माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३ योजनेची नोंदणी,पात्रता,अर्थसहाय्य पहा व लाभ घ्या- Mazi Kanya Bhagyashree Yojna 2023 Benefits, Eligibility & How to Apply

१. माझी कन्या भाग्यश्री योजना २०२३ परिचय -Mazi kanya Bhagyashree 2023 introduction –

महाराष्ट्र राज्यामध्ये  माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत  मुलीचा जन्मदर वाढविणे, गर्भ लिंग निदानास प्रतिबंध करणे ,मुलींच्या  शिक्षणबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे  व मुलींच्या आरोग्य यामध्ये सुधारणा करुन दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना हि योजना १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली आहे.सदर योजना दारीद्रय रेषेखालील (BPL)सर्व कुटुंबात जन्माला येणाऱ्या दोन अपत्य मुलींसाठी असून तसेच  दारिद्रय रेषेवरील (APL) कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींसाठी देखील या योजनेतील काही लाभ देण्यात येणार आहे.

Table of Contents

माझी कन्या भाग्यश्री योजना दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली राबविताना क्षेत्रीय कार्यालयांना येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन तसेच निधीच्या बाबतीत वित्त विभागाने सुचविलेप्रमाणे  ह्या योजनेत बदल करण्यात आला असून . जुनी योजना बाबत माहिती पहायची असेल तर वरील लिंक दिली आहे त्यातील pdf file द्वारे  शासन निर्णय नुसार तुम्ही माहिती पाहू शकता.
माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र सुधारित योजना दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार शासनाने दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली योजना शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करून नवीन सुधारित  माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र सुधारित योजना दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून नव्याने लागू केली आहे . सदर नवीन योजनेतील तरतूद अशी आहे कि ज्या  कुटुंबाचे वार्षिक उतपन्न रुपये ७.५० लाख (सात हजार पन्नास रुपये फक्त ) पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकासाठी लागू करण्यात आली आहे.

सदर नवीन सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना बाबत  सविस्तर माहिती पहायची आहे का ? चला तर मग शासन निर्णयानुसार पात्रता , निकष , अटी व शर्थी ,लाभ मिळवण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे , लाभचे स्वरूप . लाभ घेण्याची कार्यपद्धती ,नियम व योजेनेची इतर सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहू .

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र
                      माझी कन्या भाग्यश्री योजना

२. माझी कन्या भाग्यश्री योजनेचे  उद्देश –

  • मुलींचा जन्मदर वाढविणे .
  • गर्भ लिंग निदानास प्रतिबंध करणे .
  • मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन तसेच खात्री देणे .
  • मुलींच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे व वाढविणे .

या महत्व पूर्ण उद्देश पूर्तीसाठी तसेच स्त्री पुरुष समानतेच्या द्र्ष्टीने माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र सुधारित  राबवली जात आहे.

  ३. माझी कन्या भाग्यश्री योजनेची पात्रता –

१. लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असावेत .

२. कुटुंबाचे वार्षिक उतपन्न रुपये ७.५० लाख (सात हजार पन्नास रुपये फक्त ) पर्यंत आसावे .

३. लाभार्थी दारिद्रय रेषेखालील (BPL) कुटुंबातील २ मुली अपत्य असतील .

४. तसेच काही लाभ हा दारिद्रय रेषेवरील (APL) कुटुंबातील जन्माला येणाऱ्या मुलीसाठी देण्यात येणार आहे .

५. फक्त एका मुलीनंतर मातेने/पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेले कुटुंब पात्र असतील .

६. ज्यांना दोन मुलीच आहेत अशा कुटुंबाने  दोन मुलीनंतर मातेने/पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असेल तर ते कुटुंब पात्र  असतील.

४. माझी कन्या भाग्यश्री योजना लागणारी कागदपत्रे –

  • लाभार्थी मुलीचे आधार कार्ड
  • लाभार्थी मुलीचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र .
  • रहिवाशी प्रमाणपत्र .
  • कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. (माता / पित्याचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र)
  • उत्पन्नाचा दाखला. (स्थानिक तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला)
  • रेशनिंग कार्ड.
  • सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र .

हे पण वाचा – लेक लाडकी योजना २०२३ मुलीच्या भविष्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन – Lek Ladki Yojana 2023

५.  माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मिळणाऱ्या लाभाचे स्वरूप व लाभाचे निकष .

