रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) ७५,००० /- रु पर्यंत वाहतूक अनुदान मिळवा.

रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) शेतमाल व्यापार रस्ते वाहतूक खर्च अनुदान योजने अंतर्गत किलोमीटर नुसार २० हजार रुपयापासून ते ७५,००० /- रु पर्यंत वाहतूक अनुदान मिळवा .

महाराष्ट्र शासनामार्फत रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) हि योजना राबवली जाते .कारण कि भारत देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो . त्याचप्रमाणे  भाजीपाला व फळे उत्पादनामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र मध्ये  भाजीपाला व फळे यांचे उत्पादन घेण्यात येते .महाराष्ट्रातील फळे  व भाजीपाल्याचे उत्पादन पाहता बाहेरील परकीय  निर्यातीबरोबर देशांअंतर्गत चालणारा व्यापार हि तितकाच महत्वाचा आहे . परंतु वाहतुकीदरम्यान लागणारा वेळ यामुळे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते कारण भाजीपाला व फळे नाशवंत शेतमाल असल्याने शेतमालाचे वाहतुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर नुकसान होते .अशा विविध अडचणीवर मात करण्यासाठी सरकारने सदर योजनेची अमलबजावणी करून शेतमालास परराज्यात बाजारपेठ मिळवून देणे आणि थेट व्यापारास चालना देणे या उद्देशाने सदर योजनेची सुरुवात केली आहे .

Table of Contents

महाराष्ट्रातील उत्पादित शेतमाला मध्ये भाजीपाला विशेषतः कांदा ,टोमाटो ,डाळिंब ,द्राक्षे ,केळी , आंबा इत्यादीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते .या उत्पादनाच्या व्यापारास चालना देण्यासाठी सदर योजनेंतर्गत वाहतूक खर्चात अनुदान देंण्यात येणार आहे .

चला तर मग मित्रानो सदर योजना काय आहे ? योजनेच्या अटी व शर्ती , योजनेंतर्गत देय अनुदान किती मिळणार ? कागद पत्रे काय  लागतील ,संपर्क करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता , योजनेत कोणकोणते जिल्हे स्माविस्ट आहेत इत्यादी बाबत सविस्तर माहिती आज आपण या लेखात पुढीलप्रमाणे पाहणार आहोत .

रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत)
रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत)

रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) संबधित शासनाचा निर्णय –

रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) महाराष्ट्र राज्यात कृषी पणन मंडळामार्फत योजना महाराष्ट्रातून शेतमालाच्या आंतरराज्यीय व्यापारास चालना देण्यासाठी राबविण्यात येणार .त्या अनुषंगाने योजनेच्या दिनांकापासून दि-३१.३.२०२६ या कालावधीपर्यंत देशांतर्गत रस्ते वाहतूक भाड्यामध्ये अनुदान (Transport Subsidy) देण्यासाठी योजनेची घोषणा करण्यात आली आहे .

रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) योजनेच्या अटी व शर्ती –

  • रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) योजनेसाठी राज्यातील नोंदणीकृत शेतकरी , उत्पादक कंपन्या व शेतमाल उत्पादकाच्या सहकारी संस्था या योजनेस पात्र असतील .
  • महाराष्ट्र राज्यातील जे नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या , शेतमाल उत्पादकांच्या सहकारी सभासदांनी स्वत उत्पादित केलेला शेतमालच सबंधित राज्यात पाठविणे बंधनकारक असेल .
  • सदर योजना फक्त महाराष्ट्रातून रस्ते वाहतुकीद्वारे परराज्यात शेतमाल वाहतूक करून प्रत्यक्ष विक्री करण्यात येणाऱ्या व्यवहारासाठी लागू राहील .
  • योजनेंतर्गत कामकाज सुरु करणेपूर्वी अर्जदाराणे महाराष्ट्र राज्यात कृषी पणन मंडळामार्फत पूर्व मान्यता घेणे आवश्यक असेल .
  • सदर योजना फक्त नाशवंत पिकांसाठीच लागु राहील .उदा- भाजीपाला ,टोमाटो ,आंबा , कांदा ,केळी ,डाळिंब , द्राक्षे ,संत्रे , मोसंबी, आले इत्यादी .
  • सदर योजनेत नमूद नसलेला नाशवंत शेतमाल जर परराज्यात विकायचा असेल तर लाभार्थी संस्था , कंपनीने तसा स्पष्ट उल्लेख करून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत पूर्व मान्यता घेणे आवश्यक असेल .
  • सदर योजनेमध्ये रस्ते मार्गे प्रत्यक्ष वाहतूक होणाऱ्या शेतमालावर अनुदान देय राहील .इतर कोणत्याही अनुषंगिक खर्चाचा यात सहभाग नसेल .
  • तसेच शेतमाल विक्री झाल्यानतरच अनुदान देय असेल माल विक्रीपूर्वी मिळणार नाही .

रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) योजने अंतर्गत प्रत्यक्ष वाहतूक केलेल्या अंतरानुसार देय अनुदान तपशील. 

अंतर

देय अनुदान

३५० ते ७५० कि.मी.पर्यंत·       वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा

·       कमाल मर्यादा रु २०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल .

 

७५१ ते १००० कि.मी. पर्यंत·       वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा

·       कमाल मर्यादा रु ३०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.

१००१ ते १५०० कि.मी.पर्यंत·       वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा

·       कमाल मर्यादा रु ४०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.

१५०१ ते २००० कि.मी. पर्यंत·       वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा

·       कमाल मर्यादा रु ५०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.

२००१ कि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी·       वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा

·       कमाल मर्यादा रु ६०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.

सिक्कीम ,आसाम, अरुणाचल प्रदेश , नागालँड, मणिपूर , मिझोराम , मेघालय व त्रिपुरा या राज्यासाठी·       वाहतूक खर्चाच्या ५०% रक्कम किंवा

·       कमाल मर्यादा रु ७५,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम अदा करण्यात येईल.

रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) योजनेतील  नियम –

  • महाराष्ट्रातील सीमेलगतच्या ज़िल्यतील शेतमाल नियमित जवळच्या जोडून असणाऱ्या पर राज्यात जातो. परंतु दूरच्या बाजारपेठ मध्ये शेतमाल पाठविणे आर्थिक अडचणीचे असल्याकारणे ३५० कि.मी. पेक्षा कमी अंतरावरील वाहतुकीस कोणतेही अनुदान लागू / देय नाही .
  • सदर योजनेंतर्गत एका लाभार्थी शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा उत्पादक कंपनीस एका आर्थिक वर्षात कमाल रु ३.०० लाख एवढे वाहतूक अनुदान देय असेल .
  • सदर अनुदान केवळ महाराष्ट्रातून इतर राज्यात केलेल्या एकेरी वाहतुकीस लागू असेल .
  • शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा उत्पादक कंपनीने वाहतूक दारास देय असलेली वाहतूक भाड्याची रक्कम धनादेश/आरटीजीएस / online बँकिंग द्वारे अदा करणे बंधनकारक असेल .
  • शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा उत्पादक कंपनीकडून पाठविण्यात आलेल्या कृषिमालाच्या प्राप्त विक्री रक्कमेतून लागणारा खर्च जसे – शेतमालाची हाताळणी ,विरळणी ,वर्गीकरण ,पाकिंग ,हमाली , वाहतूक , व कंपनी व संस्थाचे सर्विस चार्जेस इत्यादी खर्च ,कपात करून उर्वरित रक्कम सबंधित उत्पादक सभासद खात्यावर वर्ग केल्यानंतर वाहतूक अनुदानासाठी अर्ज करू शकतील. तसेच कपात रक्कम व अनुषंगिक आर्थिक व्यवहार हि संबधित शेतकरी सभासद , कंपनी व संस्था यांची अंतर्गत बाब असेल .याबाबत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचा कोणताही संबंध नसेल .
  • पाठवलेला माल गुणवत्ते अभावी किंवा इतर कारणाने विक्री रक्कम प्राप्त ण झाल्यास त्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ जबाबदार असणार नाही. आणि याप्रकरणी वाहतूक अनुदान देय असणार नाही .
  • सदर योजनेंतर्गत पर राज्यात पाठविण्यात आलेल्या वाहतूक खर्चाचे अनुदान मागणी प्रस्ताव शेतमाल विक्री नंतर ३० दिवसात आवश्यक त्या कागदपत्रासह विभागीय कार्यालयात सादर करावेत .
  • योजनेंतर्गत पर राज्यात शेतमाल पाठवीत असताना १ कन्साईनमेंट मध्ये शेतकरी उत्पादक सहकारी संस्था किंवा उत्पादक कंपनीच्या किमान ३ उत्पादक शेतकरी सभासदांचा शेतमाल  एकत्रित पाठविणे आवश्यक राहील .

रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) लागणारी कागदपत्रे –

  • प्रपत्र १- पूर्व मान्यता प्रस्ताव –विहित नमुन्यात अर्ज करावा .
  • शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनी च्या नोंदणी पत्राची सत्यप्रत
  • शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनी च्यासभासदत्वाचा दाखला यादी .
  • पिक पेरा नोंदीसह सभासदांचा सातबारा उतारा .
  • शेतमाल उत्पादक सहकारी संस्था किंवा शेतकरी उत्पादक कंपनी च्या राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेच्या पासबुक ची झेरॉक्स प्रत
  • प्रपत्र २- अनुदान मागणी अर्ज –विहित नमुन्यात अर्ज करावा
  • पुर्व मान्तेच्या पत्राची प्रत
  • ट्रान्सपोर्ट कंपनीचे मूळ बिल
  • ट्रान्सपोर्ट कंपनीची (बिल्टी / एल आर नंबर सह पावती )
  • शेतमाल विक्रीपश्चात खरेदीदाराकडून देण्यात आलेली पट्टी .
  • सभासदाच्या बँक खात्यात रक्कम वर्ग झालेली बँक खात्याचा तपशील .

