महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) महाराष्ट्र शासनाची हि प्रमुख आरोग्य विमा योजना म्हणून महाराष्ट्र सरकारद्वारे राबवली जाते. पूर्वीची केंद्र शासना मार्फत चालत असलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना हि सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये सदर योजना १ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली व त्यानुसार सदर योजना राबवली जाते .
सदर योजनेंतर्गत विशेष आरोग्य सेवांच्या अंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी हॉस्पिटलायझेशन आवश्यक असलेल्या गंभीर आजारासाठी योजनेंतर्गत कॅशलेस दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान केल्या आहेत .अर्थात निशुल्क आरोग्य सेवा पुरवत आहेत .
सदर योजनेला संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाकडून अर्थसहाय्य दिले जाते .महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) योजनेचीआरोग्य सेवा व उपचार,फायदे,पात्रता निकष,नोंदणी,विमा सरंक्षण इत्यादी सर्वसमावेशक माहिती आत्ताच मिळवायची आहे का ? तर चला मग पुढीलप्रमाणे माहितीचा आढावा घेऊया .
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY)योजनेचा overview –
योजनेचे नाव | महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) |
सरकारद्वारा | केंद्र सरकार आणि राज्य सरकार द्वारा |
योजनेची सुरुवात | १ एप्रिल २०१७ |
विभाग | आरोग्य मंत्रालय महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील नागरिक |
लाभ | निशुल्क आरोग्य सुविधा |
अर्ज करण्याची पद्धत | online |
अधिकृत website | www.jeevandayee.gov.in |
Toll Free Number | 155388 / 1800232200 |
विमा सरंक्षण | प्रती कुटुंब प्रती वर्ष १.५० लाख रु आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणसाठी प्रती वर्ष २.५० लाख पर्यंत |
योजनेतील समाविष्ट उपचार | ३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार व शस्त्रक्रिया आणि १२१ followup सेवांचा समावेश आहे |
१. योजनेचा उद्देश –
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) योजनेचा मुख्य उद्धेश राज्यातील लोकांना विशेष सेवांच्या व गंभीर आजारावरील उप्चारांसाठी अंतर्गत शस्त्रक्रिया आणि हॉस्पिटलायझेशन आवश्यक असलेल्या राज्यातील लोकांना पूर्णपणे निशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे .
२. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY)पात्रता आणि निकष –
लाभार्थी –
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी लाभार्थी निकष ठरवले आहेत ते कोण कोणते आहेत ते खालिलप्रकारे पाहूया.
- A – पिवळे आणि केशरी शिधापत्रिका धारक त्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रु पर्यंत असणे गरजेचे आहे.ते सदर योजनेच लाभ घेण्यास पात्र ठरतील .
- B – पांढरे शिधापत्रिका धारक आत्महत्याग्रस्त जिल्हातील शेतकरी तसेच कृषीदृष्ट्या अडचणीत असलेले शेतकरी कुटुंब लाभार्थी ठरतील . आत्महत्या ग्रस्त घोषित जिल्हे – औरंगाबाद ,जालना,बीड ,परभणी ,हिंगोली . लातूर ,नांदेड ,उस्मानाबाद ,बुलढाणा वासिम यवतमाळ आणि वर्धा इत्यादि होय.
- C – a)
- शासकीय अनाथ आश्रमातील मुले.
- शासकीय महिला आश्रमातील महिला कैदी .आणि
- शासकीय वृद्ध आश्रमातील जेष्ठ नागरिक हे येतील .
b) महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडील नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंब होय.
c) DGIPR ने मंजूर केलेले पत्रकार आणि त्यांचे कुटुंब होय .
३. महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) विम्याची रक्कम-
- सदर योजना लाभार्थीच्या हॉस्पिटलायझेशन शी संबंधित सर्व खर्चाची पूर्तता करण्यासाठी कव्हरेज प्रदान करते . कुटुंबानुसार प्रती कुटुंब प्रती पॉलिसी वर्ष १,५०,००० /- पर्यंत रु पर्यंत .
- मूत्रपिंड प्र्त्यारोप्ननासाठी हि मर्यादा प्रती कुटुंब प्रती पॉलिसीवर्षाला २,५०,०००/-,पर्यंत वाढवण्यात आली आहे .
