मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra योजना काय आहे , पात्रता निकष ,लाभाचे स्वरूप इ माहिती घ्या आणि आत्ताच अर्ज करा आणि ३००० रु अर्थसहाय्य मिळवा .
नमस्कार मित्रांनो ,
आज आपण आजच्या या लेखात मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra या योजनेची माहिती घेणार आहोत तर सदर योजना महाराष्ट्र राज्यातील वय ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवन जगताना वयानुसार येणाऱ्या शारीरिक समस्या उदा -अपंगत्व ,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरने खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ केंद्र , योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वस्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जाणार आहे त्यासंबंधी चा शासन निर्णय दिनांक ६ फेबुरवारी २०२४ रोजी जाहीर केला आहे .
मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra या योजनेची उद्दिष्ट काय ,योजनेचे स्वरूप ,अर्थसहाय्य ,योजनेची अंमलबजावणी कशी केली जाईल ,पात्रता आणि निकष ,आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सविस्तर माहिती घ्यायची आहे का ? चला तर मग आज आपण या लेखात पुढीलप्रमाणे संबधित सविस्तर माहिती पाहूया .
मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra योजना काय आहे ?
मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra योजनेची माहिती घेणार आहोत तर सदर योजना महाराष्ट्र राज्यातील वय ६५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवन जगताना वयानुसार येणाऱ्या शारीरिक समस्या उदा – अपंगत्व ,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरने खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ केंद्र , योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वस्थ अबाधित ठेवण्यासाठी त्यांना प्रबोधन करणे आणि प्रशिक्षणकरिता एकवेळ एकरकमी रु.३०००/- पात्र लाभार्थ्याच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत बँक खात्यात थेट लाभ वितरण (DBT) प्रणालीद्वारे देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra सदर योजनेंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक कमजोरी किंवा दुर्बलता अशा सहाय्यासाठी साधने आणि उपकरणे खरेदी करता येतील उदा – चष्मा ,श्रवण यंत्र ,ट्रायपॉड,स्टिक व्हील चेअर ,फोल्डिंग वॉकर ,कमोड खुर्ची ,नि -ब्रेस ,लंबर बेल्ट ,सर्वाइकल कॅलर इ,यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवली जानार आहे त्यासंबधी चा शासन निर्णय दिनांक ६ फेबुरवारी २०२४ रोजी जाहीर झाला आहे.
सन २०११ च्या जंणगणनेनुसार महाराष्ट्रची एकूण लोकसंख्या ११.२४ कोटी त्यापैकी सद्यस्थितीत ६५ वर्षं आणि त्यावरील अंदाजित एकूण १०ते १२ टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे .त्यापैकी मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागत आहे .उदा –जास्तीत जास्त वयोवृद्धाना कानाने ऐकायलाच येत नाही .किंवा दिसत नाही .अशा सदर बाबींचा विचार करून शासनाने दारिद्रय रेषेखालील सबंधित दिव्यांग /दुर्बलग्रस्त जेष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने / उपकरणे पुरविण्यासाठी वयोश्री योजनेची सुरुवात केली आहे .
त्यानुसार जेष्ठ नागरिकांना सक्रीय पद्धतीने जीवन जगण्यासाठी किंवा जीवनात गीतीशिलता आणण्यासाठी तसेच त्यांना मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी हि संबधित उपकरणे दिली जाणार आहेत. त्याबरोबर त्यांच्या मानसिक किंवा कौटुंबिक स्वस्थ चांगले ठेवून त्यांच्यासाठी कुटुंबात आणि समाजात अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्याचे विचारात होते. त्त्यानुसार सदर योजना राबविली जाणार आहे.
सदर योजनेबाबत सविस्तर माहिती शासनाच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे .
मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –
- आधार कार्ड /मतदान कार्ड,
- राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स,
- पासपोर्ट फोटो,
- स्वयं –घोषणापत्र,
- शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली इतर कागदपत्रे .
मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukh yamantri Vyoshree Yojana Maharashtra योजनेसाठी लाभार्थीचे पात्रतेचे निकष –
- मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे वय ६५ वर्ष पूर्ण असावे. (दिनांक -३१/१२/२०२३ अखेर)
- आधार कार्ड असने गरजेचे आहे .आधार कार्ड नसेल तर त्यासाठी अर्ज केलेला असावा .आणि आधार नोंदणीची पावती असणे गरजेचे असेल .
- पुरावा म्हणून BPL रेशन कार्ड किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेंतर्गत किंवा इतर कोणत्याही पेंशन योजनेंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करावा .
- लाभार्थीचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु २ लाखाच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थीने स्वयं घोषणा पत्र सादर करणे आवश्यक असेल .
- सदर व्यक्तीने मागील ३ वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे चालणारे सार्वजनिक कार्यक्रमासहित कोणत्याही स्त्रोताकडून तेच उपकरण विनामुल्य प्राप्त केले नसावे.याबाबत लाभार्थीने तसे घोषणा पत्र सादर करणे अवश्यक राहील .
- पात्र लाभार्थ्याच्या बँकेच्या वैयक्तिक आधार सलंग्न बचत खात्यात रु.३०००/- थेट DBT द्वारे वितरीत झाल्यावर सदर योजनेंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्याचे देयक प्रमाणपत्र ३० दिवसाच्या आत संबधित सहाय्यक आयुक्त , समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टल वर ३० दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील .अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल .
- निवड केलेल्या जिल्यात लाभार्थ्याच्या संख्येपैकी ३०% महिला असतील .
मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra लाभाचे स्वरूप –
- शिबीर आयोजन –मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra सार्वजनिक आरोग्य विभागांमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र , उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत असंसर्ग जन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात अशाप्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्वेक्षण सोबत या योजनेच्या लाभार्थ्याची तपासणी करण्यात येईल .तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र ,मनस्वस्थ केंद्र , मनशक्ती केंद्र /प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल .
- सदर योजनेंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता / दुर्बल्तेनुसार सहाय्यभूत साधने / उपकरणे खरेदी करता येतील .उदा चष्मा ,श्रवण यंत्र ,ट्रायपॉड,स्टिक व्हील चेअर ,फोल्डिंग वॉकर ,कमोड खुर्ची ,नि -ब्रेस ,लंबर बेल्ट ,सर्वाइकल कॅलर इ,
- सदर योजनेस राज्य शासनाचे १०० % अर्थसहाय्य आहे .
- थेट लाभ वितरण (DBT) प्रणाली द्वारे रु .३०००/- च्या मर्यादेत निधी वितरण करण्यात येईल .
मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra योजनेची अंमलबजावणी-
- मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra सदर योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे अदा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , मंत्रालय , आयुक्त समाजकल्याण विभाग , पुणे आणि जिल्हा स्तरावरील अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल .
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग , योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण करेल .
- मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra आर्थिक वार्षिक अंदाजीत बजेट सदर योजनेकरिता वार्षिक अंदाजे रु ४८०.०० कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे .
मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra निष्कर्ष –
मुख्यमंत्री वयोश्री योजना – Mukhyamantri Vyoshree Yojana Maharashtra सदर योजनेची सविस्तर माहिती आजच्या या लेखात देण्यात आली आहे .तरी आम्ही आशा करतो कि सदर माहिती नक्कीच तुम्हाला आवडेल आणि योजनेचा लाभ घेण्यास मदत होईल .तरी आपणास विनंती कि हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि या योजनेबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच विचारू शकतात. आम्ही तुमच्या शंकांचे समाधान करण्याचा नक्कीच प्रयंत्न करू .
धन्यवाद !