Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत होणारी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित ) सेवा संयुक्त पूर्व परिक्षा -२०२५ एकूण २८२ पदांची भरती होणार अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि पात्रता पहा.

Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत होणाऱ्या ९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या संयुक्त पूर्व परीक्षेची संपूर्ण मीहिती,अर्ज करण्याकरिता अंतिम दिनांक २१ ऑगस्ट २०२५.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामार्फत दरवर्षी Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत विविध पदांची भरती केली जाते व तशी जाहिरात देखील दिली जाते त्याचप्रमाणे २०२५ या चालू वर्षाकरिता एकूण २८२ पदांच्या भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परिक्षा-२०२५ हि महाराष्ट्रातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर रविवार दिनांक ०९ नोव्हेंबर ,२०२५ रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे .त्याकरिता सदर जाहिरात शासनामार्फत २९ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे .

Table of Contents

चला तर मग मित्रांनो सदर पदभरती बाबत आपण खालील मुद्याच्या आधारे माहिती घेवूया .

अल्पसंख्याक विध्यार्थीसाठी परदेश शिष्यवृत्ती योजना २०२५-२०२६विदयार्थीकरिता सुवर्ण संधी लगेच अर्ज करा.

Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत भरण्यात येणाऱ्या विविध पदांचा तपशील :-

  • सहायक कक्ष अधिकारी ,गट-ब (अराजपत्रित)
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोग एकूण -०३ पदे
  • राज्य क्र निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित)
  • एकूण -२७९ पदे भरती केली जाणार .
  • पदभरती पहा –

    Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग
    Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग

अशी एकूण -२८२ पदांची भरती होणार आहे .सविस्तर पद भरती pdf पहा mpsc

अर्ज सादर करण्याचा कालावधी :-

अ.क्रतपशीलविहित कालावधी
१.अर्ज सादर करण्याचा कालावधीदिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजल्यापासून तुम्ही अर्ज भरू शकतात . ते
अर्ज करण्याची अंतिम तारीखदिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात .

२.ऑनलाइन पध्दतीने विहित परिक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत तुम्ही परिक्षा शुल्क भरू शकतात .
३.भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परिक्षा शुल्क भरण्याकरिता चलनाची प्रत घेण्याचा दिनांकदिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत तुम्ही चलनाची प्रत मिळवू शकतात .
४.चलनाद्वारे परिक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकदिनांक २५ ऑगस्ट २०२५ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये .

अर्ज करण्याचा अंतिम तारीख:-

Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत होणाऱ्या पदभरती करिता दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत तुम्ही अर्ज करू शकतात.

Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग उमेदवार पात्रता :-

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा .
  • अर्जदाराचे वय पदानुसार आणि प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे .
  • वयोमर्यादा:-
  • १ नोव्हेंबर २०२५ या तारखेपर्यंत अर्जदाराचे वय मोजले जाईल .
अ.

क्र

पदवयोमर्यादा मोजण्याचा दिनांक

वय

किमान आमागास /मागासवर्गीय /आ.दु.घ

कमाल

प्राविण्य प्राप्त खेडाळूमाजी सैनिक,आणीबाणी वअल्पसेवा राजदिष्ट अधिकारी

आमागासमागासवर्गीय /अनाथ/आ.दु.घआमागासमागासवर्गीय / आ.दु.आमागासमागासवर्गीय / आ.दु.दिव्यांग उमेदवार
सहायक कक्ष अधिकारी१ नोव्हेंबर २०२५१८३८४३४३४३४३४३वयाच्या ४५ वर्षापर्यंत
राज्य कर निरीक्षक१ नोव्हेंबर २०२५१८३८४३४३४३४३४३वयाच्या ४५ वर्षापर्यंत

वरील वयोमर्यादा कोणत्याही बाबतीत शिथिल केली जाणार नाही कृपया अर्जदारांनी याची दक्षता घ्यावी .

Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्जदारासाठी शैक्षणिक अर्हता :-

  • अर्जदाराने अर्ज करताना कोणत्याही विध्यापिठाची पदवी घेण्याचे शिक्षण चालू असताना अर्ज करता येतो.
  • परंतु मुख्य परीक्षेस बसण्या अगोदर पदवी परिक्षा उतीर्ण होणे आवश्यक आहे .
  • मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
  • Intership किंवा कार्यशाळेतील कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पद्विधारकाने हि अट मुख्य परीक्षेचे अर्ज स्वीकारण्यापूर्वी अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केली पहिजे .

MPSC परीक्षेचे टप्पे काय असतील :-

महाराष्ट्र शासनामार्फत Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत विविध पदाकरिता भरती प्रक्रिया केली जात आहे ती कशा स्वरुपाची परिक्षा घेतली जाईल किती गुण असतील ते सर्व आपण खालील मुद्याच्या आधारे पाहूया .

