प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 बाबत उद्दिष्ट,पात्रता निकष ,आवश्यक कागदपत्रे ,ऑनलाईन ,ऑफलाईन अर्ज प्रक्रिया, योजनेचे व सबसिडीचे फायदे,इतर सर्वसमावेशक माहिती जाणून घ्या.
“सर्वासाठी घरे ” या संकल्पनेवर आधारीत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) केंद्र व राज्य शासनामार्फत राबवीली जात आहे.या योजनेच्या अटी व नियमा नुसार तुम्ही पात्रतेत बसता का ?याचा विचार करून या सर्वाची माहिती मिळवुन या योजनेमार्फत आपल्या निवाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी योजनेचा लाभ घ्यायचा आहे का ? तर चला मग बघूया (PMAY) योजनेची उदिष्टे, पात्रता निकष यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे ,ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज प्रक्रिया ,योजनेचे व सबसिडीचे फायदे व इतर सर्व समावेशक माहिती खालील मुददयांच्या आधारे जाणुन घेवुया .
1.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 योजना परिचय –
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ही एक सरकारी योजना असुन याची सुरूवात 1 जून 2015 रोजी करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागासाठी ही योजना असून या योजनेमार्फत भारत देशातील प्रत्येक राज्य असो किंवा केंद्रशासीत प्रदेश कोणत्याही भागातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य ठेवते व समाजातील दुर्बल घटकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देत आहे.
तसेच खरोखरच वंचित कुटुंब अथवा वैयक्तीक लाभधारक यांना निवाऱ्याची गरज सोडवण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 ही योजना मदत पुरवते .
(PMAY) या योजने अंर्तगत घराचे बांधकाम करणे ,नविन घर खरेदी करणे किंवा जुन्या घराची नुतनीकरण करणे यासाठी आर्थिक मदत व अल्प व्याजदरात गृहकर्ज पुरवठा करण्याचे काम करते.
(PMAY)योजना खुप व्यापक व विस्तारीत स्वरूपाची आहे . तसेच विकासाला चालना देणारी आहे. तसेच राज्यानुसार स्टेट पॉलीसी काय सांगते ते या pdf च्या माध्यमातून तुम्ही योजनेची सविस्तर माहिती मिळवू शकता .या योजनेची उद्दिष्ट नेमकी काय सांगतात ते पुढील मुददयांच्या आधारे पाहुया .
2.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 योजनेचे उद्दिष्ट –
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 या योजनेचे मुख्य उद्दिष्ट कच्च्या व मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या सर्व बेघर कुंटुंबांना मुलभूत सुविधांसह पक्के घर देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे .तसेच इतर उद्दिष्ट पूर्तीसाठी काही महत्वपूर्ण घटक मानले आहेत ते खालील मुददयांच्या आधारे पाहु.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 योजनेत उद्दिष्ट पुर्तीसाठी महत्वपूर्ण मानलेले घटक –
1. झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन :
जमीनीचा साधनसंपत्ती म्हणून वापर करून त्यावरील झोपडपट्ट्यांचा आहे तेथेच योग्य पद्धतीने घरांच्या सुविधा आणी पायाभुत सुविधा देउन पुनर्विकास करणे .
2. महिला व अल्पसंख्याकाचे सशक्तीकरण-
महिला आणि अल्पसंख्याकांच्या व्यवहारात तसेच निर्णय क्षमतेत व राहनीमानात सूधारणा करून त्यांना सक्षम बनवणे व गृहनिर्माण योजनेत समावेश करण्यास प्राधान्य देणे होय.
3. सर्वसमावेशक विकास :
एका विशिष्ट कालावधीत सर्वसामान्य गरजुंना व इतर लाभर्थ्याना सर्वासाठी घरांची खात्री करण्यास व सर्वागिन विकास करण्यास सहकार्य करते .यामुळे राज्यातील सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळत आहे.
