लेक लाडकी योजना २०२३ मुलीच्या भविष्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन – Lek Ladki Yojana 2023

राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी  लेक लाडकी योजना २०२३

१ .  लेक लाडकी योजना २०२३ – परिचय 

महाराष्ट्र  सरकारकडून लेक लाडकी योजना २०२३    या योजनेंतर्गत मुलीच्या भविष्यासाठी व  सक्षमीकरणासाठी अभियान राबवताना  सरकारच्या शासननिर्णयाच्या आधारे संपूर्ण मार्गदर्शनसह माहिती घेणार आहोत .

Table of Contents

मुलीचा जन्मदर वाढविणे व मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री  देणे यासाठी २०१७  पासून माझी कन्या भाग्श्री सुधारित नवीन योजना लागू करण्यात आली आहे .परंतु या योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद याचा विचार शासनाद्वारे करून या योजनेस अधिक्रमित करून मुलीच्या सक्षमीकरणासाठी नवीन योजना महाराष्ट्र शासन मार्फत महिला व बालविकास विभागाद्वारे मुलीच्या भविष्याचा खजिना लेक लाडकी योजना २०२३ हि नवीन योजना सुरु करण्यात आली आहे.

पिवळ्या केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्या टप्यात मध्ये अनुदान देण्यात येणार आहे .लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५०००/- रुपये याप्रमाणे असे एकूण रुपये १०१०००/- एवढी रक्कम देण्यात येईल . या योजेनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी हि १ एप्रिल २०२३ पासून करण्यात आली आहे .

लेक लाडकी योजेनेची उदिष्टे ,अटी व शर्ती ,लागणारी आवश्यक कागदपत्रे , अर्जाची नोंदणी  प्रक्रिया , योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती ,संबधित विभाग इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण या लेखात खालिल प्रकारे पाहणार आहोत .

२. लेक लाडकी योजना २०२३ योजनेची समरी(overview) पाहु या- 

योजना नावलेक लाडकी योजना २०२३
योजनेची सुरवातमार्च २०२३ मधील अर्थसंकल्पात घोषणा २०२३ -२०२४
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील मुली
उद्देशमुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी
विभागमहिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन 
लाभाची रक्कम१०१०००/- (एक लाख एक हजार रु )रुपये
अर्जाची पद्धतofline आणि online
हे पण पहा –प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin)2023 : पायाभूत सुविधांचा विकास व गृहनिर्माण सक्षमीकरण व महाराष्ट्रातील योजनेची list.

३ . योजनाची उदिष्टे –

  • मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे .
  • मुलींचा मृत्यू दर कमी करणे .
  • मुलींच्या शिक्षणास चालना देणे .
  • मुलींचे बालविवाह रोखणे .
  • मुलींचे कुपोषणाचे प्रमाण कमी करणे .
  • शाळेपासून वंचित राहिलेल्या शाळा बाह्य मुलींचे प्रमाण ० (शून्य) वर आणण्याकरिता प्रोत्साहन देणे इत्यादी उद्देशाच्या पूर्तीसाठी शासन प्रयत्न करत आहे.

.लेक लाडकी योजना २०२३ योजनेची पात्रता – 

  1. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक असेल .
  2. लेक लाडकी योजना  कुटुंबातील २ मुलींसाठी लागू राहील .
  3. लाभार्थीं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयापेक्षा जास्त नसावे.
  4. पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील  मुली या योजेसाठी पात्र असतील .

५ . लेक लाडकी योजना २०२३ अटी व शर्ती –

लेक लाडकी योजना २०२३ शासन निर्णयानुसार ज्या  अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती पाहूया.

  • पिवळ्या व केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील .
  • तसेच जर त्या कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर फक्त त्या मुलीला लागू होईल .
  • तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी व दुसरा मुलगा झाला तर त्यापेईकी मुलीला आणि दोन्ही मुलीच असतील तर दोन्ही मुलीना या योजनेचा लाभ घेता येईल. मात्र त्यानंतर माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील .
  • १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी / मुलगा आहे इ त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र) हि योजना लागू असेल मात्र त्यासाठी माता / पित्याने  कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील .
  • पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सदर करतेवेळी माता / पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील .
  • लाभार्थीचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक असेल .
  • लाभार्थींच बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे .
  • लाभार्थीं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयापेक्षा जास्त नसावे .

