सुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती २०२३-Sukanya Samrudhi Yojana

मुलीचे जीवन बदलणारी सुकन्या समृद्धी योजना (SSY)

संपुर्ण माहीती २०२३”

सुकन्या समृद्धी योजना (SSY)सह मुलीचे भविष्य सक्षम करा “.

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

Table of Contents

नमस्कार मित्रांनो आज आपण “सुकन्या समृद्धी योजना(SSY)2023 ची संपुर्ण माहीती” मराठीत घेणार आहोत .तुम्ही विवीध योजनाची माहीती वाचली असेल पण ती एकाच लेखात प्रत्येक पायरीनुसार संबंधीत योजनेची माहीती मीळेल.

पालकांना मुंलीच्या भवितव्याची चिंता सतावत असते ती ‍चिंता दुर करण्यासाठी सुकन्या समृद्धी  योजनेचा लाभ घेवून मुलीच्या उच्चशिक्षणासाठी,आरोग्य ,लग्न कार्य तसेच भवीतव्यासाठी आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना(SSY)फायदा घेवून मुलींसाठी आर्थीक गुंतवणूकीच्या दिशेने एक पाउल होय .

    संबंधीत येाजनेची माहीती  खालील मुद्यांच्या आधारे सवीस्तर पाहणार  आहोत . 

सुकन्या समृद्धी योजना (SSY) संपूर्ण माहिती 2023
       सुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती 2023

  “सुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती २०२३”:-

1.सुकन्या समृद्धी योजना (SSY) परीचय

      सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही एक सरकारी बचत योजना आहे . जी विशेषतः मुलींच्या कल्याणासाठी आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी केलेली आहे.

“बेटी बचाओ, बेटी पढाओ” उपक्रमाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश पालकांना त्यांच्या मुलीच्या भविष्यातील गरजांसाठी, शिक्षण,आरोग्य आणि लग्नाच्या खर्च यासाठी निधी तयार करण्यासाठी प्रोत्साहित करते .

मुलींचे आई वडिल ,पालक यांच्याकडून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ मुलीच्या भविष्यासाठी घेऊ शकतात.

   सुकन्या समृद्धी योजना (SSY)त मुदत ठेवीचा कालावधी मुलीचे सुकन्या समृद्धी खाते उघडण्यापासून २१ वर्ष एवढा आहे. 
   तसेच योजने मघ्ये जमा रक्कमेवर सध्याचा व्याज दर ७.६% टक्के इतका दिला जातो. ज्यावर कर सवलत आहे.
   तसेच भारत सरकारची  शंभर टक्के सुरक्षीत योजना आहे.
   ही योजना सुकन्या समृद्धी खाते आणी पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना  या नावाने देखील चालते.‍

2. सुकन्या समृद्धी योजना ( SSY ) उदेश्य  

  • सुकन्या समृद्धी योजना पालकांच्या मनातील लिंगभेदभाव कमी करण्यात प्रोत्साहन देत आहे.
  • सुकन्या समृद्धी योजना मध्ये मुलीचे सुदृड आरोग्य,उच्च शिक्षण , लग्न इत्यादीच्या माध्यमातुन मुंलीचे जीवनमान उंचावने  .
  • सुकन्या समृद्धी योजना द्वारे मुंलीचे सामाजीक आणी आर्थिक दृष्टया भविष्य सुरक्षित करणे.
  • देशातील मुंलीचा सर्वागीण विकास साधणे .
  • मुंलींना सक्षम आत्मनिर्भर  बनवणे तसेच स्वत:च्या पायावर उभे करणे .
  • मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणी कल्याणासाठी पालकांना छोटी गुंतवणूकीच्या माध्यामातून हातभार .