4.परवडणारी घरे :
सर्व पात्र लाभार्थ्याना परवडणारी घरे प्रदान करणे .त्यासाठी खाजगी भागीदारी द्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मीती करणे अशा स्वरूपाची कार्य योजनेच्या माध्यमातून केली जात आहेत.
हे देखील पाहा –“सुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती २०२३”-Sukanya Samrudhi Yojana
3. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 अटी –
- प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 योजने अंतर्गत बांधण्यात येणारी घरे कुंटुंबातील कर्ती महिला अथवा कर्ता पुरूष व महिला यांच्या संयुक्त नावावर असतील आणि कर्ती महिला सदस्य नसेल तर कर्ता पुरूष यांच्या नावे असेल .
- लाभधारकांना सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहीत करण्यात येईल .
लाभार्थी कुंटुबामध्ये पति, पत्नी, अविवाहीत मुले यांचा समावेश असेल.
- या योजने अंतर्गत केंद्राकडून अनुदान /सहाय्य प्राप्त करून घेण्याकरिता देशातील कोणत्याही भागात लाभार्थी कुटुंबातील व्यकतीच्या मालकीचे पक्के घर नसावे .
4. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 पात्रता निकष-
(PMAY) योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यकती आणी कुटुंबानी विशीष्ट मार्गदर्शक सुचनेनुसार पात्रता निकष पूर्ण केले पाहीजेत ते निकष
लाभार्थी निकष व उत्पन्नाचे निकष या दोन्ही प्रकारच्या निकषाची सविस्तर माहिती पाहूया.
a )लाभार्थी निकष-
आर्थिक दृष्टया दुर्बल घटक , कमी उत्तपन्न असणारा गट, मध्यम उत्पन्न असणारा गट, एकल किंवा संयुक्त व्यकती वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण झालेल्या व त्या पुढील व्यकती अशा निकषाद्वारे लाभार्थी र्निवड केली जाते.त्याची खालील मुद्द्यांच्या आधारे पडताळणी केली जाते.
- कौटुंबीक स्थिति – (PMAY) योजने अंतर्गत निर्धारीत केलेल्या मापदंडा नुसार पती , पत्नी आणि विवाहीत मुलांचे कुटुंब हे घर मानले जाते.
- या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे भारतातील कोणत्याही भागात त्याच्या नावे किंवा कुटुंबातील सदस्याच्या नावे पक्कया घराची मालकी नसावी .
- तसेच 21 चौरस मीटरपेक्षा कमी पक्के घर असलेल्या लोकांना सध्याच्या घराच्या वाढीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते.
- प्रौढ कमावणारा कुंटुबातील सदस्य असेल तर त्याच्या किंवा तिच्या वैवाहिकस्थितिकडे दुर्लक्ष करून एक वेगळे कुटुंब मानले जाते.
b) उत्पन्नाचे निकष :
- यामध्ये आपण सविस्तर पाहूया
अ.क्र | लाभार्थी श्रेणी | त्यांचे वार्षीक उत्पन्न |
1 | आर्थिक दृष्टया दुर्बल घटक (EWS) | 3 लाख रू पर्यत |
2 | कमी उत्पन्न गट (LIG) | 3 लाख ते 6 लाख रू पर्यत |
3 | मध्यम उत्पन्न गट (MIG -1) | 6 लाख ते 12 लाख रू पर्यत |
4 | मध्यम उत्पन्न गट (MIG -1) | 12 ते 18 लाख रू पर्यत |
5. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 वैशिष्ट्ये-
- 6.50-/- प्रत्येक लाभार्थी ला 20 वर्षाच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 योजने अंतर्गत गृहकर्जावर दिला जाणारा सबसीडी व्याज दर आहे.
- तळमजल्याची व्यवस्था करताना दिव्यांग व्यक्ती व जेष्ट नागरीक यांना प्राधान्य दिले जाईल.
- पर्यावरण पूरक व सुरक्षित असे तंत्रज्ञान वापरून बांधकाम केले जाईल.
- योजनेत पारदर्शक व्यावहारास महत्व दिले आहे.
