अटल पेन्शन योजना २०२३ -आर्थिक भविष्य सुरक्षित करा व भविष्यातील स्थिरतेस सक्षम करा 

अटल पेन्शन योजनेची पात्रता व निकष, योजनेचे फायदे ,नाव नोंदणी कशी करावी ,योगदान आणि पेन्शनमधील कॅलक़्युलेटर चार्ट, करलाभ इत्यादी बाबत सविस्तर माहिती घ्या .

१.अटल पेन्शन योजना परिचय

अटल पेन्शन योजना भारत सरकारद्वारा २०१५ मध्ये सुरु केलेली योजना आहे.या योजनेला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे .

Table of Contents

सदर योजना प्रामुख्याने ऐच्छिक पेन्शन योजना आहे .भारतातील असंघटित  क्षेत्रात काम करणाऱ्यांना गरीब ,वंचित नागरिकांसाठी पेन्शन प्रदान करते.ज्याचा उद्देश वृद्धापकाळात व्यक्तीसाठी सामाजिक आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करते .

या योजनेंतर्गत वयाच्या ६० वर्षानंतर भारत सरकारकडून प्रतिमहिना  १,०००/-,२,००० /- ३,०००/- ,४,०००/-किंवा ५,०००/- रु याप्रमाणे रक्कम मासिक पेन्शन म्हणून दिली जाईल .तसेच लाभार्थी च्या वारसाला १.७ लाख रु ते ८.५ लाख रु पर्यंत एकरकमी लाभ मिळेल .

सदर योजनेची सविस्तर माहिती घेऊन आपला सहभाग नोंदवून लाभ घ्याचा आहे का ? चला तर मग सदर योजनेची पात्रता व निकष, योजनेचे फायदे ,नाव नोंदणी कशी करावी ,योगदान आणि पेन्शनमधील रक्कमेचे गणित, करलाभ इत्यादी बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेऊया .

हे पण पहा- PM KISAN सन्मान निधी योजना 2023-नविन अपडेटसह संपुर्ण माहिती.

२. अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता व निकष – 

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने  काही महत्वाचे मापदंड ठरवलेले आहेत ते काय सांगतात ते पाहूया .

  1. लाभार्थी हा भारताचा नागरिक असावा .
  2. लाभार्थीचे वय १८ ते ४० वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे .
  3. लाभार्थीचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असावे आणि नसेल तर अगोदर बचत खाते उघडावे लागेल.
  4. एक ऑक्टोबर २०२२ पासून कोणताही भारतीय नागरिक जो अंतर्गत आयकर दाता आहे किंवा आयकर कायदा १९६१ अर्जाच्या तारखेनुसार नवीन उघडण्यास पात्र होणार नाही .
  5. APY खात्यात नाव नोंदवते वेळी पती/ पत्नीची माहिती देणे बंधनकारक आहे .

३. अटल पेन्शन योजनाचे फायदे

सदर योजनेत गुंतवणूक केल्याचा फायदा हा कि वृद्धापकाळात माणसाचे वयानुसार कमाईचे साधन बंध होते किंवा काम करणे शय्क  नसते त्यावेळी आर्थिक साह्याची खूप गरज भासते .ती गरज अटल पेन्शन योजानेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे.

  1. सदर योजना निश्चित पेन्शनची हमी देते .
  2. निवृत्तीनंतर आर्थिक स्थिरता प्रदान करते .
  3. सदर योजनेस शासनाचे देखील सह योगदान आहे .
  4. सुरुवातीला ५ वर्ष शासन हप्त्यातील ५० % रक्कम भरणार आहे . हा लाभ घेण्यासाठी खाते उघडण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१५ होती ती नंतर ३१ मार्च २०१६ करण्यात आली .
  5. आर्थिक सुरक्षा प्रदान करते .
  6. करलाभ मिळतो.

हे पण पहा – प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin)2023 : पायाभूत सुविधांचा विकास व गृहनिर्माण सक्षमीकरण व महाराष्ट्रातील योजनेची list.