3. सुकन्या समृद्धी योजना (SSY) वैशीष्ट

  • सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी मुलीच्या जन्मापासुन ते वय  १० वर्षापर्यत खाते उघडता येते आणी  मुदत ठेवीचा कालावधी मुलीचे वय २१ वर्ष एवढा आहे.
  • सुकन्या समृद्धी योजनेचा कालावधी  २१ वर्ष असला तरीही  सुरवातीच्या १५ वर्षांपर्यंत पैसे भरायचे असतात.
  • मुलीचे २१ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर मुलीचे लग्न झाले तर सुकन्या समृद्धी योजना खाते आपोआप बंद होते.
  • मुलीने १८ वर्ष पूर्ण केल्यास, मुलीच्या उच्च शिक्षणासाठी मागील आर्थिक वर्षाच्या शिल्लकवर ५०% रक्कम काढता येऊ शकते.
  • आयकर कायदा १९६१, कलम ८०-सी  या कायद्याअंतर्गत कर भरण्यात पूर्ण सुट मिळवता येते.
  • सुकन्या समृद्धी खाते उघडण्यापासुन ते दरवर्षी कमीत कमी  रुपये २५०/- ते जास्तीत जास्त १,५०,०००/-रक्कम जमा करता येते.
    सुकन्या समृद्धी खात्यात नियमीत रक्कम जमा नाही केली तर खाते बंद होते. मात्र, खाते पुन्हा सुरू करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे 
    ५०/- रुपये दंड भरुन खाते पुन्हा सुरू करता येते.
  • खाते धारकाचा मृत्यू झाल्यास पालकांना व्याजासाहित जमा रक्कम मिळते.
  • भारत सरकारची १००% सुरक्षित योजना आहे.

4. सुकन्या समृद्धी योजना (SSY) गरज

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

         सुकन्या समृद्धी योजना (SSY) आर्थिक सक्षमीकरणासाठी आशेचा किरण आहे .कुटुंब लहान असो वा मोटे सर्वत्र मुलीचे शिक्षण ,आरोग्य, लग्न या कार्यासाठी मुलीच्या पालकांना पैशाची तडजोड करने गरजेचे असते .परंतु घर खर्च यामुळे पैशाची बचत करणे अवघड जात. किंवा काही वेळा पगार कमी असणे ,अथवा रोजगार नसणे किंवा उत्पन्न पुरेसे नसणे याचा परिणाम इच्छा असताना सुदा पैशाची बचत  होत नाही .

मुलीना  शिक्षण पुर्ण करता  येत नाही , योग्य व चांगला जोडीदार ही मिळत नाही .या  होणाऱ्या परिणामाची सोडवणुक करण्यासाठी ही योजना गरीब आणी गरजु कुटुंबासाठी अत्यंत फायदयाची ठरत आहे. आणी यातुन मुलींच्या उज्जवल भवितव्याचे स्वप्न साकार होत आहेत.

5. सुकन्या समृद्धी योजनाची(SSY) पात्रता आणी वयोमर्यादा

  • सुकन्या समृद्धी योजनेचा लक्षगट हा भारत देशातील आणी सर्व राज्यातील शुन्य (०)ते १० वर्ष वयाच्या मुली आहेत.
  • एका कुटुंबातील २ मुली किंवा जर मातेच्या दुसऱ्या प्रसुती दरम्यान जर जुळया मुली झाल्या तर अशा एका कुटुंबातील तिन मुलींना या योजनेचा लाभ  मिळेल परंतू त्यासाठी मातेच्या प्रसुतीचे वैदयकीय प्रमाणपत्र आणी आई वडीलांचे शपथपत्र दयावे लागते.
  • मूलीच्या जन्मापासून ते वय वर्ष १० च्या आत  असणे बंधनकारक .