अ.क्र.लाभ मिळण्यास पात्र लाभार्थी शासनाकडून बँकेत गुंतवणूक करण्यात येणारी रक्कम मुलीच्या वयाच्या टप्प्यानुसार ध्याव्याची रक्कम (अनु द्य व्याज धरून)
१.एका मुलीनंतर मातेने / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर अनुज्ञेय रक्कममुलीच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत ५००००/-

रुपये गुंतवण्यात येतील .

1) रुपये ५०,०००/- इतक्या रक्कमेवर ६ वर्षासाठी अनुज्ञेय होणारे  फक्त व्याज मुलीला वयाच्या ६ व्या वर्षी काढता येईल.

2) पुन्हा  मुदृल रुपये  ५०,०००/- गुंतवणूक  करुन ६ वर्षासाठी अनुज्ञेय होणारे  व्याज वयाच्या १२ व्या वर्षी काढता येईल.

3) पुन्हा मुदृल रुपये ५०,०००/- गुंतवणूक करुन ६ वर्षासाठी अनुज्ञेय होणारे  व्याज + मुद्यल दोन्ही

रक्कम वयाच्या  १८ व्या वर्षी  काढता येईल.

माता/ पिता  यांनी कुटुंब नियोजन  शस्त्रक्रिया केल्याचे

प्रमाणपत्र  सादर केल्यानंतर  रुपये ५०,०००/-

इतकी रक्कम मुलीच्या नावावर  जमा करण्यात येईल.

अशाप्रकारे  जमा केलेल्या रक्कमेवर  त्यावेळी  मुलीचे वयानुसार  देय असलेली व्याजाची रक्कम  तीला अनुज्ञेय राहील .

२.दोन  मुलीनंतर मातेने / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर अनुज्ञेय रक्कम 

 

पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी २५,०००/- रुपये याप्रमाणे रु ५०,०००/- इतकी रक्कम दोन्ही मुलींच्या नावे बँकेत मुदतठेव योजनेत गुंतवण्यात येतील .

1) रुपये २५,०००/- इतक्या रक्कमेवर  ६ वर्षासाठी अनुज्ञेय होणारे  फक्त व्याज मुलीला वयाच्या ६ व्या वर्षी काढता येईल.

2) पुन्हा  मुदृल रुपये  २५,०००/- गुंतवणूक  करुन ६ वर्षासाठी अनुज्ञेय होणारे  व्याज वयाच्या १२ व्या वर्षी काढता येईल.

3) पुन्हा मुदृल रुपये  २५,०००/-गुंतवणूक करुन ६ वर्षासाठी लागू  होणारे  व्याज + मुद्यल दोन्ही रक्कम वयाच्या  १८ व्या वर्षी  काढता येईल.

माता/ पिता  यांनी कुटुंब नियोजन  शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र  सादर केल्यानंतर  रुपये ५०,०००/- इतकी रक्कम मुलीच्या नावावर  जमा करण्यात येईल.

अशाप्रकारे  जमा केलेल्या रक्कमेवर  त्यावेळी  मुलीचे वयानुसार  देय असलेली व्याजाची रक्कम  तीला प्राप्त  राहील .

 

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र
माझी कन्या भाग्यश्री योजना

 

६ . माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या अटी व शर्ती –

सदर योजनेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे असतील .
  • सदर योजना बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमार्फत राबविण्यात येते .
  • लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असावेत .
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
  • तसेच सदर योजना आधार सोबत जोडण्यात येईल.
  • प्रत्येक मुलीसाठी स्वतंत्र खाते बँकेत उघडण्यात येईल.
  • माझी कन्या भाग्यश्री योजना सुधारित योजनेचा लाभ १ ऑगस्ट २०१७ रोजी जन्मलेल्या व त्यानंतरच्या मुलींना लागू होईल.
  • ज्या कुटुंबाना दिनांक १ ऑगस्ट २०१७ पूर्वी १ मुलगी आहे व दिनांक १ ऑगस्ट २०१७ नंतर दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यास व माता / पित्याने कुटुंब नियोजनाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर फक्त दुसऱ्या मुलीला रुपेय २५०००/- इतका योजनेचा लाभ लागू होईल.
  • पहिले अपत्य मुलगा असल्यास व दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास व दुसरे अपत्य मुलगा झाल्यास योजनेचा लाभ लागू होणार नाही  .
  • कुटुंबात पहिले अपत्य मुलगी आहे व दुसरे अपत्य मुलगी जन्मल्यास तिला लाभ देय असेल. मात्र तिसरे अपत्य जन्मल्यास त्यास हा लाभ लागू नसेल.
  • तिसरे अपत्य झाल्यास पहिल्या एक / दोन अपत्यांचे लाभही बंद होतील . तसेच प्रदान करण्यात आलेली रक्कम ९११ वसुली या लेखाशीर्ष जमा करण्यात येईल.
  • दुसऱ्या प्रसुतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या ,तर त्या मुली योजनेस पात्र असतील.
  • बालगृहातील अनाथ मुलींसाठी हि योजना लागू राहील .
  • दत्तक पालकांनी मुलांचे account उघडून हा लाभ त्या account ला देण्यात येईल .मात्र दत्तक पालकांवर योजनेच्या सर्व अटी व शर्ती लागू राहतील .
  • मुदत ठेवीत गुंतवण्यात आलेली मूळ रक्कम व त्यावरील १८ व्या वर्षी देय असणारे व्याज लागू होण्यासाठी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असणे व इयत्ता १० वी परिक्षा उत्तीर्ण असणे तसेच मुलगी अविवाहित असणे आवश्यक राहील.
  • वयाची १८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मुलीचा विवाह झाल्यास,किंवा दहावी होण्यापूर्वी शाळा बंद केल्यास किंवा नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नाही.याउलट मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावे असणाऱ्या खात्यात जमा करण्यात येईल .
  • मात्र निसर्गिक कारणाने मुलीचा मृतू झाल्यास मुलीच्या नावे गुंतविण्यात आलेली रक्कम मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर पूर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देण्यात येईल .
  • मुलीच्या नावे बँकेत रक्कम जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मूळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यास देण्यात यावी अशी तरतूद आहे. व याची छायांकित प्रत शासकीय कार्यालयात जमा करून ठेवण्यात येईल.
  • वार्षिक उत्पन्न रुपये ७.५० लाख पर्यंत असल्याचे स्थानिक तहसीलदार यांचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर लाभ मिळेल.
  • मुद्दलावर मिळनाऱ्या व्याजाचा दर हा त्यावेळी  बँकेमार्फत लागू असलेल्या दरानुसार लागू असेल.

हे पण वाचा- “सुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती २०२३”-Sukanya Samrudhi Yojana

७. माझी कन्या भाग्यश्री  योजनेचे नियम –

  • दिनांक १ जानेवारी २०१४ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत सुकन्या योजना कार्यान्वीत होती .तसेच १ एप्रिल २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीत  माझी कन्या भाग्यश्री योजना जुनी योजना कार्यान्वीत होती . सदर कालावधीत सबंधित लाभार्थ्याने अर्ज केला असेल व  आजच्या निकषानुसार पात्र ठरत असेल तर त्यास या योजनेचा लाभ देय राहील . मात्र दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना  मध्ये नमूद असलेले लाभ मंजूर करण्यात येतील .
  • एका मुलीच्या जन्मानंतर माता / पित्याने १ वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण / नागरी यांचाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. एक वर्षानंतर सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • तसेच दोन मुलीनंतर ६ महिन्याच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र अर्जाबरोबर सादर करणाऱ्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ लागू असेल.

    ८. सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्याची नोंदणी  –

    • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी खालील पद्धतीने कार्य करावे व लाभ घ्यावा .
    • मुलीचा जन्म झाल्यानंतर ग्रामपंचायत मध्ये जन्माची नोंदणी करावी .
    • त्या त्या शेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे विहित नमुन्यात अर्ज आणि आवश्यक ते सर्व कागदपत्र सादर करावीत.
    • form विनामूल्य उपलब्ध आहेत .
      माझी कन्या भाग्यश्री योजना
      माझी कन्या भाग्यश्री योजना
      माझी कन्या भाग्यश्री योजना
      माझी कन्या भाग्यश्री योजना

