आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ग्रामीण व शहरी भागातील शिधापत्रिका धारकास वैद्यकीय सेवा बरोबर ५ लाख रुपयाचे विमा कवच आत्ताच लाभ घ्या
आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ हि सदर योजना दिनांक २३ सप्टेंबर २०१८ पासून भारत सरकारद्वारे सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत शासकीय आणि खाजगी रूग्णालयामार्फत पात्र शिधापत्रिका धारक आणि इतर लाभार्थी गटांना listed आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत .
०१/०४/२०२० पासून विमा कंपनी युनायटेड इंडिया इंन्सुरंस कंपनी सार्वजनिक स्थरातील उपक्रम कंपनी द्वारे सदर योजना विमा योजना म्हणून चालवली जाते .सदर योजनेबाबतीत सविस्तर माहिती घ्यायची असेल तर योजना काय आहे ?लाभार्थी कोन आहेत , वैध फोटो आयडी पुराव्यांची यादी . लाभ कव्हरेज किंवा योजनेचे फायदे , उपचाराची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जाते ,नोंदणी प्रक्रिया कशी केली जाते इतर सबंधित माहिती या लेखात आपण घेणार आहोत .ती माहिती खालीलप्रमाणे पाहू .
१. आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ योजना काय आहे ?
आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ हि भारत सरकारची प्रमुख योजना आहे .युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज (UHC) चे ध्येय साध्य करण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ नुसार शिफारस करून हि योजना सुरु करण्यात आली .आरोग्य सेवा वितरणाच्या क्षेत्रीय आणि विभागीय दृष्टीकोनातून सर्वसमावेशक गरजा-आधारित आरोग्य सेवांकडे जाण्याचा हा योजनेमार्फतचा प्रयत्न आहे .
आयुष्यमान भारत अंतर्गत दुसरा घटक म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY हि योजना आहे .हि जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे.ज्याचे उद्दिष्ट रु चे आरोग्य कवच प्रदान करण्याचे आहे. योजनेत स्माविस्ट केलेली कुटुंबे ग्रामीण आणि शहरी भागासाठी सामाजिक आर्थिक जात गणना २०११ (SECC 2011) च्या वंचित आणि व्यावसायिक निकषांवर आधारित आहेत.
राज्य आरोग्य विमा संस्थेतर्फे पात्र लाभार्थी कुटुंबाच्या वतीने दरवर्षी विमा कंपनीला प्रती कुटुंब रु ७९७ /- इतकी रक्कम त्रैमासिक विमा हप्ता म्हणून भरली जाते.तसेच देशातील कोणत्याही हॉस्पिटल मध्ये द्वितीय आणि तृतीय काळजी हॉस्पिटलायझेंशनसाठी प्रती कुटुंब प्रती वर्ष ५ लाख रुपये विमा कवच दिले जाते . हा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला फ्लोटर आधारावर उपलब्ध आहे .
प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची विभागणी केंद्र आणि राज्य शासन यांच्यामध्ये ६०:४० या प्रमाणात खर्च केला जातो .या योजनेंतर्गत शासकीय आणि खाजगी रूग्णाल यामार्फत पात्र शिधापत्रिका धारक आणि इतर लाभार्थी गटांना listed आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत .
२. आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) योजनेतील लाभार्थी –
आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ सदर योजनेंतर्गत लाभार्थी हे ग्रामीण आणि शहरी भागांसाठी सामाजिक –आर्थिक जात गणना २०११ (SECC २०११)स्वयंचलित समावेश , वंचितता आणि व्यवसायिक निकषांवर आधारित आहेत .राज्यात ८३.७२ लाख कुटुंबे आहेत . हा डेटा फिक्स आहे .त्यामुळे अतिरिक्त कुटुंबे जोडली जाऊ शकत नाहीत .परंतु त्या त्या कुटुंबातील नवीन सदस्य जोडले जाऊ शकतात .
शहरी भागासाठी – शहरी भागासाठी ११ व्यावसायिक निकष आहेत ते खालिलप्रकारे
- भिकारी
- घरगुती कामगार ,
- रस्त्यावरील विक्रेते ,
- मोची ,
- फेरीवाले ,
- बांधकाम कामगार ,
- प्लंबर ,
- गवंडी ,
- पेंटर्स ,
- वेल्डर्स,
- सफाई व स्वच्छता कामगार,
- माळी ,
- गृहस्थ कामगार,
- कारागीर ,
- हस्तकला कामगार ,
- शिंपी ,
- वाहतूक कामगार ,
- ड्रायवर ,
- कंडक्टर ,
- मदतनीस ,
- रिक्षाचालक ,
- दुकानातील कामगार ,
- सहाय्यक ,
- शिपाई ,
- परिचर ,
- वेटर ,
- इलेक्ट्रीशियन,
- मेकानिक ,
- असेंबलर,
- दुरुस्ती कामगार ,
- वासरमेन,
- चौकिदार .