6. सुकन्या समृद्धी योजना ( SSY )चे फायदे

  1. उच्च-व्याजदर: SSY आकर्षक व्याजदर देते, जे इतर अनेक बचत योजनांपेक्षा जास्त आहे.
  2. कर लाभ: SSY साठी केलेले योगदान कलम 80C अंतर्गत कर कपातीसाठी पात्र आहेत.
  3. लवचिक ठेव पर्याय: पालक किंवा पालक त्यांच्या सोयीनुसार वेगवेगळ्या रकमा जमा करू शकतात, जोपर्यंत किमान निकष पूर्ण केले जातात.
  4. मॅच्युरिटी बेनिफिट्स: मॅच्युरिटी झाल्यावर, जमा झालेली रक्कम व्याजासह मुलीला दिली जाते.
  5. आंशिक पैसे काढण्याची सुविधा: मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर, तिच्या शिक्षणाच्या गरजांसाठी आंशिक पैसे काढण्याची परवानगी दिली जाते.
  6. तसेच  “आम आदमी विमा योजने अंतर्गत” सदर मुलीच्या नावे जमा केलेल्या रक्कमेतून  १०० रु प्रमाणे हप्ता जमा केला जातो. व मुलीच्या कमावत्या पालकांच्या नावे विमा उतरवला जातो.त्यामुळे पालकांच्या अपघात किंवा अकाली मुत्यू आल्यास लार्भार्थ्याच्या वारसाला किमान ३०,००० /- रक्कम ते ७५,०००/- रक्कम  पर्यत आर्थिक मदत दिली जाते.
  7. मुलीला दत्तक घेतलेले असल्यासही या योजनेचा लाभ घेता येतो.

7. सुकन्या समृद्धी योजना ( SSY )चे नुकसान

    1. सुकन्या समृद्धी योजनेचा गूंतवणूक कालावधी खुप मोठा आहे .
    2. “सुकन्या समृद्धी योजना ( SSY )च्या जमा रक्कमेवर मिळणारे व्याजदर हे  या योजनेच्या धोरणात ठरावीक नसुन ते कमी जास्त स्वरुपात होत राहाते जसे -२०१५ साली जमा रक्कमेवर व्याजदर हे ९.२ टक्के होते तर आता सध्या ते ७.६ एवढे आहे.
    3. अडचणीच्या वेळेला तीव्र स्वरुपाची गरज असली तरी पैसे काढता येत नाहीत.

8. सुकन्या समृद्धी योजना ( SSY )च्या अटी  व नियम

  • मुलीच्या जन्मापासून ते वय १० वर्षापर्यत म्हणजेच १० वयाच्या आतील मुलींनाच लाभ  ‍मिळेल.
  • एका कुटंबातील फक्त २ मुंलीनाच लाभ घेता येईल आणी दोन्ही खाती स्वंतत्र काढावी लागतील.
  • जर मातेच्या दुसऱ्या प्रसुती दरम्यान जर जुळया मुली झाल्या तर अशा एका कुटुंबातील तिन मुलींना या योजनेचा लाभा मिळेल परंतू त्यासाठी प्रसुतीचे वैदयकीय प्रमाणपत्र आणी आई वडीलांचे शपथपत्र दयावे लागते .
  • सुकन्या समृद्धी योजनाचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये काढावे लागते .
  • मुलीच्या नावे खाते उघडल्यापासून ते १५ वर्ष वार्षीक हप्ता भरावा लागतो आणी हप्त्याची रक्कम ही २५० रक्कम पासून ते १,५०,०००/- पर्यंत  भरता येते .तसेच ती जमा रक्कम ही खाते उघडयापासून ते मुलीचे २१ वय पूर्ण हाेईस्तव गुंतवणूक करुन ठेवावी लागते .
  • मात्र या मध्ये मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर तिच्या उच्च शिक्षणासाठी गंतुवणुकीच्या ५० टक्के रक्क्म काढता येते.

9 .सुकन्या समृद्धी योजना (SSY)साठी लागणारी कागदपत्रे

  • सुकन्या समृद्धी योजनेचा अर्ज
  • मुलीच्या जन्माचा दाखला.
  • पॅन कार्ड.
  • आधार कार्ड.
  • मतदान ओळखपत्र.
  • आई विडीलांचे रहीवासी प्रमाणपत्र.
  • पत्यासाठी रेशन कार्ड किंवा विजबील.
  • जूळया किंवा तिळया मुलींचा जन्म झाल्यास वैदयकीय प्रमाणपत्र .

10.सुकन्या समृद्धी योजना (SSY)चे खाते कुठे काढावे

         सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुख्यत पोस्ट ऑफिस मध्ये उघडले जाते आणी सर्व राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडले जातील .

 A) संबंधीत राष्ट्रीयकृत बँकेची यादी खालीलप्रमाणे.

