बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या,अर्थसहाय्याची,आरोग्य सेवासाठी तसेच शैक्षणिक सेवा प्रदान करणाऱ्या योजनाची माहिती मिळवा.
बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ योजनेंतर्गत कामगारांना सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने विविध योजनाचा लाभ दिला जातो . त्यामुळे बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबाला सामाजिक ,आर्थिक ,आरोग्याच्या तसेच शैक्षणिक योजना मार्फत प्रत्येक घटकानुसार योजनाचा लाभ मिळतो. त्यासाठी या कामगाराची नोंद असणे गरजेचे आहे .कारण नोंद असणाऱ्या कामगारांनाच लाभ दिला जातो .
महाराष्ट्र शासन मार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे या सर्व योजना राबवल्या जातात .आणि त्याचा लाभ हि मिळवून दिला जातो .
लाभ मिळवण्यासाठी कामगारांना नोंदणी करणे गरजेचे असते त्या नोदणीसाठी निकष व पात्रता पूर्ण करावी लागते. तसेच त्यासाठी काही कागदपत्राची देखील पूर्तता करावी लागते .त्यानुसार नोंदणी प्रकीर्या पूर्ण करता येते . इत्यादी बाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखात घेणार आहोत . तसेच योजनेचे फायदे आणि योजना कोणकोणत्या आहेत याची देखील माहिती घेणार आहोत . कामगारांना मिळणाऱ्या योजनाची माहिती मिळवायची आहे का ? चला तर मग बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनाची माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहूया .
१. बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ योजना काय आहे ? त्यासाठी योजनेचा थोडक्यात over view पाहूया
योजना नाव | बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ |
विभाग | महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ |
योजनेचे उद्देश | बांधकाम कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून विकास करणे आणि अडचणी सोडवणे |
योजनेचे लाभाचे स्वरूप
| महाराष्ट्र शासनाकडून ४ घटकाच्या आधारे ३२ कल्याणकारी योजनाचा लाभ मिळतो |
कामगार नोंदणी फी | १ रु |
नोंदणी ची वयोमर्यादा | १८ ते ६० वयाच्या आतील |
लाभार्थी | महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार |
शासन | महाराष्ट्र शासन |
अधिकृत website | mahabocw.in |
अर्जाची पद्धत | online |
अटल पेन्शन योजना २०२३ -आर्थिक भविष्य सुरक्षित करा व भविष्यातील स्थिरतेस सक्षम करा
२. बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ योजनेचा उद्देश –
- महाराष्ट्रातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगार हिताच्या विविध योजना राबवणे आणि कामगारांच्या व कुटुंबियांच्या कल्याणाच्या योजना राबून सक्षम बनवणे ,उच्च शिक्षणाची स्वप्न साकार करणे ,त्यांचा आर्थिक विकास करणे होय
- बांधकाम कामगाराचे जीवनमान व राहणीमान सुधारणे
- बांधकाम कामगारांना सामाजिक,आर्थिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक सुरक्षा प्रधान करणे .
- त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे कल्याणकारी योजना मार्फत विकास व कल्याण करणे .
- कामगारांना योजना मार्फत हक्काचे घर मिळवून देणे .
- नवीन बांधकाम कामगारांची सातत्यपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे .
३. बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ योजनेचे फायदे –
- बांधकाम कामगाराची नोंदणी होते
- या मार्फत सातत्यपूर्ण आणि कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होतो
- सामाजिक सुरक्षा मिळते
- कामगारा बरोबर त्यांच्या कुटुंबियांना विविध योजनाचा लाभ मिळतो
- आर्थिक सुरक्षा मिळते
- आरोग्य विषयक योजनाचा लाभ मिळतो
- सर्वात महत्वाचे त्यांच्या पहिली पासून ते उच्च शिक्षणाचे स्वप्न ,तसेच इतर शिक्षणाचे स्वप्न साकार होते .
- गृह उपयोगी वस्तू मिळतात .
- कामासाठी लागणारे साहित्य मिळते .
- ज्यांना घर नाही त्यांना योजनेमार्फत हक्काचे घर मिळते .
४. बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ नोंदणी पात्रता निकष –
- १८ ते ६० वयोगटातील बांधकामगार नोंदणी करण्यास पात्र आहे .
