जननी सुरक्षा योजना (JSY) Janani Surksha Yojana -२०२३ अध्यावत नवीन माहितीसह महिलांसाठी योजनेचा लाभ घ्या .
जननी सुरक्षा योजना (JSY) भारत सरकारने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे आरोग्य उपक्रमाच्या क्षेत्रात (JSY) अंतर्गत देशभरातील गरोदर मातांचे कल्याण आणि आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी तसेच मातामृत्यू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी सरकारने राबवलेला हा सर्वात महत्वकांक्षी उपक्रम आहे .
या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांसाठी सुलभ व दर्जेदार आरोग्य सेवा , तसेच अर्थसहाय्यचा लाभ मिळवायचा आहे का ? तर चला मित्रांनो आज आपण जननी सुरक्षा योजनेचे (JSY) फायदे , पात्रता , लागणारी कागदपत्रे , रक्कम किती मिळते , योजनेची अर्ज प्रक्रिया इत्यादी बाबत सविस्तर माहिती या लेखात खालिलप्रकारे जाणून घेणार आहोत .
१. जननी सुरक्षा योजना (JSY)काय आहे ?
- जननी सुरक्षा योजना (JSY) भारत सरकारने केंद्र शासन स्तरावर २००५ – ०६ मध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा (NRHM)महत्वाचा घटक म्हणून हि योजना सुरु केली. त्यानुसार २२ डिसेंबर २००६ नुसार जननी सुरक्षा योजना राबविली जाते या योजनेमध्ये ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती इ दारिद्रय रेषेखालील महिला लाभार्थ्यांना लाभ दिला जातो .
- JSY योजनेद्वारे महिलांना सुलभ आरोग्य सुविधा आणि आर्थिक सहाय्य दिले जाते .तसेच गर्भवती महिलांची सुरक्षीत प्रसूती हि जवळच्या आरोग्य केंद्रात , उपकेंद्रारात अथवा जवळच्या ग्रामीण/ शहरी रुग्णालयात करणे हे प्राथमिक लक्ष्य आहे . कारण या योजनेद्वारे माता मृत्यू दर आणि बाल मृत्यू दर कमी करणे हे सरकारचे ध्येय आहे. योजनेचा लाभ खालिलप्रकारे मिळतो .
- HOME DILIVERY – JSY योजनेंतर्गत फक्त दारिद्रय रेषेखालील महिला जर सबंधित महिलेचे बाळंतपण घरी झाले तर ५००/- रु रक्कम लाभार्थ्याला दिली जाते
- ग्रामीण भागात – .आणि जर ग्रामीण भागातील कोणत्याही आरोग्य संस्थेत महिलेची प्रसूती झाली तर ७००/- रु रक्कम हि ७ दिवसाच्या आत परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे दिली जाते .
- शहरी भागात – तसेच शहरी भागातील कोणत्याही आरोग्य संस्थेत महिलेचे बाळंतपण झाले तर ६०० /-रु रक्कम हि ७ दिवसाच्या आत परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे लाभार्थ्याला दिली जाते. महिलेच्या २ प्रसूती पर्यंतच लाभ मिळतो .
२. जननी सुरक्षा योजना (JSY) योजनेचे उद्देश –
- माता मृत्यू दर आणि बालमृत्यू दर कमी करणे .
- ग्रामीण आणि शहरी भागातील संस्थात्मक प्रसूती वाढवण्यावर भर देणे .
- प्रसूती काळातील खर्चासाठी लाभार्थ्यास अर्थसहाय्य प्रदान करणे होय .
- योजनेद्वारे सुलभ दर्जेदार आरोग्य सुविधा माता व नवजात बालकास प्रदान करणे होय .
- बालविवाहाचे प्रमाण कमी करणे .
- मातेच्या कमी वयात लादलेल्या गरोदरपणावर आळा बसवणे .
- बाळंतपणातील जोखीम कमी करणे .
हे पण वाचा –सुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती २०२३-Sukanya Samrudhi Yojana
३.जननी सुरक्षा योजना (JSY) लाभार्थीची पात्रता –
- दारिद्रय रेषेखालील महिला लाभार्थी असणे गरजेचे आहे .
- अनुसूचित जाती जमातीच्या बाबतीत सर्व गर्भवती महिलांना लाभ देण्यात येईल .
- नोंदणीकृत गरोदर मातेचे वय १९ वर्षापेक्षा कमी नसावे .
- दोन प्रसूतीचाच लाभ मिळेल म्हणजे दोन जिवंत मुलांपर्यंत लाभ मिळेल .
- सदर योजनेंतर्गत नोंदणी केलेली असावी .