6. प्रधानमंत्री आवास योजनेच्या नियमातील महत्वाचे बदल-
- प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 योजनेच्या नियमा अंतर्गत जर एखादया लाभार्थी चा मृत्यु झाला तर त्याची मालमत्ता कुटुंबातील सदस्याला भाडेतत्वावर हस्तांतरीत केली जाईल.
- वाटप केलेली घरे जर आपण न वापरता भाडे तत्वावर दिली जात आहेत असे दिसुन आले तर भविष्यात ज्यांना हा करार करून दिला जाईल त्यांची नोंदणी होणार नाही.
- PMAY योजनेअंतर्गत लाभार्थ्याना 5 वर्षासाठी घरे वापरावीच लागणार आहेत त्यानंतर भाडे पुर्ववत केले जाईल.
- शहरी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेले फॅल्ट फ्री होल्ड असणार नाहीत. कारण घरे भाडयाने देत होते ते आता देता येणार नाही.
7. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 मुदत/ वैधता-
- केंद्रीय मंत्री मंडळाने 2021 मध्ये 2.95 कोटी घरे पुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते ते साध्य करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना ही
- दोन विभागा मार्फत काम करत आहे. ते विभाग
- 1.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 –ग्रामीण
- 2.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 – शहरी
- या दोन्ही विभागा मार्फत प्रयत्न करत आहे . त्यानुसार दोन्ही विभागाचा कालावधी हा वेगळा आहे.
- त्यापैकी 1. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) – ग्रामीण ची मुदत 31मार्च 2021 होती परंतु उद्दिष्ट पुर्तीसाठी ती आता 31 मार्च 2024 अशी करण्यात आली आहे.
- तसेच 2. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) – शहरी या विभागाची पुर्वीची मुदत मार्च 2022 होती ती आता डिसेंबर 2024 करण्यात आली आहे.
- मात्र कलम 80 ईईए अंर्तगत ऑफर केलेले फायदे 31 मार्च 2022 रोजी संपले आहेत.या बाबत अदयापही कोणतीही घोषणा नाही.
8.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 गृहकर्जाबाबत तपशील-
- प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 योजने अंतर्गत सर्व गृहकर्ज खाती लाभार्थ्याच्या आधार क्रमांकाशी जोडली आहेत.
- यात मिळणारे अनुदान हे 20 वर्षाच्या कालावधीसाठी आहे.
- कर्जदाराला घेतलेल्या गृहकर्जावर व्याजदर हे संबंधीत बॅकेच्या ठरलेल्या व्याजदराप्रमाणे भरावे लागेल.
- CLSS अंतर्गत व्याज सवलतीचा लाभ आधीच घेतला असेल तर पुन्हा व्याज सवलतीच्या लाभासाठीतो लाभार्थी पुन्हा पात्र नसेल.
9.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 गृहकर्ज देणाऱ्या बॅंकाची यादी-
- एस बी आय बॅंक
- पंजाब नॅशनल बॅंक
- बॅंक ऑफ बडोदा
- एच डी एफ सी बॅंक
- ॲक्सेस बॅंक
- आय डी एफ सी बॅंक
- बंधन बॅंक
- बॅंक ऑफ इंडिया
- आय डी बी आय बॅंक
- कॅनरा बॅंक
10.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 अनुदानाच्या रक्क्मेचा चार्ट-
अ .क्र | कर्जदार प्रकार | CLSS |
1 | EWS | 2.20 लाख रू |
2 | LIG | 2.67 लाख रू |
3 | MIG-1 | 2.35 लाख रू |
4 | MIG-2 | 1.30 लाख रू |
11. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023- CLSS व्याज अनुदान-
अ.क्र | कर्जदार प्रकार | व्याज अनुदान (वार्षीक) | कर्जाची कमाल मर्यादा |
1 | EWS | 6.50-/- | 6 लाख रूपये |
2 | LIG | 6.50 -/- | 6 लाख रूपये |
3 | MIG-1 | 4.00 -/- | 9 लाख रूपये |
4 | MIG-2 | 3.00 -/- | 12 लाख रूपये |
12 .प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 मापदंडानुसार घराचा आकार-
अ.क्र | अर्जदार प्रकार | वार्षीक उत्पन्न | घराचे कार्पेट क्षेत्र मिटर मध्ये | घराचे कार्पेट क्षेत्र फुट मध्ये |
1 | EWS | 3 लाख | 60 | 645.83 |
2 | LIG | 6 लाख | 60 | 645.83 |
3 | MIG-1 | 6-12 लाख | 160 | 1722.33 |
4 | MIG-2 | 12-18 लाख | 200 | 2152.78 |
PM KISAN सन्मान निधी योजना 2023-नविन अपडेटसह संपुर्ण माहिती.
