स्वाधार योजना २०२४-Swadhar Yojanaअंतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे लाभार्थी विद्यार्थीस रु ५१,०००/-रक्कमेचे अर्थसहाय्य मिळवा

स्वाधार योजना २०२४अंतर्गतअनुसूचित जाती आणि नवबोद्ध विद्यार्थीस अर्थसहाय्य,१ जानेवारी २०२४ पासुन नोंदणी प्रक्रिया सुरूअर्ज करा व लाभ मिळवा.  

महाराष्ट्र स्वाधार योजना २०२४ या योजनेस भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना देखील म्हंटले जाते . सदर योजना महाराष्ट्र सरकारमार्फत समाजकल्याण विभागाअंतर्गत राबवली जाते .या योजनेत फक्त अनुसूचित जाती आणि नवबोद्ध प्रवर्गातील गरजू लाभार्थीला  १० वि नंतर १२, पदवी अथवा पदविका ,इतर कोर्स ,वैद्यकीय /अभियांत्रिकी अशा पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी रुपये ५१,०००/- रक्क्मेद्वारे आर्थिक साहाय्यद्वारे मदत केली जाते .

स्वाधार योजना २०२४ ची नोंदणी प्रक्रियेची सुरुवात १ जानेवारी २०२४ रोजी सुरु झाली आहे .गरजू आणि गरज वंतांना सदर योजनेचा लाभ घ्यायचा आहे का ? चला तर मग मित्रांनो आज आपण या लेखाद्वारे योजनेचा overview घेऊन माहिती मिळवूया .योजनेचा form,login ,नोंदणी प्रक्रिया, योजनेची पात्रता ,योजेनेचे उद्देश , वैशिष्ट्य ,नियम ,लाभ काय मिळतो,लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ,इत्यादी विषयी सविस्तर माहिती आपण खालिलप्रकारे या लेखाद्वारे पाहू .

स्वाधार योजना २०२४
स्वाधार योजना २०२४

१.स्वाधार योजना २०२४  काय आहे ?

स्वाधार योजना २०२४ महाराष्ट्र राज्य अंतर्गत नवबौद्ध प्रवर्ग व अनुसूचित जातीतील विद्यार्थीना भोजन भत्ता , निवास भत्ता , निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधांसाठी अनुदान दिले जाते. वार्षिक खर्चासाठी अनुदान म्हणून रक्कम मंजूर करण्यात येते आणि डायरेक्ट विद्यार्थीच्या बँक खात्यात DBT च्या माध्यमातून जमा होते .

सदर योजना महाराष्ट्र राज्यातील ११ वि आणि १२ वि इयत्तात  शिक्षण घेत असणाऱ्या आणि शासकीय वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या  विद्यार्थीयांना निवास व्यवस्थेसाठी या योजनेचा लाभ घेता येईल .

या योजनेत फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील गरजू लाभार्थी त्याला १० वि , १२ वि किंवा पदवी अथवा पदविका ,इतर कोर्स व  पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी रुपये ५१,०००/- रक्क्मेद्वारे आर्थिक साहाय्यद्वारे मदत केली जाते.विद्यार्थ्यासाठी सदर योजनेंतर्गत लाभार्थी विद्यार्थीस ५०००/-रु व २०००/- रु शैक्षणिक साहित्यासाठी राज्य सरकार रोख रक्कम देते .

इयत्ता १०  वि नंतर पुढील शिक्षणासाठी under graduate & post graduate साठी पुणे मुंबई ,नागपूर इत्यादी शहरात त्यांच्या वसतिगृह आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी ५१,००० /- ते ६०,०००/- रु दरवर्षी अनुदान दिले जाते .

अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana देशातील लाखो तरुणाचे आर्मी भरतीचे स्वप्न पूर्ण करणार

२. स्वाधार योजना २०२४ योजनेचा overview 

स्वाधार योजना २०२४
स्वाधार योजना २०२४
योजनेचे नावस्वाधार  योजना २०२४ -Swadhar Yojana 2024 
 विभागसामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग
शासनमहाराष्ट्र शासन
योजना प्रारंभ दिनांक१ सप्टेंबर २०२०
 राज्यमहाराष्ट्र
योजनेचा उद्देशअनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील गरजू विद्यार्थीयांना १० वि नंतरच्या पुढील शिक्षणसाठी अर्थसहाय्य व इतर शैक्षणिक सुविधा प्रदान करणे
अर्ज प्रक्रियाonline
अधिकृत संकेतस्थळsyn.mahasamajkalyan.in 
अर्ज प्रक्रियाonline
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नवबौद्ध प्रवर्ग व अनुसूचित जाती
लाभाचे स्वरूपप्रती वर्षी ५१,०००/- रुपयाची मदत
हेल्प लाईन क्रमांक१८००१२०८०४०

 

३. स्वाधार योजनेचे उद्देश –

  • स्वाधार योजना २०२४ सदर योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील नवबौद्ध व अनुसूचित जाती या विशेष प्रवर्गातील नितांत गरज असणाऱ्या मुलांचे  शिक्षण पूर्ण करण्यासाठी अर्थ सहाय्य प्रदान करणे व त्यांना प्रोत्साहन देणे होय .
  • सदर योजनेंतर्गत सबंधित प्रवर्गातील मुलांचे शिक्षणाचे स्वप्न साकार करणे आणि त्यांना सशक्त ,आत्मनिर्भर ,स्वावलंबी बनवणे आणि त्यांचे जीवनमान उंचावून स्वतच्या पायावर उभे करणे .

४.स्वाधार योजना २०२४ योजनेची  मुख्य वैशिष्ट्य –

  • 10 च्या नंतर पुढील शिक्षणासाठी लाभार्थी विध्यार्थीने जे काही शिक्षणाचे क्षेत्र निवडले असेल त्याचा कालावधी किमान २ वर्ष आसावा .
  • कॉंलेज मधील उपस्थीती  किमान ७५% असणे गरजेचे आहे .
  • सदर योजना विशेष प्रवर्गातील विद्यार्थीयांना उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य प्रदान करते.
  • सदर योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभाची रक्कम लाभार्थ्याचा आधार  कार्डशी जोडलेल्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते  .
  • सदर योजनेची online अर्ज प्रक्रिया आहे .

५.स्वाधार योजनेचे लाभार्थी  कोण  –

भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील लाभार्थी हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील नवबौद्ध प्रवर्ग व अनुसूचित जाती या विशेष प्रवर्गातील मुलांचे  शिक्षण पूर्ण  करण्यासाठी नितांत गरज असणारे लाभ घेण्यास पात्र असतील .

६.स्वाधार योजना २०२४ पात्रता –

  • लाभार्थी विध्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असावा .
  • राज्यातील नवबौद्ध प्रवर्ग व अनुसूचित जाती या विशेष प्रवर्गातील लाभार्थी असावा .
  • बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असावे .
  • आई वडिलांचे उत्पन्न २.५० रुपयाच्या लाखाच्या आत असावे .
  • दिव्यांगास प्राधान्य असेल. (यास किमान ५०% गुण असावेत )
  • लाभार्थीस लाभ घेण्यासाठी किमान ६० % गुण असावेत .

७.स्वाधार योजना २०२४ नुसार कागदपत्रे –

  • आधार कार्ड
  • विहित अर्जाचा नमुना अथवा online अर्ज करू शकतात .
  • दहावी ,बारावी . डिप्लोमा इत्यादी गुणपत्रक .
  • शाळेचा दाखला.
  • जन्म प्रमाणपत्र.
  • शपथ पत्र.
  • cast certificate.
  • तशीलदार उत्पन्नाचा दाखला.
  • रहिवाशी प्रमाणपत्र.
  • बँकेच्या पासबुक ची झेरॉक्स प्रत.
  • BPL कुटुंब धारक असल्यास प्राधान्य.
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र .
  • ११ वि साठी अथवा इतर व्यवसायिक उपक्रमासाठी प्रवेश घेतल्यास महाविद्यालय कडून बोनाफाईड सर्टिफिकेट.
  • वरीलप्रमाणे इत्यादी कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे आहे .

बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ कामगारासाठीच्या सामाजिक ,आर्थिक ,शैक्षणिक व आरोग्यविषयक कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती .

८.स्वाधार योजना २०२४ नुसार नियम –

  • लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी आसावा.
  • १० वि १२ वि नंतर लाभार्थी हा कोणत्या शाखेत प्रवेश करू इच्छितो त्याचा कालावधी किमान २ वर्ष असणे गरजेचे आहे .
  • स्वाधार योजना २०२४ योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता १० वि ,१२, अथवा पदवी किंवा पदविका परीक्षेत ६०% पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे .
  • जर लाभार्थी हा दिव्यांग असेल तर त्याला किमान ५०% गुण असणे गरजेचे आहे .
  • पालकाचे वर्षिक उत्पन्न २.५ लाखापेक्षा जास्त नसावे .
  • लाभार्थीचे जिल्हा बदली शिक्षण असावे .
  • इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा नाही तर या योजनेचा लाभ मिळणार नाही .
  • लाभधारक विद्यार्थीचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे .

९.स्वाधार योजना २०२४ नुसार नोंदणी प्रक्रिया –

नोंदणी प्रक्रियेची सरुवात १ जानेवारी २०२४ रोजी सुरु झाली आहे .परंतु अर्ज करण्याची अंतिम तारीख अद्याप जाहीर झालेली नाही .

  • महाराष्ट्र समाजकल्याण विभागाच्या अधिकृत website वरती जा .
  • website च्या होम page वर स्वाधार योजना  online अर्ज वर किल्क करा.
  • ओपन झालेल्या form ची प्रिंट घ्या.
  • त्यावरती सर्व माहिती भरा आणि सोबत सर्व कागदपत्रे जोडा .
  • त्यानंतर form आणि सोबत सर्व कागदपत्रे जोडून त्याची झेरॉक्स करून त्याची एक प्रत आपल्याकडे ठेवावी आणि दुसरी  प्रत सबंधित समाजकल्याण कार्यालयात जाऊन जमा करणे .
  • अशा प्रकारे स्वाधार योजनेची नोंदणी प्रकीया पूर्ण होते .
स्वाधार योजना २०२४
स्वाधार योजना २०२४

१०. स्वाधार योजना २०२४ अंतर्गत मिळणारे फायदे व लाभाचे स्वरूप –

  • भोजन व्यवस्था
  • निवास व्यवस्था
  • इतर आवश्यक सुविधा
  • आर्थिक सहायता
  • आरोग्य विमा कवच सुद्धा प्रदान करते .
  • कौशल्य विकास कर्यक्रम यातून रोजगार क्षमता वाढवण्यासाठी मदत होते .
  • लाभार्थीला वेळोवेळी मोफत सल्ले आणि मार्गदर्शन सुद्धा दिले जाते .
  • देण्यात येणाऱ्या लाभाचे विवरण.
अ.क्रदेण्यात येणाऱ्या सुविधाखर्चाचे विवरण
निवास सुविधा१५,०००/-रु
भोजन  सुविधा२८ ,०००/-रु
निर्वाह सुविधा८०००/-रु
एकूण५१,०००/- रु रोख रक्कम मिळेल
इतरअभियांत्रिकी आणि वैद्यकीय विभागातील विद्यार्थी५,०००/- रु
११ वि किंवा इतर शाखा२,०००/-रु अतिरिक्त

 

११. निष्कर्ष –

स्वाधार योजना २०२४ योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आणि नवबोद्ध गरजवंत विध्यार्थीसाठी १० वि नंतर ११ वि , १२ वि  आणि व्यवसायिक पदवी किंवा पदविका इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण करता यावा आणि स्वावलंबी बनावे तसेच शिक्षणाचे त्यापुढील स्वप्न साकार करता यावेत .यासाठी सरकारने आर्थिक मदतीच्या द्वारे मुलांना सहाय्य प्रदान केले आहे .

सदर योजनेंतर्गत लाभार्थी विद्यार्थीयाला निवास ,भोजन,निर्वाह भत्ता आणि शैक्षणिक संसाधने याच्या स्वरुपात अर्थ सहाय्य प्रदान केले जाते.सदर योजेची नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी या लेखाद्वारे सविस्तर माहिती दिली आहे .दिलेल्या माहितीच्या आधारे योजनेचा लाभ घ्या आणि इतरांना हि लाभ घेण्यासाठी मदत करा .योजनेबाबत काही प्रश्न असतील तर आमच्याशी कमेंट करून विचारू शकता .

धन्यवाद !

 

Leave a comment