जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) २०२३- माता व बाल आरोग्य सेवांसाठी आजच नोंद करा
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) २०२३ या अंतर्गत मातामृत्यू आणि बाल मृत्यू कमी करण्यासाठी तसेच आरोग्य संस्थातील प्रसूतीचे प्रमाण वाढवणे आणि गरोदर माता ते बालक यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेत वाढ करून ,लाभार्थीस अडचणीच्या वेळेला वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबवला जात आहे .
सदर कार्यक्रमातून गरोदर मातेस प्रसूतीपूर्व , प्रसूतीदरम्यान , प्रसूतीपश्चातच्या सर्व सुविधा तसेच आजारी बालकास 30 दिवसापर्यंत औषध उपचार आणि लसीकरण दिले जाते तसेच पोषणआहार प्रसूती दरम्यान नॉरमल डिलीव्हरी झाल्यास ३ दिवस आणि सिझेरियन डिलीव्हरी झाल्यास ७ दिवस दिला जातो .
सदर योजनेतून गरोदर मातासाठी आणि बालकांसाठी आरोग्य सेवा मिळवायच्या आहेत का ? चला तर मग मित्रांनो या लेखाद्वारे सदर कार्यक्रमाचे फायदे ,पात्रता निकष ,कार्यक्रमाचे घटक ,अर्ज नोंदणी पद्धती ,लाभ घेण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहू .
1 .जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK)काय आहे ?
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK)भारत सरकारद्वारा ,आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय मार्फत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत १ जून २०११ पासून महाराष्ट्रातील सर्व जिल्यात राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे .
सदर कार्यक्रम हा गरोदर मातेस प्रसूतीपूर्व , प्रसूतीदरम्यान ,प्रसूतीपश्चात च्या सर्व सुविधा ,तपासण्या ,लशीकरण ,औषधउपचार व पोषणआहार तसेच नवजात बालकास ३० दिवसापर्यंत औषध उपचार आणि लसीकरण दिले जाते तसेच पोषणआहार सुधा मिळतो .तसेच वाहतूक व्यवस्था प्रसुतीस जाण्यासाठी ,प्रसुतीनंतर घरी जाण्यासाठी तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदर्भ सेवा घेण्यासाठी मोफत वाहतूक व्यवस्था देण्यात येते . लागल्यास मोफत रक्त पुरवठा आणि शासकीय रुग्णालये आणि इतर शासकीय संस्था मार्फत विनामुल्य उपचार दिला जातो .
JSSK कार्यक्रमा अंतर्गत ग्रामीण अथवा शहरी भागातील महिलांचे शासकीय आरोग्य संस्थेत प्रसूतीचे प्रमाण वाढवणे तसेच डॉक्टरच्या देखरेखीत प्रसूती करून माता मृत्यूचे व बाल म्रुत्युचे प्रमाण कमी करणे इत्यादी उद्देश पूर्तीसाठी या कार्यक्रमाची सरुवात करण्यात आली आहे .
या कार्यक्रमाची अंमलबजावणी गाव पातळीपासून ,तालुका , जिल्हा व राज्य स्तरापर्यंत सेवा देणाऱ्या आरोग्य संस्थामार्फत विविध घटकाद्वारे करण्यात येते . त्याकरिता प्रत्येक स्तरावर कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी अधिकारी नेमणूक केलेली आहे त्यानुसार कार्य केले जाते व कार्यक्रम राबवला जातो .
2 . जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) – overview
योजना नाव | जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) |
विभाग | आरोग्य व कटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार |
योजना प्रारंभ | १ जुन २०११ |
लाभार्थी गट | गरोदर महिला आणि नवजात बालक |
योजनेचा उद्देश | गरोदर माता व अर्भकास मोफत आरोग्य तपासणी , मोफत औषध उपचार , मोफत वाहतूक व्यवस्था इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देणे |
मोफत वाहतूक टोल क्र | १०२ |
अधिकृत website | nhm.gov.in |
अर्जाची पद्धत | offline |
लाभाचे स्वरूप | गरोदर माता व बालकास शासकीय आरोग्य संस्थेत विनामुल्य उपचार |
कार्यक्षेत्र | भारत देश व संपूर्ण महाराष्ट्र राज्य |
3 .(JSSK) कार्यक्रमाचा उद्देश –
- माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर कमी करणे .प्रत्येक गरोदर माता आणि बालक यांना सरकारी संस्थामध्ये विनामुल्य उपचार उपलब्ध करून देणे .
