सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४ साठी वार्षिक अनुदान १ लाख रुपये मिळवा

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४ साठी निर्यातदारास ५०,०००/-प्रती कंटेनर (२० फुट / ४० फुट )प्रती लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान १ लाख रुपये  मिळवा. 

शासनामार्फत विविध घटकासाठी महत्वपूर्ण अशा योजना राबवल्या जातात त्यापैकी सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४ महाराष्ट्र शासनामार्फत विशेष शेतकरी घटकासाठी राबवली जात आहे . या योजनेत नवीन इतर देशात समुद्री मार्गाने राज्यातील शेतकरी यांनी शेतात पिकवलेल्या मालाची(फळे , भाज्या) निर्यात करण्यासाठी परिवहन साह्यता योजना सुरु केली आहे .सदर योजनेमध्ये पुढील तक्त्यात नमूद केलेल्या  देशात विहित केलेल्या कृषी मालाची समुद्र मार्ग निर्यात करतील अशा शेतकरी ,शेतकरी गट , शेतकरी उत्पादन कंपनी , फर्म, सहकारी संस्था , निर्यातदार यांना रु ५०,०००/-प्रती कंटेनर (२० फुट / ४० फुट )इतक्या अनुदानास पात्र असतील. तसेच प्रती लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान १ लाख रुपये इतके देण्यात येणार असून त्याकरिता योजनेचे नियम व अटी ,लागणारी कागदपत्रे ,मंजूर देश आणि मंजूर असणारा माल इत्यादिबाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे पुढीलप्रमाणे पाहणार आहोत .

Table of Contents

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४ योजनेचा उद्देश –

  • शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे व कृषी मालाची निर्यात वृद्धी करणे.  तसेच निर्यातीस जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळवून देणे .
सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४
सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४ योजनेचे नियम व अटी :

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४ सदर योजनेंतर्गत परिवहन सहाय्य अनुदान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील नियम आणि अटी ची पूर्तता करणे गरजेचे आहे .त्यासाठी काही अटी  व नियम पूर्ण करणे बंधनकारक असतील ते कोणते आहेत ते खालीलप्रमाणे पाहूया ..

  • महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी , सहकारी संस्था ,शेतकरी उत्पादन महामंडल ,कंपनी ,निर्यातदार इत्यादी सदर योजनेसाठी पात्र ठरतील .
  • महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी , सहकारी संस्था ,शेतकरी उत्पादन महामंडल ,कंपनी ,निर्यातदार इत्यादीणी सागरी मार्गाने कन्टेनर द्वारे शेतमालाची थेट निर्यात करणे आवश्यक आहे .
  • योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर कृषी पणन मंडळाकडे पूर्व संमती करिता अर्ज सादर करणे आवश्यक आहे .
  • सदर योजनेसाठी संबधित अर्जदाराने दिल्लेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा तसेच कंटेनर पुरवठादार फर्मच्या पावत्यासह इतर सर्व संबधित कागदपत्रे जोडणे आवश्यक राहील .
  • कृषी मालाचा नमुना पाठविण्याकरिता सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही .
  • माल हा गुणवत्तापूर्ण असावा .माल गुणवत्तापूर्वक नसेल तर शेतकरी अथवा इतर संबधित निर्यातदार अपात्र असेल .
  • पूर्व संमती प्राप्त झालेले लाभार्थी यांनी निर्यात केल्या मालाची विक्री रक्कम प्राप्त झाल्यानंतरच योजनेकरिता प्रस्ताव सादर करू शकतील,जेणेकरून गुणवत्ते अभावी मालाची विक्री रक्कम प्राप्त ण झाल्यास अशा प्रस्तावना अनुदान देय होणार नाही .

सदर योजनेमध्ये पुढील तक्त्यात नमूद केलेय देशात विहित केलेल्या कृषी मालाची समुद्र मार्ग निर्यात करतील अशा शेतकरी ,शेतकरी गट , शेतकरी उत्पादन कंपनी , फर्म म सहकारी संस्था , निर्यातदार यांना रु ५०,०००/-प्रती कंटेनर (२० फुट / ४० फुट )इतक्या अनुदानास पात्र असतील. तसेच प्रती लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान १ लाख रुपये इतके असेल.

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४  निर्यात करण्यासाठी कोणते देश आणि मालाचा प्रकार

अ.क्रदेशमाल
युएसएआंबा , डाळिंब
ऑस्टेलियाआंबा , डाळिंब
दक्षिण कोरियाकेळी ,आंबा
4कझाकिस्थानआंबा
अफगाणिस्थानकेळी , कांदा
इराणकेळी ,मंडारीन ,आंबा
रशियाकेळी ,आंबा
मॉरिशस आंबा , कांदा
लाटविया (रेगा पोर्ट मार्गे )भाज्या , कांदा
१०युरोपियन संघआंबा , डाळिंब
११कनाडाआंबा , डाळिंब
१२सर्व देशसंत्री

वरील यादीनुसार आपण या सर्व देशांबरोबर वरील प्रमाणे मालाची निर्यात करू शकतोत.

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४ आवश्यक कागदपत्रे –

  • दिलेल्या अर्जाच्या स्वरुपात विहित नमुन्यात लेखी अर्ज करणे .
  • ईनव्हाईस कापी
  • शिपिंग बिल
  • कंटेनर भाडे पावती
  • परकीय चलन जमा करणारे बँक प्राप्ती प्रमाणपत्र किंवा बँक एन्ट्री पुरावा .

वरील सर्व संबधित कागदपत्रे निर्यातदारांनी त्यांचे प्रस्ताव  MSAMB च्या विभागीय कार्यालयांना सादर करणे आवश्यक असेल .

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४ लाभाचे स्वरूप ––

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४ कृषी मालाची समुद्र मार्ग निर्यात करतील अशा शेतकरी ,शेतकरी गट , शेतकरी उत्पादन कंपनी , फर्म, सहकारी संस्था , निर्यातदार यांना रु ५०,०००/-प्रती कंटेनर (२० फुट / ४० फुट )इतक्या अनुदानास पात्र असतील. तसेच प्रती लाभार्थी कमाल वार्षिक अनुदान १ लाख रुपये इतके असेल.

सागरी मार्गाने कृषी उत्पादनाच्या निर्यातीसाठी अनुदान योजना- २०२४ अर्ज करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज , हमीपत्र ,आणि सविस्तर परिपत्रक त्यादि पाहण्याकरिता
 export_scheme_application   guarantee_letter  Circularयेथे किल्क करा .

 शासनाच्या वेबसाईट वरती जाऊन योजनेची सविस्तर माहिती पाहू शकतात .

Leave a comment