PM KISAN सन्मान निधी योजना 2023 शेतकऱ्याचे सक्षमीकरण, ग्रामीण जीवनात परिवर्तन.
नमस्कार मित्रांनो आज आपण PM KISAN सन्मान निधी योजना 2023 या योजनेचे फायदे,पात्रता आणी इतर माहिती तसेच योजना काय आहे, निकष ,नोंदणी कशी करावी आणि इतर संबंधीत माहीती नविन अपडेटसह या सरकारी उपक्रमाबाबत नवीनतम सर्वसमावेशक संपुर्ण माहिती खालील मुददे च्या आधारे जाणुन घेणार आहोत.
“ PM KISAN सन्मान निधी योजना 2023
1) PM KISAN सन्मान निधी योजना 2023 ची ओळख व परीचय –
PM KISAN सन्मान निधी योजना 2023 केंद्र शासना मार्फत भारतातील व अल्प व अल्पभुधारक शेतकऱी कुटुंबांना आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतुने राबवली जाते.या योजनेतून देशातील लहान आणी सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक पाटबळ देण्याचा प्रयत्न केला आहे.
डिसेंबर 2018 मध्ये या योजनेची घोषणा एक प्रमुख कल्याणकारी योजना म्हणून केली .तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मार्गदर्शक तत्त्वा नुसार फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू करण्यात आली . या योजनेची अंमलबजावणी कृषी आणी शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून करण्यात येत आहे.
2) PM KISAN सन्मान निधी योजना 2023उद्देश–
- भारत सरकारने कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणी देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने या सरकारी योजनेची सुरूवात केली आहे.
- शेतकऱ्याच्या होणाऱ्या आत्महत्या कमी करणे.
- शेतकऱ्यांना सावकाराच्या तावडीतून मुक्त करण्याचा या योजनेचा उद्देश आहे.
- PM KISAN सन्मान निधी योजना 2023या योजने अंर्तगत केंद्र शासन दर वर्षी 6000/- रूपये रक्क्म समान तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी 2000/- रूपये प्रमाणे थेट शेतकऱ्याच्या बॅक खात्यात हस्तांतरीत करत आहे .
3) PM KISAN सन्मान निधी योजना 2023 वैशीष्टय व फायदे –
1. वैशीष्टय
- PM KISAN सन्मान निधी योजना 2023 ही इतर योजनेसारखी अनुदानात्मक किंवा कल्याणकारी कार्यक्रमापेक्षा वेगळी आहे. कारण की शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीला प्राधान्य देवुन ,थेट उत्पन्न समर्थन पध्दती मुळे वेगळी आहे.
- या योजनेत पारदर्शकता आहे.
2. फायदे
- सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा आधार देण्याच्या उद्देशाने ज्या कुटुंबांकडे शेतीयोग्य जमीन आहे, अशासाठी सरकारने PM KISAN सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
- शेतकरी बरोबर त्याच्या कुंटुबाला देखील या योजनेचा फायदा होतो.
4) PM KISAN सन्मान निधी योजना 2023 नियम-
- केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या उन्नतीच्या दिशेने टाकलेले एक पाउल आहे.त्यात सर्वाचा समान विचार व्हावा या हेतूने काही नियम लागू केले आहेत ते पाहूया.
- PM KISAN सन्मान निधी योजना 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात अगोदर जमीनीच्या भुखंड क्रमांकानुसार नोंदणी करणे गरजेचे आहे.
- नोंदणी कोण करू शकतो तर अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी जो की २ हेक्टरच्या आत असणारे कुंटुंब होय.तर या योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार कुटुंबाची व्याख्या-पती पत्नी व अल्पवयीन मुले म्हणजे कुंटुंब होय.परंतु कुंटुंब प्रमुखाच्या स्वतच्या नावे जमीन असेल असा शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतो.
- संयुक्त कुटुंबातील शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीनीचे विभाजन होवून त्याच्या नावे जमीन असणे गरजेचे आहे.
- जमीन स्वत: शेतकऱ्याच्या नावे किंवा मालकीची असणे गरजेचे आहे.
- जर एखादा शेतकरी हा शासकीय पदावर असेल आणी जमीन त्याच्या मालकीची असली तरी त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेचा लाभ घेत असलेला शेतकरी किंवा नोंदणी असणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यु झाला तर या योजनेचा लाभ त्याच्या पत्नी व मुलाला मिळेल.
5) PM KISAN सन्मान निधी योजना 2023 पात्रता व निकष-
PM KISAN सन्मान निधी योजना 2023 मार्गदर्शक सुचनानुसार पुढीलप्रमाणे पात्रता ,अपात्रता,निकष पाहुया
पात्रता :
- 2 हेक्टरच्या आतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुंटुंब.
- ग्रामीण भागातील शेतकरी
- शहरी भागातील शेतकरी
अपात्रता :
- संस्थात्मक जमीनधारक शेतकरी .
- 2 हेक्टच्या वरील शेतकरी ज्याची आर्थिक स्थिती उच्च आहे .