      माझी कन्या भाग्यश्री योजना form1

    • अर्ज पूर्ण भरलेला नसल्यास तो पंधरा दिवसात पूर्ण करून द्याव. जर कागदपत्रे जोडलेली नसतील तर त्यासाठी १ महिन्याची वाढीव मुदत मिळते . परंतु जर एक महिन्यात कागदपत्राची पूर्तता  करता आली नाही तर जास्तीत जास्त २ महिन्याची वाढीव मुदत मिळते . यापेक्षा अधिक काळ प्रलंबित ठेवता येत नाही .
    • ज्या लाभार्थी कुटुंबाने एक मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर १ वर्षाच्या आत करणे गरजेचे आहे.व दोन मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर ६ महिन्याच्या आत करणे गरजेचे आहे. आणि तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तरच लाभार्थ्यास लाभ मिळेल .
    • अंगणवाडी मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या अर्जाची पडताळणी,छाननी /तपासणी  करतील.व पुढील तपासणीसाठी अर्ज नागरी व  ग्रामीण  क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी  तसेच संस्था मधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी महिला व बाल विकास अधिकारी , जिल्हा परिषद ,यांच्याकडे एकत्रित मान्यतेसाठी सादर करतील .
    • महिला व बाल विकास अधिकारी (जिल्हा परिषद) यांनी योग्य ती छाननी करून यादीस मान्यता देऊन बँकेत सादर करतील .
    • प्रधानमंत्री जनधन योजना मार्फत लाभार्थी मुलगी व तिची आई यांचे नावे संयुक्त बचत खाते (नो फ्रील खाते) बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीय कृत बँकेत खाते उघडण्यात येईल . त्यासाठी अंगणवाडी सेविका/मुख्य सेविका / पर्यवेक्षिका या अर्जदारास बँकेत खाते उघडण्यासाठी मदत करतील . त्यामुळे योजनेंतर्गत रुपये १,००,०००/- अपघात विमा व रुपये ५,०००/- overdraft व इतर अनुज्ञेय लाभ घेता येईल .
    • त्यानंतर १ महिन्याच्या कालावधीत बाल विकास प्रकल्प अधिकारी व महिला व बाल विकास अधिकारी , जिल्हा परिषद हे पात्र लाभार्थ्याचे अर्ज बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेकडे , लाभार्थ्याला रुपये ५०,०००/- किंवा रुपये  २५,०००/- पात्रतेनुसार एवढ्या रक्कमेची मुदत ठेव प्रमाणपत्र मिळण्यासाठी सादर करतील. त्यानंतर बँकेकडून मिळालेले प्रमाणपत्र लाभार्थीच्या पालकांना उपलब्ध करून देण्यात येतात .
    • माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत अनुज्ञेय लाभ लाभार्थ्याच्या प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत बँक खात्यात देण्यात येतो .

  • निष्कर्ष –

मुलींचा जन्मदर वाढविणे ,गर्भ लिंग निदानास प्रतिबंध करणे ,मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन तसेच खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा सुधारणे व वाढविणे यासाठी दिनांक १ एप्रिल २०१६ पासून लागू करण्यात आलेली माझी कन्या भाग्यश्री योजना हि योजना शासन निर्णयान्वे अधिक्रमित करून माझी कन्या भाग्यश्री सुधारित योजना दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उतपन्न रुपये ७.५० लाख (सात हजार पन्नास रुपये फक्त ) पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकासाठी लागू करण्यात आली आहे.

सदर योजनेंतर्गत असणारी सर्व माहिती या लेखात देण्यात आली आहे तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी या मिहीतीचा जास्तीत जास्त उपयोग करुन हि माहिती इतरांबरोबर शेअर करावी व काही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क करावा .

धन्यवाद !

FAQ –

१. माझी कन्या भाग्श्री सुधारित योजनेतील उत्पन्न मर्यादा किती आहे ?

– सदर योजनेंतर्गत दिनांक १ ऑगस्ट २०१७ पासून ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ७.५० लाख रुपये पर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकासाठी हि योजना लागू करण्यात येत आहे .

२. या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते कोणत्या बँकेत open करावे ?

– सदर योजना हि बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत राबविण्यात येत आहे त्यामुळे प्रधानमंत्री जनधन योजना मार्फत लाभार्थी मुलगी व तिची आई यांचे नावे संयक्त बचत खाते (नो फ्रील खाते) बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीय कृत बँकेत उघडण्यात येईल.

३. योजनेची नोंदणी प्रक्रिया कशी आहे ?

– सदर योजनेची नोंदणी प्रक्रिया हि off line आहे . form विनामूल्य उपलब्ध आहेत त्या शेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा  आणि आवश्यक ते सर्व कागदपत्र  सोबत जोडावीत .

४ . एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर मुलीला लाभ घेता येतो का ?

– नाही पहिले अपत्य मुलगा असल्यास आणि दुसरे अपत्य मुलगी झाल्यास किंवा पहिले अपत्य मुलगी असल्यास आणि दुसरे अपत्य मुलगा झाल्यास योजनेचा लाभ घेता येत नाही .