  • पदानुसार परिक्षा हि दोन टप्यात घेतली जाईल .
  • पहिला टप्पा – संयुक्त पूर्व परिक्षा
  • दुसरा टप्पा –मुख्य परीक्षा
  • तर पहिला टप्पा – संयुक्त पूर्व परिक्षा हि १०० गुणांची घेतली जाईल
  • तर मुख्य परिक्षा हि ४०० गुणांची घेतली जाईल .

Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त पूर्व परिक्षाकरिता अर्ज करण्याची पद्धत :-

online पद्धतीने अर्ज करण्याकरिता MPSC अधिकृत संकेतस्थळावर जा .

Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग
  • Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवर विहित पध्दतीने नोंदणी केली नसल्यास नोदणी करून खाते (profile)तयार करावे .
  • जर खाते तयार केलेले असेल तर ते अद्यावत करावे .
  • आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील उमेदवाराच्या खात्याची केवायसी (KYC)सदर कालावधीतपूर्ण करणे अनिवार्य असेल .
  • दिलेल्या कालावधीत विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा .
  • परिक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने सादर करावा .
  • त्यानंतर जिल्हा केंद्र निवडावे .
  • संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन पध्दतीने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित)सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील .

अर्जा सोबत जोडवयाची कागदपत्रे व प्रमाणपत्रे :-

  • Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग पदांच्या भरतीकरिता अर्ज करता प्रोफाईल मध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू ,दिव्यांग ,माजी सैनिक ,अनाथ आरक्षणांचा दावा करणाऱ्या उमेदवारा व्यतिरिक्त अन्य उमेदवारांना कोणतीही कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नाही .
  • विविध सामाजिक व समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता अजमाव्ल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे /प्रमानपत्रे अपलोड करावीत .
  • सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबत पुरावा .
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबत पुरावा .वर्ष २०२५-२०२६
  • वैध नॉन क्रिमिलेअर प्रमाण पत्र वर्ष २०२५-२०२६
  • दिव्यांग असल्यास पुरावा .
  • माजी सैनिक असल्याबाबत पुरावा .
  • खेडाळू आरक्षणा करिता पात्र असल्यास पुरवा.(पूर्व परीक्षेकरिता –क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल किंवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी सादर केलेली पोहोच पावती )
  • अनाथ असल्यास पुरावा .
  • अराखीव महिला खेडाळू ,दिव्यांग ,माजी सैनिक ,अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अदिवास प्रमाणपत्र .
  • दिव्यांग ,खेडाळू ,माजी सैनिक ,अनाथ आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे किंवा कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज सादर करता येणार नाही .
  • टीप –सर्व कागदपत्रे हि pdf file करून किमान file साईज ५० kb आणि कमाल साईज ५०० kb असावी .

परिक्षा फी किती भरावी लागेल :-

Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग पदांच्या भरतीकरिता परिक्षा फी हि खालील प्रकारे आरक्षणानुसार असेल .

परीक्षेचे नाव :- संयुक्त पूर्व परिक्षा

  • आमागास – ३९४ रुपये परिक्षा शुल्क आहे ,
  • मागासवर्गीय /आ.दु.घ./अनाथ – २९४ रुपये परिक्षा शुल्क आहे .
  • माजी सैनिक – गट-ब संवर्ग आमागास -३९४ आणि मागासवर्गीय /आ.दु.घ./अनाथ – २९४ रुपये परिक्षा शुल्क आहे.
  • याव्यतिरिक्त बँक चार्जेस आणि त्यावरील देय कर अतिरिक्त असतील .
  • परिक्षा शुल्क हे ना परतावा आहे .(Non refundable )
  • परिक्षा शुल्क हे दोन प्रकारे भारता येईल
  • १- online process ने आणि
  • २. offline process –चलनाद्वारे या दोन्ही प्रकारे परिक्षा शुल्क तुम्ही भरू शकतात .

Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग सदर पदाकरिता मिळणारी वेतनश्रेणी :-

  • सहायक कक्ष अधिकारी पदाकरिता S-१६ :रुपये ४४९००-१४२४०० रुपये वेतन असेल .
  • इतर पदाकरिता मिळणारे वेतन S-१४:रुपये ३८६००-१२२८०० रुपये इतके वेतन असेल तसेच
  • अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते देखील मिळतील .

टीप – सविस्तर जाहिरात पाहण्याकरिता तुम्ही Maharashtra Public Service Commission (MPSC)महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या website वरती जाऊन सविस्तर जाहिरात पाहू शकतात .

धन्यवाद !

Leave a comment