४. अटल पेन्शन योजनासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –

  • आधार कार्ड असावे आणि तेही बँक खातेशी लिंक असावे .
  • पत्ता साठी पुरावा रेशिंग कार्ड किंवा लाईट बिल
  • पॅन कार्ड.
  • पासपोर्ट फोटो.
  • मोबाईल नंबर.
  • बँक बचत खाते तपशिल.
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना

५. अटल पेन्शन योजना अर्ज किंवा नाव नोंदणी कशी करावी

  1. अटल पेन्शन योजनेंतेर्गत लाभ घेण्यासाठी अधिकृत बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये आपले बचत खाते असावे जर नसेल तर नवीन बचत खाते खोलावे .
  2. बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जावून सदर योजनेची  offline नोंदणी करून घेऊ  शकता  .
  3. नोंदणी form बँक कर्मचारी किंवा पोस्टातील कर्मचारी यांच्या मदतीने form अचूक माहितीसह पूर्ण भरावा .
  4. सोबत अवश्यक कागदपत्रे जोडावीत.
  5. पेन्शन रक्कमेच्या चार्ट नुसार योगदान वारंवारता आणि कालावधी निवडा.
  6. आत्ता form पूर्ण कागदपत्रासह दाखल करा .
  7. अटल पेन्शन योजनेची अधिकृत website यावर सविस्तर माहिती पहा आणि त्याद्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करा .
  8. किंवा नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) website द्वारे किंवा सहभागी बँकद्वारे इंटरनेट बँकिंग सुविधा मार्फत online अर्ज करू शकतात.
अटल पेन्शन योजना -Application Form
अटल पेन्शन योजना -Application Form

६ .  अटल पेन्शन योजना नियम व अटी –

  • लाभ घेण्यासाठी त्या सबंधित व्यक्तीचे बँकेत खाते असावे .कारण तीच व्यक्ती अटल पेन्शन योजनेची पात्र लाभार्थी असेल .
  • अटल पेन्शन योजना सुरु झाल्यानंतर संबंधित लाभार्थीच्या खात्यात शिल्लक रक्कम जमा असणे गरजेचे असते. कारण बँक हि खातेदाराच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून घेते आणि योजनेत ठरलेल्या हप्त्या नुसार जमा करते .
  • लाभार्थी ने पहिल्यांदा ज्या तारकेला हप्ता भरला तीच तारीख कायमसाठी निश्चित केली जाते .आणि त्याच तारखेला हप्ता भरावा लागतो अन्यथा दंड भरावा लागतो .दंड कशा प्रकारे भरावा लागतो ते पुढीलप्रमाणे पाहू .
  • दंडाची रक्कम –
  • जर आपण देय तारखेपूर्वी मासिक किंवा जो ठरलेला हप्ता भरू शकला नाहीत तर तुम्हाला खालिलप्रकारे दंड भरावा लागेल .
  • १०० रु च्या मासिक रक्कमे साठी १ रु दंड असतो.
  • १०१ ते १५० रु पर्यंतच्या मासिक योगदानासाठी २ रु दंड असतो.
  • ५०० रु ते १००० रु पर्यंतच्या मासिक रक्कमेचा हप्ता असेल तर यासाठी ५ रु दंड आकारला जातो .
  • 1000 रु पेक्षा जास्त मासिक हप्ता असेल तर १० रु दंड असतो .

७ . अटल पेन्शन योजनेतील योगदान 

  • योगदानाची रक्कम इच्छित पेन्शन रक्कम , सदस्याचे वय आणि सेवानिवृत्ती पर्यंत किती वर्ष शिल्लक आहेत यावर अवलंबून असते .निवडलेल्या पेन्शन च्या रक्कमेनुसार प्रीमियम बदलतो .
  • योगदान कालावधी – योजनेसाठी सदस्याचे वय ६० वर्ष होईस्तव नियमित योगदान आवश्यक आहे. .योगदान मासिक ,त्रीमासिक ,किंवा सहामाही यापैकी लाभार्थीच्या पसंतीनुसार भरू शकतात .
  • पेन्शनची रक्कम – सदर योजना रु पासून निश्चित पेन्शनची रक्कम देते .१०००/- ते ५०००/- प्रती महिना केलेले योगदान आणि सामील होताना सदस्याचे वय यावर अवलंबून असते .
  • सरकारी सह योगदान – सरकार लाभार्थीच्या योगदानात ५०% सहभागीता  करते किंवा रु याच्या स्वरुपात सह योगदान करते .
  • पात्र सदस्यासाठी  प्रती वर्ष १००० यापैकी जे कमी असेल .हे सह योगदान १ जून २०१५ आणि ३१ डिसेंबर २०१५ दरम्यान योजनेत सामील झालेल्या आणि जे आयकर भरणारे नाहीत त्यांच्यासाठी उपलब्ध आहे .

८ . अटल पेन्शन योजना कॅलक़्युलेटर चार्ट नुसार माहिती .

