NPS वात्सल्य योजना -२०२५ योजनेचे फायदे ,अर्ज प्रक्रिया ,लाभार्थी पात्रता ,व्याजदर किती सविस्तर माहिती .

NPS वात्सल्य योजना -२०२५ काय आहे ?

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी NPS वात्सल्य योजना -२०२५ या सदर योजनेची घोषणा २०२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली .सदर योजना १८ सप्टेंबर २०२४ रोजी सुरु करण्यात आली .हि योजना अल्पवयीन मुलानासाठी एकप्रकारची राष्ट्रीय पेन्सन योजना आहे ज्याद्वारे पालकांना त्याच्या मुलांच्या वतीने त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याकरिता अणी त्यांना सेवानिवृत्ती निधी विकसित करण्यास मदत करते .

NPS वात्सल्य योजना -२०२५ हि बचत सोबत पेन्शन योजना केवळ अल्पवयीन मुलांसाठी सुरु करण्यात आली आहे .पाल्कानाद्वारे मुलांच्या नावे NPS खाते उघडून मूल १८ वर्षाचे पूर्ण होईपर्यंत त्यामध्ये दरमहा किंवा वर्षिक हप्ता किमान रुपये १००० ते कमाल तुम्ही कितीही भरू शकतात त्याबाबत कहीही मर्यादा नाहीत .PFRDA-पेन्शन फंड रेग्युलेटरी अथारीटी ऑफ इंडिया द्वारे सदर योजना नियंत्रित केली जाते .

NPS वात्सल्य योजना -२०२५ योजनेची पात्रता काय ?

  • भारतीय नागरिक असावा .
  • १८ वर्षाखालील अल्पवयीन मुल
  • तसेच अल्पवयीन मुलांचे पालक फक्त नावापुरते असतील परंतु लाभार्थी हा फक्त ते अल्पवयीन मुल असेल .
  • सर्व अल्पवयीन नागरिक (वय १८ वर्षे) पात्र आहेत.
  • अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेले आणि पालकाद्वारे चालवले जाणारे खाते.
  • अल्पवयीन व्यक्ती एकमेव लाभार्थी असेल.

Post Office RD Yojana 2025-पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव (RD)योजना

NPS वात्सल्य योजना -२०२५ योजनेचे फायदे ;-

  • योजनेंतर्गत मुलांसाठी आर्थिक सुरक्षितताप्राप्त होते .
  • दीर्घकालीन बचतीची सवय लागते
  • कर बचतीचा पर्याय मिळतो .
  • पालकांना गुंतवणुकीचे व्यवस्थापन करण्याची संधी मिळते .
  • मुलांच्या निवृत्तीच्या वेळी मोठी रक्कम जमा होते .
  • निवृतीच्या वेळी NPS खात्यात जमा झालेल्या रकमेच्या ६०% रक्कम काढता येते .

योजनें अंतर्गत मिळणारा व्याजदर .

NPS वात्सल्य योजना -२०२५ सदर योजनेंतर्गत मिळणारा व्याजदर हा ९.५%ते १०%या दरम्यान दिला जातो .

NPS वात्सल्य योजना -२०२५ योजनाअंतर्गत अर्ज कसा करायचा .

NPS वात्सल्य योजनेची वैशिष्टे :-

NPS खाते उघडण्यासाठी website वरती जा .

NPS वात्सल्य योजना -२०२५
NPS वात्सल्य योजना -२०२५

IMG 20250731 190125

  • पालक (१८ वर्षाखालील )मुलांच्या वतीने खाते उघडू शकतात .
  • सदर योजना मुलांकरिता दीर्घकालीन आर्थिक बचत आणि सुरक्षितता देते .
  • योजनेकरिता गुंतवलेली रक्कम हि मुलांना पेन्शन म्हणून वापरता येईल .
  • सदर योजनेंतर्गत कर लाभ देखील मिळणार आहे .
  • सदर योजेकारिता खाते उघडण्याची ऑनलाईन सुविधा आहे .
  • NPS वात्सल्य योजना -२०२५ योजनेचे खाते कुठे उघडायचे.