  1. पोस्ट ऑफिस सुकन्या समृद्धी खाते (SSA) नियम 2019 नुसार  पोस्ट ऑफिस योजना 
  2. भारतीय स्टेट बँक-
  3. बँक ऑफ  इंडिया,
  4.  इंडीयन बँक,
  5. बँक ऑफ बडोदा,
  6. पंजाब नॅशनल बँक,
  7. बँक ऑफ महाराष्ट्र सुकन्या समृद्धी योजना (SSY)साठी अर्ज 

इत्यादी बँकामध्ये आपण सुकन्या समृद्धी योजनाचे खाते उघडू शकतो .

  1.  सुकन्या समृद्धी योजना (SSY) Form pdf

B)  सुकन्या समृद्धी योजना (SSY) साठी अर्ज कसा करावा ?

    सुकन्या समृद्धी योजना (SSY)साठी अर्ज करताना एक सरळ प्रक्रिया समाविष्ट आहे.
  1. जवळच्या अधिकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसला भेट द्या.
  2. सुकन्या समृद्धी योजना (SSY) खाते उघडण्याचा फॉर्म भरा.
  3. आवश्यक कागदपत्रे सबमिट करा: मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पालक/कायदेशीर पालकांचे KYC इत्यादी दस्ताऐवज.
  4. खाते सक्रिय करण्यासाठी  रक्क्म 250 रु किंवा त्याहून अधिकची प्रारंभिक ठेव करा.

11.सुकन्या समृद्धी योजना (SSY)च्या खात्यात पैसे भरण्याची पध्दत

  1. सुकन्या समृद्धी योजनात १५ वर्षापर्यत वार्षीक किंवा  मासीक हप्ता भरणे.
  2.   हप्ता रोख रक्कमेद्वारे ,
  3.   चेकद्वारे ,
  4.   डिमांड ड्राप्ट द्वारे,
  5.  तसेच ऑनलाईन पण भरु शकता .

12.सुकन्या समृद्धी योजना (SSY)चे जमा रकमेवरील व्याजदर

       “सुकन्या समृद्धी योजनाच्या जमा रक्कमेवर मिळणारा सध्याचा व्याजदर ७.६ टक्के इतका  आहे. आणी पुढील व्याजदराबाबत सांगायचे तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेवर व्याजदराचा दर अंवलंबुन असतो .

योजनेत कुठेच दिल्या जाणाऱ्या व्याजदरा बाबत असे निश्चत केलेले नाही. त्यामुळे मिळणारे व्याजदर हे कमी होईल किंवा जास्त होईल.प्रत्येक  आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यात व्याजदर जमा केले जाते.मागील व्याजदर हे खालील प्रकारे पाहु .

सुकन्या समृद्धी योजनेचा मागील व्याजदर

२०१५९.१
२०१६८.६
२०१७८.१
२०१८८.१
२०१९८.५
२०२०७.६
२०२१७.६
२०२२७.६
२०२३७.६

13.सुकन्या समृद्धी योजनेच्या(SSY) मुदतीपर्वी पैसे कसे व कधी काढता येतात

खातेदार मुलीचे वय १८वर्ष पूर्ण झाल्यानंतर मागील आर्थिक वर्षातील  ‍शिल्लक रक्कमेच्या ५० टक्के रककम काढता  येते उदा- पूढील    शिक्षणासाठी  वर्षातून एकदा रोख रककम काढता येते.

14.सुकन्या समृद्धी योजनेमध्ये(SSY) मुदतपूर्तीपूर्वी येणाऱ्या अडचणी ‍आणी उपाय

१. अकाली मृत्यूसुकन्या समृद्धी योजना (SSY)या योजनेच्या मुदतपूर्तीपूर्वी आधी जर खातेदाराचा मृत्यू झाला तर खाते बंद होते परंतु मृत्यूबाबत संबंधीत लागणारी कागदपत्रे सादर केल्यास जमा रक्कम ही व्याजासह खातेधारकांच्या पालकांना अथवा जो कोणी  वारस असेल त्यांना दिली जाते.