  1. जर लाभार्थ्याने १००० रु ची पेन्शन योजना निवडली तर बँक आपल्या खात्यातून महिन्याला ४२ रु ते २९१ रुपये पर्यंत डेबिट करेल. लाभार्थीच्या मृत्यू नंतर जो कोणी नॉमिनी  आसेल त्याला परतावा रक्कम हि रु १.७ लाख मिळेल .
  2. जर लाभार्थ्याने २०००/- रु ची पेन्शन योजना निवडली तर बँक आपल्या खात्यातून महिन्याला ८४ रु ते ५२८ रुपये पर्यंत मासिक हप्पता भरावा लागेल . जो कोणी नॉमिनी आसेल त्याला परतावा रक्कम हि रु ३.४ लाख मिळेल .
  3. जर लाभार्थ्याने ३०००/- रु ची पेन्शन योजना निवडली तर बँक आपल्या खात्यातून महिन्याला १२६ रु ते ८७३/- पर्यंत रुपये मासिक योगदान द्यावे लागेल . जो कोणी नॉमिनी आसेल त्याला परतावा रक्कम हि रु ५.१ लाख मिळतील .
  4. जर लाभार्थ्याने ४०००/- रु ची पेन्शन योजना निवडली तर. बँक लाभार्थीच्या  खात्यातून महिन्याला १६८ रु ते ११६४ /- पर्यंत रुपये मासिक योगदान द्यावे लागेल . आणि जो कोणी नॉमिनी आसेल त्याला परतावा रक्कम हि रु ६.८ लाख रुपये मिळतील .
  5. जर लाभार्थी यांनी ५००० /-रुपये पेन्शन योजनेचा पर्याय निवडला तर मासिक हप्पता रक्कम रु २१० /- रुपया पासून ते १४५४ रु पर्यंत भरावा लागेल . नॉमिनीला रु ८.५ लाख रुपये परतावा मिळेल .अशा प्रकारे योजनेचे कॅलक़्युलेटर चार्ट थोडक्यात  समजावून सांगितला आहे .
  • APY अंतर्गत करलाभ- 

अटल पेन्शन योजनेसाठी केलेली गुंतवणूक हि आयकर कायदा ,१९६१ च्या कलम ८० c अंतर्गत कर  लाभांसाठी पात्र आहेत .

९ .   स्वइच्छेने बाहेर पडणे आणि पेशे काढणे –

६० वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ग्राहकाचा मृत्यू झाला तर जोडीदाराला पेन्शन किंवा जमा झालेला निधी मिळू शकतो .आणि जर जोडीदाराचा देखील मृत्यू झाला असेल तर जो नॉमिनी असेल त्याला  रक्कम मिळेल .

अटल पेन्शन योजना Toll  Free Number –  1800 110 069
निष्कर्ष –

अटल पेन्शन योजना हि असंघटित क्षेत्रातील  व्यक्तीना सेवानिवृत्ती दरम्यान आर्थिक सुरक्षा प्रदान करणारी एक फायदेशीर योजना आहे . वरीलप्रमाणे पात्रता निकषांचे पालन करून आणि अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून या सरकार समर्पित योजनेद्वारे निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न मिळवता येते.

अटल पेन्शन योजना बाबत अधिक माहितीसाठी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि सविस्तर माहिती मिळवा आणि जर काही अडचण आल्यास आमच्याशी  कमेंट  द्वारे कळवू शकता .

FAQ –
1 अटल पेन्शन योजना कोणासाठी आहे ?
  • असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकासाठी सरकारने सुरु केलेली एक पेन्शन योजना आहे .
२. अटल पेन्शन योजना लाभार्थी होण्यासाठी वयोमर्यादा किती आहे ?

संबधित व्यक्तीचे वय योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ ते ४० वर्ष असावे .

३. ६० वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर ग्राहकाचा मृत्यू झाला तर पेन्शन चे काय होते ? 

अटल पेन्शन योजना योजनेंतेर्गत त्यांच्या पत्नीला APY खाते सुरु ठेवण्याचा पर्याय आहे .जर पत्नीला खाते सुरु ठेवायचे नसेल तर तिला जमा पेन्शन रक्कम म्हणजे लाभार्थीने APY मध्ये दिलेले योगदान आणि त्याच्या योग्दनावरील निव्वळ प्रत्यक्ष व्याजाची परतफेड करण्यात येईल .

 

 

 

 

Leave a comment