- सरकारी रुग्णालय आणि सरकारतर्फे निवडलेले खाजगी रुग्णालयात प्रसूती केलेले लाभार्थी या योजनेस पात्र असतील .
४. (JSY) अंतर्गत लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे –
- नोंदणी केलेले जननी सुरक्षा योजना (JSY) कार्ड.
- आधार कार्ड.
- मोबाईल क्रमांक.
- पासपोर्ट फोटो.
- पत्यासाठी पुरावा लाईट बिल.
- BPL रेशनकार्ड.
- अनुसूचित जाती , जमातीसाठी जात प्रमाणपत्र.
- बँक तपशील.
- प्रसूती प्रमाणपत्र.
५. जननी सुरक्षा योजना (JSY) overview –
योजनेचे नाव | जननी सुरक्षा योजना (JSY) |
विभाग | आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे |
योजना प्रारंभ | २००५-०६ |
श्रेणी | दारिद्रय रेषेखालील ,अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती |
लाभार्थी | देशातील आणि राज्यातील गर्भवती महिला |
लाभाची रक्कम | ग्रामीण भागासाठी -७०० /- रु शहरी भागासाठी – ६०० /- रु सिझेरियन झाल्यास १५०० /- रु |
रक्कमेचा कालावधी आणि स्वरूप | प्रसुतीनंतर ७ दिसाच्या आत. परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे (Account payee crossed cheque) |
Help line no | १८००१८०४४४४ |
अधिकृत website | nhm.gov.in nrhm.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची पद्धत | offline आणि online |
६. (JSY) योजनेचे फायदे –
- आर्थिक सहाय्य त्या त्या श्रेणीनुसार मिळते
- दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतात .
- बाळंतपण ची जोखीम कमी होते तत्काळ वाहतूक सुविधा प्रदान करते .
- सदर योजनेंतर्गत गर्भवती महिलेला वेळेवर प्रसूतीपूर्व ३ दर्जेदार आरोग्य तपासण्या मिळतात .
- लसीकरण आणि औषध गोळ्या मिळतात .
- प्रसूती डॉक्टर च्या देखरेखीत आणि मोफत होते .
- प्रसूतीनंतरचे लशीकरण आणि औषध उपचार आणि गोळ्या सर्व काही मोफत मिळते .
७. (JSY) लाभार्थ्यास मिळणारे लाभाचे स्वरूप आणि अर्थसहाय्याची रक्कम –
जननी सुरक्षा योजना (JSY) अंतर्गत लाभार्थी महिलेस आर्थिक लाभासोबत आरोग्य सुविधा दिल्या जातात त्या कशा मिळतात ते पाहूया .
अ ) आरोग्य सुविधा –
- नोंदणीकृत जननी सुरक्षा योजना (JSY) कार्ड दिले जाते.
- पात्र लाभार्थीस प्रसूतीपूर्व ३ तपासन्या दिल्या जातात .
- पात्र लाभार्थीचे धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण केले जाते .
- लोहयुक्त गोळ्या दिल्या जातात .
- या योजनेंतर्गत वाहतूक सुविधा उपलब्ध आहे .
ब) अर्थ सहाय्य –
- ग्रामीण भागासाठी – जननी सुरक्षा योजना (JSY) योजनेंतर्गत पात्र लाभार्थीची जर सरकारी आरोग्य संस्था किंवा मान्यताप्राप्त खाजगी आरोग्य संस्थेत प्रसूती झाली तर तिला ७००/- रु रक्कम हि प्रसुतीनंतर ७ दिवसाच्या आत बँक खात्यामध्ये धनादेशाद्वारे (Account payee crossed cheque) दिली जाते.
- शहरी भागासाठी – सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थीची जर सरकारी आरोग्य संस्था किंवा मान्यताप्राप्त खाजगी आरोग्य संस्थेत प्रसूती झाली तर तिला ६००/- रु रक्कम हि प्रसुतीनंतर ७ दिवसाच्या आत बँक खात्यामध्ये धनादेशाद्वारे (Account payee crossed cheque) दिली जाते.
- दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील लाभार्थ्याची जर घरीच प्रसूती झाली तर या लाभार्थीस ५००/- रु रक्कमही प्रसूती नंतर ७ दिवसाच्या आत जमा बँक खात्यात परस्पर जमा होणाऱ्या धनादेशाद्वारे दिली जाते.
- जर पात्र आवश्यक असल्यास लाभार्थीचे सिझेरियन झाले तर त्या लाभार्थीस १५००/- रु रक्कम बँक खात्यामध्ये धनादेशाद्वारे (Account payee crossed cheque) दिली जाते .अशा प्रकारे दिले जाते .