ग्रामीण भागातील लाभार्थी– ग्रामीण भागातील लाभार्थीचे वर्णन खालिलप्रकारे –
- कच्चे घर किंवा एकच खोली असलेले कुटुंब.
- महिला कुटुंब प्रमुख असावी .१६ ते ५९ वयोगटातील प्रोढ सदस्य नसलेले कुटुंब.
- अपंग सदस्य.
- अनुसूचित जाती / जमाती कुटुंबे ,
- भूमिहीन कुटुंब जे कि शारीरिक कस्टतून उत्पन्न मिळवतात .
- निवारा नसलेली कुटुंब ,
- निराधार ,
- भिक्षेवर जगणारी कुटुंब ,
- हाताने सफाई करणारे कामगार कुटुंबे,
- आदिवासी गट इत्यादी होय .
३. आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४योजनेंतर्गत वैध फोटो आयडी पुराव्यांची यादी /आवश्यक कागदपत्रे .
- आधार कार्ड / आधार नोंदणी स्लीप.
- PAN कार्ड.
- मतदान ओळखपत्र.
- ड्रायविंग लायसन्स.
- शाळा /कॉलेज चे आयडी.
- पासपोर्ट.
- स्वतंत्र सैनिक ओळखपत्र.
- हेल्थ कार्ड,
- अपंग प्रमाणपत्र,
- फोटो असलेले राष्ट्रीय कृत बँकेचे पासबुक,
- केंद्र आणि राज्य सरकार ने जारी केलेले जेष्ट नागरिक कार्ड,
- सैनिक बोर्डाने जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड,
- महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालय/ मत्स व्यवसाय विभागाद्वारे जारी केलेले सागरी मत्स्पालन ओळखपत्र
- भारत सरकारने / महाराष्ट्र सरकारने जारी केलेला कोणताही फोटो आयडी पुरावा.
४.आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ योजनेंतर्गत लाभ कव्हरेज व फायदे –
- आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ खालील ३४ ओळखल्या गेलेल्या वैशिष्टयांच्या संदर्भात कॅशलेस उपचाराद्वारे वैद्यकीय आणि सर्जिकल प्रक्रियेसाठी हॉस्पिटलायझेशन कव्हर करण्यासाठी आरोग्य विमा योजना आहे .PMJAY लाभार्थीला १८३ फॉलो अप प्रक्रियेसह १२०९ वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रियांचा लाभ मिळतो. तसेच (अतिरिक्त २१३ वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया प्रक्रिया आहेत) आणि १२०९ प्रक्रियेसाठी अतिरिक्त ३७ सरकारी आरक्षित प्रक्रिया आहेत .
- पॅकेजमध्ये उपचारानुसार कोण कोणता खर्च समाविष्ट आहे ?
- जनरल वर्ड मधील बेडचे चार्ज,
- नार्शिग आणि बोर्डिंग चार्ज ,
- सर्जन आणि एंनेस्थेटिस्टचे शुल्क ,
- वैद्यकीय व्यवसायिक सल्लागार शुल्क ,
- ऑक्सिजन ,ओटी,आणि आयसीयू शुल्क ,
- सर्जिकल उपकरणांची किंमत ,
- औषधांची किंमत,
- डिस्पोजल,उपभोग्य वस्तू ,प्रत्यारोपण,प्रत्यारोपनाचे शुल्क,समाविष्ट आहे ,
- उपकरणे ,रक्त संक्रमणाची किंमत (राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रदान केले जाणारे रक्त) ,
- क्षकिरण आणि निदान चाचण्या , आंतररुग्णांना अन्न ,राज्य परिवहन किंवा द्वतीय श्रेणीचे रेल्वे भाडे ( फक्त रुग्णालयापासून रुग्णाच्या निवासस्थानापर्यंत )
- या पॅकेजमध्ये रुग्णाला हॉस्पिटल डीसचार्ज दिल्याच्या तारखेपासून त्याचा उपचाराचा संपूर्ण खर्च समाविष्ट आहे ,त्यात काही गुंतागुंत असल्यास .
