Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना महाराष्ट्र मराठी माहिती.

सदर योजना भारत देशातील गर्भवती महिला ,स्तनदा माता, आणि नवजात बालके यांच्या आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिने त्यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहन देण्याच्या दुष्टीने केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने मातृ वंदना योजना संपूर्ण देशात दिनांक १जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित केली आहे .

Table of Contents

भारत देशातील दारिद्रय रेषेखालील आणि दारिद्रय रेषेवरील बऱ्याच महिलांना गरोदरपणात शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी जावे लागते आणि काम करावे लागते.आणि एवढेच नाही तर त्यांना लगेच प्रसूती झाली कि शारीरिक क्षमता नसताना सुद्धा मोलमजुरी करावी लागते.याकारणामुळे अशा गर्भवती महिला आणि माता कुपोषित राहतात यामुळे त्याच्या आणि त्याच्या बालकाच्या आरोग्यावर परिणाम होतो.याचा परिणाम बालमृत्यू आणि मातामृत्यू होतो .तसेच या मृत्यू दरात वाढ होत राहते. सदर दर कमी करण्यासाठी तसेच त्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ,त्यांना सकस आहार घेण्यास प्रोत्साहन देण्याकरिता हि योजना सुरु करण्यात आली आहे .

चला तर मग आज आपण Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना योजनेची सविस्तर माहिती खालील मुद्यांच्या आधारे घेवूया .

Ladki Bahin Yojna Jully 13 Installment: लाडकी बहिण योजना जुलैचा १३ हप्ता रुपये १५००,पात्र महिलांची यादी पाहा .

Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाचे ध्येय :-

  • गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांचे आरोग्य सुधारणे .
  • नवजात बालकांचे आरोग्य सुधारणे .
  • गर्भवती महिला आणि स्तनदा माता सकस आहार घेण्यास प्रोत्साहन देणे.
  • जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचे आरोग्य सुधारणे .
  • माता आणि बालक मृत्यू दर कमी करणे आणि तो नियंत्रणात ठेवणे .
  • लिंग गुणोत्तर सुधारणे स्त्री जन्माचे स्वागत करण्यास प्रोत्साहन देणे .
  • आरोग्य संत्स्थांच्या सुविधांचा लाभ घेण्यास प्रोत्साहन देणे आणि संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढवणे .
  • नवजात बालकांच्या जन्माबरोबर जन्म नोंदणीचे प्रमाणात देखील वाढ करणे .

PMMVY योजनेची उद्दिष्ट्ये कोणती ?

  • Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सदर योजनेचे मुख्य उद्दिष्ट गरोदर महिला आणि स्तनदा माता यांचे आरोग्य व पोषण सधारण्याकरिता त्यांना आर्थिक सहाय्य देणे .
  • प्रसूतीदरम्यान लागणाऱ्या आरोग्य सुविधांचा वापर आणि प्रसुतीनंतर पुरेसा आराम याकरिता सदर लाभार्थीस प्रोत्साहन देणे .
  • मुलीच्या जन्माचे स्वागत होण्यासाठी या योजनेद्वारे समाजात सकारात्मक वातावरण तयार करणे .

योजनेचा लाभ मिळण्याकरिता लाभार्थीची पात्रता :-

  • Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सदर योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्या महिलांचे कौटुंबिक उत्पन्न रु.८ लाखापेक्षा कमी आहे .अशा मिहिलांना लाभ घेता येईल .
  • अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला लाभ घेऊ शकतात .
  • ज्या महिला ४०% किंवा पूर्णतः दिव्यांग आहेत अशा महिला लाभ घेऊ शकतात .
  • दारिद्रय रेषेखालील शिधापत्रिकाधारक महिला लाभ घेऊ शकतात .
  • आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY ) अंतर्गत महिला लाभ घेऊ शकतात .
  • ई-श्रम कार्ड असणाऱ्या महिला देखील लाभ घेऊ शकतात .
  • किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी सुद्धा लाभ घेऊ शकतात .
  • मनरेगा जॉब कार्ड असणाऱ्या महिला देखील सदर योजनेचा लाभ घेऊ शकतात .
  • गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तसेच आशा कार्यकर्ती या देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
  • अन्नसुरक्षा कायदा २०१३ अंतर्गत रेशनिंग कार्ड धारक महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

अर्जासोबत जोडवयाची कागदपत्रे ?

  • लाभार्थी आधार कार्ड किंवा (आधार नोंदणी EID )
  • पूर्ण भरलेले माता आणि बाल संरक्षण कार्ड (यामध्ये शेवटच्या मासिक मळीचा दिनांक ,गरोदर पणाची नोंदणी दिनांक ,आणि प्रसूतीपूर्व तपासणीच्या नोंदी असणे गरजेचे असेल ).
  • लाभार्थीच्या नावचे बँक पासबुक ची झेरॉक्स प्रत .
  • बाळाचे जन्मनोंदणी प्रमाणपत्र .
  • माता आणि बाल संरक्षण कार्ड वर बाळाच्या लाशीकरण केलेल्या नोंदी अअसलेल्या पानाची झेरॉक्स प्रत .
  • गरोदरपणाची नोंदणी केलेला RCH पोर्टल मधील लाभार्थी नोंदणी क्रमांक .
  • लाभार्थी स्वत:चा किंवा कुटुंबातील सदस्यांचा मोबाईल क्रमांक .
  • तसेच Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेत वेळोवेळी विहित केलेले अन्य कागदपत्रे .

