शेळी मेंढी पालन योजना -२०२५ sheli mendhi palan Yojana-ऑनलाइन अर्ज आणि मिळणारे अनुदान.
महाराष्ट्र शासनाची पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्यपूर्ण अशी शेळी मेंढी पालन योजना -२०२५ sheli mendhi palan Yojana स्वयं रोजगार उपलब्धी करिता आणि लाभार्थी गटाच्या उत्पन्न वाढीकरिता राबवली जाते . सदर योजना २०११-१२ पासून कार्यान्वित असून याअंतर्गत लाभधारकांना १० शेळ्या आणि १ बोकड किंवा १० मेंढ्या आणि नर १ मेंढा असा गट वाटप केला जातो.
तसेच योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी साठी ७५%राज्य शासनमार्फत आणि २५% स्वः हिस्सा किंवा बँकद्वारे कर्ज काढून भरणे अनिवार्य असेल .तसेच खुल्या व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी साठी ५०% राज्य शासनामार्फत आणि ५०%स्वतः भरणे किंवा बँक द्वारे कर्ज काढून भरणे आवश्यक आहे.
सदर योजनेच्या अटी व शर्ती ,ऑनलाईन अर्ज कसा करायचा,आवश्यक कागदपत्रे कोणती इत्यादीबाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रकारे पाहूया .

शेळी मेंढी पालन योजना -२०२५ sheli mendhi palan Yojana लाभार्थी निवडीचे निकष –
- दारिद्रय रेषेखालील लाभार्थी
- अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
- अल्प भूधारक शेतकरी (१ते२ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
- सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
- महिला बचत गटातील लाभार्थी(अंक १ ते ४ मधील)
पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यातील नागरिकांनकरिता सन २०२५-२०२६ राज्यस्तरीय ७५%अनुदान योजना – दोन दुधाळ गायी / म्हशीचे वाटप करणे.
पशुसंवर्धन खात्याची शेळी मेंढी पालन योजना-२०२५ मिळणारे अनुदानाची रक्कम /एका गटाची किंमत तपशील खालीलप्रकारे असेल.
अ.क्र | तपशील | दर (रक्कम रुपयात) | १० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात ) |
१ | शेळ्या खरेदी | ८,०००/- प्रति शेळी (उस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम ) | १०x८०००= ८०००० (१० शेळ्या) |
६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम ) | १०x ६,०००/-= (१० शेळ्या) | ||
२ | बोकड खरेदी | १०,०००/-एक बोकड (उस्मानाबाद/ संमनेरी जातीचा नर) | १०,०००/- (१ बोकड) |
८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम ) | ८,०००/- (१बोकड ) | ||
३. | शेळ्या व बोकडाचा विमा (तीन वर्षाकरिता) | १२.७५% (अधिक १८% वस्तू व सेवाकर ) | रु १३,५४५/- (उस्मानाबादी / संगमनेरी जातीसाठी) |
रु १०,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी ) | |||
४. | शेळ्यांचे व्यवस्थापन (खाद्य चाऱ्यावरील खर्च ) | लाभार्थीने स्वत: करणे अपेक्षित | |
एकूण खर्च | १,०३,५४५/-(उस्मानाबादी/संगमनेरी जातीसाठी) ७८,२३१/-(अन्य स्थानिक जातीसाठी) |
अ.क्र | तपशील | दर (रक्कम रुपयात) | १०मेंढ्या व १नर मेंढा (रक्कम रुपयात ) |
१. | मेंढ्या खरेदी | १०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ) | १,००,०००/- (१० मेंढ्या) |
८,०००/- प्रति मेंढी (द्ख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासम) | ८०,०००/-(१० मेंढ्या) | ||
२. | नरमेंढा खरेदी | १२,०००/- नरमेंढा (माडग्याळ) | १२,०००/-(१ नर मेंढा) |
१०,०००/- एक नर मेंढा (दख्खनी व अन्य स्थानिक जातीच्या नर) | १०,०००/- (१ नर मेंढा) | ||
३. | मेंढ्या व नर मेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी) | १२.७५%(अधिक १८% वस्तू व सेवाकर ) | रु १६,८५०/-(माडग्याळ जातीसाठी) |
रु १३,५४५/-(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी) | |||
४. | मेंढ्याचे व्यवस्थापण (खाद्य चाऱ्यावरील खर्च) | लाभार्थीने स्वत: करणे अपेक्षित | |
एकूण खर्च | १,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी) १,०३,५४५/-(दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी) |
एक गटाचे किमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे .
अ.क्र | गट | प्रवर्ग | एकूण किंमत | शासनाचे अनुदान | लाभार्थ्यांचा स्वहिस्सा |
१. | दख्खणी व अन्य स्थानिक जाती | अनु.जाती व जमाती | १,०३,५४५/- | ७७,६४९/- | २५,८८६/- |
शेळी मेंढी पालन योजनेची आवश्यक कागदपत्रे.