- घटनात्मक पदे भूषवलेले शेतकरी
निकष :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या मार्गदर्शक सुचनानुसार केंद्र व राज्य शासन यात येणारे कुटुंबाची ओळख करतील आणी पात्रतेत बसणारी नियमातील निकषानुसार पडताळणी केली जाईल त्यानुसार अशी कुंटुंब या योजनेसाठी पात्र ठरतील .
6) PM KISAN सन्मान निधी योजना 2023 लागणारी आवश्यक कागदपत्रे –
- जमीनीचा सातबारा
- आधार कार्ड
- कोणतेही एक ओळखपत्र – मतदान ओळखपत्र
- बॅक खाते पासबुक
- पत्ता देण्यासाठी पुरावा जसे रेशन कार्ड अथवा विजबील.
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो इत्यादी .
7) PM KISAN सन्मान निधी योजना 2023 नोंदणी प्रक्रिया-
या योजनेची नोंदणी ही ऑनलाइन पध्दतीने केली जाईल त्याची खालील प्रकारे नोंदणी प्रक्रिया पाहू.
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया–
- Google च्या ब्राउजर वर जावून Pm kisan website उघडा .
- त्यामध्ये New Farmer Registration Form open होईल.
- त्यामध्ये आधार क्रं आणी captcha टाकायचा. Captcha म्हणजे समोर दिलेली सांकेतीक अक्षरे किंवा संख्या जशीच्या तशी टाकणे होय.
- त्यांनंतर continue हा पर्याय येईल त्या पर्यायावर किल्क करा.
- Record not found with given details असा मेसेज येईल.
- Ok या पर्यायावर किल्क करायचे.
- त्यांनतर Registration Form open करायचा.
त्यामध्ये शेतकऱ्याची वयक्तीक माहिती भरायची आहे.
- State-
- District – Sub-district –block इत्यादी. सर्व माहीती भरायची .
- त्यांनतर आधार कार्ड नुसार त्यावर नाव असेल तसेच नावाची नोंद करावी .
- त्यांनतर शेतकऱ्यांचा प्रकार निवडायचा म्हणजे
- First – 1 ते 2 हेक्टर दरम्यान शेती असेल तर वर किल्क करा.
- Other – 2 हेक्टर पेक्षा जास्त जमीन असेल तर या पर्यायावर किल्क करा .
- आधार क्रंमाक आपोआप जनरेट होतो .
बॅक खात्याची माहिती भरायची आहे .
- IFSC Code
- Bank Name
- Bank Account No सर्व माहिती सविस्तर भरावी.
- पत्ता टाकुन submit for Adhar authentication वर किल्क करा त्यानंतर एक message येईल yes आधार Authenticated Succesfully.
शेतकरी बाबत इतर माहिती भरा.
- मो. क्रं., जन्मतारीख , आई वडीलांचे नाव ,इत्यादी.
- जमिनीच्या माहितीचा प्रकार सांगायचा आहे.
- Single- जर जमिन एकटयाच्या मालकीची असेल तर या पर्यायवर किल्क करा.
- Joint – सामुहिक मालकिची जमिन असेल तर या पर्यायवर किल्क करा.
Add करून शेतजमिनीची माहिती दयायची आहे.
- सर्वे नं मध्ये सातबाऱ्या मधील 8 अ चा जो क्रंमाक आहे तो टाकायचा आहे.
- गट नं टाकायचा.
- नावावर असणारी शेतजमीन किती हेक्टर आहे ते यात टाकायचे .
- सातबाऱ्यानुसार जमीनीचा आकडा नोंदवा.
- Add या बटनावर किल्क करा.
- जर जमीन वेगवेगळया गट क्रं मध्ये विभागलेली असेल तर पुन्हा Add या बटनावर किल्क करा व माहिती नोंदवा.
- स्क्रीन वर हा certify that all the given detailsare correct मेसेज येइल त्या पर्यायावर किल्क करा
- नंतर self Declaration form वर किल्क करा आपली माहिती वाचू शकता.
- Save वर किल्क करा .
- नंतर स्क्रिन वर मेसेज येईल की ***** हा तुमचा identity proof number आहे नोंदणी यशस्वी रित्या झाली आहे.
- अशा प्रकारे नोंदणी प्रक्रिया पुर्ण होते.
8)PM KISAN सन्मान निधी योजना 2023 नोंदणी नंतर लाभ मिळेपर्यत ची कशी व काय प्रक्रिया असते-
या योजनेतील नियमानुसार पात्र लाभाथ्यार्नी अर्ज करावा लागतो.
- अर्ज केलेले अथवा नोंदणी झालेल्या शेतकरी यांची माहिती पुढील मंजुरी साठी राज्य सरकारकडे पाठवली जाते. ही माहिती समाधानकारक असेल तर योजनेसाठी तुमचा विचार केला जातो अन्यथा अर्ज नाकारला जातो .ज्या त्या राज्यानुसार यावर आधारीत राज्य सरकार हे महसूल नोंदी, आधार क्रं, आणी बॅक खाते क्रंमाक पडताळणी करते.