  • एनपीएस वात्सल्य खाते पीएफआरडीएकडे नोंदणीकृत पॉइंट ऑफ प्रेझेन्स (पीओपी) द्वारे ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने उघडता येते, ज्यामध्ये प्रमुख बँका, इंडिया पोस्ट, पेन्शन फंड इत्यादींचा समावेश आहे (पीओपींची यादी पीएफआरडीए वेबसाइटवर उपलब्ध आहे).
  • एनपीएस ट्रस्टचे ऑनलाइन प्लॅटफॉर्म (ईएनपीएस)
  • online खाते उघडण्याची प्रक्रिया :-
  • . eNPS च्या website वरती जा .
  • स्क्रोल करा आणि “आता नोंदणी करा ”या पर्यायावर किल्क करा .
  • पालकाची जन्मतारीख ,Pan no ,Mobile No ,email टाका आणि नोदणी करा .
  • नोंदणी करता जो mobile no टाकला आहे त्यावरती आणि ईमेल वरती आलेला OTP टाका .
  • OTP टाकल्यानंतर स्क्रीनवरती पावती क्रमांक येईल त्यावरती किल्क करा .
  • अल्पवयीन मुलाची आणि पालकाची माहिती टाका आणि सोबत आवश्यक कागदपत्रे जोडा .
  • त्यानंतर सर्व सेव्ह करा
  • त्यामध्ये सुरुवातीला आपली श्भागीता१००० रपये भरा .
  • आत्ता अल्पवयीन मुलाच्या नावे खाते उघडले जाईल .
  • NPS वात्सल्य योजना -२०२५ खाते उघडण्याकरिता आवश्यक कागदपत्रे .

  • अल्पवयीन मुलाचा जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र)
  • शाळा सोडल्याचा दाखला,
  • मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र,
  • पॅन कार्ड पालकाचे.
  • पासपोर्ट मुलाचा.
  • पालकाचे केवायसी ओळखपत्र .
  • आणि पत्ता (आधार, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड,राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) यांचा पुरावा सादर करावा .
  • पालकाचा कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) किंवा फॉर्म ६० .
  • घोषणापत्र (नियम ११४ब).
  • पालक जर एनआरआय / ओसीआय असेल तर अल्पवयीन मुलाचे एनआरई / एनआरओ बँक खाते (एकल किंवा संयुक्त).
NPS वात्सल्य योजना -२०२५ योजने अंतर्गत आपली गुंतवणूक किती असावी :-

१-खाते उघडण्याची रक्कम किंवा गुंतवणूक : किमान रु. १,००० /- आणि कमाल मर्यादा नाही.

२-त्यानंतरचे गुंतवणूक : किमान रु. १,००० /- प्रति वर्ष आणि कमाल मर्यादा नाही.

३-पेन्शन निधी निवड·पालक पीएफआरडीएकडे नोंदणीकृत पेन्शन निधीपैकी कोणताही एक निवडू शकतो.

NPS वात्सल्य योजना -२०२५ योजने अंतर्गत गुंतवणूक पर्याय :-

1-डिफॉल्ट पर्याय: मध्यम जीवनचक्र निधी -LC-50 (50% इक्विटी).

2.ऑटो पर्याय: पालक त्याच्या जोखीम क्षमतेनुसार जीवनचक्र निधी – आक्रमक-LC-75 (75% इक्विटी), मध्यम LC-50 (50% इक्विटी) किंवा कंझर्व्हेटिव्ह-LC-25(25% इक्विटी) निवडू शकतो.

3.सक्रिय पर्याय: पालक सक्रियपणे इक्विटी (75% पर्यंत), कॉर्पोरेट कर्ज (100% पर्यंत), सरकारी सिक्युरिटीज (100% पर्यंत) आणि पर्यायी मालमत्ता (5% पर्यंत) यामधून निधीचे वाटप ठरवतो.

वयाच्या १८ व्या वर्षी पोहोचल्यानंतर काय मिळते –

• NPS टियर – I (सर्व नागरिक) मध्ये अखंडपणे शिफ्ट• १८ वर्षे पूर्ण झाल्यापासून तीन महिन्यांच्या आत अल्पवयीन मुलाचे नवीन KYC. ·शिफ्ट झाल्यावर, NPS-टियर I फॉर ऑल सिटिझन मॉडेलची वैशिष्ट्ये, फायदे आणि निर्गमन नियम लागू होतील.

Leave a comment