 

रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत)योजनेत समाविष्ट जिल्हे व संबधित कार्यालय

अ.क्रयोजनेत समाविष्ट जिल्हेसंबधित विभागीय कार्यालयाचे नाव व पत्ता
·       नाशिक

·       जळगाव

·       धुळे

·       नंदुरबार

·       अहमदनगर

उप सरव्यवस्थापक ,

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,

पंचवटी , मार्केट यार्ड ,दिंडोरी नका , नाशिक -४२२००३ ,

फोन नं- (०२५३)-२५१२१७६,

इमेल – divnsk@msamb.com

2·       नागपूर ,

·       वर्धा ,

·       गडचिरोली ,

·       भंडारा ,

·       गोंदिया,

·       चंद्रपूर

उप सरव्यवस्थापक ,

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,

नवीन कॉटन मार्केट यार्ड ,एस टी स्ट समोर ,गणेशपेठ , नागपूर -४४००१८

फोन नं- (०७१२)-२७२२९९७ ,

इमेल – divnag@msamb.com

 

·       लातूर ,

·        बीड ,

·       उस्मानाबाद ,

·       नांदेड

उप सरव्यवस्थापक ,

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,

आंबा ,डाळिंब सुविधा केंद्र ,

प्लॉट नं डी -१/ १ एम.आय.डी.सी वखार मंडळाचे गोदाम स्मोर बार्शी रोड लातूर -४१३५३१

फोन नं- (०२३८२)-२१२०६१  ,

इमेल – divltr@msamb.com

 

4·       अमरावती ,

·       अकोला ,

·       यवतमाळ,

·       वाशीम ,

·       बुलढाणा

उप सरव्यवस्थापक ,

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,

नवीन कॉटन मार्केट यार्ड,

अमरावती – ४४४६०१,

फोन नं- (०७२१)-२५७३५३७  ,

इमेल – divawati@msamb.com

 

5·       रत्नागिरी,

·       ठाणे

·       सिंधुदुर्ग

·       पालघर

·       रायगड

उप सरव्यवस्थापक ,

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,

आंबा निर्यात सुविधा केंद्र ,

कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरी ,

रत्नागिरी ,नाचणेरोड ,शांतीनगर , रत्नागिरी – ४१५६३९

फोन नं- (०२३५२)-२९९३२८ ,

इमेल – divartn@msamb.com

 

·       औरंगाबाद

·       हिंगोली

·       परभणी

·       जालना

उप सरव्यवस्थापक ,

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,

प्लॉट नं .५/८ पिसादेवी रोड ,

नवामोंढा , वखार महामंडळ गोदामाजवळ , जाधववाडी ,औरंगाबाद -४३१००७,

फोन नं – ८४४६६८३९५६६ ,

ईमेल – divabad@msamb.com

·       पुणे

·       सोलापूर

उप सरव्यवस्थापक ,

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,

द्वारा –महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ कार्यालय ,

मार्केट यार्ड पुणे -४११०३७

फोन नं – (०२०)२४२६१२५१

ई मेल – divpun@msamb.com

 

8·       सातारा

·       सांगली

·       सोलापूर

उप सरव्यवस्थापक ,

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ,

बाजार समिती मल्टीपर्पज हॉल इमारत ,

कोल्हापूर -४१६००५

फोन नं – (०२३१)२६५०१६६

ईमेल – divkol@msamb.com

सारांश –

सदर योजनेची सविस्तर माहिती वरीलप्रमाणे देण्यात आली आहे . योजनेचा फायदा मिळवण्यासाठी व इतरांना मिळवून देण्यासाठी माहिती संपूर्ण वाचा आणि इतरांनाही शेअर करा .आणि योजनेबाबत काही प्रश्न असतील तर आमच्याशी कमेंट करून विचारू शकतात .

धन्यवाद !

FAQ –
  1. रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज कोण करू शकतात ?

– रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) योजनेंतर्गत राज्यातील नोंदणीकृत शेतकरी , उत्पादक कंपन्या व शेतमाल उत्पादकाच्या सहकारी संस्था या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि लाभ मिळवू शकतात .

2. रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) अर्ज कोठे करावा ?

–  रस्ते वाहतूक आंतर राज्य शेतमाल व्यापार अनुदान योजना -२०२४ (सुधारीत) साठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळा कडे अर्ज करावा तसेच त्या त्या जील्यासाठी सबंधित विभागाचे नाव आणि फोन नं आणि पत्ता दिला आहे तिथे संपर्क करावा .

 

 

 

Leave a comment