६ . लेक लाडकी योजना २०२३ आवश्यक कागदपत्रे- 

  • लाभार्थीं मुलीचा जन्माचा दाखला
  • कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला पण वार्षिक उत्पन्न हे १ लाख पेक्षा जास्त नसावे. तसेच उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदार/सक्षम अधिकारी यांचा आवश्यक राहील .
  • लाभार्थीं चे आधार कार्ड .
  • पालकाचे आधार कार्ड .
  • बँक पासबुक ची झेरॉक्स प्रत
  • शिधापत्रिका साक्षांकित प्रत
  • मतदान  ओळखपत्र (शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा  दाखला )
  • माता / पित्याने कुटुंब नियोजन केलेले शस्त्रक्रिया प्रमाणपत्र.
  • ज्या त्या संबंधित टप्या वरील लाभाकरिता मुलीचा  शिक्षण घेत असल्याबाबत चा संबंधित शाळेचा दाखला (Bonafied)
  • अंतिम लाभाकरिता मुलीचे लग्न झालेले नसणे बंधनकारक राहील त्यासाठी (अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र )
  • अनाथ प्रमाणपत्र – अनाथ मुलीना लाभ मिळण्यासाठी अर्ज सादर करताना महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून देण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे .

७ .लेक लाडकी योजना २०२३ अंतर्गत मिळणारे लाभाचे टप्पे  –

लेक लाडकी योजना २०२३
लेक लाडकी योजना २०२३

लेक लाडकी योजना २०२३ योजने च्या शासन निर्णयानुसार ज्या अटी  व शर्ती घालून दिलेल्या आहेत त्यानुसार आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यास त्यांच्या आधारे पिवळ्या व केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारक कुटुंबास लाभधारक मुलीच्या नावे जन्मानंतर टप्या टप्या मध्ये अनुदान देण्यात येणार आहे .लाभधारक मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५०००/- रु रोख देण्यात येतील .खालीलप्रमाणे लाभाचे टप्पे पाहूया.

  1. पहिला हप्ता –मुलीच्या जन्मानंतर ५०००/-रुपये दिले जातात.
  2. दुसरा हप्ता – त्यानंतर मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यास ६०००/-रुपये दिले जातात .
  3. तिसरा हप्ता – मुलगी इयत्ता सहावीत गेल्यास ७०००/-रुपये देण्यात येतात .
  4. चौथा हप्ता – जेंव्हा मुलगी अकरावीत जाईल त्यावेळी ८०००/-रुपये देण्यात  येतात .
  5.  पाचवा हप्ता – लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५०००/- रुपये याप्रमाणे असे एकूण रुपये १०१०००/- एवढी रक्कम देण्यात येईल .
हे पण पहा –“सुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती २०२३”-Sukanya Samrudhi Yojana

८ . लेक लाडकी योजना २०२३ अर्ज कुठे व कसा करावा –

  1. सदर योजनेंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे / मुख्यसेविका आवश्यकत्या कागदपत्रसोबत विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  2. लाभार्थ्याचा अर्ज स्वीकारण्याची तसेच त्याची तपासणी आणि आवश्यक कागदपत्रासह form ची online पोर्टलवर नोंदणी करने ची जबादारी हि अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका यांची असेल .
  3. अंगणवाडी सेविकेकडे / मुख्यसेविका यांनी अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे – संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण) ग्रामीणसाठी आणि – संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी (शहरी) शहरीसाठी मान्यतेकरीता सादर करतील .
  4. अंतिम मंजुरी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास विभाग ) यांचेकडे आहे . अशा प्रकारे अर्जाची पद्धत हि लेखी स्वरुपात offline आहे .आणि याची नोंदणी  महाराष्ट्र शासनाच्या संबधित पोर्टलवर अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका या करतील.
लेक लाडकी योजना २०२३
लेक लाडकी योजना २०२३

 

