प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ – २.० कनेक्शनसाठी Prdhanmantri Ujjavla Yojana आत्ताच अर्ज करा

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४- २.० कनेक्शनसाठी Prdhanmantri Ujjavla Yojanaभारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते.१४.२ किलो सिलेंडरसाठी रु. १६००/-दिले जातात आणि ५ किलो सिलेंडरसाठी रु ११५०/-देण्यात येतात या बाबत  सविस्तर माहिती मिळवा .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ सदर योजनेचा प्रारंभ भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी १ मे २०१६ रोजी उत्तर प्रदेश येथे या योजनेची घोषणा करून सुरुवात केली .पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाद्वारे ग्रामीण आणि वंचित कुटुंबाना एलपीजी सारखे स्वंयपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना एक महत्वकांशी  योजना म्हणून  सुरु केली . या योजनेंतर्गत गरीब कुटुंबाना ज्यांच्याकडे स्वंयपाकासाठी गॅस उपलब्ध नाही आणि आजही त्या त्या भागातील महिलांना लाकूड फाटा आणूननच स्वंयपाक करावा लागतो .त्यासाठी लागणारे अधिकचे कष्ट आणि धुरामुळे  महिलांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परीणाम यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे.

Table of Contents

पीएमयुवाय कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते.(१४.२ किलो सिलेंडर साठी रु. १६००/- दिले जातात, आणि ५ किलो सिलेंडर साठी रु ११५०/-देण्यात येतात

महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद  विभागामध्ये ८ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले .मार्च २०२० पर्यंत वंचित कुटुंबाना या योजनेंतर्गत ८ कोटी एलपीजी कनेक्शन देण्याचे उदिष्ट होते .स्वंयपाक करण्यासाठी  पारंपारिक पद्धतीचा चुलीचा वापर करून स्वंयपाक बनवला जातो .  ज्यामध्ये गोवऱ्या ,लाकूड ,कोळसा इत्यादीच्या वापरामुळे महिलांचे आरोग्य आणि पर्यावरणावर खूप मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होताना दिसतो .

सदर योजनेची सविस्तर माहिती आज आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत .चला तर मग योजनेचे उद्देश काय ? लाभार्थी कोण ? योजनेचे फायदे ,योजनेचे पात्रतेचे निकष , अर्ज कसा करायचा , यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ,अर्ज करण्यासाठी गॅस वितरक कोण आहेत ? याबाबत सविस्तर माहिती आपण पुढीलप्रमाणे घेणार आहोत .सदर योजनेबाबत सविस्तर  माहिती घेण्यासाठी  शेवटपर्यंत लेख वाचा .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४

प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजना (कुसूम) २०२३ – Pradhanmantri Sour Krushi Pamp Yojana (KUSUM)

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ उज्ज्वला योजना काय आहे ? 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ सदर योजना केंद्रसरकारद्वारे देशातील महिलांचे चुलीवर स्वंयपाक करण्यामुळे किंवा धुरामुळे होणारा त्रास आणि त्याचा  आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम इत्यादी बाबत प्रश्न सोडवण्यासाठी तसेच त्यांचे कष्ट कमी करण्यासाठी .पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाद्वारे ग्रामीण आणि वंचित कुटुंबाना एलपीजी सारखे स्वंयपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना  एक महत्वकांशी योजना म्हणून  सुरु केली . या योजनेंतर्गत गरीब कुटुंबाना ज्यांच्याकडे स्वंयपाकासाठी गॅस उपलब्ध नाही. अशा कुटुंबातील प्रौढ महिलांच्या नावे मोफत गॅस कनेक्शन दिले  जाते  .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ या योजनेंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना आणि गरीब कुटुंबाना या योजनेचा लाभ दिला जातो . आणि पीएमयुवाय कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते.(१४.२ किलो सिलेंडर साठी रु. १६००/- दिले जातात, आणि ५ किलो सिलेंडर साठी रु ११५०/-देण्यात येतात).

