प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin)2023 :
1.(PMAY-Gramin) योजनेचा परिचय –
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) ही 1985 साला पासुन ग्रामीण भागात निवारा पुरवण्याचे काम करते .परंतु 1995-96 पासुन इंदीरा आवास योजना या नावाने राबवली जायची नंतर राजीव गांधी निवारा योजना या नावाने सुरू होती परंतु आता 1 जुन 2015 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची सुरूवात नव्याने करून या योजनेचे नाव प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)योजनेत रूपांतरीत केले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजनेतंर्गत भारतातील ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक,विधवा अथवा एकल महिला, अपंग व्यक्ती ,अनुसुचीत जाती, जमातीतील कुटुंब, इत्यादी घटकाबरोबर त्यांच्या पायाभुत सुविधांसाठी ,बेघर किंवा कच्च्या स्वरूपाचे घर असलेल्या कुटुंबांना घर बांधण्यासाठी व सध्या राहत्या घराचे नुतनीकरण करण्यासाठी अर्थ सहाय्य 1 ,20,000 /-रू प्रदान करते .
ग्रामीण भागातील कुटुंबासाठी शासनाने “ सर्वासाठी घरे ” हा संकल्प हाती घेवून हक्काचे घर प्रदान करण्यासाठी मार्च 2024 पर्यत परवडणारी व सुरक्षीत घरे देवून ग्रामीण रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचे काम सरकार या योजनेतंर्गत करत आहे.
2. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजनेची गरज –
ग्रामीण भागात कुटंबांना राहण्यासाठी अपुरा निवारा बांधकामाचा निकृष्ट दर्जा असणे किंवा कच्या स्वरूपाची घरे , योग्य पायाभूत सुविधांचा अभाव यासह अनेक आव्हांनाना सामोरे जावे लागते.त्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) ही योजना अर्थ सहाय्य प्रदान करून ,योग्य पायाभुत सुविधांसह सुरक्षीत घरे प्रदान करून ग्रामीण रहिवाशांचे जीवनमान उंचावण्याचे काम करते.
या योजनेची गरज गावातील गरजुंना पक्का निवारा प्रदान करून तसेच रोजगार उपल्ब्ध करून ,परवडणारी घरे प्रदान करण्यासाठी अर्थ सहाय्य करते या सर्वावर उपायकारक म्हणुन ही योजना खुप प्रभावीपणे काम करताना दिसत आहे तेव्हा या योजनेची गरज जास्त प्रमाणात आहे हे ठामपणाने जाणवून देते.
3.(PMAY-Gramin) योजनेचि उद्दिष्टे–
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) ही ग्रामीण भागातील कुटुंबाना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्य भारत सरकारने सुरू केलेली गृहनिर्माण योजना आहे. या योजनेचे प्राथमिक उदिष्ट ग्रामीण कुटुंबाला योग्य पायाभुत सुविधांसह पक्का निवारा, प्रशिक्षित गंवडी वापरून दर्जेदार घरे उपलब्ध करून देणे होय. सरकारने या उदिष्ट पुर्तीसाठी योजनेची मुदत वाढवून मार्च 2024 अशी केली आहे .
4. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजनेचि वैशिष्ट्ये-
- “ सर्वांसाठी घरे ” या योजनेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना पक्की कायमस्वरूपी घरे प्रदान करणे आहे ज्यांच्याकडे पक्की व सुरक्षीत अशी पायाभुत सुविधांसह “ सर्वांसाठी घरे ” प्रदान करने होय.
- आर्थिक सहायता-लाभार्थीना नवीन घर बांधण्यासाठी अथवा सध्याच्या घरांचे नूतनीकरण करण्यासाठी सरकारकडून मैदानी सपाट प्रदेशासाठी एका घरासाठी 1,20,000/- रू रक्क्म व डोंगराळ भागासाठी 1,30,000/- रू रक्क्म लाभार्थीला दिली जाते हा खर्च केंद्र व राज्य सरकार 60:40 च्या प्रमाणात सामायीक करत आहे.
- प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) उत्तर पूर्वेकडील राज्ये जम्मु काश्मीर,हिमाचल प्रदेश मध्ये प्रत्येक युनिटसाठी लाभार्थीना 1,30,000/- रू प्रमाणे रक्कम दिली जाते.तो खर्च केंद्र व राज्य सरकार 90:10 असा वाटा उचलतात.
