Mukhyamntri Ladka Bahu Yojana Maharashtra लाडका भाऊ योजना -२०२४ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत युवकांना कसे आणि किती पैसे मिळणार .

Mukhyamantri Ladka Bhau Yojna Form and website Details

Mukhyamntri Ladka Bahu Yojana Maharashtra लाडका भाऊ योजना -२०२४ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची प्रस्तावना

महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील युवक वर्गासाठी Mukhyamntri Ladka Bahu Yojana Maharashtra लाडका भाऊ योजना -२०२४ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाने सुरु करण्यात आली आहे.ज्याद्वारे राज्यातील युवक जे कि आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी अभावी बसलेले आहेत किंवा व्यवसाय करण्यासाठी पुरेशे भाडवल नसणे किंवा अनुभव नसणे अथवा संबधित नोकरी व व्यवसायाची माहिती नसणे इत्यादी कारणामुळे युवकांमध्ये बेरोजगारी मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहे .

Table of Contents

Mukhyamntri Ladka Bahu Yojana Maharashtra लाडका भाऊ योजना -२०२४ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यामध्ये विशेषतः बेरोजगारीमध्ये असणारे युवक १२ वी पास ,आयटीआय झालेले ,पदवीधर ,पदव्युत्तर पदवी असे विविध शिक्षण क्षेत्रातील युवक यात दिसतात .अशा युवकांसाठी शासनमार्फत पूर्वीही “रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ”१९७४ पासून राबवला जातो .हि योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी यात कालानुरूप बदल करून सुधारणा करणे गरजेचे होते म्हणून लाडका भाऊ योजना -२०२४ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करून जास्तीत जास्त युवक वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याकरिता सदर योजना राबविण्यात येणार आहे त्यामध्ये राज्यातील युवकांना संबधित शिक्षणनुसार प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन सोबत सहा महिने करिता विद्यावेतन पण दिले जाणार आहे तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .

मित्रानो आपणास सदर योजनेबाबत माहिती घ्यायची आहे का ? चला तर मग आपण खालीलप्रमाणे सविस्तर लेख पाहूया .

योजनेतील content
योजनेचे स्वरूप

Mukhyamntri Ladka Bahu Yojana Maharashtra लाडका भाऊ योजना -२०२४ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना – योजनेचे स्वरूप

सदर योजनेद्वारे राज्यातील युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्यासाठी क्षमता वाढविण्यासाठी योजनेची सुरुवात क२०२४-२०२५ या आर्थिक वर्षापासून करण्यात आली आहे .

सदर योजना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष यांच्या सयुक्त विध्यामाने राबवली जात आहे .या कार्यक्रमांतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या मध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार देणारे उधोजक जोडले जाणार आहेत .रोजगार इच्छुक उमेदवाराची बारावी, आय.टी.आय., पदविका , पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण
केलेले ऑनलाईन नोंदणी सदर संकेतस्थळावर केली जाईल .

ऑनलाईन नोंदणी सदर संकेतस्थळावर केलेल्या उमेदवाराला आस्थापना/उद्योग/महामंडळा मार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/उद्योग/ महामंडळ या मध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल व अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल .

सदर कार्य प्रशिक्षणचा कालावधी ६ महिने असेल. सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेंतर्गत शासनामार्फत विध्यावेतन मिळणार आहे तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना सबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येणार आहे .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै- २०२४ Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojnana

लाडका भाऊ योजना -२०२४ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना साठी उमेदवाराची पात्रता काय असेल ?

  1. उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा .
  2. उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ३५ वर्ष असणे गरजेचे असेल .
  3. उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता १२वी पास/ आयटीआय/ पदविका/ पदवी/ पदव्युत्तर असावी. परंतु शिक्षण चालू असलेले उमेदवार सदर योजनेसाठी पात्र असणार नाहीत.
  4. उमेदवाराची आधार नोंदणी केलेली असावी .
  5. तसेच त्याचे बँक खाते आधार सलग्न असणे गरजेचे आहे .
  6. उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करुन रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा.

लाडका भाऊ योजना -२०२४ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत युवकांना कसे आणि किती पैसे मिळणार.

सदर युवा कार्य प्रशिक्षण योजनाअंतर्गत युवकांना शैक्षणिक अह्र्तेनुसार शासनामार्फत दिले जाणारे विद्यावेतन तपशील 
खालिलप्रकारे पाहूया .
अ.क्र शैक्षणिक अर्हता प्रतिमाह विध्यावेतन रु
१.    १२ वि पास                  रु.६,०००/-

२. आय.टी.आय / पदविका रु.८,०००/-

३. पदवीधर /पदव्युत्तर रु.१०,०००/-

याप्रमाणे शासनामार्फत प्रशिक्षणार्थ्याना विध्यावेतन हे प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (DBT ) online पद्धतीने दरमहा मिळणार आहे .

Mukhyamntri Ladka Bahu Yojana Maharashtra लाडका भाऊ योजना -२०२४ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना योजनेच्या प्रशिक्षणाबाबत अटी व शर्ती काय असतील ?
  • या योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून १० दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असला तर ,संबधित प्रशिक्षनार्थीस त्या महिन्याचे विध्यावेतन अनुनेय राहणार नाही .
  • जर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षनाच्या पहिल्याच महिन्यात सोडून गेला तर तो प्रशिक्षणासाठी पात्र असणार नाही .
  • एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल .

योजनेबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी शासनाच्या या website वरती जाऊन माहिती उपलब्ध करू शकता .

FAQ –
१ . सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठीची वयोमर्यादा किती आहे ?

– सदर योजनेचा लाभ मिळवण्याकरीता उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ३५ वर्ष असणे गरजेचे असेल .

२.योजनेंतर्गत आय.टी.आय वाल्यांसाठी किती रक्कम मिळणार आहे ?

– सदर योजनेच्या लाभाचे स्वरूप रु .८,०००/- याप्रमाणे शासनामार्फत प्रशिक्षणार्थ्याना विध्यावेतन हे प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (DBT ) online पद्धतीने दरमहा मिळणार आहे .

Leave a comment