- जर एकादे मृतूचे उधाहरण असेल आणि नेटवर्क हॉस्पिटल मधून गाव किंवा वस्ती पर्यंत मृत देहाची वाहतूक करयाची असेल तर तो खर्च देखील या पॅकेजमध्ये येतो .
५.आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४योजनेंतर्गत नोंदणी प्रक्रियेचे टप्पे –
आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड असणे गरजेचे आहे .कार्ड मिळवण्यासाठी अगोदर आयुष्यमान कार्ड ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे . मग आपल्याला कार्ड घरपोच मिळवता येईल.
- आपण योजनेचे लाभार्थी आहोत की नाही हे तपासण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in/ या वेबलिंकचा वापर करा .
- रेशनिंग कार्ड १२ अंकी क्रमांक तपासणीसाठी वेबलिंकचा वापर करा.
- स्वतःचे कार्ड स्वतः बनवू शकता त्यासाठी बेनिफ़िशिअरी login चा वापर करा. त्यासाठी अगोदर तुम्हाला Google play Store मधून Ayushyman App dounload कराव लागेल .
- App dounload करण्यासाठी Ayushman App National Health Authority या लिंकवर किल्क करा .
- आणि आपले नाव यादीत असल्याची खात्री झाल्यास रेशनीग कार्ड आधार कार्ड व आधारला जोडलेला मोबाईल क्रमांकसह इत्यादी कागदपत्रद्वारे आपले कार्ड बनवा .
- आपले कार्ड बनविण्यासाठी आरोग्य केंद्रातील आशा स्वयं सेविका , किंवा ग्राम पंचायत मधील आपले सरकार केंद्रचालक यांच्याकडे जाऊन कार्ड बनवा .
- किंवा कॉमन सर्विस सेंटर (CSC )महा- ई- सेवा- केंद्र यांच्याकडे जाऊन आपले कार्ड बनवू शकता .
- स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन आपले आयुष्यमान कार्ड –ई –केवायसी मोफत करून घेऊ शकता .यासाठी कोणतेही फी आपणास देण्याची गरज.
६.आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ योजनेंतर्गत उपचार घेण्याबाबत अमलबजावणी प्रक्रिया कशी केली जाते ?
- लाभार्थी यांनी आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ सदर योजनेंतर्गत नेटवर्क मध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये संपर्क करावा .
- नेटवर्क हॉस्पिटल द्वारे ठेवलेल्या आरोग्य शिबिरास हजर राहून आरोग्य स्म्स्यानुसार उपचारासाठी संदर्भ पत्र मिळवू शकतात .
- या सर्व प्रक्रियेसाठी नेटवर्क हॉस्पिटल द्वारे आरोग्यमित्र लाभार्थी रुग्णास मदत करतील .
- आरोग्य मित्र लाभार्थी रुग्णाची नोंदणी वैध रेशन कार्ड आणि फोटो आयडी तपासून करतो .
- सदर योजेतील लाभार्थी १२०९ प्रक्रियेसाठी सदर रुग्णाची प्रोसेस येत असल्यास त्यास लागणारी सर्व कागदपत्रे जोडून हॉस्पिटल द्वारे ई –प्राधिकरण विनंती केली जाते .
- या विनंतीचे परीक्षण वैद्यकीय विशेष तज्ञ करतात आणि त्यास मंजुरी देतात .
- मंजुरी मिळाल्यानंतर या प्रक्रियेस खाजगी रुग्नाल्यामार्फात ३० दिवसाच्या आत आणि सार्वजनिक / सरकारी रुग्नाल्यामार्फात ६० दिवसाच्या आत कार्यवाही करावी लागते अन्यथा त्यानंतर पूर्वाधिकार स्वयं रद्द होतात .
- इमर्जन्सी प्रक्रियेसाठी १२ तासात प्रक्रिया पूर्ण करावी लागते . वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी मंजुरी MCO द्वारे दूरध्वनी द्वारे घ्यावी लागते .
- इमर्जन्सी टेलीफोनिक (ETI) ज्या मध्ये व्हाइस रेकार्डिंग द्वारे सुविधा आहे .
- नेटवर्क हॉस्पिटल लाभार्थींना कॅशलेस वैद्यकीय किंवा सर्जिकल उपचार प्रदान करते .
- वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रिया केल्यानंतर रिपोर्ट पोर्टल वर अपलोड केला जातो .