- लाभार्थी निवड ही ग्रामसभांद्वारे सामाजिक व आर्थिक जातिगणना (SECC) 2011 च्या मापदंडाचा वापर करून केली जाते .
- सहभागात्मक दृष्टीकोन – PMAY -G मध्ये लाभार्थी चा नियोजन आणी बांधकाम प्रक्रिया त सहभाग समाविष्ट आहे.त्यांना त्यांच्या घरांच्या डिझाईन आणि लेआउट बाबत निर्णय घेण्यास सक्षम बनवते.
- महिलांचे सक्षमीकरण : ही योजना महिलांच्या नावावर घरांची मालकी किंवा त्यांच्या जोडीदारासह संयुक्त मालकी देण्यास प्रोत्साहन देते, याचा उद्देश्य ग्रामीण कुटुंबातील महिलांना सक्षम बनवणे आहे.
- इतर योजनामार्फत अर्थ सहाय्य, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ,व महात्मा गांधी रोजगार हमी योजना च्या मदतीने शौचालय उभारणीसाठी स्वतंत्र 12,000-/- रू मदत दिली जाते.
- पारदर्शक व्यवहार – या योजनेतंर्गत दिलेली आर्थिक मदत ही थेट लाभार्थीच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट ऑफिस खात्यामध्ये दिली जाते.
हे पण पहा- “सुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती २०२३”-Sukanya Samrudhi Yojana
5.प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजनेची पात्रता निकष-
- या योजनेतून लाभ घ्यायचा असेल तर शासनाने काही ठरवून दिलेले मापदंड आहेत त्यानुसार खालील घटक पात्रता निकष ठरवतात ते पाहुया .
- पात्रता प्रामुख्याने लाभार्थीच्या उत्पन्न व गृहनिर्माण स्थिति आणि कौटुंबिक श्रेणीवर अधारीत असते .
- तो भारताचा व राज्याचा सबंधीत राज्यातुन लाभ घ्यायचा असेल तर त्या राज्याचा रहीवाशी असला पाहीजे .
- वयोमर्यादा 18 वर्षे व त्याहुन अधिक असावी.
- अर्जदाराकडे स्वत: चे भारतात व राज्यात कोठेच पक्के घर नसावे.
- कुटुंबातील सदस्यास सरकारी नोकरी नसावी .
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin)या योजनेची घटकानुसार पात्रता ठरवली जाते ते घटक पुढीलप्रमाणे पाहू.
मापदंडानुसार पात्रतेसाठी असणारे घटक –
- (BPL) दारीद्रय रेषेखालील कुटंब व कमी उत्पन्न गटातील कुटुंबातील लाभार्थी हा पात्र ठरेल .
- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील व्यक्ती हा पात्र ठरेल .
- अनुचित जाती (SC)आणी अनुसुचीत जमाती (ST)व इतर मागास वर्गातील (OBC)सदस्य या योजनेस पात्र ठरेल.
अपंग व्यक्ती ,एकल अथवा विधवा महिला हा योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरेल.
6. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजनेचे फायदे –
- नविन घर बांधण्यासाठी तसेच जुन्या घराचे नुतनीकरण करण्यासाठी पक्कया घराबरोबर इतर पायाभुत सुविधा मिळतात .
- आर्थिक सहायता – यात निकष असा आहे की ,मैदानी सपाट भागातील एका घरकुलासाठी 1 लाख 20 हजार रू प्रमाणे तर डोंगराळ भागासाठी 1 लाख 30 हजार रू प्रमाणे कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाईल .
- या योजनेशी कनेक्टेड प्रधानमंत्री उज्जवला योजना द्वारे लाभधारकास LPG कनेक्शन दिले जाते.
- रोजगार निर्मीती साठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत 90 ते 95 दिवस अकुशल मजुरीच्या स्वरुपात अर्थ सहाय्य दिले जाते .रोजगार उपलब्ध होतो.
- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभधारकाला शौचालय उभारणी साठी 12000 /-रू रक्कम दिली जाते.
- लाभाची रक्कम ही थेट लाभार्थीच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात जमा होते.
7. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) लाभार्थीची निवड प्रक्रिया –
- PMAY –Gramin अंतर्गत लाभार्थी निवड ही 2011 मधील सामाजीक , आर्थिक व जात सर्वेक्षण च्या माहीतीचा वापर करून निवड
प्रक्रिया पूर्ण केली जाते.
