ladki bhahin yojna मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना e-kycआत्ता दरवर्षी करने बंधनकारक.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासाकरिता आणि आर्थिक स्वतंत्र्याकरिता तसेच त्यांची कुटुंबातील भूमिका हि निर्णायक करण्याकरिता आणि त्यांचे आरोग्य व पोषण मजबूत करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २८ जून २०२४ च्या शासन निर्णय मान्यतेनुसार सुरु केली आहे तेंव्हापासून हि योजना राबवली जात आहे .
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र मिहीलाना दर महिना रु.१,५००/- देण्यात येतो आणि तो आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट DBT द्वारे दिला जातो .त्यानुसार पात्र महिलांना आजपर्यंत एकूण १३ हप्ते मिळाले आहेत .जून २०२४ ते जुलै २०२५ या कालवधीत सुमारे १९,५००/- रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. पुढील लाभ मिळण्याकरिता मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना e-kyc सुरु करणे बाबत १८ सप्टेंबर २०२५ चा Gr आला .त्यानुसार लाडकी बहिण योजनेंतर्गत आत्ता दरवषी जून महिन्यात ekyc करणे बंधनकारक असणार
त्याकरिता महाराष्ट्रातील सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना या योजनेची website जाऊन e-kyc करणे बंधनकारक करण्यात आले आहे .त्याकरिता तुंम्हाला सदर योजनेचा website वरती जाऊन e-kyc करावी लागणार आहे , Ladki Bahin Yojna eKYC Online: ई-केवायसी ऑनलाईन कशी करावी इत्यादी प्रश्नाची उत्तरे आपण खालीलमुद्याच्या आधारे पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी तुम्हाला तुम्ही पात्र यादीत आहात कि नाही याकरिता योजनेतील लाभार्थीकरिता पात्रतानिकष काय हे पाहावे लागेल .
चला तर मग मैत्रिनिनो आपण मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनाची सविस्तर माहिती खालील मुद्यांच्या आधारे घेऊया .
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना पात्रता निकष :-
- अर्जदार महिला असावी .
- महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी .
- अर्जदाराचे वय किमान १८ ते कमाल ६५ वर्षाच्या आत असावे .
- तिचे बँक खाते हे आधार लिंक असावे .
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे रु.२,५०,०००/- च्या मर्यादेत असावे .
- अर्जदार हा एक कुटुंबातील-विवाहित स्त्री.-विधवा महिला .- घटसस्फोटीत महिला .- निराधार महिलाआणि एक अविवाहित महिला .अशा प्रकारे वरील संबधित पात्रतेच्या निकषात बसणाऱ्या सर्व महिलांना लाभ मिळवता येतो .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र लाभार्थी यादी तपासा .
Ladki Bahin Yojna eKYC Online: ई-केवायसी ऑनलाईन कशी करावी .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी e-kyc माध्यमातून Aadhaar Authentication करण्यास कालच्या शासन निर्णयानुसार मान्यता दिली आहे त्यानुसार सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात ekyc करणे बंधकारक असणार आहे .
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना सदर योजनेच्या अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल कनवा आधार अधिप्रमाणन करल असे स्पष्ट नमूद केले आहे .
ladki bhahin yojna मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना e-kycकधी करावी ?

- राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना सदर योजनेंतर्गत पात्र लाभार्थीची e-kyc दरवर्षी जून महिन्यात करायची आहे . आणि चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून २ महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधकारक आहे .
- सदर योजनेचे वेब पोर्टल वर e-kyc ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे .त्यानुसार या web portal वरती जाऊन तुम्हाला e-kyc करावी लागणार आहे .
- ekyc काय तर आधार पडताळणी आणि प्रमाणीकरण e-kyc मध्यातून Aadhaar Authentication करणे होय .
ladki bhahin yojna मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना e-kyc कशी करावी?
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनाबाबत लाभार्थ्यांना प्रत्यक्षात e-kyc कशा प्रकारे करायची याबाबत माहितीचा Flowchart दिला आहे .तो खालीलप्रमाणे पहा.
- पात्र लाभार्थींनी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना https://ladkibahin.maharashtra.gov.in या website ला भेट द्या.
- ladki bhahin yojna e-kyc link: https://ladkibahin.maharashtra.gov.in
- मुखपृष्ठ वरील e-kyc Banner वर Click करा .
- e-kyc फॉर्म उघडेल –या फॉर्म मध्ये लाभार्थींनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक कोड (Captcha) टाका आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून Send OTP बटनावर click करा .
- आपली e-kyc या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल .
दोन प्रकारचे संदेश येतील १. e-kyc आधीच प्रून झाली आहे असा संदेश प्राप्त होईल .
२. किंवा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल .
३. त्यानंतर आधार क्रमांक लाभार्थीच्या मंजूर यादीत आहे कि नाही , हे तपासले जाईल .
४. लाभार्थीच्या Aadhaar Linked मोबाईलवर प्राप्त झालेला OTP स्क्रीनमध्ये टाकून submit बटनावर click करा .
५. नंतर e-kyc पृष्ठावर पती/वडील याचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड (captcha)नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरण संमती दर्शवून Send OTP बटनावर click करा .
६. नंतर पती/वडील यांच्या (Aadhar Linked ) मोबईलवर प्राप्त झालेला OTP –स्क्रीनवर टाकून submit बटनावर click करा .
७. यानंतर लाभार्थ्याने
– जात प्रवर्ग निवडायचा आहे .
– खालील बाबी प्रमाणित कराव्यात .
१. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी महणून सरकारी विभाग /उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकार च्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत .(होय/नाही)
२.माझ्या कुटुंबातील केव १ विवाहित आणि १ अविवाहित महिला लाभ घेत आहे ?(होय /नाही )
८. शेवटी “ success तुमची e-kyc पडताळणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.” असा संदेश येईल .
अशा प्रकारे तुमची मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजना e-kyc प्रकिया करायची आहे आणि ती बंधनकारक आहे तेव्हासंबंधित योजनेच्या webportal ला भेट ध्या आणि या बाबत सविस्तर माहिती घ्या .
धन्यवाद !