- राज्य सरकारद़वारे माहितीची पडताळणी होईपर्यंत पैसे येत नाहीत एकदा पडताळणी टप्पा पार पडला की फंड हस्तांतरण ऑर्डर तयार होते आणी मग त्यांनतर केंद्र सरकार ही नियोजीत रक्क्म थेट शेकऱ्यांच्या खात्यात जमा करते.
9) PM KISAN सन्मान निधी योजना 2023 हेल्पलाइन नंबर –
जर आपण या योजने अंर्तगत नोंदणीकृत असाल आणी आपल्या खात्यात 2000/- रू हप्ता येत नसेल किंवा या संर्दभात इतर काही अडचण योजने बाबत येत असेल. तर आपण या टोल फ्री क्रं 1800-115-526 किंवा 011-23381092 वर तसेच किसान हेल्पलाइन नं-155261 यावरती कॉल करून समस्याचे निवारण करू शकता.
10) PM KISAN सन्मान निधी योजना 2023अंर्तगत आलेले पैसे कसे चेक करण्याची पध्दती –
या योजनेचा हप्ता वर्षातुन तिन वेळा जमा होतो.या योजनेचा Quarter नुसार कालावधी आहे. यानुसार पैसे जमा झाले की नाही हे तपासण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
- मोबाईलवरील मेसेज दवारे कळते त्यासाठी मोबाईल ॲप डाउनलोड करावे लागते त्यासाठी या लींकवर किल्क करा.
- किंवा योजनेच्या वेबसाइट वर जावून देखील पाहता येते. ते कसे चेक करावे तर Farmer corner वर किल्क करून Beneficiary status या पर्यायावर किल्क करा
- त्यावरती आधार क्रं, बॅक खाते क्रं किंवा मोबाइल क्रं यापैकी एक पर्याय टाकून Get Data पर्यायावर किल्क करायचे त्यानंतर हप्ता विषयी सविस्तर माहिती मिळते.
11 ) PM KISAN सन्मान निधी योजना 2023 योजनेची लाभार्थी यादी चेक करण्याची प्रक्रिया -(Beneficiary status/ list )
PM KISAN सन्मान निधी योजना 2023 अंर्तगत नोंद झालेल्या शेतकऱ्यांची नाव या योजनेत आहे की नाही याची खात्री करण्यासाठी
Beneficiary status/ list या दिलेल्या लिंक वर किल्क करून आपल्या नावाची खात्री करू शकता.
निष्कर्ष –
PM KISAN सन्मान निधी योजना 2023 ही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी आणी त्याची आर्थिक स्थिरता निश्चीत करण्याचा सरकारचा एक प्रयत्न आहे .
थेट उत्पन्नाचा आधार देऊन ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात गुंतवणूक करण्यास सक्षम करते. त्यामुळे कृषी उत्पादकता वाढते आणी एकुण ग्रामीण विकास होतो.
PM KISAN सन्मान निधी योजना 2023 बाबत अधीक माहिती घेण्यासाठी अधीकृत वेबसाइटला भेट दया व काही समस्या असेल तर आमच्याशी संपर्क साधा व हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा मिळवून देण्यासाठी आपले योगदान वाढवा.
धन्यवाद !
FAQ
1. PM KISAN सन्मान निधी योजना 2023 म्हणजे काय आहे ?
– प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही जगातील सर्वात पारदर्शक व थेट लाभ हस्तांतराची योजना आहे जी शेतक्ऱ्यांना या योजनेतील निकषानुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दिली जाते.
2. PM KISAN सन्मान निधी योजना 2023 योजनेच्या प्रश्नासाठी हेल्पलाईन आहे का?
होय – PM KISAN पोर्टलवर नमुद टोल फ्री क्रं 1800-115-526 किंवा 011-23381092 वर तसेच किसान हेल्पलाइन नं-155261 हेल्पलाईन वरती किंवा ईमेल वरती संर्पक साधू शकता.
3. शेतकरी त्यांच्या PM KISAN सन्मान निधी योजना 2023 योजनेच्या अर्जाची सथती ऑनलाईन चेक करू शकतात का?
होय – लाभाथर् हा PM KISAN या पोर्टलवरून त्यांच्या अर्ज व लाभाची स्थिती पाहु शकतात.
4. PM KISAN सन्मान निधी योजना 2023 योजनेचा लाभ घेण्यासाठीची पात्रता काय आहे ?
- ज्याच्याकडे लागवडीयोग्य जमीन आहे असे आणी अल्प व अत्यल्प भुधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतील .
- 2 हेक्टर जमीन जी लागवडीयोग्य आहे व ती संबंधीत शेतकऱ्याच्या नावे आहे.
- तसेच सरकारच्या मार्गदर्शक सुचना नुसार निकषात व पात्रतेत बसणारे सर्व शेतकरी.
इतर माहीती – “सुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती २०२३”-Sukanya Samrudhi Yojana