- लाभार्थ्याची निवड ग्रामपंचायती मार्फत ग्रामसभेद्वारे योजनेतील मापदंडानुसार पात्रता निकष वापरून व श्रेणीचा वापर करून योग्य लाभार्थी निवडुन सर्वानुमते मान्यता दिली जाते.
- ग्रामपंचायती मार्फत तयार केलेली व मंजुर झालेली यादी तसेच प्रतीक्षा यादी ही कायम ग्रामपंचायतीच्या सुचना फलकावर प्रसिद्ध केली जाते.
8.(PMAY-Gramin)योजेनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे –
- प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin)या योजनेतंर्गत संबंधीत व्यक्तीला लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्राची पुर्तता करावी लागते .
- आधार कार्ड.
- मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड.
- जॉब कार्डची प्रत.
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- BPLकार्ड.
- पासपोर्ट फोटो व मोबाईल नं.
9. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजनेची समरी-
अ.क्रं | शीर्षक | माहिती |
1. | योजनेचे नाव | प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) |
2. | संबंधीत विभाग | ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार |
3. | योजनेचा प्रारंभ | जून 2015 |
4. | योजनेचा प्रकार | केंद्र पुरस्कृत योजना |
5. | अनुदान रक्कम | 1,20,000/-व 1,30,000/-रू रक्कम |
6. | शासनाचि अधिकृत वेबसाइट | |
7. | हेल्पलाईन नंबर | 1800-11-6446 |
8. | योजनेची मुदत कालावधी | मार्च 2024 |
10.प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin)अंतर्गत नोंदणी प्रक्रिया-
SECC 2011 अंतर्गत समाविष्ट असलेले नागरिक प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) साठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी त्यांना पंचायती कडून online नोंदणीसाठी user ID आणि password प्रदान केला जाईल ज्याद्वारे तुम्ही अर्ज भरू शकतात .
या योजेनेची नोंदणी प्रक्रिया ३ टप्यात पूर्ण केली जाते ते टप्पे खालीलप्रमाणे पाहूया .
1. पहिला टप्पा –
- प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) च्या या अधिकृत website वर जा व open करा .
- Home Page open होईल
- यात Data Entry या पर्यायावर किल्क करा.
- स्क्रीन वर समोर PMAY Rural online form login लिंक उघडेल .
- यामध्ये तुम्हाला पंचायत स्तरावरून मिळालेला user Name आणि password च्या मदतीने login करा .
- तुम्ही तुमच्या सोयीनुसार user Name आणि password बदलू शकता .
- यानंतर तुम्हाला pmay-g online login पोर्टल वर ४ पर्याय एकत्र दिसतील .
- pmay-g online अर्ज .
- निवासाच्या फोटोची पडताळणी .
- Downloading मंजुरी पत्र
- FTO आणि order sheet तयार करणे .
२. दुसरा टप्पा –
- तुम्हाला PMAY-Gramin online नोंदणीवर किल्क करायचे आहे .
- स्क्रीनवर नोंदणी form उघडेल .
- या उघडलेल्या स्क्रीनवर form मध्ये ४ प्रकारचा तपशील प्रविष्ट करावा लागेल .
–
- वैयक्तिक माहितीचा तपशील
- बँक तपशील
- अभिसरण तपशील
- संबधित कार्यालयाचा तपशील
नोंदणीसाठी वैयक्तिक तपशील निवडा व नोंदणी ची सर्व माहिती भरा व सबमिट करा
३. तिसरा टप्पा –
- तुम्हाला ग्रामीण गृहनिर्माण योजेनेच्या अर्जात बदल करण्यासाठी user Id आणि password च्या मदतीने पोर्टलवर login in करावे लागेल आणि नोंदणी मध्ये बदल करण्यासाठी नोंदणी form वर किल्क करा .
- अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजेनेंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून लाभ घेऊ शकता.
11.प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजनेची list पाहण्याची प्रक्रिया –
- ग्रामीण विकास मंत्रालय वेबपोर्टल open करा.
- Home page उघडेल त्यात physical progress report उघडेल त्यात High level Physical progress report हा पर्याय निवडा.
- राज्य ——-, जिल्हा ——–, तालूका———–, व ग्रामपंचायत नाव ————टाका.