13.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 चे घटक-
1.CLSS-(क्डिट-लिंक सबसिडी योजना )-
नवीन घरे बांधण्यासाठी तसेच राहत्या घराचे नुतनीकरण करण्यासाठी 6 लाख ते 12 लाख् रूपयांच्या गृहकर्जावर कमी व्याजदरावर केंद्रीय अनुदानाची तरतूद करणे.CLSS अंतर्गत लाभार्थ्याना गृहकर्जावर व्याज अनुदान मिळते. ज्यामुळे त्याच्यासाठी घर घेणे अथवा बांधणे आर्थिक दृष्टया शक्य होते.सबसीडी या लाभार्थ्याच्या श्रेणीनुसार बदलतात.
2.BLC- (लाभार्थ्याच्या नेतृत्वाखालील वैयतिक् घर बांधणी अथवा सुधारणा)-
लाभार्थ्याच्या नेतृत्वाखालील बांधकाम लाभार्थ्याना त्यांचे स्वत: चे घर बांधण्यासाठी किंवा घराचे नुतनीकरण हाती घेण्यास सक्षम बनवते तसेच मालकी आणि जबाबदारीची भावना वाढवते.
3.AHP- ( भागीदारीत परवणारी घरे )-
पायाभूत सुविधा सुनिश्चित करून परवडणारे गृहनिर्माण प्रकल्प विकसीत करण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रामधील सहकार्य . थोडक्यात राज्ये केंद्रीय एजन्सीमार्फत किंवा ईडब्ल्यूएस मार्फत श्रेणीसाठी खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून व केद्रीय सहाय्याने परवडणारे गृनिर्माण प्रकल्प उभारणे.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023
4. ISSR ( इन-सीटू झोपडपट्टी पुनविकास )-
झोपडपट्टीयाखालील जमीनीवर पात्र झोपडपट्टी धारकासाठी खाजगी सहभागातून घरे बांधून झोपडपट्टीयाचे पुनर्वसन करणे.
14. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 अर्ज करण्याची पध्दत –ऑनलाईन अर्ज व ऑफलाईन अर्ज-
A) ऑनलाईन अर्ज-
- अधिकृत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 पोर्टल वर जावून
- 1.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 –ग्रामीण
- 2.प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 – शहरी
- दोन्ही विभागाच्या वेबसाईट वर जावून आपली नोंदणी पूर्ण करू शकतात.
- HOME Page वर किल्क करा व
- Citizen Assessment वर किल्क करून
- Apply online या पर्यायावर किल्क करा आणी अचूक तपशीलांसह अर्ज भरा.
B) ऑफलाईन अर्ज-
- अधिकृत कॉमन सविर्हस सेंटर्स (CSCS) दवारे अर्ज करणे यासाठी नाममात्र फी भरावी लागते.
- लाभार्थी स्थिति तपासण्या साठीची पध्दत .
- PMAY वेबसाईटला भेट दया.
- HOME Page ओपन होईल त्यावर किल्क करा.
- लाभार्थी विभागावर किल्क करा.
- सिक्रनवर येणाऱ्या नवीन पेज वर तुमचा आधार क्रंमाक टाका व
- Show या बटणावर किल्क करा.