आवश्यक कागदपत्रे –
१ फोटो ओळखपत्राची सत्यप्रत
२. ८अ उतारा
३. सातबारा
४. अपत्य दाखला /स्व घोषणापत्र
५. आधारकार्ड.
६. रहिवाशी प्रमाणपत्र.
७. बँकखाते पासबुक सत्यप्रत.
८. रेशनकार्ड/कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटुंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.)
९.७-१२ लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र ,किंवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा .
१०. अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य).
११. दारिद्रय रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र. (असल्यास अनिवार्य)
१२. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१३. वय- जन्मतारखेचा पुरावा.
१४. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
१५.बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत.
१६. दिव्यांग असल्यास दाखला.
१७.रोजगार,स्वयं रोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत.
शेळी मेंढी पालन योजना -२०२५ sheli mendhi palan Yojana-sheli mendhi palan yojna online application( online अर्ज करण्याची पद्धत )
- अर्ज करण्याकरिता AH.MAHABMS या संकेतस्थळ वरती जाऊन पपुढीलप्रमाणे अर्ज प्रक्रिया करावी .
- अर्जदाराने अगोदर अर्जदार नोंदणी करावी.
- त्यानंतर योजनेसाठी अर्ज प्राप्त होईल तो संपूर्ण नचुकवता भरावा .
- प्रणालीद्वारे पात्र लाभार्थी यादी तयार असेल त्यानुसार प्राथमिक निवड होईल .
- निवड झाल्यानंतर अर्जदाराने कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य असेल .
- कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अंतिम निवड होईल आणि यादी online टाकली जाईल.
- त्यानंतर अर्जदाराने आपले नाव यादीत आले कि नाही हे चेक करावे.
महत्वपूर्ण टीप=
- शेळी मेंढी पालन योजना -२०२५ sheli mendhi palan Yojana योजनेंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश,आणि मराठवाडा विभागातील जिल्यात उस्मानाबादी व संगमनेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील .
- लाभार्थी निवडताना ३०% महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
- योजनेंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वस्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील .
घरकुल योजना -२०२५ प्रधानमंत्री आवास योजना –ग्रामीण Prdhanmantri Awas Yojana – Gramin योजनेंतर्गत रु. १,२०,०००/- अनुदान मिळवा.
निष्कर्ष :-
शेळी मेंढी पालन योजना -२०२५ sheli mendhi palan Yojana अंतर्गत शेतकरी वर्ग ,युवक ,महिला,दिव्यांग ,अनुसूचित जाती जमाती ,इतर मागास प्रवर्ग ,दारिद्रय रेषेखालील व्यक्तीया आणि वरील मुद्यांच्या आधारे योजनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे .त्यातील सर्व लाभधारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात .सदर योजनेबाबत इतर online अर्ज करण्याची पद्धत ,शेळी मेंढी पालन योजनेची आवश्यक कागदपत्रे, लाभार्थी निवडीचे निकष ,पशुसंवर्धन खात्याची शेळी मेंढी पालन योजना-२०२५ मिळणारे अनुदानाची रक्कम /एका गटाची किंमत तपशील याबाबत सविस्तर माहिती या लेखात देण्यात आली आहे .तरी सर्व मित्र परिवाराला विनंती की सदर माहिती चा लाभ आपण घ्यावा आणि इतरांना मिळण्यासाठी मदत करावी .
सदर योजनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे तरी ती माहिती इतरांबरोबर शेअर करा आणि योजनेबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकतात .
धन्यवाद !
FAQ :-
१. शेळी मेंढी पालन योजना -२०२५ sheli mendhi palan Yojana लाभार्थी निवडीचे निकष काय ?
⇒ दारिद्रय रेषेखालील लाभार्थी,अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यंतचे भूधारक ,अल्प भूधारक शेतकरी (१ते२ हेक्टर पर्यंतचे भूधारक),सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.),महिला बचत गटातील लाभार्थी(अंक १ ते ४ मधील)
२. शेळी मेंढी पालन योजना -२०२५ sheli mendhi palan Yojana online application कुठे करावे ?
⇒अर्ज करण्याकरिता AH.MAHABMS या संकेतस्थळ वरती जाऊन पपुढीलप्रमाणे अर्ज प्रक्रिया करावी .
३. शेळी मेंढी पालन योजना -२०२५ sheli mendhi palan Yojanaबाबत सविस्तर माहिती मिळवण्याकरीता शासन GR कुठे मिळेल ?
⇒ योजनेबाबत सविस्तर माहिती घेण्याकरिता शासनाचा GR येथे पहा .