- अगोदर वर्षे निवडा- 2021 ते 2023.
- त्यांनतर योजनेचे नाव निवडा – प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin)
- राज्य ………….
- जिल्हा …………..
- तालुका …………..
- ग्रामपंचायत कार्यालय नाव-…………………हे सर्व भरल्यावर Submit बटन वर किल्क करा.
- लाभार्थी नाव … …..पती किंवा वडीलांचे नाव हे चेक करू शकतात.
12. योजनेचे status चेक करण्याची प्रक्रिया –
अगोदर नाव चेक केल्या बरोबर या योजनेचे status पाहु शकतात.
- घर बांधण्यासाठी अनुदान रक्कम किती आली आहे.
- आपले घराचे बांधकाम हे पुर्ण झाले की अर्धवट झाले याचे status देखील इथेच दिसते.
13. महाराष्ट्रातील योजनेची list कुठे व कशी चेक करावी –
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) महाराष्ट्रातील प्रधानमंत्री आवास योजनेची list कशी चेक करावी .वरीलप्रमाणे नोंदणी करूनही जर तुमचे नाव दिसत नसेल तर खालील 3 पध्दतीने तुमचे नाव तुम्ही चेक करू शकता.
- Search by Registration Number .
- Search by Name
- Search by Adhar Number
Step 1. search by Registration Number
- pmayg.nic.in हे वेब पोर्टल उघडा
- IAY/Pmayg. beneficiary हा पर्याय निवडा व किल्क करा .
- open झालास menu हा पर्याय निवडा , त्यामध्ये stakeholders याचखाली pmay-g beneficiary हा पर्याय निवडा व किल्क करा
- Registration Number टाकून submit या बटनावर किल्क करा
2. Search by Name-
- pmay- gramin योजना नाव सर्च करुन माहिती पाहता येते .
- Beneficiary Advance search निवडा
- pmayg.nic.in या वेबपोर्टल वर जा Stakeholders हा पर्याय निवडा
- IAY/ pmay Beneficiary Advance search या पर्याय वर किल्क करा
- स्क्रीनवर search Beneficiary detail हा पर्याय उघडला जाईल त्यामध्ये तुमचे किंवा जो लाभार्थी असेल त्याचे नाव टाकून शोधा
- advance search – वैयक्तिक सविस्तर माहिती भरा
- लाभार्थी नाव ————————————–
- राज्य ——————-
- जिल्हा ————
- तालुका ———–
- ग्राम पंचायत नाव ———————————-
- योजना नाव —————————————
- साल किंवा वर्ष निवडा ————————— इत्यादी सविस्तर माहिती भरा
3. Search by Adhar Number
- Adhar Number चा वापरकरून आपले नाव list मध्ये पहाता येते त्याची पद्धत पुढीलप्रमाणे
- pmayg.nic.in या वेबपोर्टल वर जा
- आधार क्रमांक टाकून find Beneficiary Detail यावर किल्क करा
- त्यानंतर search Beneficiary यावर किल्क करा
- यात आधार क्रमांक टाकून show बटन वर किल्क करा यात लाभार्थी बाबत माहिती मिळेल
अशा प्रकारे लाभार्थी बाबत सविस्तर माहिती मिळवू शकते .
14. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) अंतर्गत आर्थिक सहायता –
प्रधान मंत्री आवास योजना – ग्रामीण अंतर्गत आर्थिक सहायता (1)
- प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) अंतर्गत आर्थिक सहायता सरकार कडून ३ हप्त्या मध्ये मदत दिली केली जाते .
- त्याची विभागणी १. पहिला हप्ता हा घरकुल मंजुरी मिळाल्यानंतर घर बांध कामासाठी दिला जातो .
- २. दुसरा हप्ता हा घराचा पाया घातल्यानंतर दिला जातो.
- ३. तिसरा हप्ता आणि शेवटा हप्ता घर पूर्ण झाल्यानंतर कधीही मिळतो .
हे पण पहा- PM KISAN सन्मान निधी योजना 2023-नविन अपडेटसह संपुर्ण माहिती.
15. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) च्या मापदंडा नुसार घराची संरचना कशी असावी-
- या योजने अंतर्गत घरकुलाचे संपूर्ण बांध काम हे वाळू, सिमेंट ,विटा, मध्ये असणे गरजेचे आहे .
