पीएम धन धान्य कृषी योजना-२०२५भारतातील समृद्ध आणि शाश्वत शेतीकडे एक पाऊल.
प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५याला केंद्र शासनाची मंजुरी देण्यात आली आहे .या योजनेकरिता देशातील १०० जील्यांची निवड करण्यात आली असून यात अंदाजे देशातील १.७ कोटी शेतकऱ्याना या योजनेचा फायदा होणार आहे .यामध्ये शेतीची नव नवीन अवजारे .धन धान्य साठवण क्षमता ,सिचन सुविधा इत्यादी मार्फत शेतकऱ्याना लाभ मिळणार आहे .
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली असून त्यास आजच्या काबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे .या योजनेमध्ये शेतीविषयक इतर ३६ योजनांचे एकत्रीकरण करून हि योजना अमलात आणली जाणार आहे .चला तर मग मित्रानो या योजनेची सविस्तर माहिती आपण पुढीलप्रकारे पाहूया .

१. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५ काय आहे ?
प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५याला केंद्र शासनाची मंजुरी देण्यात आली आहे .या योजनेकरिता देशातील १०० जील्यांची निवड करण्यात आली असून यात अंदाजे देशातील १.७ कोटी शेतकऱ्याना या योजनेचा फायदा होणार आहे .यामध्ये शेतीची नव नवीन अवजारे .धन धान्य साठवण क्षमता ,सिचन सुविधा इत्यादी मार्फत शेतकऱ्याना लाभ मिळणार आहे.देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली असून त्यास आजच्या काबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे .या योजनेमध्ये शेतीविषयक इतर ३६ योजनांचे एकत्रीकरण करून हि योजना अमलात आणली जाणार आहे .
प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५.यामध्ये शेतीची नव नवीन अवजारे .धन धान्य साठवण क्षमता ,सिचन सुविधा इत्यादी मार्फत शेतकऱ्याना लाभ मिळणार आहे .शेती क्षेत्राचा विकास करणे आणि पिक साठवण शमता सुधारणे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, आणि भारतीय शेतीचे आधुनिकीकरण.तसेच शेतकरी केवळ पिकेच उत्पादन करत नाहीत तर त्यांची साठवणूक, प्रक्रिया आणि विक्री देखील कार्यक्षमतेने करतात याचे महत्व लक्षात घेऊन या योजनेला डिझाइन केले आहे .
हवामान बदलाचे परिमाण कमी करण्यासाठी तसेच पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी शाश्वत शेती पद्धतीचा वापर करून नवीन अचूक अवजारे इत्यादीचा वापर करून शेतकरी यांच्या मालास चांगल्या किमती मिळण्यास मदत होणार आहे.
PM Kisan Yojana-पी एम किसान योजना 2025 ची नवीन यादी: नाव, स्थिती आणि पेमेंट अपडेट तपासा
२. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५योजनेचे उद्देश :-
- ग्रामीण उप जीविकेला आधार देवून शास्वत शेतीला प्रोत्साहन देणे .
- शेती करण्याच्या पद्धतीचे आधुनिकीकरण करून शेतकऱ्याना आर्थिक सहाय्य प्रधान करणे.पिकांचे विविधीकरण करणे ,
- पिक कापणीनंतरचे नुकसान कमी करून, पायाभूत सुविधा वाढवून शेतीला सिंचन क्षेत्राचा विस्तार केला जाईल .
- जास्तीत जास्त नवीन तंत्रणाचा वापर केला जाईल आणि उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार आहे .
अशा प्रकारे या योजनेद्वारे शेतकरी आणि शेती क्षेत्राचा विकास होणार असून शेतकऱ्याना आर्थिक फायदा तर होणारच पण शेतीचे आणि शेतमालाचे आधुनिकीकरण होणार आहे .
३. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५ योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये-
- प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५ योजनेद्वारे पायाभूत सुविधा विकास करणे.
- धान्य आणि नाशवंत वस्तू साठवण्यासाठी गोदामे, शीतगृहे बांधणे.अन्न प्रक्रियेची निर्मिती करणे .
- तंत्रज्ञान एकत्रीकरण केले जाणार आहे त्यामध्ये स्मार्ट शेती साधनांचा प्रचार,अचूक शेतीचे प्रशिक्षण इत्यादीवर भर दिला जाणार आहे .