९.  योजनेतील इतर महत्वपूर्ण मुद्दे – 

  1. लेक लाडकी योजना २०२३ अंतर्गत लाभार्थ्यांना विविध टप्प्यात देण्यात येणारा लाभ थेट लाभार्थी हस्तांतर (DBT) द्वारे देण्यात येईल.
  2. त्याकरिता लाभार्थी व माता यांचे संयुक्त बँक खाते उघडणे अनिवार्य राहील .
  3. एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास लाभार्थी व पिता यांचे संयुक्त खाते उघडण्यात यावे . मात्र अशा प्रकरणात अर्ज सादर करताना मातेचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील .
  4. अनाथ मुलींच्या बाबतीत त्यांना लाभ देताना विभागाच्या इतर योजनांचा लाभ ज्या पद्धतीने त्यांना दिला जातो त्याचप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल .
  5. तसेच एखादे लाभार्थी कुटुंब सदर योजने मधील एक अथवा काही टप्प्याचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्यात स्थलांतरित झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ लागू होण्यासाठी त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचे कडे अर्ज सादर करावा.
  6. त्याचप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब या योजने मधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरित झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा व राज्य कक्ष याबाबत अंतिम निर्णय घेऊन त्याबाबत खुलासा करेल .
  7. लेक लाडकी योजना २०२३ मध्ये १ एप्रिल २०२३ अगोदर जन्मलेल्या मुलींना माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) योजनेच्या अटी व शर्ती नुसार लाभ दिला जाईल मात्र त्याकरिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ३१ डिसेंबर २०२३ राहील त्यानंतरचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता लाभार्थ्यांनी घेणे गरजेचे आहे .
निष्कर्ष –

लेक लाडकी योजना २०२३ महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन मार्फत राबवली जात आहे मुलींच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी सुरु करण्यात आलेली योजना आहे.

पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्या टप्यात मध्ये अनुदान देण्यात येत असून लाभधारक मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५०००/- रु रोख असे एकूण रुपये १०१०००/- (एक लाख एक हजार रु ) एवढी रक्कम देण्यात येईल.

लेक लाडकी योजेनेची उदिष्टे ,अटी व शर्ती ,लागणारी आवश्यक कागदपत्रे , अर्जाची नोंदणी  प्रक्रिया , योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती ,संबधित विभाग इत्यादी बाबत सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेतली आहे . सदर योजनेची माहिती आवडली असल्यास आणि उपयोगी वाट असल्यास हि माहिती मित्र परीवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि काही अडचण वाटल्यास आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात .

धन्यवाद !

FAQ –
1.  लेक लाडकी योजना कधी सुरु झाली ?

⇒  लेक लाडकी योजना मार्च २०२३ मध्ये अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री मा .देवेंद्र फडणवीस यांनी या योजेनेची घोषणा केली.

2.  लेक लाडकी योजना Form  कसा व कुठे भरावा ?

⇒  सदर योजनेंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी मुलीच्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे / मुख्यसेविका आवश्यक त्या कागदपत्र सोबत विहित नमुन्यात अर्ज करावा.

⇒  त्यानंतर online अर्ज करण्याची जबाबदारी हि पूर्ण अंगणवाडी सेविकेकडे / मुख्यसेविका यांच्यावर राहील .

3 . लेक लाडकी योजना योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते कोणाच्या नावे असावे ?

⇒  लाभार्थी मुलगी आणि आई यांच्या नवे संयुक्त बँक खाते काढावे .एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असल्यास लाभार्थी व पिता यांचे संयुक्त खाते उघडण्यात यावे .

4 .लेक लाडकी योजनेतील लाभाचे स्वरूप कशे आहे ?
⇒ पहिला हप्ता - मुलीच्या जन्मानंतर ५०००/-रुपये दिले जातात.

⇒ दुसरा हप्ता - त्यानंतर मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यास ६०००/-रुपये दिले जातात .

⇒ तिसरा हप्ता - मुलगी इयत्ता सहावीत गेल्यास ७०००/-रुपये देण्यात येतात .

⇒ चवथा हप्ता - जेंव्हा मुलगी अकरावीत जाईल त्यावेळी ८०००/-रुपये देण्यात येतात .

⇒ पाचवा हप्ता - लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५०००/- रुपये याप्रमाणे असे एकूण रुपये १०१०००/- एवढी रक्कम देण्यात येईल .
5. योजनेचा लाभ घेत असताना स्थलांतरीत झालेस लाभ घेता येतो का ?

– सदर योजेने अंतर्गत एक अथवा काही टप्प्याचा लाभ घेतल्यानंतर जर एखाद्या लाभार्थी कुटुंबाने कामानिमित्ताने  राज्यातील अन्य जिल्यात स्थलांतरित झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ लागू होण्यासाठी त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचे कडे अर्ज सादर करावा लागतो .

 

 

Leave a comment