० | |
५ | २५x२५x३ | १४६१ | १२८१ | |
६ | ३०x२५x३ | १७९१ | १५८८.५० | |
७ | ३०x३०x३ | २१९६ | १९७१ | |
८ | ३४x३४x३ | २८९२ | २६३१ | |
७. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ साठी लाभार्थींची जबाबदारी –
- कृषी विभागाचे कृषी सहायक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे घेणे बंधनकारक राहील .
- कार्यारंभ आदेश / पुर्व संमती पत्र मिळाल्यापासून शेततळयाचे काम तीन महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील .
- लाभार्थीने राष्ट्रीयकृत बँक अथवा इतर बँक पासबुक ची झेरॉक्स कृषी सहायक यांच्याकडे द्यावी .
- कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही .
- शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतीची लागवड करावी .
- लाभार्थीने शेततळयाची निगा राखणे तसेच वेळोवेळी गाळ काढणे इ जबाबदारी पार पाडावी लागेल .
- पावसाळ्यात शेततळयात गाळ साचणार नाही याची दक्षता शेतकऱ्याने घेने गरजेचे आहे तसेच तशी व्यवस्था करावी .
- पाण्याच्या प्रवाहाच्या दोनी बाजूस तुराटीचे आणि पळाटीचे संरक्षण कुंपण घालावे .
- तसेच इनलेट व आऊटलेट जवळ ३ ते ४ फांदेरी बंध घालावेत .
- शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा ४ x ३ फुट आकाराचा बोर्ड लावणे.
- कुटलीही नैसर्गिक अपत्ती आली आणि शेततळेचे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळणार नाही .
- मंजूर आकार मनाचेच शेततळे खोदने बंधनकारक असेल .
- प्लास्टिक अस्तरीकरण स्व खर्चाने करावे लागेल .
- इनलेट आणि आऊटलेट विरहीत शेततळी घेणाऱ्या लाभार्थ्याने शेततळमध्ये पाणी उचलून टाकण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा असणे गरजेचे आहे .
- शेतकऱ्याने हमीपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
- शेततळ्याचे काम पूर्ण होताच तसे कृषी अधिकारी यांना कळवणे बंधनकारक असेल .
८. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ योजनेची अर्ज प्रक्रिया –
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ अंतर्गत वैयक्तिक शेततळेसाठी अर्ज करायचा असेल तर इच्छुक शेतकरीयांनी महा – डीबीटी पोर्टल द्वारे अर्ज करावेत यामार्फत पात्र शेतकरी यांची संगणकीय सोडत पद्धतीने निवड करण्यात येईल. यामुळे योजनेच्या अमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता येण्यासाठी शासनाने हि पद्धत अवलंबली आहे . अर्ज प्रक्रियेचे टप्पे खालिलप्रकारे पाहू .
१ . संकेतस्थळ –
- महा – डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahit.gov.in संकेतस्थळ आहे. यावरती जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडा .
२. अर्जदार नोंदणी –
- अर्जदाराने user name आणि password तयार करून घ्यावा . व आपले खाते उघडावे. व login करावे .
- वैयक्तिक शेततळेसाठी वैयक्तिक लाभार्थी हा पर्याय निवडा .
३. आधार क्रमांक प्रमाणीकरण –
वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळवर प्रमाणित करून घ्यावा.
४. वैयक्तिक तपशील भरावा –
- वैयक्तिक तपशील भरणे बंधनकारक असेल .
- वैयक्तिक माहिती
- पत्ता
- स्वतच्या नावे असलेल्या शेतजमिनीचा तपशील सादर करावा .
- योजनेच्या आवश्यकतेनुसार पिकांचा तपशील ,
- कुटुंबाचा तपशील ,
- शेतावरील वीज जोडणी उपलब्धता ,
- सिंचन क्षेत्राचा स्रोताचा तपशील भरावा लागेल .
- सदर माहिती भरल्या नंतर लाबार्थीना त्यांच्या वैयक्तिक तपशीलावरून ते विविध योजना मधील ज्या घटकांना पात्र ठरतील त्या घटकाच्या निवडीसाठी त्यांना अर्ज करता येईल .
५. अर्ज करण्यासाठी किती पैशे लागतील –
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना रक्कम रुपये २० आणि रक्कम रुपये ३.६० पैशे वस्तू व सेवाकर असे एकूण रक्कम रुपये २३.६० अर्ज शुल्क म्हणून online भरावयाचे आहे. अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत शेतकऱ्यांना अर्जात निवडलेल्या बाबीमध्ये विनामुल्य बदल करता येईल .मात्र मुदत संपल्यानंतर त्यामध्ये बदल करता येणार नाही .
६. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ लागणारी कागदपत्रे –
- जमिनीचा ७/१२
- ८-अ चा उतारा
- आधार कार्ड
- बँक पासबुक ची झेरॉक्स
- शेतकऱ्याचे हमीपत्र
- जातीचा दाखला
वरील सर्व कागदपत्रे हि online पोर्टलवर विहित मुदतीत अपलोड करावीत अन्यथा निवड रद्द होऊ शकते याची दक्षता घ्यावी . कारण हि सर्व प्रक्रिया online आहे .
७. SMS सुविधा-
नोंदणी कृत लाभार्थी शेतकऱ्याना अर्ज करतेवेळी जो मोबाईल क्रमांक नोद्वला असेल त्यावरती वेळोवेळी सर्व सूचना sms द्वारे कळविल्या जातील .
८. सूचना –
शेतकर्यांना अर्ज करतेवेळी काही अडचणी येत असतील अथवा काही सूचना करायची असेल तर या पोर्टल वरील तक्रारी /सूचना या बटनावर किल्क करा अणी आपली तक्रार अथवा सूचना नोद्वू शकतात .अशा प्रक्रारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ मिळवू शकतात .
९. निष्कर्ष –
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – २०२४ सदर योजनेसाठी वित्त विभागाच्या दि .१२ एप्रिल २०२३ रोजीच्या परिपत्रकानुसार सदर योजनेंतर्गत अर्थ संकल्पीय तरतुदीच्या ७०% निधीच्या मर्यादेत रु ३५० कोटी निधीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे . त्यानुसार सदर योजनेकरिता सन २०२३-२४ साठी एकूण १०० कोटी निधी आयुक्त कृषी यांना वितरीत करण्यात आला आहे. त्यानुसार वैयक्तिक शेततळे या घटकाकरिता रु ४० कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे .
सदर लेखात योजनेची सविस्तर माहिती दिली आहे. तरी सर्व आपल्या शेतकरी मित्रांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी हि माहिती जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करावी आणि योजनेचा लाभ घ्यावा .
धन्यवाद !