जुनी PMMVY CAS योजना लाभाचे स्वरूप :

  • Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाचा लाभ घेण्याकरिता शासनाच्या अधिसूचनेनुसार शासकीय रुग्णालयात नोंदणी केलेल्या गर्भवती महिलेस पहिल्या जीवित अपत्यापुरताच एकदाच लाभ लागू होता आणि लाभाची रक्कम रु.५०००/- इतकी होती.
  • तसेच वेतनासह मातृत्व रजा मिळणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ लागू नव्हता .
  • मिळणारा लाभ हा तीन टप्प्यात महिलेच्या थेट सलंग्न खात्यात किंवा पोस्ट ऑफिस मधील खात्यात जमा केला जायचा (DBT-Through PFMS)
  • पहिला टप्पा – रु १०००/- मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसात गर्भ धारणा नोदणी केल्यानंतर जमा होतो .
  • दुसरा टप्पा – रु २०००/- किमान एकदा प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास गर्भ धारणाचे ६ महिने पूर्ण झाल्यानतर दुसरा हप्ता लाभार्थ्यास दिला जायचा .
  • तिसरा हप्ता –रु २०००/- प्रसुतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंद्दनी व बालकास बीसीजी,ओपीव्ही झिरो,तसेच पेन्टाव्हालेन्ट व ओपीव्ही चे ३ मात्रा अथवा इतर लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तिसरा हप्ता दिला जायचा .

Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजनाच्या या निधी करिता केंद्र शासनाचा ६०% निधी तर ४०%निधी हा राज्य शासनाचा दिला जायचा .

नवीन Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना -२.० योजना

सदर योजना केंद्र शासनाच्या दिनांक १४ जुलै २०२२ रोजीच्या पत्रानुसार सदर योजना नव्या स्वरुपात देशात लागू करण्यात आली .सदर योजनेमध्ये पूर्वी केवळ पहिल्या अपत्यासाठी लाभ मिळत असून आता नवीन मार्गदर्शक सूचनानुसार दिनांक १ एप्रिल २०२२ नंतर दुसरे अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतर च्या लाभा लाभार्थीच्या या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे .

Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सदर योजनेंतर्गत मिळणारा लाभ आणि त्याचे वितरण :

  • सदर योजनेतर्गत पात्र लाभार्थी महिलेने विहित अटी ,शर्ती आणि कागदपत्रांची पूर्तता केल्यास तिला पहिल्या अपत्याच्या वेळी रु ५०००/- ची रक्कम दोन हप्त्यात दिली जाते तर दुसरे अपत्याच्या वेळी मुलगी झाल्यास मुलीच्या जन्मानंतर एकाच टप्प्यात रु.६०००/- चा लाभ तिच्या आधार सलंग्न बँक खात्यात किंवा पोस्ट ऑफिस च्या खात्यात DBT द्वारे जमा केला जातो .
टप्पाअटपहिल्या अपत्यासाठीदुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर
पहिला टप्पा· राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार शासकीय रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी केलेल्या शेवटच्या मासिक पाळीच्या तारखेपासून ६ महिन्याच्या आत किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी केल्यास .

1. बाळाची जन्म नोंदणी

२. बालकास व बालकास बीसीजी,ओपीव्ही झिरो तसेच पेन्टाव्हालेन्ट व ओपीव्ही चे ३ मात्रा अथवा समतुल्य/पर्यायी लसीकरनाचे चक्र पूर्ण करणे आवश्यक .

रु.३०००/-एकत्रित रु.६०००/-

1. बाळाची जन्म

तसेच नोंदणी

२. बालकास व बालकास बीसीजी,ओपीव्ही झिरो पेन्टाव्हालेन्ट व ओपीव्ही चे ३ मात्रा अथवा समतुल्य/पर्यायी लसीकरनाचे चक्र पूर्ण करणे आवश्यक .

  • पहिल्या बाळाच्या वेळीच्या नोंदीसाठी शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून ५७० दिवसांच्या आत तर दुसरे जिवंत अपत्य मुलगी असलेल्या मातांनी मुलीच्या जन्म दिनांकापासून २७० दिवसांच्या आत लाभासाठी सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून लाभ प्राप्त करू शकतात .
  • विहित मुदतीनंतर संगणक प्रणालीद्वारे form स्वीकरला जात नाही .
Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अर्ज कसा करायचा :

Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना फॉर्म :-

Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना फॉर्म
Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)-प्रधानमंत्री मातृ वंदना योजना फॉर्म

Leave a comment