- गरोदर मातेस प्रसूतीपूर्व, ,प्रसूतीदरम्यान,प्रसूतीपश्चात ६ आठवड्यापर्यंत अतिअवश्य्क आरोग्य तपासण्या , औषध उपचार ,लशीकरण योग्यवेळी मोफत उपलब्ध करून देणे .
- आरोग्य संस्था मध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढवणे .
- मोफत आहात , मोफत रक्त पुरवता ,मोफत वाहतूक व्यवस्था इत्यादी माता व बालकास प्रदान करणे .
- विनामुल्य उपचार आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करणे .इत्यादी उद्देश पूर्तीसाठी जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) कार्यक्रम राबविला जात आहे .
4 . जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) कार्यक्रमाची वैशिष्ट्य –
अ) मोफत संदर्भ वाहतूक व्यवस्था-
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) सदर कार्यक्रमान्व्ये तत्काळ सेवेसाठी डिलिव्हरी पेशंटसाठी राज्यभारामध्ये प्रत्येक जिल्हासाठी १०२ हा टोल फ्री क्रमांक असून प्रत्येक जील्यासाठी एक call center उभारण्यात आले आहे. call center ऑपरेटिंग नुसार मोफत वाहतूक व्यवस्था पुरविली जाते .
माता व बालकास लागणाऱ्या सेवानुसार जवळच्या आरोग्य केंद्रात पोहचवले जाते .जर संदर्भ नुसार त्या आरोग्य केंद्रात उपचार होत नसेल तर पुढील उपचारासाठी दुसऱ्या आरोग्य संस्थेत या वाहतूक व्यवस्था मार्फत पाठवले जाते. उपचारानंतर घरी सोडण्यात येते.अशा प्रकारे या मोफत वाहतूक व्यवस्थेचा फायदा दिला जातो
ब) मोफत आरोग्य तपासण्या –
गरोदर मातेच्या प्रसूतीपूर्व,प्रसूतीदरम्यान,प्रसूतीपश्चात ६ आठवड्यापर्यंत अतिअवश्य्क आरोग्य तपासण्या मोफत केल्या जातात. बालकाच्या ३० दिवसापर्यंत गरजेनुसार मोफत तपासण्या केल्या जातात .
क) मोफत रक्त पुरवठा –
प्रसूती दरम्यान किंवा प्रसूतीनंतर जर काही critical case असेल तर सबंधित गरोदर मातेस व बाळास रक्त पुरवठा करावा लागला तर गरजेनुसार मोफत रक्त पुरवठा केला जातो .
ड) मोफत आहार –
प्रसूती दरम्यान नॉरमल डिलीव्हरी झाल्यास ३ दिवस आणि सिझेरियन डिलीव्हरी झाल्यास ७ दिवस दिला जातो . दवाखान्यात भरती असेपर्यंत मोफत आहार दिला जातो.
इ) मोफत औषधउपचार –
- सर्व शासकीय आरोग्य संस्थेत विनामुल्य औषध उपचार दिला जातो.
- गरोदर मातेस बाळाचे स्तनपान तसेच योग्य काळजी घेण्याबाबत व लशीकरण बाबत माहिती दिली जाते.
हे पण पहा – लेक लाडकी योजना २०२३ मुलीच्या भविष्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन – Lek Ladki Yojana 2023
5 . JSSY अंतर्गत माता व बालकास मिळणारा लाभ –
अ) गरोदर मतांसाठी मिळणारा लाभ –
- गरोदरपणात तसेच प्रसुतीदरम्यान व नंतर जे काही आरोग्य तपासण्या (रक्त ,लघवी ,व सोनोग्राफी इत्यादी)व औषधउपचार लागतील ते सर्व मोफत मिळतात .
- मोफत औषधे इतर लागणारे साहित्य मिळते .