- ज्या कामगारांनी मागील एक वर्षा मध्ये ९० दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले आहे असे कामगार नोंदणी करण्यास पात्र आहेत .
अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana देशातील लाखो तरुणाचे आर्मी भरतीचे स्वप्न पूर्ण करणार
५. बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे –
मंडळात नोंदणी करण्याकरिता form – v भरावा लागतो .आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतात ती खालिलप्रकारे पाहूया .
- वयाचा दाखला
- रहिवाशी प्रमाणपत्र
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट फोटो
- किमान ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
६. नोंदणी प्रक्रिया –
६ .मान्यताप्राप्त कामाच्या प्रकारांची यादी –
- इमारती
- रस्ते
- रस्त्यावर
- रेल्वे
- सिंचन
- ड्रेनेज
- ट्रामवेज
- एअरफिल्ड
- तटबंद आणि नेव्हिगेशन वर्क्स
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह
- निर्मिती
- पारेषण आणि पॉवर वितरण
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना
- इलेक्ट्रिक लाईन्स
- वायरलेस
- रेडियो
- दूरदर्शन
- दूरध्वनी
- टेलिग्राम आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन
- डॅम
- नद्या
- रक्षक
- पाणीपुरवठा
- टनेल
- पुंल
- पदवीधर
- जल विदयुत
- पाईप लाईन
- टॉवर्स
- कुलिंग टॉवर्स
- ट्रान्समिशन टॉवर्स आणि अशे इतर कार्य ‘
- दगड कापणे ,फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे
- रंग ,वार्निश लावणे इत्यादी सुता काम .
- गटार व नळ जोडणीची कामे
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादी सहित विद्युत कामे,,
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे ,
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे ,
- उद्दाहने ,स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे .
- लोखंडाच्या किंवा धातूच्या ग्रील्स ,खिडक्या ,दरवाजे तयार करणे व बसविणे .
- जलसंचय संरचनेचे बांधकाम करणे ,
- सुतारकाम करणे ,अभाशी छत , प्रकाश व्यवस्था ,प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे)काम ,
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे ,
- काच कापणे ,काचरोगगण लावणे व काचेची तावदाने बसविणे ,
- कारखाना अधिनियम ,१९४८ खाली समावेश नसलेल्या विटा , छपरावरील कौल इत्यादी तयार करणे ,
- सौर तावदाने इत्यादिसारखी ऊर्जाक्षम उपकरणे बसविणे,
- स्वयपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडूलर (आधुनिक)युनिट बसविणे .
- सिमेंट कॉंक्रीटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे .
- जलतरण तलाव ,गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बाधकाम करणे ,
- माहिती फलक ,रोड फर्निचर ,प्रवाशी निवारे किंवा बस स्थानके ,सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे ,
- रोटरीजचे बांधकाम करणे , कारंजे बसविणे इत्यादी ,
- सार्वजनिक उद्दाने ,पदपथ ,रमणीय भूप्रदेश इत्यादीचे बांधकाम.
प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना (कुसूम) २०२३ – Pradhanmantri Sour Krushi Pamp Yojana (KUSUM)
७. बांधकाम कामगारासाठी योजना – २०२४ मिळणाऱ्या कल्याणकारी योजनाची माहिती –
बांधकाम कामगार यांना सरकारतर्फ सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रोत्साहन पर योजना दिल्या जातात त्या योजना खालिलप्रकारे पाहूया .
सामाजिक सुरक्षा प्रदान करणाऱ्या योजना
- पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रती पूर्तीसाठी रु ३०,०००/- रु दिले जातात .
- नोंदणीकृत लाभार्थ्यास त्याच्या स्वतच्या विवाहासाठी शासनाच्या मार्फत अनुदान दिले जाते
- आवश्यक पात्रता -१. विवाह नोंदणी प्रमाणपत्र २. प्रथम विवाह असल्याबाबत शपथपत्र
- मध्यान्ह भोजन योजना –
- या योजनेमार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगार यास मोफत मध्यान भोजन सुविधा दिली जाते .
- आवश्यक पात्रता – १.विहित नमुन्यातील मागणीपत्र .