८. जननी सुरक्षा योजना (JSY) ग्रामीण व शहरी भागासाठी सेवा देणाऱ्या आरोग्य संस्थाची माहिती-
अ ) ग्रामीण भागासाठी सेवा देणाऱ्या आरोग्य संस्थाची माहिती –
- उपकेंद्र
- प्राथमिक आरोग्य केंद्र
- ग्रामीण रुग्णालये
- उपजिल्हा रुग्णालये
- जिल्हा स्त्री रुग्णालये
- जिल्हा रुग्णालये
- खाजगी रुग्णालये JSY अंतर्गत मानांकित केलेली .
ब )शहरी भागासाठी सेवा देणाऱ्या आरोग्य संस्थाची माहिती –
- वैद्यकीय महाविद्यालये.
- नागरी आरोग्य केंद्रे नगरपालिका, महानगरपालिका कार्यक्षेत्रातील.
- नागरी कुटुंब कल्याण केंद्रे अंतर्गत इतर रुग्णालये.
- शासन अनुदानित रुग्णालये.
९. जननी सुरक्षा योजना (JSY) अर्ज प्रक्रिया –
जननी सुरक्षा योजना अंतर्गत लाभार्थी नोंदणी दोन प्रकारे करू शकतात . offline आणि online याविषयीची खालिलप्रकारे स्टेप नुसार माहिती घेऊया .
अ ) offline पद्धती द्वारे –
- शासन च्या अधिकृत website वरती जा E -online Registration वरती किल्क करा आणि नंतर download offline form वर किल्क करा.form ची भाषा निवडा आणि form download करा .
- form ची प्रिंट घ्या आणि त्यामध्ये लाभार्थी बाबत वयक्तिक माहिती भरा .
- सोबत संबधित आवश्यक कागदपत्रे जोडा .
- form ची प्रिंट आणि सोबत संबधित आवश्यक कागदपत्रे जोडा आणि ASHA worker किंवा अंगणवाडी केंद्रात जमा करा. अशा प्रकारे अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल .
ब ) online पद्धती द्वारे-
- शासन च्या अधिकृत website वरती जा E -online Registration वरती किल्क करा आणि नंतर download online form वर किल्क करा.form ची भाषा निवडा आणि form download करा.
- आत्ता form भरा त्यामध्ये गर्भवती महिलेची सविस्तर माहिती भरा .
- भरलेला तपशील पूर्ण वाचा आणि प्रविष्ट करा.आणि सोबत संबधित आवश्यक कागदपत्रे जोडा.
- form प्रविष्ट केल्यास एक कोड येईल तो कोड लिहून ठेवा.
- आत्ता form submit करा . अशा प्रकारे तुमची online नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल .
१०. जननी सुरक्षा योजना (JSY) FAQ –
१. जननी सुरक्षा योजना (JSY) योजनेंतेर्गत समाविष्ट घटक कोणते आहेत ?
⇒जननी सुरक्षा योजना (JSY) रोख अर्थसहाय्य , वाहतूक सुविधा ,प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात सर्व दर्जेदार आरोग्य सुविधा देणे.
२. जननी सुरक्षा योजना (JSY) योजनेचा फायदा गर्भवती मातांना कशा स्वरुपात होतो ?
⇒ एक तर लाभार्थीला अर्थसहाय्य पुरवते आणि संस्थात्मक प्रसूती करण्यास प्रोत्साहन देते दर्जेदार आरोग्य सुविधांचा वापर करून माता मृत्यू दर आणि बालक मृत्यू दर कमी करते .
३. जन्मानंतर काळजीसाठी (JSY) शी काही इतर उपक्रम जोडलेले आहेत का ?
⇒ होय , जननी शिशु सुरक्षा योजना हि पोषण आणि आरोग्य सुविधा पुरवते .
११. निष्कर्ष –
जननी सुरक्षा योजना (JSY) हि माता आरोग्य सुधारण्यासाठी तसेच माता व बालक मृत्यू दर कमी करण्यासाठी शासन हि योजना ग्रामीण आणि शहरी भागासाठी राबवीत आहे . (JSY) अंतर्गत आर्थिक मदत वाहतूक सुविधा , प्रसूतीपूर्व आणि प्रसूती नंतर च्या आरोग्य सुविधा मिळतात .बाळंत पणातील जोखीम कमी होऊन , संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवण्यावर भर दिला जात आहे . योजनेची पात्रता , उद्देश , फायदे ,लाभाचे स्वरूप ,नोंदणी प्रक्रिया व इतर सर्व माहिती या लेखात दिली आहे .
(JSY) योजनेचा लाभ घेण्यासाठी व हि माहिती इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी मित्रानो आपण या माहितीचा वापर करु शकता .आणि काही अडचण असल्यास आम्हाला कमेंट करून विचारू शकता .
धन्यवाद !