C) लाभार्थी स्थिती तपासू शकतात
- सबसिडी कॅल्कुलेटर
- सबसिडी किंवा अनुदान कॅल्कुलेटर तपासण्यासाठी प्रथम PMAY योजनेची वेबसाइट ओपन करावी
- सबसिडी कॅल्कुलेटर पर्यायावर किल्क करा .
- नवीन पृष्ठ ओपन होईल त्यात विचारलेली माहिती भरा
- आणी फॉर्म सबमीट करा.
- आता तुम्ही सबसिडी कॅल्कुलेटर तपासु शकता.
D) प्रधानमंत्री आवास योजनेसंबंधीत मोबाईल ॲप डाउनलोड पध्दत
- PMAY च्या वेबसाईटला भेट दया.
- त्यानंतर तूमच्या स्क्रीनवर Home page वर mis Login वर किल्क करा.
- समोर स्क्रीनवर लीस्ट येईल् या लीस्ट मधून PMAY -U पर्यायावर किल्क करा.
- मग Option किल्क करा.
- लगेच मोबाईल मध्ये ॲप डाउनलोड होईल
15. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 हेल्पलाईन क्रमांक-
-प्रधानमंत्री आवास योजने संदर्भात कोणतीही समस्या अथवा माहिती मिळवायची असेल तर हेल्पलाईन क्रंमांक – 011-23060484,011-23063620, 011-23063285 या क्रमांकावरती संपर्क साधून आपल्याप्रश्नांची उत्तरे अथ्रृवा समस्याचे समाधान करू शकतात.
16. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 सध्याचा प्रगती अहवाल – pdf
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 या योजनेच्या कार्याची प्रगती या अहवाला मार्फत पाहु शकतात वविकासाची गतीचा अंदाज लावु शकतात.
17. निष्कर्ष –
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) 2023 या योजनेची सुरूवात 2015 पासून झाली असुन ती डिसेंबर 2024 पर्यत राबवली जाणार आहे . ही योजना 2 विभागामार्फत राबवली जाते ते 1. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तर दुसरी 2. प्रधानमंत्री आवास योजना –शहरी होय.
निवाऱ्यासाठी परवडणाऱ्या घरांना पाठींबा देणे सरकारने हाती घेतले आहे. व सर्वासाठी घरे या संक्लपनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्टया दुर्बल घटक , कमी उत्तपन्न असणारा गट, मध्यम उत्पन्न असणारा गट, एकल किंवा संयुक्त व्यकती ,वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण झालेल्या त्या पुढील व्यकती अशा निकषाद़वारे लाभार्थी र्निवड केली जाते व या योजनेचा लाभ दिला जातो .
अशा प्रकारे योजनेची सविस्तर माहिती आपण घेतली आहेच परंतू या योजने संदर्भात काही अडचण असल्यास तूम्ही आमच्याशी सपंर्क् साधु शकता तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त आपल्या मित्रांबरोबर शेअर करा व या योजनेचा फायदा घ्या .
धन्यवाद !
18 . FAQ –
1. आम्ही BPL धारक नाहीत मग या योजनेचा लाभ मिळू शकेल का ?
- होय -प्रधानमंत्री आवास योजना ही BPL धारकाबरोबर आर्थिक दृष्टया दुर्बल घटक , कमी उत्तपन्न असणारा गट, मध्यम उत्पन्न असणारा गट, एकल किंवा संयुक्त व्यकती ,वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण झालेल्या व त्या पुढील व्यकती अशा निकषाद़वारे लाभार्थी र्निवड केली जाते व या योजनेचा लाभ दिला जातो.
2. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी महिला अर्ज करू शकतात का?
- होय- ही योजना महीला सक्षमीकरणालाच प्राधान्य देते त्यामुळे या योजनेचा लाभ हा प्रथम घरातील कर्ती महिला किंवा जोडीदार महिलेच्या नावे दिला जातो .