- प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना –
- नोंदणीकृत लाभार्थी या योजनेमार्फत लाभ घेऊ शकतो
- आवश्यक पात्रता -१.पाल्याचे शाळेचे ओळखपत्र
- नोंदणीकृत लाभार्थीस प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभ मिळतो त्यासाठी
आवश्यक पात्रता -१. विहित नमुन्यातील हमीपत्र
5. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना –
आवश्यक पात्रता – १. विहित नमुन्यातील मागणीपत्र पत्र नुसार नोंदणीकृत कामगाराने मागणी केलेली असावी .
6 . पात्र लाभार्थीस पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना मार्फत प्रशिक्षण दिले जाते
आवश्यक पात्रता – १. विहित नमुन्यातील हमीपत्र असणे गरजेचे आहे .
ब) शैक्षणिक योजना
या योजनेंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांनसाठी लागू आहेत .
१. नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांनसाठी.इयत्ता १ ते ७ च्या विध्यार्थ्यासाठी प्रती वर्ष रु . २,५००/-शैक्षणिक आर्थिक सहाय्य प्रोत्साहन म्हणून दिले जाते .
आवश्यक पात्रता – किमान ७५ % अथवा अधिक उपस्थिती अवश्यक आहे
२. इयत्ता ८ ते १० च्या विध्यार्थायासाठी प्रतिवर्ष रु ५००० /- प्रोत्साहन दिले जाते .
आवश्यक पात्रता – किमान ७५ % अथवा अधिक उपस्थिती अवश्यक आहे .
३. नोंदणीकृत कामगाराच्या पाल्यास इयत्ता १० व १२ वि मध्ये किमान ५०% किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास रु १०,००० /- रुपये शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून दिले जाते ..
४. इयत्ता ११ वि १२ च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्ष रु. १०,००० /- रुपये प्रोत्साहन पर दिले जाते .त्याकरिता
आवश्यक पात्रता – १० वि व ११ वि ची गुणपत्रिका असणे आवश्यक आहे
5. पदवी अभ्यास करिता प्रतिवर्षी रु २०,००० /- (नोंदणीत कामगाराच्या पत्नीसहीत लागू ).
आवश्यक पात्रता- १.मागील शैक्षणिक इयत्तेत उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक / प्रमाणपत्र
२. चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती / बोनाफाईड आवश्यक आहे .
6. वैद्यकीय पदवी करिता प्रतिवर्षी रु,१००,०००/-नोंदणीकृत कामगाराची पाल्ये हुशार असतील तर त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून दिले जातात .
आवश्यक पात्रता- १.मागील शैक्षणिक इयत्तेत उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक / प्रमाणपत्र.
२. चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती / बोनाफाईड असणे आवश्यक आहे .
7. अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी रु६००००/-(नोंदणीत कामगाराच्या पत्नीसहीत लागू )शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले जाते .त्याकरिता
आवश्यक पात्रता –
- मागील शैक्षणिक इयत्तेत उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक / प्रमाणपत्र
- चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती / बोनाफाईड असणे गरजेचे आहे .
8. शासन मान्य पदविकेसाठी प्रती शैक्षणिक वर्षी रु २०,०००,/-रुपये प्रोत्साहन म्हणून दिले जातात .
9. शासन मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रती शैक्षणिक वर्षी रु २५,०००,/-
- आवश्यक पात्रता – मागील शैक्षणिक इयत्तेत उतीर्ण झाल्याचे गुणपत्रक / प्रमाणपत्र
- चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची पावती / बोनाफाईड .
10 .नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांना MS-CIT च्या शिक्षणासाठी अर्थसहाय्य केले जाते त्याकरिता .
आवश्यक पात्रता – MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व शुल्काची भरल्याची पावतीअसणे गरजेचे आहे .
वरील सर्व शैक्षणिक सुविधा मिळवायच्या असतील तर form अपलोड करा .
क) आरोग्यविषयक योजना –
१. नोंदणीकृत स्त्री लाभार्थी साठी आणि पुरुष लाभार्थीच्या पत्नीच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु १५००० /- आणि सिझेरियन झाल्यास रु -२००००/- दिले जातात .त्यासाठी
आवश्यक पात्रता – वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेले प्रसूती प्रमानपत्र आणि उपचारासाठीची देयके सोबत जोडावीत .
२. पात्र लाभार्थी कामगार आणि त्याचे कुटुंबीयाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी १ लाख रु अर्थसहाय्य दिले जाते .