२. नियमीत  हप्ता न भरलेस खाते बंद होणेसुकन्या समृद्धी योजना (SSY) खात्यात २५०/- रु पासुन ते १,५०,०००/- रु पर्यत जी ठरलेली हप्त्याची रक्कम नाही भरली तर खाते बंद होते परतु खाते पुन्हा सुरु करता येते पण त्यासाठी ५०/-  रु प्रमाणे वार्षीक दंड भरावा लागतो.जर दंड भरला नाही तर सुकन्या समृद्धी योजना (SSY) खात्यात जमा रक्कमेवर पोस्ट ऑफिस च्या बचत खाते प्रमाणे ४ टक्के व्याज मिळते व खाते बंद होते.

15.सुकन्या समृद्धी योजना (SSY)चे खाते स्थलांतराची प्रक्रीया

  • आपण काही कारणास्तव गाव ,शहर सोडतो यामुळे बँकेचा व्यवहार असो किंवा पोस्ट ऑफिसचा व्यवहार असो यात सर्वात मोठा अडथळा येतो . तेव्हा खाते स्थंलातराची प्रक्रीया करावी लागते.
  • त्याचप्रमाणे सुकन्या समृद्धी योजनेचे खाते देखील स्थलांतरीत करता येते एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये तसेच एका बँकेतून दुसऱ्या बँकेत स्थलांतरीत करता येते.
  • स्थलांतराची प्रकीया ही ऑनलाईन आणी ऑफलाईन दोन्ही प्रकारे करता येते .

16.निष्कर्ष –

मित्रांनो या पोस्ट मध्ये आम्हीसुकन्या समृद्धी योजना (SSY)संपुर्ण माहीती २०२३” ही प्रत्येक टप्यानुसार आपल्याला आवश्यक असणारी सर्व  माहीती दिली आहे.

या योजनेचा लाभ घेताना सर्व माहीती असल्यास कुठेही  समस्या उद्भवणार नाही. आणी अडचण आली तर त्यावरती या माहीतीच्या आधारे आपण मात करु शकता .या योजनेचा फायदा मुलीच्या उज्जवल भवीतव्यासाठी तिच्या उच्च शिक्षण ,आरोग्य, व लग्न कार्यासाठी घेवू शकता .

सुकन्या समृद्धी योजना तुम्हाला तिच्या यशाचा मार्ग मोकळा करण्याचे सामर्थ्य देते. उज्वल उद्यासाठी आजच गुंतवणूक सुरू करा!

जर या व्यतीरीक्त तुम्हाला काही मूददे सुचवायचे असतील किंवा या पोस्ट बददल काही समस्या असेल  तर आम्हाला सूचवू शकता आणी ही माहीती तुमच्या मित्रा बरोबर शेअर करायला विसरु  नका .

या वेबसाइटला भेट दिल्या बददल धन्यवाद!

लवकरच भेटुया एका नविन पोस्ट सोबत .  

FAQ – वारंवार विचारले जाणारे प्रश्न :-

1. मी माझ्या मुलीसाठी एकापेक्षा जास्त सुकन्या समृद्धी योजना (SSY) खाते उघडू शकतो का?
उत्तर- होय, एक कुटुंब दोन मुलींसाठी जास्तीत जास्त दोन सुकन्या समृद्धी योजना(SSY)खाती उघडू शकते.
2. सुकन्या समृद्धी योजना (SSY) अंतर्गत आंशिक पैसे काढण्याची परवानगी आहे का?
उत्तर- होय, खातेधारकाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण किंवा लग्नासारख्या विशिष्ट हेतूंसाठी अंशतः
पैसे काढण्याची परवानगी आहे.
3. खातेदार एनआरआय झाल्यास काय होईल?
उत्तर- खाते उघडल्यानंतर खातेदाराने एनआरआय दर्जा प्राप्त केल्यास, ते त्या दिवसापासून बंद मानले जाते आणि 
पोस्ट ऑफिस बचत खात्यानुसार व्याज दर लागू होतो.
4. एखाद्या विशिष्ट वर्षात मी किमान रक्कम जमा करू शकलो नाही तर?
उत्तर- किमान वार्षिक ठेव निकष पूर्ण न केल्यास दंड आकारला जातो. तथापि, दंड भरल्यानंतर खाते सक्रिय राहते.
 

Leave a comment