- कुटुंबातील प्रत्येक सदस्याला हा लाभ फ्लोटर आधारावर आहे म्हणजेच एकूण १.५ लाख किंवा २.५ लाख कव्हरेज एक व्यक्ती किंवा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रितपणे घेऊ शकतात.
४. (MJPJAY) योजनेंतर्गत मिळणारे लाभ आणि फायदे –
निशुल्क उपचार –
- महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) वैद्यकीय विमा योजना हि ३४ ओळखल्या गेलेल्या वैशिष्ट्य संदर्भात निशुल्क उपचाराद्वारे वैद्यकीय आणि सर्जिकल प्रक्रियासाठी हॉस्पिटलायझेसन कव्हर करण्यासाठी काम करते .
- सदर योजनेतील लाभार्थीला १२१ फालोअप प्रक्रीयासह ९९६ वैद्यकीय उपचार आणि शास्त्रक्रियेचा लाभ मिळतो .९९६ प्रक्रिया आहेत त्यापैकी १३१ सरकारी आरक्षित प्रक्रिया आहेत .
- आरोग्य शिबिर मार्फत लाभार्थी निवडला जातो –
- तसेच सदर योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना घेता येण्यासाठी योजनेतील नेटवर्क रूग्णालया मार्फत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात त्या शिबिरामार्फात रुग्णांची आरोग्य तपासणी करून योजनेतील ९७१ उपचारापैकी सदर रुग्ण पात्र ठराल्यास त्यावर योजनेंतर्गत येणारे नेटवर्किंग रुग्णालयामध्ये उपचार केले जातात .
निशुल्क सुविधा -(Cashless Medical Services)
- लाभार्थी रुग्णास योजनेंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातून निशुल्क वैद्यकीय सेवा देणे पूर्णतः संगणीकृत आहे परंतु त्यासाठी
- रुग्ण लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (अंत्योदय अंतर्गत पिवळे रेशनिंग कार्ड आणि अन्नपूर्णा योजनेंतर्गत केशरी रेशनिंग कार्ड )आणि फोटो ओळख पत्राच्या आधारे नेटवर्क मध्ये असलेल्या रुग्णालयातून उपचार लागू असेल .
- पांढरे शिधापत्रिका धारक शेतकरी आत्महत्या ग्रस्त १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना पांढरी शिधापत्रिका , ७/१२ चा उतारा फोटो ओळखपत्राच्या आधारे योजनेंतर्गत निवडक रुग्णालयात उपचार लागू असेल .
- महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) मध्ये वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयातील उपचार निदान, आवश्यक औषधपचार ,काळजी व सेवा , भोजन तसेच एक वेळेचा प्रतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे .
- तसेच रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर १० दिवसापर्यंत सेवा पॅकेज मध्ये स्माविस्ट आहेत .
५.महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) योजनेची नोंदणी प्रक्रिया –
सदर योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे त्याकरिता पुढील प्रमाणे नोंदणी प्रक्रियेची माहिती घेऊया.
- महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) योजनेत सामाविस्ट असणाऱ्या रुग्नालयात आरोग्यमित्र आहेत ते आपणास नोंदणी साठी मदत करतील .
- योजनेंतर्गत online नोंदणी करण्याची प्रक्रिया हि आरोग्य मित्रांद्वारे केली जाते .
- यात नोंदणी दरम्यान नावाची ओळखपत्राद्वारे पडताळणी करणे तसेच इतर कागद्त्रे याची पडताळणी करून सत्यता पाहणे हि पूर्ण प्रक्रिया आरोग्य मित्रांद्वारे पूर्ण केली जाते .
- त्यानंतर लाभार्थ्यांना आरोग्य शिबिराद्वारे तसेच नेटवर्क हॉस्पिटल द्वारे लाभार्थी निवड होऊन उपचार आणि निदानावर आधारित संदर्भ लेटर मिळवू शकतो.
- online नोंदणी केली जाते .नोंदणी झाल्यावर कार्ड मिळते ते उपचारादरम्यान वापरण्यास मुभा आहे .
६.(MJPJAY)योजनेंतर्गत विमा संरक्षण –
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष रुपये १.५० लाखापर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे .मूत्रपिंड प्रत्यारोपण हि मर्यादा प्रतिवर्ष २.५० लाखापर्यंत आहे .
लाभार्थी कुटुंबाला कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तींना वरील योजनेचा लाभ घेता येतो .
सुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती २०२३-Sukanya Samrudhi Yojana
७.महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) योजनेत समाविष्ट उपचार –
योजनेंतर्गत ३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे .सदर योजनेत खालिलप्रकारे विशेष सेवांतर्गत उपचार / सेवा देण्यात येत आहेत .
- सर्वसाधारण शस्त्रक्रिया
- काम, नाक घसा शस्त्रक्रिया
- नेत्ररोग शस्त्रक्रिया.
- स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र
- अस्थिरोग शस्त्रक्रिया व प्रक्रिया
- पोठ व जठार शस्त्रक्रिया
- कोर्दिओव्हस्क्युलर थोरासिक सर्जरी
- बालरोग शस्त्रक्रिया
- प्रजनन व मुत्र रोग शस्त्रक्रिया
- मज्जातंतूविकृती शास्त्र
- कर्क रोग शस्त्रक्रिया
- वैद्यकीय कर्करोग उपचार
- रेडिओथेरपी कर्करोग
- त्वचा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
- जळीत
- पोलिट्रामा
- प्रोस्थेसिस
- जोखीम देखभाल
- जनरल मेडिसिन
- संसर्गजन्य रोग
- बालरोग वैद्यकीय व्यवस्थापन
- हृद्यरोग
- नफ्रोलोजी
- न्युरोलोजी
- प्ल्मोनोलोजी
- चर्मरोग चिकित्सा
- रोमेटोलोजी
- इंडोक्रायनोलोजी
- मेडिकल गेस्ट्रोइंट्रोलोजी
- इंटरवेन्शनल रेडीओलोजी
(MJPJAY)योजनेंतर्गत विम्याचा हप्ता –
लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विम्याचा हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटी मार्फत नॅशनल इन्सुरंस कंपनीस देण्यात येतो .
८. (MJPJAY)योजनेंतर्गत विमा संरक्षण –
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) योजनेमार्फत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष १.५० लाख रुपये पर्यंतचे विमा संरक्षण दिले जाते . आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणसाठी हि मर्यादा रुपये २.५० लाख असी आहे .
९. योजनेंतर्गत येणारी रुग्णालये –
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) योजनेंतर्गत शासकीय /निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रुग्णालयाची निवड काही निकषांच्या आधारे करण्यात आली आहे .या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे .तर एकल स्पेशालीस्ट विशेष रुग्णालयांसाठी १० खाटा आणि इतर निकष लागू .रुग्ण / लाभार्थी त्यांच्या मर्जीनुसार किंवा सोयीनुसार राज्यातील कोणतेही योजनेतील स्माविस्ट रुग्णालयात उपचार घेऊ शकतात .
अटल पेन्शन योजना २०२३ -आर्थिक भविष्य सुरक्षित करा व भविष्यातील स्थिरतेस सक्षम करा
१० .(MJPJAY)योजनेंतर्गत लागणारी कागदपत्रे –
- list of the ID profs फोटो असलेले कोणतेही ओळख पत्र . जसे – फोटो असणारे रेशनीग कार्ड ,मतदान कार्ड ,वाहन चालक परवाना ,
- आत्महत्या ग्रस्त जिल्यातील शेतकरी कुटुंबाचे पांढरे रेशनिंग कार्ड तसेच ७/१२ चा उतारा लागतो .
- आश्रम शाळेतील मुलांसाठी राज्य शानाकडून निर्धारित केलेली ओळखपत्र ग्राह्य धरली जातील .
११. निष्कर्ष –
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना २०२४ (MJPJAY) हि महाराष्ट्रातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा ,मदत इत्यादि द्वारे निशुल्क आरोग्य सेवा पुरवते ,त्याचे सर्वसमावेशक फायदे ,पात्रता निकष ,नोंदणी प्रक्रिया , विमा संरक्षण ,मिळणारे उपचार आदिबाबत वरीलप्रमाणे सर्व माहिती देण्यात आली आहे
सदर योजनेची सर्व माहिती आपल्याला मिळाली असेल तरी देखील आपले या योजनेबाबत काही प्रश्न असतील किवा काही शंका असतील तर तुमी आम्हाला कमेंट्स करून विचारू शकतात .त्याबाबत आम्ही उत्तरे देण्याचा किंवा आपल्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करू .
सदर योजनेची माहिती आपणास उपुक्त वाटत असेल तर हि माहिती तुमच्या मित्रांना तसेच परिवाराला शेअर करा जेणेकरून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना घेत येईल .
धन्यवाद !