- शाश्वत शेतीवर लक्ष केंद्रित करा :
- सेंद्रिय शेती, नैसर्गिक खते आणि पीक फेरपालट तंत्रांना प्रोत्साहन देण्यात येईल .
- आर्थिक सहाय्य आणि अनुदान: ही योजना स्टोरेज, कोल्ड चेन आणि अन्न प्रक्रिया युनिट्स बांधण्यासाठी कर्ज किंवा अनुदान देऊ शकते.त्यामध्ये शेतकऱ्यास अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही प्रकारचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे .
- आधुनिक शेती तंत्रे: ठिबक सिंचन, सौर पंप आणि अचूक शेती यासारख्या तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देते.
- कापणीनंतरची पायाभूत सुविधा: कचरा कमी करण्यासाठी साठवणूक, वाहतूक आणि प्रक्रिया सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
- बाजारपेठेतील दुवा: शेतकऱ्यांना खरेदीदार, मंडई आणि निर्यात माध्यमांशी जोडून त्यांना चांगले बाजारभाव मिळविण्यास मदत होणार आहे .
४. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५ योजनेचा लाभ कोणाला मिळू शकेल? (पात्रता)
- प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५ योजनेंतर्गत लहान आणि सीमांत शेतकरी: विशेषतः ज्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे.
- ते प्राथमिक केंद्रबिंदू आहेत, कारण त्यांच्यात अनेकदा पैशांचा अभाव असतो.
- महिला शेतकरी गट आणि स्वयंसहाय्यता गट (स्वयंसेवा गट): महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण गटांना प्राधान्य दिले जाते.
- एफपीओ (शेतकरी उत्पादक संघटना): सामायिक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी निधीसाठी अर्ज करू शकणारे समूह.एफपीओ आणि कृषी स्टार्टअप्स :
- एफपीओ सामूहिक फायद्यासाठी प्रक्रिया युनिट्स किंवा कोल्ड चेन स्थापन करू शकतात.
- कृषी-तंत्रज्ञान किंवा अन्न प्रक्रिया क्षेत्रातील स्टार्टअप्सना मोठ्या प्रमाणात कामकाज करण्यासाठी मदत मिळू शकते.
- कृषी-उद्योजक आणि स्टार्टअप्स:
- तरुणांना व्यवसायाभिमुख दृष्टिकोनासह शेतीकडे परतण्यास प्रोत्साहित करते.
५. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५ शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला होणारे फायदे-
- प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५कृषी विकासाद्वारे शेतकरीयांच्या पिक उत्पादनात वाढ होईल .
- शेतकरी यांना आर्थिक सहाय्य मिळेल .या योजनेमुळे स्थानिक रोजगार निर्मिती होईल .
- शाश्वत आणि हवामान प्रतिरोधक शेतीसाठी अचूक शेतीच्या तंत्रज्ञानाचा वापर होईल .
- शेतकरी यांचा थेट बाजारपेठेत प्रवेश होईल आणि शेतमालास योग्य किंमत मिळेल .
- साठवणूक केलेल्या मालाचे निगा राखली जाईल म्हणजे काय तर उत्पन्न साठवणुकीचे नुकसान कमी प्रमाणात होईल .
- शेतकरी थेट मोठ्या प्रमाणात खरेदीदार, निर्यातदार किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर मालाची विक्री करू शकतात.
- ग्रामीण सक्षमीकरण: ग्रामीण पायाभूत सुविधांना चालना देते आणि स्वावलंबनाला प्रोत्साहन देते.
- सदर योजनेची तपशीलवार माहिती पाहण्या करिताकेंद्र शासनाच्या website वरती भेट द्या
८. निष्कर्ष
प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५ योजनेत भारतीय शेतीला फायदेशीर, तंत्रज्ञान-चालित उद्योगात रूपांतरित करण्याची क्षमता आहे.पात्र शेतकरी, महिला आणि तरुणांना पुढाकार घेऊन अर्ज करण्यास प्रोत्साहित करेल हि योजना .सातत्यपूर्ण अंमलबजावणीसह स्थानिक समृद्धी सुनिश्चित करताना जागतिक कृषी-निर्यात केंद्र बनू शकतो.
धन्यवाद !
९. वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)-
१. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५ हि योजना किती वर्षाकरिता असेल ?
– सन २०२५-२६ पासून पुढील पाच वर्षाकरिता लागू असेल .
२. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना- २०२५ या योजनेस मंजुरी कधी मिळाली ?
– दिनांक १६ जुलै २०२५ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली आहे .