- रीतसर डिस्चार्ज मिळतो .
- वाहतूक खर्च बिल , आणि इतर कागदपत्र बिले ,सर्व दिले जाते .
- जर लाभार्थीचे निदान आणि उपचार फॉलो अप प्रक्रियेत येत असेल तर डिस्चार्ज वेळी रुग्णाला हॉस्पिटल द्वारे सूचित केले जाते .रुग्णाला सपोर्ट करणे हि आरोग्य मित्राची जबाबदारी राहील .नेटवर्क होस्पिटल द्वारे डिस्चार्ज झाल्यापासून १० दिवसांपर्यंत योजनेंतर्गत मोफत पाठपुरवठा सल्ला ,निदान,व औषधे दिली जातात.
७.आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ योजनेंतर्गतआरोग्य सेवा कुठे मिळू शकते ?
- नेटवर्क रूग्णालया मध्ये सरकारी आणि खाजगी रुग्णालये समाविष्ट आहेत ,
- सरकारी रूग्णालयामध्ये सामाविष्ट असणाऱ्या सेवा
- सार्वजनिक आरोग्य विभाग ,
- वैद्यकीय शिक्षणसंस्था ,
- संशोधन विभाग ,
- महानगरपालिका आणि नगरपालिका अंतर्गत येणारी रुग्णालये इत्यादीचा यात समावेश आहे .
- यात सहभागी खाजगी आणि सरकारी रुग्णालये संख्या १००० इतकी आहे .
- मल्टीस्पेशालीस्ट खाजगी रुग्णालयासाठी ICU साठी ३० खाटांचा समावेश आहे .
- तर एकल स्पेशालीस्ट विशेष रुग्णालयासाठी १० खाता आणि इतर निकष लागू आहेत .
८. निष्कर्ष –
आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ सदर योजना आयुष्यमान भारत अंतर्गत दुसरा घटक म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY हि योजना आहे .हि जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे.ज्याचे उद्दिष्ट रु चे आरोग्य कवच प्रदान करण्याचे आहे योजनेत स्माविस्ट केलेली कुटुंबे ग्रामीण आणि शहरी भागासाठी सामाजिक आर्थिक जात गणना २०११ (SECC 2011) च्या वंचित आणि व्यावसायिक निकषांवर आधारित आहेत.
या योजनेंतर्गत शासकीय आणि खाजगी रूग्णाल यामार्फत पात्र शिधापत्रिका धारक आणि इतर लाभार्थी गटांना listed आजारांवर मोफत वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे .आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ योजना काय आहे,योजनेतील लाभार्थी , लाभ कव्हरेज व फायदे, योजनेंतर्गत वैध फोटो आयडी पुराव्यांची यादी , नोंदणी प्रक्रियेचे टप्पे,उपचार घेण्याबाबत अमलबजावणी प्रक्रिया कशी केली जाते,
तर मित्रांनो आज आपण या लेखात वरीलप्रमाणे सविस्तर माहिती जाणून घेतली आहे . संबधित माहिती तुमच्या फायद्याची ठरेल आणि जर माहिती आवडली तर इतर गरजू मित्र परिवारा बरोबर शेअर करा आणि काही अडचण आल्यास आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात .
धन्यवाद !
FAQ –
१. आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जन आरोग्य योजना(AB-PMJAY) २०२४ कार्ड काढण्यासाठी कागदपत्रे काय लागतात ?
⇒ राशन कार्ड , आधार कार्ड , रहिवासी प्रमाण पत्र , पासपोर्ट फोटो , पुन कार्ड , मोबाईल क्रमांक इत्यादी
२. आयुष्यमान योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो ?
⇒कुटुंब प्रमुख महिला , अपंग व्यक्ती , अनुसूचित जाती जमाती इत्यादी महिला पुरुष
३. आयुष्यमान योजनेंतर्गत कुटुंबातील किती सदस्य लाभ घेऊ शकतात ?
⇒एक व्यक्ती किंवा सर्वजण मिळून लाभ घेऊ शकतात .
४. कुटुंबातील नवीन सदस्य या योजनेत कसा जोडावा ?
⇒आरोग्य मित्रांद्वारे त्यांना कळवा आणि त्यांना योजनेचे कार्ड आणि आपले आधार कार्ड द्या आणि नवीन जो सदस्य जोडायचा आहे त्याचे आधार कार्ड द्यावे लागेल आणि त्याची सविस्तर माहिती द्यावी लागेल .