अवश्यक पात्रता –
अ ) कुटुंबातील २ सदस्यास या योजेचा लाभ घेता येईल आणि आणी एका सदस्यास केवळ एकदाच लाभ घेता येतो .
ब) जर आरोग्य विमा लागू नसेल तरच हा लाभ मिळेल .
क) गंभीर आजाराबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि उपचार घेतल्याची कागदपत्रे.
३. नोंदणीकृत कामगाराने अथवा पत्नीने एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर मुलगी १८ वर्ष वयाची होईस्तव १ लाख रुपये मुदत ठेव लाभ दिला जातो.त्याकरिता
आवश्यक पात्रता –
अ) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय प्रमाणपत्र असणे गरजेचे .
ब) लाभार्थीचे शपथ पत्र
४. नोंदणीकृत लाभार्थी कामगारास जर कायमचे किंवा ७५% अपंगत्व आले तर त्यास २ लाख रुपये अर्थसहाय्य केले जाते. त्याकरिता
आवश्यक पात्रता –
अ) अपंगत्व (कायमचे /७५% )आल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे
ब) उपचाराची देयके सादर करणे गरजेचे
५) महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ नोंदणीकृत कामगाराला घेता येईल .
६. नियमित आरोग्य तपासणीची सुविधा दिली जाते .
७. व्यसन मुक्ती करिता निधी दिला जातो.
ड) आर्थिक सहाय्य –
१. नोंदणी कृत कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाला तरत्याच्या वारसास ५ लाखाची आर्थिक मदतीद्वारे सहाय्य केले जाते.
आवश्यक पात्रता –
अ . त्यासाठी मृतूचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
ब . बांधकाम कामगार कामावर असताना मृत्यू झाला याबाबत पुरावा सादर करवा लागेल .
२. लाभार्थी कामगाराला जर नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या वारसास २ लाख रु अर्थसहाय्य दिले जाते .
आवश्यक पात्रता –
अ. त्यासाठी मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
३. नोंदणीकृत बांधकाम कामगाराला अटल बांधकाम आवास योजनेंतर्गत २ लाख रु आर्थिक मदत दिली जाते .शहरी आणि ग्रामीण भागासाठी सारखेच अर्थसहाय्य दिले जाते .
आवश्यक पात्रता-
अ . प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सशां अधिकारी यांचे प्रमाणपत्र .तसेच यादी नाव असलेली यादी सादर करणे आवश्यक राहील .
४. नोंदणीकृत कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यसंस्कार करिता रु १००००/- ची मदत केली जाते .त्याकरिता
अ) कामगाराचे वय ५० ते ६० वर्ष असावे आणि शमं अधिकारी यांणी दिलेला मृत्यू दाखला .
५. कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नीस किंवा कामगार स्त्री असेल तर तिच्या विधुर पतीस रु २४००० /- ५ वर्षाकरिता अर्थसहाय्य केले जाते .
आवश्यक पात्रता –
सक्षम अधिकाऱ्यांनी देलेले मृत्यू चे प्रमाणपत्र. अर्ज करण्यासाठी form अपलोड करा
६. घरासाठी गृहकर्जावरील रु ६०००००/- पर्यंतच्या व्याजाची रक्कम किंवा रु २०००००/- रुपये यापेकी मदत केली जाते .
आवश्यक पात्रता –
- राष्ट्रीय कृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा
- कर्ज विम्याची पावती
- घर पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्यचा पुरावा असणे गरजेचे आहे .
- यासाठीचा form अपलोड करा
अशा प्रकारे बांधकाम कामगार यांच्या कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती आहे
निष्कर्ष –
बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केलेली कामगारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण, महत्वकांशी अशी योजना आहे . राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पातील कामगाराच्या उज्ज्वल भाविष्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात.या योजनेंतर्गत लाभार्थ्यास सामाजिक सुरक्षा ,शैक्षणिक सहाय्य , आरोग्यविषयक सहाय्य तसेच आर्थिक सहाय्य दिले जाते .
कामगारांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनेंतर्गत कामगारास आणि त्याच्या कुटुंबाला विविध प्रकारचे लाभ मिळतात त्याबाबत सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखात दिली आहे.तेंव्हा हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या माहितीचा वापर सबंधित कामगाराला मदत करण्यासाठी करा .
धन्यवाद !