१ सप्टेंबर २०२३ पासून नवीन शासन निर्णयानुसार उज्जवला योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वर ४०० रु ची सबसिडी दिली जात आहे . २०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षासाठी ७६८०/- कोटी रु खर्च केले जातील . तसेच लाभार्थीच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जात आहे .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ योजनेची मुख्य घटक 

योजनेचे नावप्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४
योजनेची सुरुवात१ मे २०१६
विभागपेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय भारत सरकार
योजनेचा स्तरकेंद्र सरकार स्तरावर
लाभार्थीगरीब कुटुंबातील प्रौढ महिला
योजनेचा उद्देशगरीब कुटुंबाला मोफत एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे
लाभाचे स्वरूपपीएमयुवाय कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते.(१४.२ किलो सिलेंडर साठी रु. १६००/- दिले जातात, आणि ५ किलो सिलेंडर साठी रु ११५०/-देण्यात येतात.
अधिकृत websitewww.pmuy.gov.in
टोल फ्री क्रमांक·        १९०६ एल पी जी आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक .

·        १८००-२३३-३५५५ टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक .

·        १८००-२६६-६६९६ उज्ज्वला हेल्पलाईन क्रमांक

अर्जाची पद्धत·        online

·        offline

 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ योजनेचे उद्देश –

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ योजनेचा मुख्य उद्देश देशातील गरीब आणि दारिद्रय रेषेखालील कुटुंब यांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे आणि सुरक्षित जीवन निर्माण करून देणे .
  • वायुप्रदूषण कमी करणे आणि चुलीच्या धुरामुळे महिलांना होणारे त्रास आणि आजार कमी करणे .
  • महिलांचे जीवनमान आणि राहणीमान उंचावणे .
  • गरीब कुटुंबांचा आर्थिक विकास करणे.
  • महिलांसाठी स्वंयपाकातून वेळ वाचवून इतर कलाकौशल्य विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देणे .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ योजनेचे वैशिष्ट्ये  –

  • BPL कुटुंबाना मोफत गॅस क्नेशन आणि अनुदान दिले जाते .
  • तसेच मिळणारे अनुदान थेट महिलांच्या खात्यात हस्तांतरित केले जाते .
  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ योजनेच्या पहिल्या टप्प्याचे यश पाहता दुसरा टप्पाही सुरु केला आणि अर्थसंकल्पात त्याचा विस्तार देखील केला आहे .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ पात्रतेचे निकष –

  • प्रौढ महिला असावी .
  • अनुसूचित जाती व जमाती कुटुंबातील महिला सदस्याच्या नावे लाभ घेता येईल .
  • प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत चे लाभार्थी .
  • सर्वाधिक मागासवर्गीय संवर्गातील महिला .
  • अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी .
  • चहा आणि माजी चाहा मळा जमाती ,
  • वनवासी,
  • बेटावरील आणि बेटावरील रहिवासी,
  • एसईसीसी कुटुंबे,
  • १४ कलमी घोषने नुसार गरीब कुटुंब,
  • अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे असावे,
  • एकाच घरात इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावे .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ आवश्यक कागदपत्रे –

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४
  • केवाईसी,
  • रेशन कार्ड,
  • स्थलांतरीत अर्जदारासाठी स्वयं- घोषणापत्र,
  • आधार कार्ड,
  • पत्याचा पुरावा,
  • बँक खाते तपशील.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ योजनेचे फायदे –

  • प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ पीएमयुवाय कनेक्शनसाठी भारत सरकारद्वारे रोख मदत करण्यात येते.(१४.२ किलो सिलेंडर साठी रु. १६००दिले जातात आणि ५ किलो सिलेंडर साठी रु ११५०.देण्यात येतात.
  • सिलेंडर साठी सुरक्षा ठेव १४.२ किलो सिलेंडर साठी १२५० रु .
  • ५ किलो सिलेंडर साठी ८०० रु .
  • प्रेशर रेग्युलेटर -१५० रु .
  • एलपीजी नळी -१०० रु
  • घरगुती गॅस ग्राहक कार्ड -२५ रु .
  • तपासणी/ मांडणी /प्रत्याषिक शुल्क -७५ रु .
  • पहिले एलपीजी रिफील आणि स्टोव्ह ( होट प्लैट)दोन्ही विनामुल्य प्रदान केले जातील .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ अंतर्गत गॅस वितरक बाबत माहिती –