- घराची रचना हि १ स्वंयपाक घर , १ बैठक खोली / हॉल असावा .
- शौचालय आणि स्नानघर बांधणे अनिवार्य आहे.
- जोत्यापासून घराची उंची कमीत कमी १० फुट असावी .
- छतासाठी स्थानिक गरजेनुसार मजबूत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलाचा वापर करण्यास परवानगी राहील.
निष्कर्ष-
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) या योजनेची सुरुवात २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. हि केंद्रपुरस्कृत योजना असून ती राज्य स्तरावर सन २०१६-२०१७ पासून या योजनेची अंमलबजावणीस सुरुवात झाली. घरकुल बांधकामासाठीमैदानी सपाट भागासाठी रु १,२०,०००/- दिले जातात तर डोंगराळ भागासाठी रु १,३०,००० /– दिले जातात तसेच याच बरोबर इतर योजनामार्फत अर्थ सहाय्य,महात्मा गांधी रोजगार हमी योजना ,व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण च्या मदतीने शौचालय उभारणीसाठी स्वतंत्र 12,000-/- रू मदत दिली जाते.
लाभार्थी निवड हि ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभेद्वारे योजने तील निकषानुसार व सामाजिक आणि आर्थिक जात सर्वेक्षण च्या (SECC) मापदंड नुसार केली जाते .
या योजेने मार्फत लाभार्थी कुटुंबाना मुलभूत सुविधा सोबत पक्के घर प्रदान केले जाते. हि योजना ग्रामीण विकासाच्या दृष्टीने खूपच महत्वाची ठरत आहे .
या योजेने चा लाभ घेण्यासाठी वरीलप्रमाणे माहितीचा वापर करून योजनेचा लाभ घेऊ शकता आणि इतरानाही लाभ घेण्यासाठी मदत करू शकता तेंव्हा हि माहिती तुमच्या मित्र परिवार सोबत जास्तीत जास्त share करा आणि काही अडचन आली तर आमच्याशी संपर्क करू शकता .
धन्यवाद !
FAQ –
1. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजना काय आहे आणि कोणासाठी आहे ?
→ pmay-g हि योजना ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंब (BPL) किंवा घर नसणारे अथवा कच्या स्वरूपाचे घर असणाऱ्या कुटुंबाना घर बांधकामासाठी व राहत्या घराचे नुतनीकरण करण्यासाठी अर्थसहाय्य करते .
2. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजना साठी अर्ज कसा करायचा ?
→ pmay-g योजना साठी अर्ज करायचा असेल तर अगोदर तुम्ही pmay.nic.in या website वरून form भरायचा आहे.
3. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजेनेंतर्गत इतर कोणत्या योजनेचा लाभ मिळतो ?
→ pmay-g योजना अंतर्गत घर बांधकामासाठी व घराच्या नुतनीकरण करण्यासाठी अर्थ सहाय्य तर मिळतेच पण त्या बरोबर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ९० ते ९५ दिवसाचा अकुशल मजुरीच्या स्वरुपात अर्थ सहाय्य दिले जाते .
→ स्वच्छ भारत अभियानांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना शोचालय उभारणीसाठी स्वतंत्रपणे रु १२००० /- निधी उपलब्ध करून दिला जातो.
→ या योजनेशी कनेक्टेड प्रधानमंत्री उज्जवला योजना द्वारे लाभधारकास LPG कनेक्शन दिले जाते.
4. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (PMAY-Gramin) योजनेची अपात्रता काय आहे ?
→ pmay-g योजना ज्या उमेदवाराकडे दुचाकी ,चारचाकी ,तीनचाकी अशी वाहने अथवा कृषी उपकरणे किंवा औजारे असतील त्यांना लाभ घेता येणार नाही .
→ ज्या कुटुंबात किमान एक सदस्य सरकारी नोकरीला असेल अथवा त्याची किंवा तिची कमाई मासिक १०००० रु पेक्षा जास्त असेल असे कुटुंब किंवा व्यक्ती अपात्र असेल .
→ आयकर ,व्यावसायिक कर भरणारी व्यक्ती अपात्र असेल.
→ जो व्यक्ती किसान क्रेडीट कार्ड चा लाभ घेतात व त्यांची क्रेडीट कार्ड मर्यादा हि ५०,००० रु पेक्षा जास्त किंवा तेवढीच असेल असा व्यक्ती अपात्र असेल.