मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2025 चा हप्ता बाबत New Update :-
NEW UPDATE :-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2025 चा हप्ता बाबत New Update महाराष्ट्र शासना तर्फे चालवण्यात येणारी महत्वपूर्ण अशी योजना आहे . त्यासंदर्भात शासनाची नवीन अपडेट आली आहे. 30 जुलै २०२५ चा महाराष्ट्र शासनाचा जीआर आलेला आहे की सदर योजनेचा जुलै चा हप्ता शासन निर्णयानुसार ८ ते १० दिवसात पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे .अशी माहिती महिला व बाल विकास विभगाच्या मंत्री अदिती तटकरे यानी जाहीर केले आहे .
सदर योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै चा हप्ता दरमहा १५०० रुपये प्रमाणे लाडक्या बहिंनीसाठी ८ ते १० दिवसात त्याच्या खात्यात वर्ग करण्यात येईल परंतु ज्या महिलांना जून महिन्याचा रुपये १५०० हजार हप्ता मिळाला होता त्याच महिलांना हा हप्ता दिला जाणार आहे .त्यासंदर्भात तसा 30 जुलै २०२५ चा महाराष्ट्र शासनाचा जीआर आलेला आहे.
सन २०२५ या आर्थिक वर्षाकरिता असणाऱ्या बजेटची तरतूद त्यातून या योजनेकरिता शासनाने अनुदान रु.२८२९०.०० कोटी इतक्या रुपयाचे अनुदान मागणी केले होते. परंतु अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रु.२९८४.०० कोटी इतका निधी मंजूर झाला आहे .त्यानुसार पात्र लाभार्थीच्या आधार सलंग्न बँक खात्यात लाभ हस्तांतरणाद्वारे (Direct Benefit Transfer ) मासिक १३ वा हप्ता रुपये १५००/- जमा करण्यात येणार आहे .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana
जुलै महिन्याच्या १३ व्या हप्ता करिता रु,२९८४ कोटीचा निधी वर्ग :-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2025 चा हप्ता बाबत New Update सदर योजनेतील सर्व लाभार्थी पात्र महिला २१ते ६५ वयोगटातील असून त्यांना दरमहा रुपये १५००/- देण्यात येतात .सदर योजना २०२४ पासून सुरु करण्यात आली आहे त्यानुसार जून २०२४ पासून ते आजतागायत म्हणजे जुलै २०२५ यादरम्यान १३ व हप्ता असून त्याची तरतूद शासनाने केली आहे .
योजनेंतर्गत अपात्र लाभार्थीबाबत निर्णय काय ?
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2025 चा हप्ता बाबत New Update सदर योजनेबाबत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अशी माहिती जाहीर केली आहे कि ,जून महिन्यात केलेल्या अर्जाच्या छाननीनुसार २६.३४ लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत .त्यानुसार त्यांचा जून महिन्याचा हप्ता देखील स्थगित करण्यात आला आहे .
- जून महिन्यात १२ वा हप्ता हा पात्र महिला लाभार्थी २ कोटी २५ लाख महिलांना दिला गेला असून त्याच पात्र महिलांना जुलै चा १३ वा हप्ता देखील मिळणार आहे अशी माहिती दिली आहे .
योजनेचे स्वरूप काय आहे ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2025 चा हप्ता बाबत New Update अंतर्गत राज्यातील पात्र महिलेस पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा रु .१,५०० इतकी रक्कम दिली जाईल . तसेच केंद्र / राज्य शासनाच्या अन्य अर्थीक लाभाच्या .
योजनेतील लाभार्थीपात्रता – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2025 चा हप्ता बाबत New Update नुसार सदर लाभार्थीचे किमान वय वर्ष २१ पूर्ण आणि ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत या वयोगटातील महिला पात्र असतील .
- विवाहित महिला ,विधवा महिला , घटस्फोटीत महिला ,परित्यक्त्या महिला तसेच निराधार महिलाआणि त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित मुलगी या योजनेसाठी पात्र असतील .
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे गरजेचे आहे .
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्डर लाभार्थी महिलेचे बँक खाते असणे अवश्यक आहे .
- तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु .२.५० लाखापेक्षा जास्त नसावे .
- ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग /उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. तथापि २.५० पर्यंत उत्पन्न घेत असलेले परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार व कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील .
अर्ज करण्याकरिता लागणारी कागदपत्रे –
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2025 चा हप्ता बाबत New Update नुसार लाभार्थीचे आधार कार्ड .
- बँक पासबुक .
- मोबाईल क्रमांक .
- उत्पनाचे प्रमाणपत्र .सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा दाखला वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे .तथापि पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र तून सूट देण्यात येत आहे .
- महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र /महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला .लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड ,मतदान ओळखपत्र , शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापेकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे .
- तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या पुरुषाशी विवाह केला असेल तर अशा बाबतीत पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल .
- पासपोर्ट फोटो
- रेशनकार्ड.
- सदर योजनेच्या अति व शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र .
सदर योजने बाबत सविस्तर माहिती शासनाच्या अधिकृत website वरती जाऊन येथे पहा .