- प्रसूती दरम्यान किंवा सिझेरियन दरम्यान लागल्यास मोफत रक्त पुरवठा मिळतो .
- दवाखान्यात भरती असे पर्यंत मोफत आहार दिला जातो.
- प्रसूती असो किंवा सिझेरियन मोफत केले जाते .
- दवाखाण्याद्वारे प्रसूतीला जाण्यासाठी घरापासून दवाखान्यापर्यंत मोफत वाहतूक सुविधा मिळते तसेच प्रसूती नंतर दवाखान्यातून घरी जाण्यासाठी पण असते .
ब) नवजात अर्भकास ३० दिवसापर्यंत देण्यात येणारे लाभ –
- मोफत वाहतूक सुविधा -दवाखाण्याद्वारे घरीवून दवाखान्यात जाण्यासाठी व दवाखान्यातून घरी जाण्यासाठी तसेच संदर्भ सेवेसाठी मिळते
- मोफत औषधे इतर लागणारे साहित्य मिळते.
- आरोग्य तपासण्या व
- औषधउपचार लागतील ते सर्व मोफत मिळतात .
- मोफत रक्त पुरवठा मिळतो.
6 . जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) महत्वाची कागदपत्रे –
- सविस्तर माहिती साठी मार्गदर्शक सूचना पाहू शकता .JSSK मार्गदर्शक सूचना
- आधार कार्ड
- पत्यासाठी पुरावा
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- मोबाईल क्रमांक
- JSSK अंतर्गत नोंदणी केलेली असावी .
7 . जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) कार्यक्रमाचे फायदे –
- हा सरकारी उपक्रम आहे.यामार्फत गरोदर महिला आणि अर्भक यास मोफत दर्जेदार आरोग्य सेवा मिळतात .
- मोफत संदर्भ वाहतूक व्यवस्था गरोदर माता व अर्भकास मिळते .
- मोफत आरोग्य तपासण्या – गरोदर मातेसाठी (रक्त ,लघवी , सोनोग्राफी इत्यादी ) तसेच अर्भकासाठी आवश्यकता असेल त्यानुसार मोफत तपासणी मिळेल .
- प्रसूती दरम्यान सिझेरियन अथवा काही गुंतागुंत निर्माण झाली आणि रक्त देण्याची गरज भासली तर मोफत रक्त पुरवठा सुविधा दिली जाते .
- नॉरमल डिलिव्हरी झाली तर ३ दिवस मोफत आहात दिला जातो तसेच सिझेरियन प्रसूती झाली तर ७ दिवस मोफत आहार दिला जातो .
8. (JSSK) अंतर्गत सेवा पुरवणाऱ्या आरोग्य संस्थाची माहिती –
- इत्यादी सर्व आरोग्य संस्थामार्फत सदर सुविधा मोफत पुरवल्या जातात
निष्कर्ष :
जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) हा एक भारत सरकारचा आरोग्य व कटुंब कल्याण मंत्रालय मार्फत, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत चालणारा सरकारी उपक्रम आहे .
माता मृत्यू व अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी गरोदर माता व बालक यास मोफत आरोग्य तपासणी ,मोफत औषधे व लागणारे साहित्य पुरवणे ,मोफत आहार ,लागल्यास रक्त पुरवठा मोफत करणे ,मोफत वाहतूक सुविधा , तशेच आरोग्य संस्थेत विनामुल्य उपचार केला जातो. इत्यादी सुविधाच्या माध्यमातून माता व बाल आरोग्याची विशेस काळजी घेतली जाते .
तसेच जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) योजनेचे फायदे ,देण्यात येणारा लाभ, नोंदणी बाबत माहिती ,उद्देश ,वैशिष्ट्य इत्यादी बाबत सविस्तर माहिती आम्ही या लेखात दिली आहे तरी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आपणास या माहितीचा उपयोग होईल.
धन्यवाद !
FAQ –
- नवजात बालकाला जन्मापासून ते किती दिवस मोफत उपचार मिळतो ?
– जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK) अंतर्गत नवजात बालकाला जन्मापासून ते ३० दिवसापर्यंत मोफत उपचार केला जातो .