अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana देशातील लाखो तरुणाचे आर्मी भरतीचे स्वप्न पूर्ण करणार

अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana काय आहे?योजनेची योग्यता / पात्रता ,आर्मी वयो मर्यादा /वयाची अट ,फायदे , योजना form व अर्ज प्रक्रिया , कागदपत्रे  याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या .

१. अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana काय आहे ?

  • अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana  १४ जुन २०२२  रोजी  भारत सरकारने सशस्त्र दलाच्या तीन सेवादलांमध्ये कमिशनर ऑफिसरच्या खाली असलेल्या सैनिकांच्या भरतीसाठी मंजूर केलेली हि योजना आहे .भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली व सदर योजनेची संकल्पना मांडली  .
  • सदर योजनेतील संकल्पनेनुसार उमेदवाराचे वय  १७.५ ते २१ वर्ष अशी वयोमर्यादा केली होती. परंतु या योजनेला तरुणांचा होणारा विरोध लक्षात घेऊन आणि कोरोना काळातील महामारीचा परिणाम यामुळे सरकारने अग्निपथ योजनेची वयोमर्यादा या १ वर्षासाठी २३ केली आहे.  या वयोगटातील देशातील तरुणांना ४ वर्षासाठी सैन्यात काम करण्याची संधी दिली आहे. आणि भरती होणाऱ्या तरुणांना आर्थिक मानधन व इतर सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत.या योजने अंतर्गत भरती झालेल्या तरुणांना अग्निवीर म्हंटले जाईल .
  • अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेंतर्गत भरती केलेल्या अग्निविरांचा  ४ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या अग्निविरामधून २५ %  अग्निविरांना आर्मी भरती साठी आरक्षण दिले जाईल. देशाची सेवा करण्यासाठी इच्छुक तरुणांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर योजना ची माहिती मिळवू शकतात.
  • योजनेची योग्यता / पात्रता ,आर्मी ची उंचीची मर्यादा ,वयाची अट ,फायदे , योजना form व अर्ज प्रक्रिया ,Exam Date , कागदपत्रे  याविषयी सविस्तर माहिती  आपण या लेखाद्वारे पुढीलप्रमाणे जाणून घेणार आहोत .

२.  अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेचे उद्धेश –

  • अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेंतर्गत देशातील जास्तीत जास्त तरुणांना देश सेवेची संधी निर्माण करून देणे होय.
  • देशातील बेरोजगारी कमी करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे व तरुणांना सक्षम करणे होय .
  • तरुणांना योग्य वयात जबाबदारीची जाणीव करून देणे व त्यांचा आत्मविश्वास वाढवणे.
  • देश सेवेची इच्छ्या असलेले तरुण सैन्यात भरती व्हायचे स्वप्न पाहत होते ते स्वप्न अग्निपत योजनेच्या मध्य्मातुन  साकार होऊ शकतात .

हे पण वाचा –PM KISAN सन्मान निधी योजना 2023-नविन अपडेटसह संपुर्ण माहिती.

Table of Contents

३. अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये

  • भारत सरकारने संरक्षण मंत्रालयाद्वारे अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेंतर्गत  युवा तरुणांना अग्निवीरांना देश सेवेची जी संधी निर्माण करून दिली आहे त्याबाबत ची वैशिष्ट्ये आपण पुढीलप्रमाणे पाहू .
  • देश सेवेची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना कमी वयात योग्य मार्ग निवडण्याच्या संधी दिल्या जातील .
  • अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana  योजनेत भरती झालेल्यांना अग्निवीर म्हणून ओळखले जाईल .
  • महिला या अग्निपथ योजेनेसाठी अर्ज करू शकतात .
  • गुणवत्तेच्या आधारे उमेदवाराची भरती केली जाईल .
  • अग्निवीरांना ६ महिन्याचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • अग्निवीरांचा ४ वर्षाचा कार्यकाल संपल्यानंतर त्याच्यापेकी २५ % अग्निवीरांना कायम करण्यात येईल .
  • अग्निविरांना दरवर्षी ३० दिवसांची रजा दिली जाईल.
  • अग्निवीरांना सेवेत असताना मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जाईल.
  • अपंगत्व आल्यास भरपाई दिली जाईल .
  • अग्निवीरांना ४८ लाखाचे जीवन विमा संरक्षण दिले जाईल.
  • या योजने अंतर्गत अग्निवीरांना जोखीम व इतर सबंधित भत्यांचा लाभ दिला जाईल .
  • या योजने अंतर्गत अग्निवीराना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शौर्य  पुरस्काराने सन्मानित केले जाईल .
  • अग्निवीरांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर अग्निशमन जवानांना त्यांच्या  कौशल्यानुसार कौशल्य प्रमाणपत्र दिले जाईल. त्याचा भवितव्यात उपयोग होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील .

४. अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेची योग्यता / पात्रता –

  1. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा .
  2. अर्जदार किमान १२ वी उतीर्ण असावा .
  3. अर्जदाराचे वय १७.५ ते २१ असावे .
  4. आरोग्य बाबत आवश्यक सर्व पात्रता पूर्ण करणे गरजेचे असेल .
अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana
अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana

५. अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेसाठी लागणारी कागदपत्रे –

  1. जन्माशी सबंधित वयाचा पुरावा असणे गरजेचे असेल  .
  2. आधार कार्ड .
  3. रहिवाशी  प्रमाणपत्र.
  4. पासपोर्ट फोटो .
  5. वैद्यकीय प्रमाणपत्र.
  6. नोंदणीसाठी मोबाईल  क्रमांक

६ . अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana overview-

योजनेचे नावअग्निपथ योजना २०२२
विभागाचे नावसुरक्षा मंत्रालय भारत सरकार
योजनेचा प्रारंभ१४ जुन 2022
लाभार्थी गटवय १७.५ ते २१ वर्षाच्या आतील तरुण
अधिकृत वेबसाइटmod.gov.in
सेवेचा कालावधी४ वर्ष
विमा कवच४८ लाख रु

 

७. अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजने द्वारे मिळणारा पगार-

  • अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेंतर्गत सुरुवातीला ३०,००० रु पगार असेल आणि तो चौथा  वर्षी पर्यंत ४०,००० रु पर्यंत  होईल .
  • चार वर्षानंतर सैनिकांना  १० ते १२ लाख रु देण्यात येतील . व ते करमुक्त असतील .
  • अग्निविराना भत्ते बाबत अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana

८. अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेंतर्गत  वयाची अट  –

अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेअंतर्गत वयाची अट हि १७.५ ते २१ वर्ष अशी आहे परंतु या योजनेसाठी देशातून होणारा विरोध पाहता आणि कोरोना महामारी मुळे वय मर्यादेत बदल करण्याचा निर्णय शासनाने हाती घेतला आणि त्यानुसार वयोमर्यादा २१ वरून २३ हि १ वर्षा साठी केली आहे .कारण कोरोना काळात मुलांना भरतीच्या संधी गमवाव्या लागल्या मुले देशातील तरुणांनी या योजनेस विरोध दर्शवला होता त्यासाठी वयाची अट एक वर्षासाठी २३ केली आहे .

निष्कर्ष –

अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेची घोषणा  १४ जून २०२२ रोजी  आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी केली आहे सशत्र दलाच्या  तीनही सेवांमध्ये कमिशनर अधिकाऱ्यांच्या   रँकपेक्षा  कमी असलेल्या सैनिकांच्या भरतीसाठी मंजूर केलेली हि योजना आहे .

सर्व भरती  हि फक्त ४ वर्षाच्या कालावधी साठी केली जात आहे . त्याच बरोबर हि योजना तरुण मुलांना रोजगाराची संधी निर्माण करून देत आहे आणि देश सेवेचे स्वप्न पूर्ण करत आहे .या योजनेचे फायदे ,वयाची अट ,योग्यता / पात्रता , इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे दिली आहे .

सदर योजनेबाबत तुम्हाला काही अडचणी वाटल्या तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि सदर माहितीचा वापर करून हि माहिती आपल्या मित्रपरिवार बरोबर जास्तीत जास्त शेअर करा .

धन्यवाद !

FAQ –
१ . अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेचा कार्यकाल किती वर्षाचा आहे ?
  • या योजनेमार्फत अग्निवीर मनून ४ वर्षासाठी रुजू होता येईल. त्यानंतर कार्यकाल संपेल. मात्र २५%  कौशल्य प्राप्त अग्निविरांना कायमस्वरूपी करण्यात येणार आहे .
२ . अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेची वयोमर्यादा किती आहे ?
  • उमेदवाराचे वय १७.५ ते २१ वर्ष या दरम्यान असने गरजेचे आहे .
३ . अग्निपथ योजना 2023- Agneepath yojana योजनेंतेर्गत अग्निविर वीरमरण प्राप्त झाल्यास कुटुंबाला कोणते लाभ मिळतील ? 
  • या योजनेंतर्गत अग्निवीरास वीरमरण प्राप्त झाल्यास  विमा कवच ४८ लाख रु असल्यामुळे ते अर्थसहाय्य  प्राप्त होईल . आणि कुटुंबाला सरकारकडून एक कोटीची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवा निधीचा लाभ देण्यात येणार आहे .

 

Leave a comment