  1. Indian Oil / Indane
  2. Bharatgas
  3. HP GAS

अर्जदार व्यक्ती वरीलपैकी कोणत्याही वितरकाकडे अर्ज करून किंवा online पोर्टलद्वारे अर्ज करू शकतात .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा  ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी online आणि offline या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ offlineपद्धत
  • सदर योजनेची अर्जाची प्रत घ्या .
  • सदरअर्ज विहित नमुन्यात पूर्ण भरा. आणि त्याबरोबर सर्व कागदपत्रे जोडा.
  • तुमच्या जवळच्या गॅस एजन्सी किंवा  जो वितरक उपलब्ध असेल त्याच्याकडे अर्ज आणि सर्व कागदपत्रे दाखल करा .
  • संबधित वितरक अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करेल आणि त्यानंतर तुमचे एलपीजी गॅस कनेक्शन  १५ दिवसाच्या आत तुम्हाला  उपलब्ध करून देईल .
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ online पद्धत –
  • सदर योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर उज्जवला योजनेच्या अधिकृत website वर जा .
  • त्यानंतर होम पेज open होईल .
  • होम पेज वरती Apply करा आणि  PMUY connection या option वरती किल्क करा .
  • तुम्हाला ३ वितरकाची list दिसेल त्यापैकी तुमच्या जवळच्या भागात जे उपलब्ध असेल त्यापैकी निवडा.
  • त्यानंतर नवीन page open होईल.
  • जे open झालेले page असेल त्यावरती तुम्हाला वितरकाचे नाव तसेच तुमचे नाव ,तुमचा पत्ता, मोबाईल क्रमांक, इत्यादी सविस्तर माहिती भरायची आहे.
  • त्यानंतर सर्व लागणारी कागदपत्रे त्या form बरोबर अपलोड करायाची .
  • त्यानंतर Apply या पर्यायावर किल्क करा .वरील दोन्ही प्रकारे तुम्ही सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी form भरू शकतात .

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ निष्कर्ष –

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ सदर योजनेची सविस्तर माहिती आम्ही आजच्या या लेखात दिली आहे.तरी सबंधित माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि या माहितीचा उपयोग तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना होईल .तर मग हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा .आणि हो तरी देखील सदर योजने बाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी इमेल किंवा कमेंट द्वारे विचारू शकतात. त्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू .

धन्यवाद !

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४  FAQ-
1 .प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ योजना कोणासाठी आहे ?

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ सदर योजनेंअंतर्गत गरीब कुटुंबातील प्रौढ महिलांसाठी स्वंयपाकाचा गॅस मोफत दिला जातो .

२.प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४  योजनेंतर्गत अनुदान कोणाकोणाला मिळेल ?

– गरीब /दारिद्रय रेषेखालील कुटुंब SC ,ST  प्रवर्गातील प्रौढ महिला , अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी , प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण चे लाभार्थी , वनवासी ,चहा आणि माजी चहा च्या बागेतील जमाती इत्यादी लोकांना अनुदानाचा लाभ मिळेल .

३. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ अंतर्गत एक वर्षात किती सिलेंडर मिळतात ?

– प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- २०२४ योजनेतील प्रत्येक लाभार्थी पात्र कुटुंबाला अनुदानित दरामध्ये १२ सिलेंडर दिले जातात .आणि जर जास्त सिलेंडर घ्यायचे असतील तर जो काही इतर लाभार्थींना सिलेंडरचा दर असतो तो भरावा लागेल .

 

 

 

Leave a comment